मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना 2024: 7.5 HP कृषी पंपांना मोफत वीज मिळणार : महाराष्ट्र शासन अनेक लोकहिताच्या योजना लोकांसाठी आणत आहे. मुख्यामंत्री माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री लाडका बाऊ योजना आणि आता शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना याची घोषणा नुकतीच मुख्यमंत्र्यांनी केली आहे. शेतकऱ्यांसाठी नेहमी भेडसावणारा प्रश्न हा विजेचा आहे. या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री यांनी सदरील योजनेची घोषणा केली आहे. या योजनेतून शेतकऱ्यांना मोफत योजना देण्याचे नियोजन आहे. या योजनेच्या मध्येमातून शेतकऱ्यांवरील विजेचा भार कमी होणार आहे. येणाऱ्या अतिरिक्त वीजबिलाच्या भारतातून शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. हि कशी आहे ते आपण पुढे पाहणार आहोत.
मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना २०२४
योजनेचे स्वरूप :
महाराष्ट्र राज्य नियामक आयोगाच्या निर्देशानुसार संपूर्ण राज्यात कृषी वाहिन्यांवरील शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना रात्रीच्या वेळी 10/8 तास किंवा दिवसा 8 तास थ्री फेज विजेची उपलब्धता चक्राकार पद्धतीने करण्यात येते. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांवर येणाऱ्या वीज बिलाचा भार उचलण्यासाठी शासनाने राज्यातील 44 लाख 3 हजार शेतकऱ्यांच्या 7.5 अश्वशक्ती क्षमतेपर्यंतच्या शेतीपंपांना पूर्णतः मोफत वीज पुरवली जाणार आहे. यासाठी साधारण 14 हजार 760 कोटी रुपये अनुदान स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेचा कालावधी :
ही योजना पाच वर्षांसाठी म्हणजेच एप्रिल 2024 ते मार्च 2029 पर्यंत राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे. परंतु 3 वर्षांच्या कालावधीनंतर या योजनेचा आढावा घेवून पुढील कालावधीत योजना राबविण्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.
पात्रता :
महाराष्ट्रातील 7.5 HP पर्यंतच्या वीजभार मंजूर असणाऱ्या कृषी पम्प धारकांना सदरील योजनेचा लाभ घेता येणार आहे. शेतकऱ्यांना रात्री 10/8 तास किंवा रात्री 8 तास मोफत वीज देण्यात येणार आहे.
सदरील योजनेची घोषणा करण्यात आलेली आहे. या योजनेचा GR आल्या नंतर सदरील योजना महाराष्ट्रात लागू होऊ शकते. शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचा असणारा वीज प्रश्न सुटला तर शेतकऱ्यानसाठी फायद्याचे राहील. मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना 2024 या योजनेचा GR येताच या Blog द्वारे उपडेट दिले जाईल.
आमच्या सोशल मीडिया ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा.