पिक विमा कसा भरायचा? – Crop Insurance Online Process in Marathi

पिक विमा ही काही नवीन गोष्ठ नाही. प्रत्येक शेतकऱ्याला पिकविमा दरवर्षी भरावाच लागतो. पण ज्यांच्या कडे जावून पीकविमा भरला जातो असे CSC सेंटर चालविणाऱ्यांना मात्र पिकविमा भरतांना विशेष काळजी घ्यावी लागते, जर फॉर्म चुकला तर शेतकरी CSC सेंटर वाल्यांना जिम्मेदार धरतात. आज आपण पिकविमा कसा भरायचा या बद्दल माहिती पाहणार आहोत.पिक विमा कसा भरायचा?- Crop Insurance Online Process in Marathi

पिक विमा

शासनाकडून शेतकऱ्यांकडून काही ठराविक रक्कम भरून घेवून, त्या बदल्यात शेतकऱ्यांना झालेल्या नुकसान भारपायीचा मोबदला दिला जातो, यालाच शेतकरी पिक विमा आपण म्हणतो. अगोदर एक रुपयात पिकविमा शासनाकडून भरून घेतला जात होता पण यावर्षी पासून ती योजना बंध करण्यात आलेली आहे. आता विमा रक्कम शेतकऱ्याला भरावी लागत आहे.

पिक विमा कसा भरायचा? | Crop Insurance Online Process in Marathi

पिक विमा योजना (Crop Insurance Scheme) ही शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची योजना आहे. हवामानातील बदल, अतिवृष्टी, दुष्काळ, गारपीट, कीड-रोग अशा कारणांमुळे पिकांचे मोठे नुकसान होते. अशा वेळी पिकविमा हा शेतकऱ्यांसाठी सुरक्षाकवच ठरतो. चला तर मग पाहूया, ऑनलाईन पिक विमा फॉर्म कसा भरायचा?

पिक विमा फॉर्म भरण्याची स्टेप-बाय-स्टेप प्रक्रिया

1. मोबाईल नंबर टाकणे

  • शेतकऱ्याने मागील वर्षी फॉर्म भरलेला असेल तर मोबाईल नंबर टाकताच तुमची संपूर्ण माहिती ऑटोमॅटिक दिसेल.

  • जर माहिती दिसली नाही तर ती मॅन्युअली भरता येते.

2. शेतकऱ्याची माहिती भरणे

  • नाव, वडिलांचे नाव (Relative Name / Son of)

  • वय (Age)

  • लिंग (Gender – Male/Female)

  • जात (Caste Category)

  • शेतकरी प्रकार (Farmer Category)

    • Owner (मालक) → नाव सातबाऱ्यावर असल्यास

    • Share Cropper (शेअर पद्धतीने शेती करणारा)

    • Tenant / Payment (भाडेतत्त्वावर शेती करणारा)

3. नॉमिनी डिटेल्स व लोकेशन

  • नॉमिनीचे नाव व माहिती भरा.

  • ज्या ठिकाणच्या शेतासाठी विमा उतरवायचा आहे ते गाव/ग्रामपंचायत निवडा.

4. पीक माहिती भरणे (Crop Details)

  • कोणते पीक घेतले आहे ते निवडा. (भुईमूग, सोयाबीन, कांदा, मका इ.)

  • मिक्स क्रॉपिंग (Mixed Cropping) असेल तर योग्य रेशो टाका.

  • पेरणीची तारीख (Sowing Date) निवडा.

5. जमीन माहिती (Land Details)

  • सर्व्हे नंबर / गट नंबर (Survey Number) भरा.

  • खाते नंबर (Khata Number) टाका.

  • तुमचं नाव व जमिनीची माहिती बरोबर आहे का ते तपासा.

6. क्षेत्रफळ (Area) व प्रीमियम

  • किती हेक्टरमध्ये पीक घेतले आहे ते लिहा.

  • सिस्टम ऑटोमॅटिक प्रीमियम दाखवेल.

  • Sum Insurance (भरपाई रक्कम) सुद्धा दिसेल.

7. कागदपत्रे अपलोड करणे

  • सातबारा (7/12 extract) अपलोड करा.

  • जर एकापेक्षा जास्त गट नंबर असतील तर ते देखील जोडू शकता.

8. फॉर्म सबमिट करणे

  • सर्व माहिती तपासून “Proceed” वर क्लिक करा.

  • पिक विमा प्रीमियम भरल्यावर तुमचा अर्ज पूर्ण होईल.

पिक विम्याचे फायदे

  •  हवामानातील बदलांमुळे झालेल्या नुकसानीवर भरपाई
  •  शेतकऱ्याला आर्थिक सुरक्षितता
  •  कर्जफेडीसाठी मदत
  •  उत्पादन खर्चाची हमी

क्षेत्रानुसार विम्याची रक्कम कशी चेक करायची

क्षेत्रानुसार विमा भरणा किती आहे हे चेक करण्यासाठी भारत सरकारच्या https://pmfby.gov.in या वेबसाईटवर जावे लागेल. या वेबसाईटवर जाऊन Culculate या पर्यायावर क्लिक करायचे आहे, रब्बी किंवा खरीप, वर्ष, योजना, राज्य, जिल्हा आणि पीक निवडायचे आहे. त्यानंतर ओपन होणाऱ्या पेजवर क्षेत्र टाकल्या नंतर क्षेत्राला लागणार भरणा रक्कम दिसणार आहे.

निष्कर्ष

शेतकऱ्यांसाठी पिक विमा योजना ही एक महत्त्वाची योजना आहे. यामध्ये सहभागी झाल्यास पिकांचे नुकसान झाले तरी शासनाकडून योग्य ती भरपाई मिळते. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी वेळेत ऑनलाईन फॉर्म भरून पिक विमा भरणे महत्वाचे आहे. पीकविमा कसा भरायचा या बद्दल सविस्तर माहिती पहिली.

माहिती आवडलीअसल्यास इतरांना शेअर करा

हे हि वाचा :-

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top