Pariksha Pe Charcha 2025: परीक्षेचा तान कमी करण्यासाठी पंतप्रधान मोदी साधणार विध्यार्थ्यांशी संवाद

Pariksha Pe Charcha 2025 :- केंद्रीय प्राथमिक शिक्षण मंडळ (CBSE) यांच्याकडून ‘परीक्षा पे चर्चा 2025’ अधिसूचना काढण्यात आलेली आहे. या नुसार देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी हे विध्यार्थी आणि पालक यांच्याशी संवाद सडणार आहेत. परीक्षेचा तान कमी करणे आणि विध्यार्थ्यांना त्यांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी मदत करणे असा या कार्यक्रमा माघील उद्देश आहे. या कार्यक्रमाच्या आधारे विध्यार्थी आणि पालक यांना पंतप्रधानांना प्रश्न विचारण्याची संधी मिळणार आहे. परीक्षा जवळ येताच विध्यार्थ्यान मध्ये वाढणारा अतिरिक्त तान कमी करणे, आणि आपल्या शैक्षणिक सिस्टम विषयी चर्चा घडवून आणणे या कार्यक्रमातून शक्य होणार आहे.

Pariksha Pe Charcha 2025
Pariksha Pe Charcha 2025

Pariksha Pe Charcha 2025/ परीक्षा वर चर्चा 2025

केंद्रीय प्राथमिक शिक्षण मंडळ (CBSE) यांच्याकडून परीक्षा वर चर्चा ( Pariksha Pe Charcha 2025 ) हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमामध्ये देशाचे पंतप्रधान हे विध्यार्थी आणि पालक यांच्याशी संवाद साधणार आहेत. विध्यार्थ्यांना येणारा परीक्षेचा अतिरिक्त तान कमी करणे आणि त्यांच्या स्वप्न पूर्तीसाठी मदत करणे हा संकल्प या कार्यक्रमा विषयीचा आहे.

परीक्षा वर चर्चा ( Pariksha Pe Charcha 2025) या कार्यक्रमात सहभाग घेण्यासाठी विध्यार्थी आणि पालक यांना आवाहन करण्यात आलेले आहे.जे विध्यार्थी इयत्ता 6 वी ते 12 वी मध्ये शिकत आहेत किंवा ज्या पालकांची मुले इयत्ता 6 वी ते 12 वी मध्ये शिकत आहेत असे पालक आणि याच वर्गाला शिकविणारे शिक्षक या कार्यक्रमात भाग घेवू शकतात. या कार्यक्रमासाठी विध्यार्थी आणि पालक यांना शासनाच्या अधिकृत वेबसाईट वर जावून नोंदणी करावी लागणार आहे.

Pariksha Pe Charcha Registration 2025/ परीक्षा वर चर्चा नोंदणी 2025

केंद्रीय प्राथमिक शिषण मंडळ (CBSE) यांच्या कडून Pariksha Pe Charcha 2025 आयोजित कार्यक्रमामध्ये विध्यार्थी, पालक तसेच शिक्षक यांना सदरील कार्यक्रमात सहभाग घेता येणार आहे. विध्यार्थ्यान वरील परीक्षेचा तान या विषयावर होणाऱ्या चर्चेत सहभागी होण्यासाठी शासनाच्या ऑनलाईन वेबसाईट वर नोंदणी करावी लागणार आहे.14 डिसेंबर ते 14 जानेवारी या कालावधीत सदरील कार्यक्रम चालणार आहे.

शासनाच्या https://innovateindia1.mygov.in या वेबसाईट वर जाऊन विध्यार्थी, पालक आणि शिक्षक यांना नोंदणी करता येणार आहे.

  • वेबसाईट वर गेल्या नंतर सर्वप्रथम तुम्हाला PARTICIPATE NOW या लाल रंगाच्या बटनावर क्लिक करून पुढे जायचे आहे.
  • स्वतः विध्यार्थ्यांचा सहभाग किंवा शिक्षका मार्फत विध्यार्थ्याचा सहभाग असे दोन पर्याय तुम्हाला विध्यार्थ्यासाठी मिळतात.
  • पालक आणि शिक्षक यांच्या साठी दोन स्वतंत्र पर्याय उपलब्ध आहेत.
  • आपला पर्याय निवडल्या नंतर आपले पूर्ण नाव, आपण शिकत असलेला वर्ग, आपला मोबाईल नंबर किंवा e-mail इत्यादी माहिती भरायची आहे.
  • आपल्या मोबाईल किंवा e-mail वर आलेला OTP भरून सबमिट करायचे आहे, आणि पुढील माहिती भरायची आहे.

पात्रता

  • विध्यार्थी असेल तर तो इयत्ता 6 वी ते 12 वी मध्ये शिकत असावा.
  • पालक नोंदणी करण्यासाठी त्याचे पाल्य हे इयत्ता इयत्ता 6 वी ते 12 वी मध्ये शिकत असावे.
  • शिक्षक असेल तर संबंधित इयात्तेशी संबंधित असावा.
  • शासनाच्या वेबसाईट वर नोंदणी करणे आवश्यक.
  • आपल्या जवळ मोबाईल किंवा e-mail असणे आवश्यक.
 सारांश

Pariksha Pe Charcha 2025: परीक्षेचा तान कमी करण्यासाठी पंतप्रधान मोदी साधणार विध्यार्थ्यांशी संवाद या लेखात आपण केंद्रीय प्राथमिक शिक्षण मंडळ (CBSE) यांच्याकडून परीक्षा वर चर्चा ( Pariksha Pe Charcha 2025) या कार्यक्रमाविषयी माहिती पहिली. विध्यार्थ्यांच्या परीक्षेचा तान कमी करण्यासाठी व त्यांच्या स्वप्न पूर्तीसाठी मदत करण्यासाठी सदरील कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. माहिती आवडली असल्यास आपल्या जवळील विध्यार्थ्यांना व शिक्षकांना अवश्य शेअर करा.

हे ही वाचा :-

अशाच नवीन माहितीसाठी आमच्या सोशल मिडिया ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक टच करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top