Mukhyamantri Tirth Yatra Yojana: राज्यातील जेष्ठ नागरिकांना मोफत मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना आपल्या देशात अनेक धर्म, पंथाचे लोक राहतात. महाराष्ट्र तर संतांची भूमी म्हणून ओळखल्या जाते. महाराष्ट्र तर संतांची भूमी म्हणून ओळखली जाते, अनेक साधू संत या महाराष्ट्राच्या पावन भूमी मध्ये जन्माला आलेले आहेत. महाराष्ट्रात इतर धर्मियांच्या अनुयायी सोबतच वारकरी संप्रदायाच्या भाविक लोकांची संख्या हि खूप आहे. भक्ती मार्गाची परंपरा महाराष्ट्रात शेकडो वर्षाची आहे. हिंदू धर्मात अनेक तीर्थस्थळ आहेत, जेथे लोक भक्तिभावाने दर्शनासाठी जातात. हिंदू धर्मीया बरोबरच इतर धर्मियांचे हि तीर्थस्थळ आहेत जेथे ते जातात. वयाच्या ६० वर्षांनंतर अनेकांना हि यात्रा सहज शक्य होत नाही. अशा राज्यातील जेष्ठ नागरिकांसाठी महाराष्ट्र शासनाने ‘मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना’ सुरु केली आहे. या योजनेबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.
Mukhyamantri Tirth Yatra Yojana/
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना
सर्वच धर्मातील लोकांमध्ये पुण्यकर्म म्हणून तीर्थक्षेत्री जाण्याची इच्छा असते, पण परिस्थिती मुळे म्हणा किंवा सोबत कोणी नसल्यामुळे तीर्थ यात्रा होऊ शकत नाही. राज्यातील जेष्ठ नागरिकांना भारतातील तीर्थस्थळी जाऊन मनशांती आणि अध्यात्मिक पातळी गाठता यावी यासाठी शासनाने महाराष्ट्रातील सर्वधर्मातील लोकांसाठी Mukhyamantri Tirth Yatra Yojana सुरु केलेली आहे. या योजनेमध्ये भारतातील सर्व प्रमुख तीर्थस्थळाचा समावेश असून आपल्या सोयीने तीर्थस्थळाची निवड करणे शक्य होणार आहे.
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना पात्रता
- सदर योजनेचा लाभार्थी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असावा.
- लाभार्थ्यांचे वय हे ६० वर्षांपेक्षा कमी नसावे.
- लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे रु. २.५० लाखापेक्षा जास्त असावे.
अपात्रता
- ज्याच्या कुटुंबातील सदस्य आयकर दाता आहे.
- ज्याांच्या कुटुांबातील सदस्य शासकीय कर्मचारी म्हणून कार्यरत आहे.
- ज्याांच्या कुटुांबातील सदस्य विद्यमान किंवा माझी खासदार/आमदार आहे.
- ज्या लाभार्थ्यांच्या कुटुंबातील सद्याच्या नावाने चारचाकी वाहन आहे, असे लाभार्थी या योजनेला अपात्र असतील ( ट्रॅक्टर वगळून ).
- प्रवासासाठी शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या सक्षम असणे गरजेचे आहे. लाभार्थी कोणत्याही संसर्गजन्य रोगाने त्रस्त नसावा.
- अर्जा सोबत लाभार्थ्याला वैधकीय आदिकाराचे निरोगी आणि प्रवासासाठी सक्षम असल्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
- अर्जदाराने अर्ज करतांना कोटी माहिती दिलेली आढळल्यास कोणत्याही शनी या योजनेतून अपात्र करण्यात येईल.
✅👉🏻 माझी लाडकी बहीण योजना Online: अर्ज करा तुमच्या मोबाईलवरून
योजनेतून मिळणारा लाभ
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना या योजनेतून राज्यातील जेष्ठ नागरिकांना तीर्थ स्थळाची यात्रा करण्यासाठी राज्य शासनाकडून आर्थिक मदत मिळणार आहे. या योजनेतून लाभार्थ्याला निर्धारित तीर्थ स्थळापेक्षा एका स्थळासाठी रु. ३०,००० हजार इतकी रक्कम मिळणार आहे. हा लाभ फक्त एक वेळेसाठीच असेल.
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना कागदपत्रे
- या लाभासाठी ऑनलाईन अर्ज.
- लाभार्थ्यांचे आधार कार्ड / रेशन कार्ड.
- महाराष्ट्र राज्यातील अधिवास प्रमाणपत्र किंवा जन्म दाखला.
- लाभार्थ्यांच्या कुटुंबाचा उत्पन्नाचा दाखला किंवा पिवळे रेशनकार्ड किंवा केशरी रेशन कार्ड.
- वैद्यकीय प्रमाणपत्र.
- पासपोर्ट साईज फोटो.
- जवळच्या व्यक्तीचा मोबाईल नंबर.
- योजनेच्या अटी व शर्थी मान्य असल्याचे हमीपत्र.
अर्ज कसा करायचा
लाभार्थ्याला स्वतः आपले आधार कार्ड आणि रेशन कार्ड सोबत घेऊन सेतू सुविधा केंद्रावर ऑनलाईन अर्ज करायचा आहे.
तीर्थ क्षेत्राची यादी पाहण्यासाठी पुढील वेबसाईट लिंकवर क्लिक करून संपूर्ण GR पहा.
✅👉🏻मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना: शेवटच्या अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आलेली हि योजना कशी आहे
Conclusion
Mukhyamantri Tirth Yatra Yojana: राज्यातील जेष्ठ नागरिकांना मोफत मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना या blog मध्ये आपण मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना या बद्दल संपूर्ण माहिती पहिली. राज्य शासनाने जेष्ठ नागरिकांसाठी सुरु केलेली Mukhyamantri Tirth Yatra Yojana ही तीर्थ दर्शन करण्यासाठी अत्यन्त उपयुक्त असून यातून गरीब कुटुंबांना ही आता तीर्थ यात्रा करता येणार आहे. माहिती आवडली असल्यास आपल्या मित्रांना आणि नातेवाईकांना अवश्य शेअर करा. अशाच नवीन माहितीसाठी आमच्या सोशल मीडिया ग्रुप मध्ये सामील व्हा.
आमच्या सोशल मीडिया ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा.