Bandhkam Kamgar Mobile Number Change:- महाराष्ट्र शासनाच्या बांधकाम कामगार विभागामार्फत असंघटीत बांधकाम कामगारांसाठी अनेक फायद्याच्या योजना राबवीत असते. यासाठी कामगार विभागाच्या वेबसाईट वर बांधकाम कामगारांना आपली online नोंदणी करावी लागते. नोंदणी करण्यासाठी लाभार्थ्याला आपला मोबाईल नंबर लिंक करावा लागतो. लिंक केलेल्या मोबाईल नंबर आधारे तुम्ही तुमची बांधकाम कामगाराची प्रोफाईल लॉगीन करावी लागते. बांधकाम कामगार विभागाची OTP या नंबर वर येत असते. कामगार विभागाकडे असलेला मोबाईल नंबर आपल्या कडून बंद पडला किंवा हरवला तर आपण बांधकाम कामगार विभागाच्या पोर्टल ला लॉगीन करू शकणार नाहीत. मग हा मोबाईल नंबर कसा बदलायचा या बद्दल सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत.
बांधकाम कामगार नोंदणी
बांधकाम कामगार विभाग असंघटीत कामगारांसाठी सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक अशा अनेक योजना राबवीत असते. बांधकाम कामगार समाजाच्या मुख्य घटकात यावे यासाठी सदरील योजना कामगार विभागामार्फत राबविल्या जातात. या योजनांचा लाभ घेण्यासाठी बांधकाम कामगारांकडे कामगार विभागाकडे आपली नोंदणी करणे गरजेचे असते.
बांधकाम कामगार नोंदणी करण्यासाठी कामगार म्हणून तुमच्या कडे 90 दिवस काम केल्याचे ग्रामशेवक किंवा गुत्तेदार यांचे प्रमाणपत्र असणे आवश्यक असते, तसेच तुमचे आधार कार्ड, रेशन कार्ड, तुमचे बँक पासबुक, कुटुंब सदस्याचे आधार कार्ड आणि आपले दोन फोटो आणि आपला मोबाईल नंबर इत्यादी कागदपत्रे लागतात. बांधकाम कामगाराच्या https://mahabocw.in या वेबसाईट वर जावून नोंदणी करावी लागते.
Bandhkam Kamgar Mobile Number Change: बांधकाम कामगार नोंदणी करण्यासाठी दिलेला मोबाईल नंबर कसा बदलायचा
बांधकाम कामगार विभागात नोंदणी करत असतांना लाभार्थ्याला आपला मोबाईल नंबर द्यावा लागतो, दिलेल्या मोबाईल नंबर वर कामगार विभागाची OTP येते जी तुम्हाला लॉगीन करतांना वापरावी लागते. दिलेला मोबाईल नंबर कामगार विभागाकडून तुमच्या प्रोफाईल शी जोडला जातो.
जर एखाद्या वेळेस तुमचा मोबाईल नंबर बंद पडला किंवा हरवला तर आपल्याला बांधकाम कामगार विभागाच्या वेबसाईट वर जावून लॉगीन करता येणार नाही, मग हा नंबर कसा बदलायचा हे आपण पाहणार आहोत.
- सर्वप्रथम तुम्हाला बांधकाम कामगार विभागाच्या https://iwbms.mahabocw.in/change-mobile-number या लिंक वरती जावे लागेल.
- लिंक वरती गेल्या नंतर तुमची प्रोफाईल ओपेन होईल वरती जावून पुढील प्रोसेस करून तुम्ही तुमचा मोबाईल नंबर बदलू शकता.
बांधकाम कामगार कौटुंबिक तपशील माहिती अद्ययावत करणे
बांधकाम कामगार विभागाकडे ऑनलाईन नोंदणी केल्या नंतर जर कुटुंबात एखाद्ये मुल जन्मले किंवा एखाद्या सदस्याचे नाव जोडायचे राहिले तर त्या मुलाचे किंवा कुटुंब सदस्याचे नाव तुम्हाला कामगार विभागाकडे नोंदविता येते. त्यासाठी त्या मुलाचे किंवा कुटुंब सदस्याचे आधार कार्ड असणे आवश्यक असते. तुम्ही खालील लिंक वर जावून नवीन जन्मलेल्या मुलाचे नवा जोडू शकता https://iwbms.mahabocw.in/registration-and-renewal/update-details
सारांश
Bandhkam Kamgar Mobile Number Change: बांधकाम कामगार नोंदणी करण्यासाठी दिलेला मोबाईल नंबर कसा बदलायचा या लेखात आपण बांधकाम विभागाकडे नोंदणीकृत असलेला मोबाईल नंबर कसा बदलायचा आणि आपल्या कुटुंबातील सदस्याचे नाव कसे जोडायचे या बद्दल माहिती पहिली. माहिती आवडली असल्यास आपल्या मित्रांना शेअर करा.
हे ही वाचा :-
- MAHADBT Farmer Scheme: रब्बी बियाणे अनुदानासाठी असा करा अर्ज
- सुशिक्षित बेरोजगारांना स्वतः चा व्यवसाय उभा करण्याची सुवर्ण संधी /Mukhyamantri Rojgar Yojna Maharashtra
- उद्योगिनी योजना: महिलांना व्यवसाय सुरु करण्यासाठी 30% अनुदानावर बिनव्याजी कर्ज
- वाहन चालविण्याचे ड्रायविंग लायसेन्स रिनिव कसे करावे ? जाणून घ्या संपूर्ण ऑनलाइन प्रक्रिया
आमच्या सोशल मिडिया ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर टच करा.