Bhajani Mandal Grant: भजनी मंडळांना साहित्य खरेदीसाठी 25000 रु. अनुदान, Online अर्ज

Bhajani Mandal Grant: भजनी मंडळांना साहित्य खरेदीसाठी 25000 रु. अनुदान, Online अर्ज: महाराष्ट्र शासनाच्या सांकृतिक कार्य विभागाकडून सांस्कृतिक क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था आणि मंडळांना अनुदान दिले जाते.चालू वर्ष 2025 पासून गणेशोत्सवाला महाराष्ट्राचा राज्य महोत्सव दर्जा देण्यात आलेला आहे. गणेशोत्सवा निमीत्त राज्यातील भजनी मंडळांना रु. 25000 अनुदान साहित्य खरेदीसाठी देण्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी जाहीर केले आहे. या अनुदानाचा उद्देश पारंपरिक भजन परंपरा जपणे, ग्रामीण संस्कृतीला चालना देणे आणि कलाकारांना प्रोत्साहन देणे हा आहे.Bhajani Mandal Grant

Bhajani Mandal Grant: भजनी मंडळ अनुदान योजना

ग्रामीण भागातील सांस्कृतिक वारसा जतन करण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून ही नवीन योजना सुरु करण्यात आलेलिया आहे. ग्रामीण असेच शहरी भागातील बरेच भजनी मंडळ आहेत जे गावात असणारी परंपरागत साहित्यावर भजन करून आपली परंपरा जपतांना आढळतात. अशा भजनी मंडळाला शासन साहित्य खरेदीसाठी 25000 हजार रुपये अनुदान देणार आहे. हे अनुदान मिळविण्यासाठी मंडळाला शासनाच्या वेब पोर्टलवर online अर्ज करायचा आहे. अर्ज कसा करायचा ते आपण खाली पहाणार आहोत.

Bhajani Mandal Grant: भजनी मंडळ अनुदान अर्ज प्रक्रिया ( online अर्ज )

भजनी मंडळाला शासकीय अनुदाना मिळविण्यासाठी शासनाच्या ऑनलाईन पोर्टलवर जावून online अर्ज करायचा आहे. अर्ज कसा करायचा आणि कोटी कागदपत्रे यासाठी लागतात याची संपूर्ण माहिती आपण खाली पाहणार आहोत.

  • भजनी मंडळाला online अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम शासनाच्या सांकृतिक कार्य संचालनालय, मुंबई या पोर्टला भेट द्यावी लागेल. या पोर्टल ला भेट देण्यासाठी https://mahaanudan.org या वेबसाईट वर जावे लागेल.
  • वरील पोर्टलवर आल्या नंतर सर्वप्रथम ‘संस्था/भजनी मंडळ नोंदणी’ या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
  • ‘संस्था/भजनी मंडळ नोंदणी; या पर्यायावर क्लिक करताच तुम्हाला तुमचा विभाग, जिल्हा, तालुका मंडळाचे नाव, मोबाईल नंबर आणि तुमचा पूर्ण पत्ता इत्यादी माहिती भरायची आहे.
  • वेईल माहिती भरल्या नंतर खालील ‘नोंदणी करा’ या बटनावर क्लिक करा, अशा पद्धतीने मंडळाची नोंदणी पूर्ण होईल.
  • त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाकून otp द्वारे लॉगीन करून घ्या.
  • त्यानंतर ओपन होणार्या नवीन पेजवर ‘भजनी मंडळ भांडवली अनुदान अर्ज’ या पर्यायावर क्लिक करा.
  •   या नवीन पेजवर भजनी अंदालाचे नाव, भजनी मंडळाचे बँक खाते, भजनी मंडळ pan कार्ड असेल तर ते टाका, मंडळाचे कार्यक्षेत्र, मागील काळात केलेल्या उलेखनीय कार्याची माहिती,भजनी मंडळ सदस्य संख्या इत्यादी माहिती भार्याची आहे.
  • खालील रकान्यात अपलोड करायची कागदपत्रे पुढील प्रमाणे आहेत 1) भजनी मंडळ अस्तित्वात असल्याचे ग्रामपंचायत प्रमाणपत्र 2) आयोजक पत्र 3) कार्याक्रमचे फोटो 4) कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका 5) हॅण्डबील/कार्यक्रमाच्या जाहिरातीचे कात्रण इत्यादी कागदपत्रे अपलोड करावी लागतात. शेवटी submit बटनावर क्लिक करून फॉर्म अपलोड करायचा आहे, अशा पद्धतीने पूर्ण होईल.

निष्कर्ष

Bhajani Mandal Grant: भजनी मंडळांना साहित्य खरेदीसाठी 25000 रु. अनुदान, Online अर्ज या लेखात आपण शासनाने सुरु केलेल्या Bhajani Mandal Grant/ भजनी मंडळ अनुदान योजने बद्दल संपूर्ण माहिती पहिली. शासनाच्या https://mahaanudan.org पोर्टलवर जाऊन भजनी मंडळ अनुदानासाठी  अगदी सोप्या पद्दतीने online अर्ज करता येतो. माहिती आवडली असल्यास आपल्या गावातील whatsup ग्रुपवर शेअर करा.

अशाच नवीन माहितीसाठी आमच्या सोशल मिडिया ग्रुपमध्ये सामील व्हा.

हे हि वाचा :-

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top