आपल्या भारत देशात अनेक पारंपरिक कारागीर आढळतात जे त्यांचा पिढीजात व्यवसाय करत असतात. या कारागिरांचा विचार केला तर आजच्या मशिनरीच्या जमान्यात त्यांचा व्यवसाय मोडकळीस आलेला दिसतो. आधुनिक साधनसामग्री नसल्यामुळे त्यांच्या हातकलेच्या व्यवसायाची जागा आज मशिनांनी घेतली आहे.
अशा पारंपरिक बारा बलुतेदार कारागिरांसाठी आणि त्यांचा पिढीजात व्यवसाय टिकवण्यासाठी विश्वकर्मा श्रम सम्मान योजना केंद्र सरकारकडून सुरू करण्यात आली आहे. पारंपरिक कारागिरांना बळ देण्यासाठी आणि त्यांच्या व्यवसायाला नवसंजीवनी देण्यासाठी ही महत्त्वपूर्ण योजना सुरू करण्यात आली आहे.
केंद्र सरकारच्या PM Vishvakarma Portal वर जाऊन ऑनलाइन नोंदणीद्वारे या योजनेचा लाभ घेता येतो. पोर्टलवर नोंदणी केल्यानंतर PM Vishvakarma प्रमाणपत्र व ओळखपत्र दिले जाते. तसेच या पोर्टलच्या माध्यमातून विनातारण कर्जासाठीही मागणी करता येते.
आज आपण या लेखाद्वारे या योजनेचे फायदे काय आहेत, या योजनेची पात्रता काय आहे, या योजनेसाठी अर्ज कसा करायचा आणि विश्वकर्मा श्रम सम्मान योजना / PM Vishvakarma Scheme मध्ये कोणकोणते व्यवसाय येतात याविषयी सविस्तर माहिती घेणार आहोत.
आज आपण या लेखाद्वारे या योजनेचे फायदे काय आहेत, या योजनेची पात्रता काय आहे, या योजनेसाठी अर्ज कसा करायचा आणि विश्वकर्मा श्रम सम्मान योजना / PM Vishvakarma Scheme मध्ये कोणकोणते व्यवसाय येतात याविषयी सविस्तर माहिती घेणार आहोत.
विश्वकर्मा श्रम सम्मान योजना/PM Vishvkarma Scheme
पारंपरिक व्यवसाय करणारे व्यावसायिक (कारागीर) जे पिढीजात व्यवसाय करतात आणि जे हाताने वस्तू तयार करतात, अशा बारा बलुतेदार कारागिरांचा समावेश या योजनेत केला जातो.
जसे की —
सुतार, बोट बनविणारा, चिलखत बनविणारा, लोहार, हातोडा व इतर हत्यारे-औजारे तयार करणारा, कुलूप बनविणारा, शिल्पकार (मूर्तिकार, दगड कोरणारा), सोनार, कुंभार, चांभार, गवंडी काम करणारा, टोपली-चटई-झाडू बनविणारा, बाहुल्या व खेळणी बनविणारा, धोबी, शिंपी, मासे पकडण्याचे जाळे बनविणारा इत्यादी पारंपरिक व्यवसायांचा समावेश या योजनेत होतो.
विश्वकर्मा श्रम सम्मान योजनेतून मिळणारे लाभ
१) नोंदणी पूर्ण झाल्यानंतर आणि पडताळणीनंतर लाभार्थ्याला PM Vishvakarma प्रमाणपत्र व ओळखपत्र दिले जाते.
२) कौशल्य पडताळणीनंतर प्रथम ५ दिवसांचे आणि त्यानंतर १५ दिवसांचे प्रगत प्रशिक्षण दिले जाते.
३) प्रशिक्षण कालावधीत लाभार्थ्याला दररोज ५०० रुपये भत्ता दिला जातो.
४) प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्याला साहित्य खरेदीसाठी १५,००० रुपये दिले जातात.
५) प्रशिक्षण पूर्ण केलेल्या लाभार्थ्याला पहिल्या टप्प्यात ५% व्याजदराने १८ महिन्यांच्या कालावधीसाठी १ लाख रुपये विनातारण कर्ज दिले जाते.
६) दुसऱ्या टप्प्यात १८ महिन्यांच्या परतफेडीच्या कालावधीसाठी २ लाख रुपये विनातारण कर्ज दिले जाते.
७) डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी १०० व्यवहारांपर्यंत दरमहा प्रति व्यवहार १ रुपया प्रोत्साहनपर रक्कम दिली जाते.
विश्वकर्मा श्रम सम्मान योजना/PM Vishvkarma Scheme योजनेसाठी पात्रता
१) असंघटित क्षेत्रात काम करणारा कामगार, जो हाताने व साधनांच्या मदतीने पारंपरिक कुटुंबआधारित व्यवसाय करणारा कारागीर आहे, तो नोंदणीस पात्र राहील.
२) नोंदणीच्या वेळी लाभार्थ्याचे वय १८ वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त असावे.
३) योजनेचा लाभ घेताना तोच व्यवसाय निवडावा लागेल जो नोंदणीच्या वेळी निवडलेला असेल.
४) मागील ५ वर्षांत व्यवसाय विकासासाठी इतर योजनांतून कर्ज घेतलेले नसावे, जसे की PM स्वनिधी योजना.
५) मात्र PM Svanidhi योजनेतून कर्ज घेऊन त्याची पूर्ण परतफेड केलेले लाभार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
६) शासकीय सेवेत असलेले व्यक्ती व त्यांचे कुटुंबीय या योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत.
Note :- विश्वकर्मा श्रम सम्मान योजनेचा लाभ कुटुंबातील फक्त एकाच व्यक्तीला घेता येतो. दुसऱ्या व्यक्तीस हा लाभ मिळू शकत नाही.
विश्वकर्मा श्रम सम्मान योजनेसाठी नाव नोंदणी कशी करायची?
सदरील योजनेसाठी नाव नोंदणी ही online पद्धतीने PM Vishwakarma Portal वर करता येते.
१) CSC सेंटर वर जाऊन तुम्ही विश्वकर्मा श्रम सम्मान योजनेसाठी नावनोंदणी करू शकता.
२) लाभार्थ्याच्या तपशीलांची पडताळणी ग्रामपंचायत किंवा नगरपंचायत स्तरावर केली जाईल.
३) जिल्हा अंमलबजावणी समितीकडे प्रस्ताव गेल्यानंतर समिती तपशीलांची पाहणी करून लाभार्थ्याची शिफारस पुढील कार्यवाहीसाठी करेल.
४) स्क्रिनिंग समिती जिल्हा समितीने शिफारस केलेल्या प्रस्तावाची छाननी करून लाभार्थ्याच्या अंतिम निवडीचे पत्र देईल.
Cunclusion
बारा बलुतेदार कारागिरांसाठी केंद्र सरकारद्वारे राबविण्यात येणारी विश्वकर्मा श्रम सम्मान योजना / PM Vishvakarma Scheme ही पारंपरिक व्यवसाय करणाऱ्या छोट्या व्यावसायिकांसाठी आपल्या व्यवसायाला आधुनिकतेची जोड देण्याची एक सुवर्णसंधी आहे. या योजनेच्या माध्यमातून तुम्ही तुमचा व्यवसाय वाढवून आर्थिक प्रगती साधू शकता.
या ब्लॉगमध्ये या योजनेची संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. लेख आवडल्यास शेअर करायला विसरू नका आणि नवनवीन शासकीय योजनांची माहिती मिळवण्यासाठी आमच्या whatsapp ग्रुप मध्ये सामील व्हा.
हे ही वाचा :- कुक्कुट पालनासाठी २५ लाख अनुदान-Layer Poultry Farming
:- Shabari Loan Scheme/आदिवासी बेरोजगार व महिला बचत गटांना कर्ज योजना
