Pradhan Mantri Gramin Awas Yojana : टप्पा 2 अंतर्गत स्वतःचा सर्वे स्वतःच करा

Pradhan Mantri Gramin Awas Yojana : टप्पा 2 अंतर्गत आता स्वतःचा सर्वे स्वतःच करता येणार आहे. प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना (PMAY-G) ही भारत सरकारने बेघर आणि आर्थिक दुर्बल घटकासाठी सुरु केलेली एक महत्त्वाकांक्षी योजना आहे, जी ग्रामीण भागातील बेघर आणि गरजू कुटुंबांना हक्काचे पक्कं घर मिळवून देण्यासाठी सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा टप्पा 2 (Phase 2) सध्या सुरु करण्यात आलेला असून आता पात्र लाभार्थ्यांना मोबाईल app च्या माध्येमातून  स्वतःचा सर्वे स्वतःच करण्याची संधी देण्यात आली आहे.Pradhan Mantri Gramin Awas Yojana

Pradhan Mantri Gramin Awas Yojana /प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना

भारत सरकारने ग्रामीण तसेच शहरी भागातील आर्थिक दुर्बल घटकातील बेघर कुटुंबांना स्वतःचे घर उपलब्ध करून देण्यासाठी सदरील योजना सुरु केली आहे. या योजनेतून बेघर कुटुंबांना घारूळ बांधण्यासाठी शासनाकडून अनुदान दिले जाते. रु. 1,20,000 आणि नवीन निर्णयानुसार अतिरिक्त 50.000 असे एकूण 1,70,000 रुपये घरकुल बांधकामासाठी शासनाकडून दिले जातात. तसेच टॉयलेटसाठी 12,000 आणि MREGS अंतर्गत बेसमेंट बांधकामासाठी 18,000 हजार अशी रक्कम दिली जाते.

प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना (PMAY-G) टप्पा-2 

पंतप्रधान ग्रामीण आवास योजनेच्या लाभार्थी यादीमध्ये नावे नसलेल्या लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी नव्याने समाविष्ठ करण्यात येणार आहे. या योनेतून वंचित राहिलेल्या लाभार्थ्यांना आता स्वतः मोबाईलद्वारे सर्वे करून प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेचा लाभ मिळविता येणार आहे.

बेघर किंवा कच्चेघर असलेल्या कुटुंबाने PMAY-G लाभार्थी यादीमध्ये आपले नाव टाकण्यासाठी मोबाईल app च्या साह्याने आपला सर्वे आपणच करून या योजनेचा लाभ मिळवायचा आहे. पंतप्रधान ग्रामीण आवास योजनेच्या सर्वे मध्ये भाग घेण्यासाठी आपल्या मोबाईल मध्ये खालील दोन app डाउनलोड करायचे आहे.

मोबाईल मधील प्ल्ये स्टोर वर जाऊन आवास अॅप आणि आधार फेस RD Service अॅप हे दोन app डाउनलोड करायचे आहे. app डाउनलोड करण्यासाठी पुढील लिंकवर जा –

आवास अॅप – https://play.google.com/store/apps/details?id=r.rural.awaasplus_2_0

आधार फेस RD Service अॅप – https://play.google.com/store/apps/details?id=in.gov.uidai.facerd

सर्वे कसा करायचा 

  1. सर्वे करत असतांना कुटुंबप्रमुख महिला करा आणि महिलाच्या नावाने सर्वे करा.
  2. सर्वे करतांना कच्चे घर हा पर्याय निवडा.
  3. ज्या जागेवर बांधकाम करायचे आहे त्या जागेचा फोटो कडून अपलोड करा.
  4. सर्वे झाल्या नंतर आवश्यक असलेले कागपत्रे अपलोड करा.
  5. एका मोबाईल नंबरवर एकच सर्वे केला जाऊ शकतो.
  6. आधार प्रमाणीकरण करण्यासाठी आधार फेस RD Service app मध्ये ज्यांच्या नवे सर्वे केला आहे त्यांचा फोटो काढा.

आवश्यक कागदपत्रे 

  1. आधार कार्ड.
  2. जॉब कार्ड.
  3. बँक पासबुक.
  4. एक मोबाईल नंबर.
निष्कर्ष 

Pradhan Mantri Gramin Awas Yojana : टप्पा 2 अंतर्गत स्वतःचा सर्वे स्वतःच करा पंतप्रधान ग्रामीण आवास योजना अंतर्गत वंचित राहिलेल्या गरजू लाभार्थ्यांना शासनाने पुन्हा एकदा Pradhan Mantri Gramin Awas Yojana : टप्पा 2 अंतर्गत लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे. लाभार्थ्याला स्वतःचा सर्वे स्वतःच करण्याची संधी शासनाने मोबाईल app च्या साह्याने उपलब्ध करून दिली आहे. लाभ्र्ठी स्वतःचा सर्वे करून सदरील योजनेचा लाभ मिळवू शकतात. माहिती आवडली असल्यास आपल्या मित्रांना शेअर करा.

आमच्या सोशल मिडिया ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंकवर टच करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top