soil health card:- मृदा आरोग्य कार्ड योजना ही भारत सरकारची एक महत्वपूर्ण योजना आहे, ज्या द्वारे शेतकरी आपल्या शेतजमिनीच्या मातीचे परीक्षण करून पिकांना आवश्यक असणारे घटक खतामार्फत देवू शकतो. जमिनी मध्ये नसलेले घटक पिकांना उपलब्ध करून दिल्यास कमी खर्चात शेतकरी आपल्या उत्पन्नात वाढ करू शकतो. पारंपारिक पद्धतीने शेती करत असतांना पूर्वी पासून चालत आलेले भरमसाठ रासायनिक खाते जमिनी मध्ये मिसळविली जातात परिणामी जमिनीचा पोट खराब होतो, आणि जमीन नापीक बनते. या वर उपाय म्हणजे जमिनीचे माती परीक्षण करणे आणि पिकांना आवश्यक तेवढीच घटक खताच्या स्वरुपात वापरणे हा आहे. आज आपण माती परीक्षण कसे करायचे आणि soil health card कसे मिळवायचे या बद्दल सविस्तर माहिती अहणार आहोत.
पिकांना जमिनीतून आवश्यक असणारी अन्नद्रव्य
शेतकऱ्याच्या शेत जमिनीमधील पिकांच्या भरघोस वाढीसाठी अनेक जीवनसत्वांची आवश्यकता असते, मुख्यत्वे करून नत्र, स्पुरद आणि पालाश ( NPK) हे तीन घटक पिकांच्या वाढीसाठी महत्वाचे असतात.
- नायट्रोजन (N), फॉस्फरस (P), आणि पोटॅशियम (K) या तीन रासायनिक घटकांच्या मिश्रणाने (NPK) पिकांसाठी उपयुक्त असणारे खते बनविले जातात.
सूक्ष्म अन्नद्रव्य :-
- बोरॉन (B), क्लोराईड ( CI),तांबे (Cu), लोह (Fe), मॅगनीज (Mn), मॉलिब्डेनम (Mo), निकेल (Ni), जस्त (Zn) या बरोबरच कॅल्शियम, मॅग्निशियम आणि सल्फर या दुय्यम अन्न घटकांचा वापर हि पिकांच्या निरोगी वाढीसाठी होतो.
पिकांच्या वाढीसाठी बरीच जीवनसत्वे ही जमिनीमध्ये उपलब्ध असतात, मात्र शेतकऱ्यांना माहित नसल्याने ज्या घटकाचा पिकांना जमिनीतून पुरवठा होत आहे, तीच घटके पुन्हा बाहेरून जमिनीत टाकली जातात. आणि ज्या घटकांची आवश्यकता आहे ते घटक मात्र टाकली जात नाहीत, यामुळे याचा विपरीत परिणाम होऊन जमिनीचा पोत खराब होतो आणि उत्पन्नात घट होते.
Soil Health Card: मृदा आरोग्य कार्ड म्हणजे काय आणि त्याचे फायदे
soil health card हे भारत सरकारच्या Ministry of Agriculture and Farmers Welfare-Department of Agriculture and Farmers Welfare विभागाकडून दिले जाणारे शेतीच्या मातीच्या आरोग्य विषयीचे प्रमाणपत्र आहे. या मध्ये मृदेचे पोषक तत्व, Ph मूल्य आणि इतर घटकांची माहिती असते. soil health card साह्याने शेतकऱ्याला आपल्या जमिनीमधील पोषकतत्वांची माहिती मिळते आणि या माहितीच्या आधारे पिकांच्या खतांचे नियोजन करता येते. पिकांना आणि जमिनीला आवश्यक असणाऱ्या खतांची मात्रा माहित झाल्या मुळे अतिरिक्त खताचा वापर कमी होतो, यामुळे खर्च कमी होतो आणि पिकांना आवश्यक व योग्य मात्रा मिळाल्याने उत्पन्नात भरघोस वाढ होते.
Soil Health Card Scheme /मृदा आरोग्य कार्ड योजना
भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय या विभागाकडून शेतकऱ्यांसाठी soil health card scheme सुरु करण्यात आलेली आहे. या योजनेतून शेतकऱ्याच्या शेतीचे माती परीक्षण करून दिले जाते. माती परीक्षण केल्यामुळे शेतकऱ्यांना माती मधील उलब्ध घटकांची माहिती होते, त्यामुळे शेतकऱ्याला खतांवर भरमसाठ खर्च करण्याची गरज पडत नाही. आवश्यक असणारी खतांची मात्रा देवून शेतकरी भरपूर उत्पन्न काढू शकतात. हा शासनाचा मुख्य उद्देश सदरील योजने मागचा आहे.
19 फेब्रुवारी 2015 ला शासनाकडून soil health card scheme या योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे. या योजने अंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या शेतातील माती परीक्षण करून मातीतील शुक्ष्म पोषक घटकांची माहिती दिली जाते. त्याच बरोबर पिकांना कोणत्या खतांची आवश्यकता आहे, याची तपशीलवार माहिती शेतकऱ्यांना दिली जाते.
soil health card शेतकऱ्यांना अडून देण्यासाठी शासनाने कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय यांच्या अंतर्गत नियोजन करून अनेक शाळा आणि विभाग यांना सदरील कार्यक्रमामध्ये सामवून घेतले आहे. ज्यांच्या द्वारे शेतकऱ्याच्या मातीचे परीक्षण करून त्यांना योग्य अहवाल दिला जातो. यामुळे शेतकऱ्यांचा अतिरिक्त खर्च कमी होऊन उत्पन्नात वाढ होते.
Soil Health Card: मृदा आरोग्य कार्ड कसे मिळायचे
मृदा आरोग्य कार्ड/soil health card कसे मिळवायचे या बद्दल माहिती आपण पाहणार आहोत. मृदा आरोग्य कार्ड online आणि offline अशा दोन्ही पद्धतीने काढता येते.
प्रथमतः online soil health card कसे काढायचे या बद्दल आपण जाणून घेणार आहोत.
- soil health card scheme अंतर्गत शेतकऱ्यांना दर 3 वर्षासाठी मृदा आरोग्य कार्ड कडून दिले जाणार आहे. यासाठी शासनाने एका स्वतंत्र पोर्टल ची निर्मिती केली आहे. भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय यांच्या मार्फत soilhealth.dac.gov.in या पोर्टल वरून मृदा आरोग्य कार्ड विषयीची संपूर्ण माहिती उपलब्ध करुन्दिली आहे, या पोर्टल वर जावून माती परीक्षणासाठी अर्ज करता येतो.आणि आपले तयार झालेले soil health card प्रिंट करून घेता येते.
- भारत सरकारने आपल्या पोर्टल बरोबरच शेतकऱ्यांना soil health card हे एक मोबाईल अॅप ही निर्माण करून दिले आहे, या अॅप च्या मदतीने शेतकरी आपल्या मोबाईल मधून नोंदणी करून आपल्या शेताची माती परीक्षण करून घेवू शकतो.
- soil health card हे मोबाईल अॅप डाउनलोड करण्यासाठी सर्वप्रथम मोबाईल मधील प्ल्ये स्टोर वर जावे लागेल, आणि soil health card टाईप करावे लागेल.
- प्ल्ये स्टोर वर soil health card सर्च करताच समोर दिसणाऱ्या इतर अॅप मधून ‘स्वस्थ धरा खेत हरा’ हे स्लोगन असलेले अॅप डाउनलोड करायचे आहे.
- अॅप डाउनलोड केल्या नंतर सर्वप्रथम अॅप ची भाषा निवडायची आहे. या मध्ये तुम्हाला हवी असलेली भाषा निवडता येते.
- त्या नंतर usertipe मध्ये STL किंवा साथी निवडायचे आहे. खालील रकान्यात वापरकर्त्याचा e-mail आणि PASWORD टाकायचा आहे.
- लॉगीन झाल्या नंतर रजिस्टर फार्मर वरती कली करा आणि तुमची आणि तुमच्या जमिनीची पूर्ण माहिती भरा.
- शेतकर्याने त्याची पूर्ण माहिती भरल्या नंतर कलेक्ट सॅमपल वर क्लिक करायचे आहे, यावर क्लिक करताच सबंधित विभागाकडून तुमच्या संपर्क केला जाईल आणि तुमच्या शेतात येवून मातीचे नमुने जमा करून नेले जातील.
- मातीचे परीक्षण पूर्ण होताच तुमच्या मोबाईल अॅप मधून प्रिंट मिळविता येयील.
- मोबाईल अॅप मधेमातून माती परीक्षणाचे स्टेटस तुम्हाला चेक करता येते.
- मोबाईल अॅप डाउनलोड करण्यासाठी पुढील लिंक वर जा:- https://play.google.com/store/apps/details?id=com.kt_goi_shc&pcampaignid
- माती परीक्षण पूर्ण झाल्या नंतर भारत सरकारच्या पोर्टल वरती जावून अहवालाची प्रिंट काढता येते, यासाठी soilhealth.dac.gov.in वेब पोर्टल वर जावे लागेल, आणि खाली दिसणाऱ्या soil health card print वर क्लिक करावे लागेल. अशा पद्धतीने soil health card मिळविता येते.
Offline soil health card अर्ज प्रक्रिया
मुद्रा आरोग्य कार्ड बनविण्यासाठी शेतकरी आपल्या जिल्हा स्तरावरील जिल्हा/राज्य नोडल अधिकारी यांच्या कडे अर्ज करू शकता. अर्ज केल्या नंतर सबंधित विभागाचा कर्मचारी शेतकऱ्या पर्यंत पोहचून जमिनीच्या मातीचे नमुने गोळा करून प्रयोग शाळेला घेवून जातो. आणि प्रयोग शाळेत 12 प्रकारच्या वेगवेगळ्या चाचण्या करून माती परीक्षांचा रिपोट बनविला जातो, तयार झालेल्या रिपोट नुसार शेतकऱ्याला विभागाच्या तज्ञ व्यक्ती कडून पिकाविषयी आणि खताच्या वापरा विषयी संपूर्ण मार्गदर्शन केले जाते.
माती परीक्षणाच्या अहवालानुसार शेतात कोणते पिक घेतले जावे आणि कोणते खाते त्या पिकला योग्य आहेत याची संपूर्ण माहिती शेतकऱ्याला माती परीक्षण कार्यालयाकडून दिली जाते.
माती परीक्षणाची योग्य वेळ
माती परीक्षणाचे नमुने शक्यतो तुमच्या शेतात कुठलेच पिक नसतांना घेतले जावेत. साधारण खरीप किंवा रब्बी चे पिक निघाल्या नंतर शेतात कोटे ही पिक नसतांना मातीचे नमुने घेतले जावेत ज्यामुळे मातीची चाचणी योग्य प्रकारे होते. कारण या काळात शेतात टाकण्यात आलेल्या खतांची मात्रा आणि पावर संपुष्टात आलेला असतो.
मृदा आरोग्य कार्ड/soil health card मिळविण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
- शेतकऱ्याचे आधार कार्ड.
- शेतकऱ्याच्या जमिनीचा तपशील जसे की, सात-बारा आणि नमिना 8 अ इत्यादी.
- मोबाईल नंबर.
- ई मेल आयडी.
इत्यादी कागदपत्रांची आवश्यकता मृदा आरोग्य कार्ड काढण्यासाठी असते.
अधिक माहितीसाठी भारत सरकारच्या soilhealth.dac.gov.in या वेब पोर्टल ला अवश्य भेट द्या.
निष्कर्ष
Soil Health Card: मृदा आरोग्य कार्ड विषयी शेतकऱ्यांना संपूर्ण माहिती आणि अर्ज प्रक्रिया या लेखात आपण मृदा आरोग्य कार्ड काय आहे, आणि ते काढण्यासाठी असणाऱ्या ऑनलाईन व ऑफलाईन प्रक्रिया या बद्दल सविस्तर माहिती पहिली. भारत सरकारने शेतकऱ्यांना त्यांच्या हिताच्या दृष्टीने Soil Health Card Scheme उपलब्ध करून दिली आहे. या मृदा आरोग्य कार्ड योजनेतून शेतकरी आपल्या जमिनीच्या मातीचे परीक्षण करून जमिनीत असलेल्या पोषक घटकांची माहिती मिळवू शकतात. जमिनीतील पोषक घटकांची माहिती झाल्याने शेतकऱ्यांना आवश्यक असलेल्याच खताचा वापर करता येयील, परिणामी खतावर होणार अनावश्यक खर्च वाचेल, शिवाय उतपान्नात ही वाढ होईल.
माहिती आवडल्यास आपल्या शेतकरी मित्रांना शेअर करा. आणि शेतीविषयीच्या अशाच माहितीसाठी आमच्या सोशल मिडिया ग्रुप मध्ये सामील व्हा.
हे ही वाचा :-
- शेतकरी ओळखपत्र: ऑनलाईन अर्ज प्रक्रिया, पात्रता आणि आवश्यक कागदपत्रे
- शेतकरी सारथी: मोबाईलवर मोफत मिळावा कृषी सल्ला
- नमो शेतकरी योजना स्टेटस: नमो शेतकरी महासन्मान निधीचे किती हप्ते पडले चेक करा
- नि:शुल्क ड्रोन पायलट प्रशिक्षण योजना: मराठा, कुणबी-मराठा शेतकरी/युवक/युवतींनी ऑनलाईन अर्ज करून योजनेचा लाभ घ्यावा
- Mahadbt Farmer Scheme List: Mahadbt शेतकरी योजना यादी
- महाडीबीटी पोर्टल शेतकरी योजना अर्ज
- अल्पभूधारक शेतकरी योजना-Smallholder Farmers Best Scheme
- Token Yantra mahaDBT Yojna:- महाडीबीटी टोकन यंत्र ऑनलाइन अर्ज
- Token Yantra mahaDBT Yojna:- महाडीबीटी टोकन यंत्र ऑनलाइन अर्ज
- सौरचलित नॅपसॅक फवारणी पंप 2025-2026 (MAHADBT): 100% अनुदानावर चार्गिंग पंपासाठी असा करा अर्ज
आमच्या सोशल मिडिया ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक ला टच करा.