सुशिक्षित बेरोजगारांना स्वतः चा व्यवसाय उभा करण्याची सुवर्ण संधी /Mukhyamantri Rojgar Yojna Maharashtra

महाराष्ट्रातील सुशिक्षित बेरोजगारांसाठी महाराष्ट्र शासनाने सुरु केलेली CMEGP LOAN योजना ( Mukhyamantri Rojgar Yojna Maharashtra ) महाराष्ट्रातील बेरोजगार तरुणांना स्वतः च्या व्यवसाय उभा करण्यासाठी निधी उपलब्ध करून देत आहे. तुम्ही उभारीत असलेल्या व्यासायाच्या अनुरूप लागणारी रक्कम शासन CMEGP Scheme अंतर्गत लाभार्थ्याला देत आहे. ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही भागात उद्योग उभारणीसाठी सदरल योजनेतून निधी मिळविता येतो. तुमच्या प्रोजेक्ट नुसार 10 लाख किंवा त्या पेक्षा अधिकचा निधी CMEGP Scheme अंतर्गत मिळविता येतो. CMEGP LOAN Scheme काय आहे आणि यासाठी अर्ज कुठे करायचा हे आपण सविस्तर पाहणार आहोत. CMEGP LOAN Scheme

CMEGP LOAN Scheme

CMEGP LOAN Scheme- मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना महाराष्ट्रातील बेरोजगार तरुणांना स्वतः चा व्यवसाय उभा करून स्वतः च्या पायावर उभे राहण्याची संधी निर्माण करून देते. महाराष्ट्रातील बेरोजगारी कमी करण्यासाठी शासनाकडून हि महत्वकांक्षी योजना सुरु करण्यात आली आहे. या योजेतून बरोजगार तरुणांना रोजगार निर्माण करून देणे आणि त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारणे हा उद्देश शासनाचा आहे.

ग्रामीण भाग आणि शहरी अशा दोन भागात CMEGP Scheme विभागलेली आहे. ग्रामीण भागासाठी खादी ग्राम उद्योग महामंडळ योजनेची अंमलबजावणी करते तर शहरी भागासाठी जिल्हा उद्योग केंद्र सदरील योजनेची अंमलबजावणी करते. अनुसूचित जाती / अनुसूचित जमाती/ यासाठी राखीव घटक कोठा या योजनेतून राखीव ठेवण्यात आलेला आहे. अनुसूचित जाती / अनुसूचित जमाती यांच्यासाठी 20% राखीव तर महिलांसाठी 30% राखीव निधी ठेवण्यात आलेला आहे. महिला बचत गट यांना एक स्वतंत्र संस्था गृहीत तरुण विशेष प्राधान्य देण्यात येते.

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेची अंमलबजावणी (CMEGP LOAN Scheme) यंत्रणा

cmegp loan  योजना महाराष्ट्र शासनाकडून ग्रामीण तसेच शहरी भागासाठी राबविली जाते. जिल्हा स्तरावरून सदरील योजनेचे नियोजन करण्यात येते. जिल्हा स्तरावर खादी ग्रामउद्योग महामंडळ आणि जिल्हा उद्योग केंद्र यांच्या मार्फत योजनेची अंमल बजावणी करण्यात येते. उद्योगासाठी तयार करण्यात आलेला प्रस्ताव जिल्हा स्तरावर वरील दोन यंत्रणेकडे पडताळणीसाठी जातो. प्रस्ताव परिपूर्ण असल्यास त्यांच्या मिटिंग मध्ये प्रस्ताव मंजूर करण्यात येतो आणि पुढील प्रोसेससाठी तुमच्या भागातील राष्ट्रीयकृत बँकेस पाठवला जातो.

जिल्हा ग्राम उद्योग विभागाकडून तुमच्या भागातील राष्ट्रीयकृत बँकेत प्रपोजल पाठविल्या नंतर बँक तुमचे रेकॉर्ड चेक करून cmegp loan scheme अंतर्गत तुमचे लोन मंजूर करते.

CMEGP Loan Scheme योजने अंतर्गत प्रकल्प खर्चाचे वर्गीकरण

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती ( Mukhyamantri Rojgar Yojna Maharashtra ) योजने अंतर्गत आरक्षित घटकांसाठी वेगळा कोठा निर्माण करण्यात आलेला आहे. cmegp loan Scheme अंतर्गत ग्रामीण आणि शहरी भागासाठी तसेच मागासवर्गीय घटकांसाठी दिले जाणारे अनुदान वेगवेगळे आहे. तसेच घटकांसाठी स्वतः ची गुंतवणूक ही वेगवेगळ्या घटकांसाठी वेगवेगळी आहे.

 

घटकांचा प्रवर्ग घटकाची स्व गुंतवणूक देय अनुदान शहरी देय अनुदान ग्रामीण बँक कर्ज शहरी बँक कर्ज ग्रामीण
अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती/महिला अपंग/माझी सेनिक 5% 25% 35% 70% 60%
उर्वरित प्रवर्ग 10% 15% 25% 75% 65%

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे/ CMEGP documents list

  1. लाभार्थ्याचे आधार कार्ड.
  2. लाभार्थ्याचे दोन पासपोर्ट साईजफोटो.
  3. पॅन कार्ड.
  4. जातीचा दाखला.
  5. शैक्षणिक प्रमाणपत्र/ गुणपत्रिका.
  6. जन्म प्रमाणपत्र/अधिवास प्रमाणपत्र.
  7. विशेष श्रेणी प्रमाणपत्र (माझी सेनिक/अपंग ).
  8. विवाह प्रमाणपत्र.
  9. प्रकल्प अहवाल.
  10. लोकसंख्या प्रमाणपत्र ( ग्रामीण असल्यास ).

वरील कागदपत्रे cmegp loan योजनेसाठी आवश्यक असतात.

CMEGP Scheme अंतर्गत येणारे उद्योग-व्यवसाय 

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम अंतर्गत खालील मुख्य घटक अंतर्गत व्यवसायाची निवड करावी लागते. मुख्य घटक अंतर्गत येणारे व्यवसायाची निवड तुम्ही करू शकता.

मुख्य घटक 
  • शेव उध्योग 
  • कृषी पूरक व्यवसाय  
  • कृषी आधारित उद्योग 
  • ई वाहतूक व त्यावर आधारित व्यवसाय 
  • विक्री केंद्रे 
  • फिरते विक्री केंद्रे 
  • खाद्यान्न केंद्रे 

इत्यादी मुख्य घटक अंतर्गत येणाऱ्या उद्योग व्यवसायाची निवड करता येते. तुम्ही तयार केलेल्या प्रोजेक्ट नुसार शासन सदरील योजनेतून निधी उपलब्ध करून देते.

CMEGP Loan अंतर्गत ऑनलाइन अर्ज 

शासनाने cmegp loan Scheme अंतर्गत ऑनलाईन पोर्टल उपलब्ध करून दिलेले आहे. https://maha-cmegp.gov.in या वेब पोर्टल वरती जावून तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता. 

पोर्टल वरती आल्या नंतर तुम्हाला समोर दिसणाऱ्या दोन पर्याया पेकी एक पर्याय निवडायचा आहे.

  • Individual
  • Non Individual

या पर्याया मधून एक पर्याय निवडून ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे. तुम्ही जर वयक्तिक स्वतः चा व्यवसाय करण्यास इच्छुक असाल तर Individual हा पर्या निवडायचा आहे. आणि जर तुमची संथा किंवा कंपनी असेल तर तुम्हाला Non Individual हा पर्याय निवडायचा आहे. 

पुढील पेज वर तुम्हाला तुमची वयक्तिक संपूर्ण माहिती भरायची आहे, तसेच तुम्हाला प्रोजेक्ट रिपोट आणि सॅम्पल फॉर्म डाउनलोड करून पूर्ण खाली अपलोड करावा लागेल, त्या सोबतच तुमचे संपूर्ण ओरिजनल कागदपत्रे अपलोड करावी लागतील.

सारांश 

सुशिक्षित बेरोजगारांना स्वतः चा व्यवसाय उभा करण्याची सुवर्ण संधी /Mukhyamantri Rojgar Yojna Maharashtra या लेखात आपण cmegp loan Scheme विषयी माहिती पहिली. शासन सदरील योजनेतून बेरोजगारांना विना तारण आणि कमी कागदपत्रांच्या आधारे कर्ज उपलब्ध करून होते. महाराष्ट्रातील बेरोजगार तरुण या योजनेला अर्ज करून आपला स्वतः चा व्यवसाय उभा करू शकतात. आणि स्वतःच्या उदयॊगाचे स्वप्न पूर्ण करू शकतात. माहिती आवडली असल्यास आपल्या मित्रांना व नटे वाइकांना अवश्य शेअर करा.

हे ही वाचा :-

 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top