farmer id- भारत सरकार अग्रीस्टॅक (agristak) ही संकल्पना देशात राबवीत आहे. या संकल्पाने अंतर्गत देशातील शेतकऱ्यांचे पायाभूत माहिती संच तयार करण्यात येणार आहेत. शेतकऱ्यांना अग्रीस्टॅक (agristak) अंतर्गत शेतकरी ओळखपत्र देण्यात येणार आहे. हे शेतकरी ओळखपत्र शेतकऱ्यांसाठी त्यांच्या शेतीविषयक आणि शासकीय कामासाठी वापरता येणार आहे. शेतकरी ओळखपत्र हे ऑनलाईन स्वरूपाचे असणार आहे. या ओळखपत्रासाठी शेतकऱ्याला ऑनलाईन नोंदणी करावी लागणार आहे. शासनाच्या वेबसाईट वरती जावून शेतकऱ्याला स्वतः ची आणि आपल्या शेतीची पूर्ण माहिती भरावी लागणार आहे. या ऑनलाईन प्रोसेस मध्ये तुमचे आधार कार्ड तुमच्या सातबारा आणि होल्डिंगशी जोडले जाणार आहे. Farmer id ऑनलाईन कसा काढायचा आणि त्यासाठी पात्रता काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत.
शेतकरी ओळखपत्र/Farmer id
शेतकरी ओळखपत्र (Farmer id) या मध्ये शेतकऱ्याची स्वतः ची आणि जमिनीची आधार सलग्न माहिती संच, हंगामी पिकांचा माहिती संच, भूसंदर्भिकृत भूभाग असणारे गाव नकाशे यांचा माहिती संच इत्यादी बाबींची माहिती शेतकरी ओळखपत्र (Farmer id) मध्ये असणार आहे. शेतकरी म्हणून तुम्हाला शासनाकडून एक ओळख क्रमांक मिळणार आहे, जो तुम्हाला शेतकरी म्हणून शासकीय आणि इतर कामाला वापरता येणार आहे. शेतकरी ओळखपत्र हे शासनाच्या वेबसाईट वर जावून ऑनलाईन पद्धतीने काढावे लागणार आहे. यासाठी शासनाने अधिकृत वेबसाईट उपलब्ध करून दिली आहे.
शेतकरी ओळखपत्र (Farmer id) ऑनलाईन अर्ज प्रक्रिया
शेतकरी ओळखपत्र हे तुम्हाला शासनाच्या वेबसाईट वर जाऊन ऑनलाइन काढायचे आहे. शासनाने त्यासाठी अधिकृत वेबसाईट उपलब्ध करून दिली आहे.
- सर्व प्रथम तुम्हाला शासनाच्या https://mhfr.agristack.gov.inया वेबसाईटवर वर जायचे आहे, या वेबसाईटवर आल्या नंतर तुम्हाला समोर दिसणाऱ्या बॉक्स मध्ये लॉगीन करायचे आहे. समोर दिसणाऱ्या Official आणि Farmer या म्स्धून Farmer वरती क्लिक करायचे आहे.
- त्या नंतर बॉक्स च्या शेवटी दिसणारे Creat new user acount वरती क्लिक करायचे आहे.
- तुमच्या समोर नवीन पेज ओपेन होईल, या पेज वर वरती तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे. आणि सबमिट बटनावर क्लिक करायचे आहे, असे करताच तुमच्या आधार शी लिंक असलेल्या मोबाईल नंबर ववर एक OTP to तुम्हाला पुढील रकान्यात टाकायचा आहे आणि वेरीफाय बटनावर क्लिक करायचे आहे.
- वेरीफाय बटनावर क्लिक करताच तुमची आधार बेस्ड माहिती समोर दिसेल, त्या खाली तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. मोबाईल नंबर टाकून त्याची OTP घेवून ती त्या खाली भरायची आहे आणि वेरीफाय या बटनावर क्लिक करायचे आहे.
- त्या नंतर तुम्हाला तुमचा एक पासवर्ड बनवायचा आहे, पासवर्ड बनविल्या नंतर त्या खालील Create my acount या बटनावर क्लिक करताच तुमचे acount तयार झालेले असेल.
- या नंतर वेबसाईट वर परत यायचे आहे, आणि तयार Farmer वरती क्लिक करून तयार केलेले id आणि pasward टाकून किंवा मोबाईल नंबर टाकून OTP घेवून तुम्ही लॉगीन करू शकता.
- लॉगीन केल्या नंतर नवीन पेज ओपेन होईल त्या पेज वर अगोदर भरलेली आधार माहिती दिसेल त्या नंतर त्याखालील रजिस्टर फार्मर वरती क्लिक करायचे आहे.
- त्या नंतर तुम्हला मोबाईल नंबर बदलायचा का विचारले जाईल बदलायचा असेल तर बदलू शकता.
- त्या खाली e-mail असेल तर टाका नसेल तर टाकण्याची आवश्यकता नाही, त्या खाली तुमच्या जमिनीची माहिती दिसेल ती योग्य असेल ठेवा किंवा तुम्ही ती दुरुस्त करू शकता.
- त्या खाली स्वतः ची आणि कुटुंबाची माहिती विचारलेली असेल ती योग्य भरा, कॅटेगिरी जी असेल ती निवडा.
- त्या खाली तुमची माहिती दिसेल त्या मध्ये तुमचा पत्ता, एखादा व्यवसाय असेल तर तो टाकायचा आहे तसेच वडिलांचे नाव टाकायचे आहे.
- त्याखाली तुमच्या जमिनीची महती तुम्हाला भरायची आहे, आणि त्याखाली जेथे तुमची जमीन आहे तेथील तुमचा जिल्हा, तालुका, गाव इत्यादी निवडायचे आहे.
- खाली तुमचा गट नंबर टाकून सर्च करा, सर्च करताच तुमचे नाव दिसेल ते तुम्हाला सिलेक करायचे आहे.
- त्या नंतर तुमची संपूर्ण शेती विषयीची महियी दिसेल सिलेक्ट करायची आहे.
- खालील LAND DITIYAL या बटनावर क्लिक करून अजून जमीन असेल तर ती तू,तुम्ही जोडू शकता आणि वेरीफाय LAND वरती क्लिक करून जमीन रेकॉर्ड वेरीफाय होईल.
- खाली महत्वाच्या बाबी टिक करून सेव बटनावर क्लिक करा.
- पुढील पेज वर तुम्हाला तुमची सही विचारली जाईल या पेज वर तुम्हाला आधार नंबर टाकून OTP घ्यायचा आहे आणि त्या खाली भरायचा आहे आणि खाली टिक करून सबमिट बटनावर क्लिक करायचे आहे, सबमिट वर क्लिक करताच तुमची डिजिटल सही कम्प्लेंट झालेली असेल.
- त्या नंतर तुम्हाला एनरोलमेंट नंबर दिसेल तो क्लिक करून प्रिंट करून किंवा सेव करून ठेवायचा आहे.
- आता आपले शेतकरी ओळखपत्र (Farmer id) बनले आहे किंवा नाही हे चेक करण्यासाठी परत लॉगिन करा आणि डाव्या बाजूला दिसणाऱ्या चेक एनरोलमेंट टेटस वरती क्लिक करा आणि शेतकरी ओळख पात्राची स्तिती तपासा.
अशा पद्धतीने तुम्ही तुमचे शेतकरी ओळखपत्र (Farmer id) बनवू शकता.
शेतकरी ओळखपत्र (Farmer id) पात्रता
- लाभार्थी महाराष्ट्राचा शेतकरी असावा,
- त्याच्या कडे त्याच्या नावे वहिती शेती असावी
कागदपत्रे
- लाभार्थी आधार कार्ड
- लाभार्थी जमिनीचा सातबारा
- लाभार्थी मोबाईल नंबर
सारांश
शेतकरी ओळखपत्र: ऑनलाईन अर्ज प्रक्रिया, पात्रता आणि आवश्यक कागदपत्रे या लेखात आपण शेतकरी ओळखपत्र ( Farmer id ) कसे काढायचे या बद्दल सविस्तर माहिती पहिली. तुम्ही शासनाच्या वेबसाईट वर जाऊन स्वतः आपला शेतकरी ओळखपत्र बनवू शकता. शेतकरी ओळखपत्र हे शेतकऱ्यांना बनविणे महत्वाचे आहे, भविष्यात हे ओळखपत्र शासनाच्या किंवा इतर कामाला आवश्यक ठरणार आहे. माहिती आवडली असल्यास आपल्या मित्र व नातेवाईकांना शेअर करा.
हे ही वाचा :-
- उद्योगिनी योजना: महिलांना व्यवसाय सुरु करण्यासाठी 30% अनुदानावर बिनव्याजी कर्ज
- सुशिक्षित बेरोजगारांना स्वतः चा व्यवसाय उभा करण्याची सुवर्ण संधी /Mukhyamantri Rojgar Yojna Maharashtra
- आयुष्मान वय वंदना कार्ड: 70 वर्षावरील जेष्ठ नागरिकांसाठी 5 लाख रुपयांचे आरोग्य सुरक्षा कवच
- जमीन मोजणी: कोणतीही फिस न भरता जमीन मोजणी करा ऑनलाइन अॅपच्या मदतीने
- ऑनलाइन सातबारा बघणे: ONLINE 7/12 कसा काढायचा
- नमो शेतकरी योजना स्टेटस: नमो शेतकरी महासन्मान निधीचे किती हप्ते पडले चेक करा