Annasaheb Patil Loan Apply Online: अण्णासाहेब पाटील ऑनलाईन कर्ज नोंदणी

Annasaheb Patil Loan Apply Online – आर्थिकदृष्ट्या मागास घटकापर्यंत पोहचून बेरोजगार तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, आणि त्यांना सक्षम बनविणे. आर्थिकदृष्ट्या मागास घटकांचा सामाजिक विकास घडवून आणणे आणि त्यांचा समाजिक स्तर उंचावणे. या उद्देशाने शासनाने अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाची स्थापना केलेली आहे. या महामंडळा अंतर्गत बेरोजगार तरुणांना रोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातात. रोजगारासाठी तरुणांना अल्प व्यादरात कर्ज उपलब्ध करून दिले जाते.अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाकडून व्यवसायिक वाहन खरेदीसाठी, बेरोजगारांना कर्ज दिले जाते. खरेदी केलेल्या व्यावसायिक वाहनावरील व्याज लाभार्थ्याला परत केले जाते. पहिले अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाकडून कर्ज काढण्यासाठी कागदपत्रे घेवून मंडळाच्या ऑफिसला खेटे मारावे लागायचे, पण आता मंडळाचे अधिकृत पोर्टल आले असून या द्वारे तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकतात.Annasaheb Patil Loan Apply Online

Annasaheb Patil Loan Scheme / अण्णासाहेब पाटील कर्ज योजना

महाराष्ट्र शासनाच्या अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ अंतर्गत आर्थिक दुर्बल घटकाच्या सामाजिक व आर्थिक विकास घडवून आणण्यासाठी अल्प व्याजदरात कर्ज योजना राबविली जाते. बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी महामंडळ व्यवसायिक वाहन खरेदीसाठी लोन उपलब्ध करून देते.

महामंडळाकडून व्याज परतावा योजना राबविल्या जातात. 1) वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना 2) गट कर्ज व्याज परतावा योजना 3) गट प्रकल्प कर्ज योजना प्रामुख्याने या तीन योजना कर्ज देण्यासाठी महामंडळाकडून राबविल्या जातात.

1) वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना

लाभार्थी हा स्वतः च्या व्यवसायासाठी व्यावसायिक वहान खरेदी करत असेल तर त्याला सदरील योजनेतून अर्ज करता येतो. महामंडळ सदरील योजनेतून लाभार्थ्याला कर्ज रु. 10 लाखापर्यंत उपलब्ध करून देते, व्याज परतावा कालावधी हा जास्तीत जास्त 5 वर्षाचा असतो. महामंडळाकडून व्याजाचा दर द.सा.द.शे. १२% नुसार असतो. या रकमेतून जास्तीत जास्त रु. 3 लक्ष रुपये व्याज परतावा म्हणून लाभार्थ्याला मिळतात.

2) गट कर्ज व्याज परतावा योजना

ग्रामीण अथवा शहरी भागात बेरोजगार तरून एकत्र एउन बचत गट स्थापन करून, किंवा एखाद्या संस्थे मार्फत एखादा व्यवसाय सामुहिक रित्या करीत असतील त्या लाभार्थ्यांना या योजनेतून कर्जाची मागणी करता येते. या योजनेतून लाभार्थ्याला कर रु. 10 लाख किंवा व्यावसायिक मागणीच्या हिशेबाने कर्ज दिले जाते. व्याज परतावा हा जास्तीत जास्त 5 वर्षासाठी असेल. आणि व्याजदर द.सा.द.शे. १२% नुसार असतो.

3) गट प्रकल्प कर्ज योजना

बचत गट, संस्था यांच्या मार्फत एखाद्या प्रकल्प उद्योगासाठी कर्ज मागणी करीत असेल तर प्रकल्प अहवाल नुसार देय असलेली रक्कम किंवा रु. 11 लाख एवडी रक्कम महामंडळाकडून लाभार्थ्यांना देय असेल. व्याज परतावा हा जास्तीत जास्त 5 वर्षासाठी असेल. आणि व्याजदर द.सा.द.शे. १२% नुसार असतो.

✅👉🏻 www mahabocw in renewal online: बांधकाम कामगार ऑनलाईन रिनीवल

Annasaheb Patil Loan Apply Online: अण्णासाहेब पाटील ऑनलाईन कर्ज नोंदणी

Annasaheb Patil Loan Apply Online फॉर्म भरण्यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ यांनी एक पोर्टल निर्माण करून दिले असून आता अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेसाठी online अर्ज करता येणार आहे. या योजनेसाठी तुम्ही Online अर्ज तुम्ही कसा करू शकता ते आपण पाहणार आहोत.

Annasaheb Patil Loan Apply Online Process

अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेसाठी Online अर्ज करण्यासाठी सर्व प्रथम तुम्हाला महामंडळाच्या स्वयंम पोर्टलवर जावे लागेल. https://udyog.mahaswayam.gov.in या पोर्टलवर गेल्यावर उजव्या कोपऱ्याच्या चौकटीत तुम्हाला नोंदणी म्हणून पर्याय दिसेल त्यावर क्लिक केल्या नंतर तुमच्या समोर नवीन सदस्य नोंदणी म्हणून लिंक दिसेल त्यावर तुम्हाला क्लिक करायची आहे.Annasaheb Patil Loan Apply Online

नवीन सदस्य नोंदणी वर क्लिक केल्या नंतर तुमच्या समोर नवीन वापरकर्ता नोंदणी म्हणून नवीन पेज Open होईल. या पेज वर तुम्हाला तुमचे पूर्ण नाव  तुमची जन्म तारीख, तुमचा आधार नंबर आणि तुमच्या आधार ला लिंक असलेला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. त्या नंतर कॅप्चा भरून Next वर क्लिक करायचे आहे.annasaheb patl loan apply online

वरील फॉर्म पूर्ण भरून पुढे या बटनावर क्लिक करताच तुमच्या आधार कार्डला लिंक असणाऱ्या मोबाईल नंबरवर सहा अंकी OTP  येईल ती तुम्हाला पुढील रकान्यात भरायची आहे. OTP भरून पुष्टी करताच तुमच्या समोर नवीन फॉर्म Open होईल.Annasaheb Patil Loan Apply Online

Annasaheb Patil Loan Apply Online

सदरील फॉर्म तुम्ही भरलेल्या आधार तपशिलाच्या माहितीच्या आधारे अपडेट असेल या मध्ये तुमच्या आधार वरील काही माहिती आपोआप येईल बाकीची माहिती तुम्हाला भरावी लागेल.

वैयक्तिक माहिती

  • तुमच्या आईचे नाव
  • तुमचा जिल्हा
  • तुमचा तालुका
  • शहर/गाव
  • पिनकोड
  • धर्म
  • जातीचा वर्ग
  • उपजातीचा विभाग
  • मातृभाषा
  • वैवाहिक स्थिती

इत्यादी वैयक्तिक माहिती तुम्हाला  फॉर्म वर भरायची आहे.

संपर्काची माहिती

  • तुमचा मोबाईल नंबर आपोआप येईल
  • फोन नंबर भरायचा आहे
  • ईमेल पत्ता भरायचा आहे
  • तुमचा Username आणि Password तुम्हाला तयार करून टाकायचा आहे.

वरील सर्व माहिती भरून झाल्या नंतर तुम्हाला पिवळ्या रकान्यात दिसणारे बटन क्लिक करायचे आहे. आता तुमची नोंदणी पूर्ण झालेली आहे. पिवळे बटन क्लिक केल्या नंतर तुम्हाला मिळालेल्या Username आणि Password च्या मध्येमातून मुख्ये पृष्ठ वर येऊन Username , Password आणि कॅप्चा टाकून लॉग-इन करायचे आहे.

लॉग-इन केल्या नंतर तुम्ही तुमचा पुढील फॉर्म भरून आणि कागदपत्रे अपलोड करून Annasaheb Patil Loan साठी Online Apply करू शकता.

✅👉🏻 MahaDBT Post Matric Scholarship: मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजना

Conclusion

Annasaheb Patil Loan Apply Online: अण्णासाहेब पाटील ऑनलाईन कर्ज नोंदणी या लेखामध्ये आपण अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेसाठी ऑनलाईन प्रोसेस पहिली. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ मार्फत राबविल्या जाणाऱ्या कर्ज योजनांसाठी आता महामंडळाकडून ऑनलाईन पोर्टल तयार करण्यात आले आहे. या पोर्टलवरून अण्णासाहेब कर्ज योजनेचा लाभ घेता येतो. आम्ही दिलेली माहिती आवडली असल्यास आपल्या मित्रांना शेअर करा.

🟢🔵🟣  आमच्या सोशल मीडिया ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा.

Scroll to Top