NAFED registration process : केंद्र सरकारने 2024-2025 हंगामासाठी पिकांची किमान आधारभूत किंमत (MSP) जाहीर केली आहे. किमान आधारभूत किंमत म्हणजेच हमी भाव म्हणून समजला जातो. शासनाने इतर मालाच्या किमान आधारभूत किमती बरोबरच सोयाबीनची किमान आधारभूत किंमत (MSP) ठरवून दिली आहे. सोयाबीन या शेतमालाला शासनाने रुपये 4892 हा हमीभाव ठरवून दिला आहे त्याच बरोबर तूर रु. 7000 हजार हमीभाव ठरवून दिलेला आहे. शेतकऱ्यांचा शेतातील निघाला आणि मार्केटला आवक वाढली की, शेतमालाचे भाव गडगडतात आणि याचा फटका शेतकऱ्याला बसतो. शेतमालाला पूर्ण तयार करण्याचा एकूण खर्च आणि मिळणारा भाव याची सांगड बसत नाही परिणामी शेतकरी तोट्यात जातो, या वर तोडगा काढण्यासाठी शासनाने हमी भावाने NAFED अंतर्गत शेतमाल खरेदीला सुरुवात केली आहे.
NAFED / नाफेड
National Agricultural Cooperative Marketing Fedreration Of India Ltd. नाफेडची चाई स्थापना 2 आक्टोबर 1958 गांधी जयंतीच्या दिवशी झाली. शेतकऱ्यांच्या हितासाठी कृषी उत्पन्नाच्या सहकारी विपणनाला चालना देण्याच्या उद्देशाने NAFED ची स्थापना करण्यात आली. NAFED ही बहुराज्य सहकारी संस्था अंतर्गत नोंदणीकृत आहे. शासन शेतकऱ्यांकडून किमान आधारभूत किंमत (हमीभाव) अंतर्गत कृषी उत्पन्नाची खरेदी NAFED या संस्थे कडून करते.
NAFED Registration Process/ नाफेड ऑनलाईन रजिस्ट्रेशन
शेतमालाला हमी भाव घेण्यासाठी NAFED वर जावून आपली ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे. ऑनलाईन नोंदणी असल्या शिवाय शेतमाल नाफेडला विकत येत नाही. NAFED Registration Process ऑनलाईन कशी करायची ते आपण खाली पाहणार आहोत.
सर्वप्रथम तुम्हाला शासनाच्या अधिकृत वेबसाईट www.nafed-india.com जावे लागेल. या वेबसाईट वर आल्या नंतर समोर दिसणाऱ्या हिरव्या रंगातील Register Now या बटनावर क्लिक करायचे आहे.
- ओपन होणार्या नवीन ई समृद्धी पेज वर Farmer Registration या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
- पुढील पेजवर पहिल्या रकान्यात तुमचा मोबाईल नंबर त्याखालील रकान्यात वरील कॅप्चा कोड भरून त्या समोर टिक मार्क करायचे आहे.
- टिकमार्क करताच तुमच्या मोबाईल नंबर वर OTP येयील तो तुम्हाला भरून खालील लॉगीन बटनावर क्लिक करायचे आहे.
- लॉगीन बटनावर क्लिक करताच नवीन पेजवर तुम्हाला तुमचे नाव, आधार नंबर भरून VERFY या बटनावर क्लिक करायचे आहे.
- त्या नंतर वडिलांचे नाव टाकायचे आहे, फार्मर कॅटेगरी निवडायचा आहे, क्लास कॅटेगरी निवडायचा आहे आणि लिंग निवडायचे आहे.
- पुढील बॉक्स मध्ये तुम्हाला तुमचे राज्य, तुमचा जिल्हा, तुमचा तालुका, तुमचे गाव, पिनकोड, तुमचा पत्ता इत्यादी बाबी निवडायच्या आहेत.
- खाली दिसणाऱ्या अपलोड बटनावर क्लिक करून तुम्हाला आधार अपलोड करायचे आहे आणि सेव बटनावर क्लिक करायचे आहे.
- सेव बटनावर क्लिक करताच तुमच्या समोर एक कॉन्फ्रीग्रेषण म्यासेस दिसेल त्यामध्ये तुम्हाला yes वरती क्लिक कार्याचे आहे.
- कॉन्फ्रीग्रेषण वरती क्लिक करताच तुमचे रजिस्ट्रेशन सक्सेस झाल्याचा म्यासेस तुमच्या मोबाईल क्रमांकावर येयील.
- पेज वरती स्क्रोल केल्या नंतर दिसणाऱ्या पेज वर शेतकऱ्याला त्याचा बँक तपशील भरायचा आहे, जसे की त्याचा खाते नंबर आय एफ सी कोड इत्यादी.
- खाली अपलोड बटनवर क्लिक करून शेतकर्याचे पासबुक अपलोड करायचे आहे आणि सबमिट बटनावर क्लिक करायचे आहे.
- खालील पेजवर शेतकऱ्याला त्याच्या जमिनीचा तपशील भरायचा आहे.
- ज्या मध्ये गट नंबर, खाते नंबर आणि इतर जमिनीचा तपशील.
- वरील माहिती भरून ADD बटनावर क्लिक करून माहिती सबमिट करा.
- शेतकर्याने त्याच्या जमिनीची सर्व कागदपत्रे जसे की, सातबारा, नमुना आठ अ इत्यादी कागदपत्रे अपलोड करून सबमिट करायची आहे.
- सगळी कागदपत्रे अपलोड केल्या नंतर आणि फॉर्म सबमिट केल्या नंतर समोर शेतकऱ्याचा अप्लिकेशन आयडी दिसेल, तुमच्या मोबाईल नंबर वर एस एम एस द्वारे पाठविली जाईल.
अशा पद्धतीने शेतकऱ्याची NAFED Registration Process पूर्ण होईल.
नाफेड रजिस्ट्रेशन प्रोसेससाठी लागणारी कागदपत्रे
- शेतकऱ्याचे आधार कार्ड
- शेतकऱ्याचेराष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक किंवा कॅन्सल चेक.
- शेती समंधी पुरावा सातबारा व नमिना आठ अ .
- शेतकऱ्याचा मोबाईल नंबर.
NAFED Registration Process पूर्ण करण्यासाठी वरील कागदपत्रांची आवश्यकता असते. ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा. https://esamridhi.in/#/
सारांश
NAFED Registration Process: सोयाबीन नाफेडला विकायचे? मग असे करा ऑनलाईन रजिस्ट्रेशन या लेखात आपण NAFED Registration Process कशी करायची, आणि कोणती कागदपत्रे लागतात बद्दल सविस्तर माहिती पहिली. शासनाने ठरवून दिलेला हमीभाव मिळविण्यासाठी शेतकऱ्याला नाफेड च्या वेबसाईट वर ऑनलाईन नोंदणी करावी लागते ती कशी करायची हे आपण वरील blog मध्ये पहिले. माहिती आवडली असल्यास आपल्या मित्रांना शेअर करा.
हे ही वाचा :-
- MAHADBT ट्रॅक्टर योजना: ट्रॅक्टर योजनेसाठी असा करा ONLINE अर्ज
- मागेल त्याला सौर कृषी पंप योजना 2024-2025 – नवीन अर्ज, लाभ आणि कागदपत्रे
- PM Tractor Yojana: ट्रॅक्टर खरेदी करा अर्ध्या किमतीत,शासन देतंय भरघोस सब्सिडीवर
- शेतकरी ओळखपत्र: ऑनलाईन अर्ज प्रक्रिया, पात्रता आणि आवश्यक कागदपत्रे
- शेतकरी सारथी: मोबाईलवर मोफत मिळावा कृषी सल्ला
- नमो शेतकरी योजना स्टेटस: नमो शेतकरी महासन्मान निधीचे किती हप्ते पडले चेक करा
- महाडीबीटी पोर्टल शेतकरी योजना अर्ज
- सौरचलित नॅपसॅक फवारणी पंप 2024-2025 (MAHADBT): 100% अनुदानावर चार्गिंग पंपासाठी असा करा अर्ज
- ऑनलाइन सातबारा बघणे: ONLINE 7/12 कसा काढायचा
अशाच नवीन माहितीसाठी आमच्या सोशल मिडिया ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर टच करा.