Dairy Farming हा भारतातील भरपूर उत्पन्न आणि मागणीला असलेला व्यवसाय आहे. लोकसंख्याच्या मानाने उपलब्ध असलेली दुधाची आकडेवारी खूप कमी आहे . भारतात आज दुधाचा तुडवडा आहे. अशा परिस्थितीत दुग्ध व्यवसाय हा खूप सारा पैसा निर्माण करून देणारा व्यवसाय आहे . कमी लागत मध्ये आणि आपल्या उपलब्ध असणाऱ्या शेतात तुम्हा हा व्यवसाय सुरु करू शकतात. आज ग्रामीण भागात या व्यवसायाला अनुकूल असे वातावरण आहे. आणि शासनाकडून अनेक दूध डेअरी सुरु करण्यात आलेल्या आहेत . त्यामुळे दूध विकण्यासाठी शहराच्या ठिकाणी जाण्याची आवश्यकता नाही. आज आपण या blog मधून दुग्ध व्यवसाया विषयीचे सर्व बारकावे समजून घेणार आहोत.
Dairy Farming: दुग्ध व्यवसायातून कमवा एक लाख रुपये महिना
Dairy Farming ची सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला त्या व्यवसाया विषयी पूर्ण पूर्ण माहिती असणे असणे आवश्यक आहे. तुम्ही किती पशु पासून या व्यवसायाला सुरुवात करणार यावर तुमचे नियोजन आणि येणारा खर्च अवलंबून असतो. या व्यवसायासाठी अत्यंत महत्वाचे म्हणजे दुग्ध पशूंची निवड करणे. दुधाच्या पशूंची निवड करतांना त्यांची दूध क्षमता आणि लागणार चारा या विषयी माहिती असणे आवश्यक आहे, त्याच बरोबर वातावरणाच्या अनुषंगाने दुधाळ पशूंची निवड करणे हेही खूप महत्वाचे असते. तुमच्याकडील वातावरणात कोणत्या जातीची भरपूर दूध देणारी म्हैस तग धरू शकते, किंवा तुमच्याकडील वातावरण कोणत्या जातीच्या म्हशीला अनुकूल आहे. हे पाऊणचं त्या जातीची म्हैस निवडणे फायद्याचे ठरते .
आजचा दुधाचा लिटरचा भाव ४ ० ते ५ ० रुपये आहे, हे रेट पहिले तर दुग्ध व्यवसाय भरपूर नफा कमवून देणारा व्यवसाय आहे. अगदी २ ते ३ कामगारांत चालणार हा व्यवसाय तुम्हाला महिन्याला एक लाख ते दीड लाख रुपये कमवून देऊ शकतो.
✅👉🏻 Nucleus Budget Scheme/नुक्लिअस बजेट योजना ८५% अनुदानावर आदिवासींसाठी वैयक्तिक लाभाच्या योजना
दुग्ध व्यवसायासाठी दूध देण्याची क्षमता आणि वातावरणानुसार म्हैशींची निवड
आपल्या देशात अनेक जातीच्या दूध देणाऱ्या म्हशी आढळतात. वेगवेगळ्या वातावरणाशी जुळवून घेऊन दुधाचे उत्पन्न देणाऱ्या म्हशी आहेत, त्यातील काही जातींची माहिती आपण खाली पाहणार आहोत .
१ ) मुर्रा जातीची म्हैस
मुर्रा जातीची म्हैस हि लोकप्रिय असणारी जात आहे , जास्तीत जास्त दूध देणारी आणि सर्व वातावरणात जुळवून घेणारी म्हशींची हि जात आहे. त्यामुळे दुग्ध व्यवसायासाठी या जातीच्या म्हशींची विशेष पसंती आहे.
- दुधाची क्षमता : – १ ७ ० ० ली. ते १ ८ ५ ० लिटर
- भोगौलिक क्षेत्र :- हरियाणा रोहतक , हिसार आणि जिंद जिल्हा , पंजाबच्या नभ आणि पटियाला या भागात विशेषतः या म्हशी जास्त प्रमाणात आढळतात .
- रंग :- गडद काळा
- शिंगे :- वळली आणि लहान गोलाकार असतात .
✅👉🏻 पशुसंवर्धन विभाग योजना / वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी असा करा अर्ज
२ ) पंढरपुरी
महाराष्ट्रात आढळणारी हि म्हशींची जात आहे, उष्णकटिबंध भागात आढळणारी हि जात अतिशय काटक स्वरूपाची असते. १ २ -१ २ महिने दूध देणारी हि म्हशींची जात आहे. कमी आणि मिळेल त्या चाऱ्यावर दुधाचे उत्पन्न देणारी अत्यंत फायदेशीर अशी पंढरपुरी म्हशी ची जात ओळखली जाते.
- भोगौलिक क्षेत्र:- महाराष्ट्रातील सोलापूर, कोल्हापूर, रत्नागिरी यासारख्या भागात या जातीच्या म्हशी आढळतात. म्हशीचे नाव सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर वरून पंढरपुरी पडले आहे .
- दूध क्षमता :- १ ७ ० ० ते १ ८ ० ० लिटर. ३ ० ५ दिवस सलग दूध देणारी जात हे वैशिष्ट्य
- रंग :- काळा
- शिंगे :- लांब ४ ५ ते ५ ० से. मी.
- हवामान :- दुष्काळी व कोरड्या हवामान असलेल्या भागात हि म्हैस उत्तम आहे .
✅👉🏻 आदिवासी लाभार्थींना दुधाळ म्हशी-गाई व शेळ्यांचा गट वाटप योजना
3) मेहसाणा
गुजरात मध्ये आढळणारी मेहसाणा हि म्हशींची जात आहे . हि साधारणतः मुर्रा म्हशी सारखी दिसते, पण या म्हशीचे वजन जास्त असते.
- भोगौलिक क्षेत्र:- गुजरातच्या मेहसाणा जिल्ह्यात आणि गुजरात लगतच्या सीमा क्षेत्रात या जातीच्या म्हशी अढळतात.
- रंग:- काळा आणि तपकिरी
- दूध क्षमता:- १४ ० ० ते १ ५ ० ० लिटर
- शिंगे :- गोलाकार लांब
✅👉🏻 अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ/मराठा बेरोजगार तरूणांनसाठी कर्ज योजना
४ ) सुरती म्हैस
जास्ती जास्त दूध देणाऱ्या जाती पैकी एक असणारी सुरती म्हैस हि गुजरात च्या खेडा आणि बडोदा या जिल्ह्यात आढळतात.
- भोगौलिक क्षेत्र:- गुजरात मधील खेडा आणि बडोदा या शहरात आढळते.
- रंग:- तपकिरी, सिल्वर राखाडी किंवा काळा
- दूध क्षमता:- १ २ ० ० ते १ ५ ० ० लिटर
- शिंगे :-शिकल च्या आकाराचे असतात.
५ ) चिलका म्हैस
चिलका हि म्हशींची जात प्रामुख्याने ओडिसा राज्यातील कटक, गंजम, पुरी, आणि खुर्दा या जिल्ह्यात आढळतात. ओडिसा मधील चिलिका तलावावरून या म्हशीचे नाव चिलका असे पडले आहे.
- भोगौलिक क्षेत्र:- ओडिसा राज्यातील कटक, गंजम, पुरी, आणि खुर्दा या जिल्ह्यात आढळतात.
- रंग:- तपकिरी काळा
- दूध क्षमता:- ५ ० ० ते ६ ० ० लिटर