व्यवसाय कर्ज योजना:वीणा तारण वीणा जामीन मिळवा कर्ज शासनाकडून बेरोजगार तरुणांच्या हाताला काम मिळावे म्हणून अनेक प्रकारे मदत केली जाते. आजच्या वाढत्या बेरोजगारीचा विचार केला तर प्रत्येक तरुणाला नोकरी मिळणे अतिशय कठीण झाले आहे. बेरोजगारीवर मत करण्यासाठी आणि तरुणांच्या हाताला काम मिळवून देण्यासाठी शासन विविध योजनाद्वारे अल्प व्याजदरात कर्ज तरुणांना उपलब्ध करून देते. प्रत्येक बेरोजगाराला व्यवसाय करता यावा आणि नोकरी माघाणारे हात नोकरी देणारे बनावेत, असा उद्देशाने शासन कर्ज योजना राबवीत असते. लाभार्थ्याला व्यवसायासाठी अनेक कर्ज योजना आहेत, त्यातील महत्वाच्या योजना विषयी आपण या आर्टिकल मध्ये जाणून घेणार आहोत. व्यवसाय कर्ज योजना कोणकोणत्या आहेत आणि त्या योजनाद्वारे तुम्ही कर्ज घेवून तुम्ही कसा व्यवसाय उभा करू शकता हे आपण पाहू.
व्यवसाय कर्ज योजना कोणत्या आहेत
केंद्र शासनाकडून आणि महाराष्ट्र शासनाकडून बेरोजगार तरुणांना स्वतः च्या पायावर उभे राहता यावेत, आणि नोकरी माघणारी व्यक्ती नोकरी देणारी बनावी यासाठी शासन अल्प व्याज दरात कर्ज मिळवून देणाऱ्या अनेक योजना राबवीत असते. व्यवसाय करण्यासाठी कर्ज माघणाऱ्या लाभार्थ्याला अतिशय अल्प व्याज दरात कुठलेही तारण आणि जामीनदार न माघता कर्ज उपलब्ध करून देते.
व्यवसायासाठी अल्प व्याजदरात कर्ज उपलब्ध करून देणाऱ्या योजना खालील प्रमाणे आहेत.
- क्रेडीट ग्यारंटी फंड योजना CGTMSE ( सूक्ष्म आणि लघु उद्योगांसाठी पत हमी योजना )
- प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना
- महाराष्ट्र राज्य लघु उद्योग महामंडळ
- SIDBI कर्ज योजना
वरील योजना मधून शासन बेरोजगार लाभार्थ्याला व्यवसायासाठी अल्प व्याजदरात कर्ज दते, कोणतेही तारण किंवा जामीनदार ना माघता सदरील योजनेतून कर्ज दिले जाते.
क्रेडीट ग्यारंटी फंड योजना CGTMSE ( MSME सूक्ष्म आणि लघु उद्योगांसाठी पत हमी योजना )
शासनाच्या MSME अंतर्गत व्यवसायासाठी अल्प दरात कर्ज योजना राबविल्या जातात. MSME अंतर्गतच CGTMSE ज्यांच्याकडे व्यवसाय करण्याची पात्रता आहे पण भांडवल नाही, अशा लाभार्थ्याला विना तारण आणि विना जामीनदार कर्ज उपलब्ध करून देवून शासन त्याला मदतीचे हात देते. CGTMSE सूक्ष्म व लघु उद्योग उभारणीसाठी कर्जाची हमी देते, जने करून व्यवसाय निर्माण होतील आणि इतर बेरोजगारांना त्यातून रोजगार निर्माण होईल.
भरत सरकारने सूक्ष्म व लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाने (एम एस एम ई ) क्रेडीट वितरण प्रणाली मजबूत करण्यासाठी आणि एम एस एम ई शेत्राला कर्ज प्रवाह सुलभ करण्यासाठी क्रेडीट हमी योजना (CGS) सुरु केली. या योजनेची अंमल बजावणी करण्यासाठी भरत सरकार आणि SIDIBI ने सूक्ष्म आणि लघु उद्योगासाठी क्रेडीट ग्यारंटी फंड (CGTMSE) ची स्थापना केली.
प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना
केंद्र सरकारकडून व्यवसाय साठी कर्ज उपलब्ध करून देणारी हि एक अतिशय सुलभ योजना आहे. या योजनेद्वारे आधीपासून व्यवसाय असणाऱ्या लाभार्थ्याला व्यवसाय वाढविण्यासाठी आणि नवीन लाभार्थ्याला नवीन व्यवसाय टाकण्यासाठी अल्प दरात आणि विना तारण विना जामीनदार कर्ज दिले जाते.
मुद्रा लोन कर्जाचे प्रकार
शिशु | किशोर | तरुण |
50,000 | 50,000 | 5,000,00 |
5,000,00 | 10,000,00 |
महारष्ट्र राज्य लघु उद्योग महामंडळ
महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र राज्य लघु उद्योग महामंडळाकडून व्यवसाय सुरु करू इच्छिणाऱ्या लाभार्थ्यांसाठी अल्प दरात कर्ज पुरवठा केला जातो. महाराष्ट्र राज्य लघु उद्योगाच्या मंडळाकडे अर्ज केल्या नंतर मंडळाच्या समिती मार्फत दाखल केलेल्या प्रस्तावावर समितीची बेठक होऊन सदरील प्रस्तावाला मान्यता देण्यात येते. व्यवसाय कर्ज योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला महामंडळाकडे अर्ज करावा लागतो.
SIDBI व्यवसाय कर्ज योजना
SIDBI हि राष्ट्रीय स्तरावरची संथा असून केंद्र शासनाच्या अखत्यारीत संस्थाचा कारभार चालतो. SIDBI आणि इतर केंद्र पुरस्कृत संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने व्यवसायासाठी कर्ज वाटप केले जाते. अधिक माहितीसाठी SIDBI च्या पोर्टल ला भेट दया.
Conclusion
व्यवसाय कर्ज योजना:वीणा तारण वीणा जामीन मिळवा कर्ज सदरील आर्टिकल मध्ये आम्ही आपल्याला व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करून देणाऱ्या शासनाच्या योजनान बद्दल माहिती पहिली. या लेखाच्या मदतीने तुम्ही व्यवसायासाठी शासनाच्या योजनेतून कर्ज मिळवू शकता. आम्ही दिलेली माहिती आवडली असल्यास शेअर करा.