Relve Bharti 2024: रेल्वे महामेगाभरती टेक्निशियन 14,298 जागा

Relve Bharti 2024: भारतीय रेल्वे खात्यामध्ये टेक्निशियन यांच्यासाठी मेगाभरती निघाली आहे. ITI, इंजिनिअरिंग, डिप्लोमा तसेच १ ० वि उत्तीर्ण झालेल्या मुलांसाठी ही एक सुवर्ण संधी आहे. भारतीय रेल्वे खात्यात जवळजवळ १ ४ ,२ ९ ८  जागांची भरती या टप्प्यात होणार आहे. जवळपास सर्वच टेक्निकल क्षेत्रातील उमेदवारांना या भरतीमध्ये अर्ज करण्याची संधी मिळणार आहे. या योजनेत अर्ज कधी करायचा आणि शेवटची तारीख काय आहे, अर्ज कुठे करायचा, तसेच पात्रता आणि कोणकोणती कागदपत्रे लागतात या विषयीची सविस्तर माहिती आपण खाली पाहणार आहोत.Relve Bharti 2024

Relve Bharti 2024

भारतीय रेल्वे खात्याकडून प्रतीक्षेत असलेली Relve Bharti 2024 महामेगाभरती जाहीर करण्यात आलेली आहे. या भरती अंतर्गत तब्बल 14,298 जागा भरल्या जाणार आहे. या मध्ये  10 व्ही उत्तीर्ण तरुण, ITI उत्तीर्ण तरुण, इंजिनिअरिंग पदवी आणि इतर पदवीधर अर्ज अर्ज करू करू शकतात. या भरती मध्ये पदसंख्येत वाढ करण्यात आलेली आहे. तसेच अर्ज रिओपन करता येणार आहे, आणि नव्याने अर्ज भरता येणार आहे. अर्ज स्वीकृतीचा कालावधी वाढवून दि. 2 ते 16 ऑक्टोबर करण्यात आलेली आहे.

रेल्वे महामेगाभरती पात्रता

भारतीय रेल्वे विभागाने जाहीर केलेल्या Relve Bharti 2024 साठी तुम्हाला Online अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्यासाठी तुमच्याकडे खालील पात्रता असणे आवश्यक आहे.

शैक्षणिक पात्रता :-

  1. लाभार्थी हा 10 व्ही उत्तीर्ण तरुण, ITI उत्तीर्ण तरुण, इंजिनिअरिंग पदवी आणि इतर पदवी धारक या रेल्वे भरतीसाठी अर्ज करू शकतात.
  2. लाभार्थ्यांकडे संबंधित शैक्षणिक प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा :-

  1. अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांचे वय हे दि. 1  2024 रोजी 18 ते 33/ 36 च्या दरम्यान असावे ( अधिकतम वयात शासकीय नियमानुसार सवलत )

अप्लिकेशन फी :-

  1. Relve Bharti 2024 साठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांना ओपन/OBC /EWS या लाभार्थ्यांना 500 रु. तर इतर मागासवर्गीय आणि महिला/ माझी सेंनिक/ EBC लाभार्थ्यांसाठी 250 रुपये फीस आकारली जाते.

✅👉🏻 E-Shram Registration: मोबाईलवरून नोंदणी करून मिळवा ई-श्रम कार्ड

Online अर्ज सादर करण्यासाठी महत्वाच्या सूचना

  • उमेदवारांनी अर्जाच्या अंतिम तारखेपर्यंत संबंधित पदासाठी आवश्यक शैक्षणिक/तांत्रिक/व्यावसायिक पात्रता पूर्ण केलेली असावी. निकालाची प्रतीक्षा करणारे उमेदवार अर्ज करण्यास पात्र नाहीत.
  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी त्यांच्या पात्रतेची खात्री करण्यासाठी तपशीलवार CEN ( Centralised Employment Notice) क्रमांक 06/2024 चा अभ्यास करणे आवश्यक आहे.
  • प्रत्येक उमेदवाराला फक्त एका RRB वर अर्ज करण्याची परवानगी आहे, आणि उमेदवाराने आपल्या पात्रतेनुसार कोणत्याही किंवा सर्व अधिसूचित पदांसाठी फक्त एकच सामान्य ऑनलाइन अर्ज सादर केला पाहिजे. अर्ज फक्त खालील पॅरा 14 (f) मध्ये नमूद केलेल्या अधिकृत RRB वेबसाइटद्वारेच सबमिट केला जावा. एकदा निवडलेला RRB अंतिम मानला जाईल, आणि एकापेक्षा जास्त RRB कडे अर्ज केल्यास सर्व अर्ज रद्द केले जातील.
  • उमेदवारांची पात्रता ही उमेदवारांनी ऑनलाइन अर्जात दिलेल्या तपशीलांवर आधारित तात्पुरती असेल. RRB अर्जांची पात्रतेसाठी तपशीलवार छाननी करणार नाही, त्यामुळे उमेदवारी केवळ तात्पुरत्या स्वरूपात, आवश्यकतेनुसार आणि मूलभूत पात्रता निकष पूर्ण करण्याच्या अधीन स्वीकारली जाईल. उमेदवारांनी आपल्या शैक्षणिक पात्रता, वय, वैद्यकीय मानके इत्यादींच्या आवश्यकतांचा आढावा घेणे आवश्यक आहे आणि संबंधित पदासाठी पात्र असल्याचे स्वतः सुनिश्चित करणे गरजेचे आहे.कागदपत्र पडताळणीच्या वेळी, RRB कडून उमेदवारांना त्यांच्या शैक्षणिक पात्रता, वय, जात/श्रेणी/समुदाय इत्यादींच्या समर्थनार्थ प्रमाणपत्रे आणि कागदपत्रे सादर करावी लागतील. या कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर, अर्जात दिलेला कोणताही दावा जर प्रमाणपत्रांद्वारे सिद्ध न झाल्यास, उमेदवाराची उमेदवारी तात्काळ रद्द केली जाईल.
  • उमेदवारांची पात्रता ही उमेदवारांनी ऑनलाइन अर्जात दिलेल्या तपशीलांच्या आधारे तात्पुरती मानली जाईल. RRB अर्जांची पात्रतेसाठी तपशीलवार छाननी करणार नाही, त्यामुळे उमेदवारांची उमेदवारी तात्पुरती मानली जाईल, परंतु ती केवळ आवश्यकतेनुसार आणि मूलभूत पात्रता निकष पूर्ण केल्याच्या अधीन राहील. उमेदवारांनी आपल्या शैक्षणिक पात्रता, वय, वैद्यकीय मानके इत्यादींची तपासणी स्वतः करणे आवश्यक आहे आणि त्यांनी संबंधित पदासाठी पात्र असल्याचे सुनिश्चित करणे गरजेचे आहे.आरआरबीकडून कागदपत्र पडताळणीच्या वेळी, उमेदवारांकडून त्यांच्या शैक्षणिक पात्रता, वय, जात/वर्ग/समुदाय इत्यादीच्या समर्थनार्थ प्रमाणपत्रे आणि कागदपत्रे सादर करावी लागतील. या प्रमाणपत्रांची तपासणी केल्यानंतर, जर उमेदवाराने अर्जात केलेला कोणताही दावा प्रमाणपत्रांच्या आधारे सिद्ध न झाल्यास, उमेदवाराची उमेदवारी तात्काळ रद्द केली जाईल.
  • भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर, उमेदवाराने दिलेली माहिती (a) खोटी/चुकीची असल्यास, (b) कोणतीही माहिती दडवली असल्यास, किंवा (c) उमेदवार पात्रता निकष पूर्ण करत नसेल, तर त्याची उमेदवारी रद्द केली जाईल.
  • SC/ST/OBC/EWS/EBC दर्जा किंवा कोणतेही इतर लाभ (शुल्क सवलत, आरक्षण, वय सूट इत्यादी) मिळविण्याची निर्णायक तारीख, या CEN साठी ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख असेल.
  • वैद्यकीय पात्रता: उमेदवारांनी निवडलेल्या पदांसाठी विहित वैद्यकीय निकष पूर्ण केलेले असावेत. निवडलेल्या पदांसाठी वैद्यकीयदृष्ट्या अयोग्य आढळलेल्या उमेदवारांना पर्यायी नियुक्ती दिली जाणार नाही.
  • परीक्षेचे टप्पे: दोन टप्प्यांमध्ये संगणक आधारित परीक्षा (CBT), नंतर टायपिंग स्किल टेस्ट (TST), त्यानंतर दस्तऐवज पडताळणी (DV) आणि वैद्यकीय तपासणी (ME) होईल.
  • RRB प्रमाणे दुसऱ्या टप्प्याच्या CBT साठी उमेदवारांची शॉर्टलिस्टिंग 15 पट पदांच्या संख्येनुसार होईल.
  • टायपिंग स्किल टेस्टसाठी शॉर्टलिस्टिंग 8 पट पदांच्या संख्येनुसार होईल (रेल्वे प्रशासनाच्या गरजेनुसार वाढ किंवा घट होऊ शकते).
  • मूळ निकाल फक्त दुसऱ्या टप्प्यातील CBT च्या कामगिरीवर आधारित TST पात्र उमेदवारांसाठी किंवा TST सवलत असलेल्या PwBD उमेदवारांसाठी काढला जाईल.
  • परीक्षेतून पात्र ठरलेल्या उमेदवारांना त्यांच्या गुणांनुसार आणि पर्यायांनुसार दस्तऐवज पडताळणीसाठी बोलावले जाईल.
  • उमेदवारांच्या विविध टप्प्यांमध्ये शॉर्टलिस्टिंग त्यांच्या सामान्यीकृत गुणांवर आधारित असेल, जेव्हा एकाच अभ्यासक्रमासाठी CBT एकाधिक सत्रांमध्ये आयोजित केला जातो.
  • उमेदवारांनी सक्रिय मोबाइल नंबर आणि वैध वैयक्तिक ई-मेल ID ठेवावी, कारण RRBs सर्व भरती संबंधित माहिती SMS आणि/किंवा ई-मेलद्वारे पाठवतील. मोबाइल नंबर आणि ई-मेल ID भरती पूर्ण होईपर्यंत सक्रिय असावा.
  • नकारात्मक गुणांकन: CBT मध्ये प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 1/3 गुणांची कपात होईल.
  • ऑनलाइन अर्ज प्रक्रियेदरम्यान, उमेदवारांना ‘खाते तयार करा’ असे विचारले जाईल. जर उमेदवाराने आधीच 2024 मध्ये अधिसूचित CEN साठी खाते तयार केले असेल, तर त्याच खात्याच्या तपशीलांचा वापर करावा. नवीन खाते तयार करताना एकदा तपशील भरल्यानंतर त्यामध्ये कोणताही बदल परवानगीशिवाय होणार नाही.
  • ऑनलाइन अर्ज सबमिट केल्यानंतर, उमेदवाराला ‘खाते तयार करा’ मध्ये भरलेले तपशील वगळता इतर तपशीलात सुधारणा करायची असल्यास, 23.10.2024 ते 01.11.2024 दरम्यान 250/- रुपये शुल्क भरून बदल करता येईल.
  • बंदी असलेली वस्तू: मोबाईल फोन, ब्लूटूथ, लॅपटॉप, स्मार्टवॉच, धातूची वस्त्रे किंवा पेन/पेन्सिल यांसारख्या वस्तू परीक्षेला नेण्यास परवानगी नाही.

अर्ज करण्याची अंतिम तारीख

Relve Bharti 2024 दि. 2 ते 16 ऑक्टोबर आहे, तुम्ही 2 तारखेपासून ते 16 ऑक्टोबर पर्यंत अर्ज करू शकता.

✅👉🏻 Aadhaar Verification: आधार पडताळणी कशी करावी ? ऑनलाइन बँक सीडिंग स्थिती

Relve Bharti Online Application/ रेल्वे भरती ऑनलाइन अर्ज

Relve Bharti 2024 साठी तुम्हाला Online अर्ज करावा लागणार आहे. यासाठी तुम्हाला रेल्वे विभागाच्या www.rrbapply.gov.in या वेबसाईटवर जावे लागेल. वेबसाईटवर तुम्हाला सर्वप्रथम तुम्हाला तुमचे अकॉउंट ( Account  ) बनवावे लागेल, आणि त्या नंतर तुम्हाला पुढील अर्ज भरावा लागेल.

  • Account बनविण्यासाठी वेब साईटवर आल्या नंतर वरती दिसणार्‍या apply या बटनावर क्लिक करायचे आहे.
  • Apply या बटनावर क्लिक केल्या नंतर Create an Account हे नवीन पेज ओपन होईल.
  • वरील बॉक्स मध्ये Country Of Nationality तुम्हाला INDIA निवडायचे आहे.
  • खालील सर्व बॉक्स मध्ये तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती भरायची आहे ( Personal Information ).
  • तुमचे पूर्ण नाव, तुमची जन्म तारीख, लिंग, वडिलांचे नाव, आईचे नाव, इत्यादी माहिती भरायची आहे.
  • आधार वेरिफिकेशन (Aadhaar Verification) या बॉक्स मध्ये तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकून Verify करायचा आहे.
  • Contact Details मध्ये तुम्हाला तुमचा ई-मेल टाकून Genrate otp वरती क्लिक करून आलेला otp  पुढील रकान्यात भरायचा आहे.

  • मोबाईल नंबर टाकून, otp घेऊन तो बॉक्स मध्ये भरायचा आहे.
  • Create Your Password मध्ये तुम्हाला तुमचा Password बनवून तो Confirm करायचा आहे.

  • सर्वात शेवटी दिलेला कॅप्चा भरून तुम्हाला Create an Account वर क्लिक आहे.

अशा पद्धतीने तुम्ही तुमचे Account Create केल्या नंतर तुम्हाला Relve Bharti 2024 चा पुढील फॉर्म भरता येणार आहे.

Conclusion

Relve Bharti 2024: रेल्वे महामेगाभरती टेक्निशियन 14,298 जागा या blog मध्ये आपण रेल्वे विभागाची निघालेली मेगाभरती विषयी माहिती पहिली. पात्रता आणि ऑनलाइन अर्ज या विषयी माहिती पहिली. माहिती आवडली असल्यास आपल्या सुशिक्षित बेरोजगार मित्र व नातेवाईक यांच्या पर्यंत अवश्य पाठवा. अशाच नवीन माहितीसाठी आमच्या सोशल मीडिया ग्रुप मध्ये सामील व्हा.

🟢🔵🟣 आमच्या सोशल मीडिया ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे किल्क करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top