Maharashtra Factory Act: महाराष्ट्र कारखाना कायदा 1948 – संपूर्ण आढावा

Maharashtra Factory Act: भारतामधील कारखान्या मध्ये काम करणाऱ्या कामगारांसाठी सदरील कायदयाची निर्मिती 1948 मध्ये करण्यात आली. हा कायदा करण्यामाघे शासनाचा मूळ उद्देश हा कारखान्यातील कामगारांचे आरोग्य, सुरक्षा व अल्याण सुनिश्चित करणे हे होते. कारखान्यातील कामगारांच्या समस्या सोडविण्यासाठी सदरील कायदयाची प्रभावीपणे अंमलबजावणी ही 1 एप्रिल 1949 पासून सुरु करण्यात आली. आपण या लेखात Maharashtra Factory Act विषयी संपूर्ण आढावा घेणार आहोत.Maharashtra Factory Act

Maharashtra Factory Act/ महाराष्ट्र कारखाना कायदा 1948

महाराष्ट्रात वाढते आद्योगिकरण आणि कामगाराची संख्या लक्षात घेता, महाराष्ट्रात कारखाना क्षेत्रात एक स्वतंत्र कायदा असणे आवश्यक होते, हे लक्षात घेता भारत सरकारने 1948 मध्ये एक स्वतंत्र Factory Act अस्तित्वात आणला. या कायद्याने कारखान्यासाठी स्वतंत्र नियम तयार झाले तसेच कमगारांना आरोग्य, सुरक्षा व कल्याण या बाबतीत सुरक्षितता मिळाली.

Maharashtra Factory Act 1948 पूर्वी कारखान्यांमध्ये कामगारांना कोणत्याही प्रकारचे कायदेशीर संरक्षण नव्हते. त्या काळात ब्रिटिश राजवटीखाली काही प्राथमिक आणि जुनाट कायदे अस्तित्वात होते, परंतु ते अपुरे आणि सर्वसमावेशक नव्हते. कामगारांना 12 ते 14 तास सलग काम करावे लागत असे, त्यांना सुट्टी, वैद्यकीय सुविधा किंवा सुरक्षिततेची साधने मिळत नव्हती.

1948 मध्ये भारत सरकारने ‘ Factory Act’ लागू केला आणि महारष्ट्र सरकारने त्याची अंमलबजावणी कडकपणे सुरू केली. पुढील काळात विविध दुरुस्त्यां करून हा कायदा अधिक सक्षम करण्यात आला. महाराष्ट्रासारख्या औद्योगिक राज्यात, जिथे मुंबई, पुणे, नागपूर, सोलापूर आणि कोल्हापूरसारखी औद्योगिक केंद्रे आहेत, अशा ठिकाणी या कायद्याचा प्रभाव मोठ्या प्रमाणात जाणवतो.

आज महाराष्ट्रात झपाट्याने वाढणारे औद्योगिकरन लक्षात घेता, अनेक आंतरराष्ट्रीय मानकांचे कारखाने महाराष्ट्रात उभे आहेत आणि या सर्व कारखान्यांना कायद्याच्या तरतुदींचे पालन करणे बंधनकारक आहे. Maharashtra Factory Act 1948 मुळेच महाराष्ट्रातील कामगार संघटनांना बळ मिळाले आणि औद्योगिक संबंध सुधारले.

Factory Act मुख्य उद्देश

कारखाना कायद्याने कारखानदारांना नियमांच्या अधीन राहून कामकाज करण्याचे बंधन आले तसेच कामगारांच्या आरोग्य व इतर कल्याणकारी योजना राबविण्याचे निश्चित करून देण्यात आले. यामुळे कामगारांना कामाचे तास, रजा, आरोग्य विषयक सुविधा आणि अपघात वेद्यकीयसेवा आणि आर्थिक  मोबदला इत्यादी सुनिश्चित झाले.

या कायद्याचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे –

  1. कारखाना कामगारांचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुरक्षित ठेवणे.
  2. कारखाना कामगारांना योग्य कामाचे तास, विश्रांती, सुट्ट्या देणे.
  3. कारखाना कामगारांना कारखान्यात आवश्यक सुरक्षा साधने आणि वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देणे.
  4. कारखान्यातील महिलांच्या आणि बालकामगारांच्या शोषणाला आळा घालणे.

Maharashtra Factory Act हा कायदा केवळ कामगारांच्या फायद्यासाठीच नाही तर उद्योगपती आणि संपूर्ण औद्योगिक क्षेत्रासाठीही आवश्यक आहे. कारण जेव्हा कामगार सुरक्षित आणि समाधानी असतात, तेव्हा उत्पादनक्षमता वाढते, उद्योग स्थिर होतात आणि अर्थव्यवस्था प्रगतीच्या मार्गावर जाते.

महाराष्ट्र कारखाना कायदा पीडीएफ मध्ये पाहण्यासाठी पुढील लिंकवर जा – Maharashtra Factory Act PDF

कारखान्दारासाठी नियम

कारखानदाराला कारखाना उभा करण्यासाठी Maharashtra Factory Act नुसार खालील काही महत्वाच्या नियमांचे पालन करावे लागते.

  • कारखानदाराला कारखाना उभारणीसाठी राज्य सरकारकडे आराखडे सादर करणे आवश्यक आहे.
  • बांधकाम व जागेच्या परवानगीसाठी पूर्वपरवानगी घेणे आवश्यक.
  • नोंदणी व परवाना घेणे बंधनकारक आवश्यक.
  • कारखान्याला आवश्यक असणाऱ्या पर्यावरण आणि इतर विभागाच्या परवानग्या घेणे बंधन कारक आहे.

कारखाना मालक म्हणून जबाबदारी

  • कामगारांचे आरोग्य, सुरक्षा व कल्याण सुनिश्चित करणे बंधनकारक आहे.
  • सुरक्षित कामाचे वातावरण, योग्य प्रशिक्षण, सुरक्षित यंत्रणा व साहित्य हाताळणीस सोपे इत्यादी बाबीची जबाबदारी मालकावर आहे.
  • लेखी आरोग्य व सुरक्षा धोरण तयार करून कामगारांना कळविणे आवश्यक आहे, जेणे करून अपघात घडल्यास कामगारांना भविष्याची सुरक्षितता मिळाली पाहिजे.

अल्पवयीन कामगार नियम

  • 14 वर्षांखालील मुले कारखान्यात कामाला लावणे हा कायद्यानुसार गुन्हा आहे.
  • किशोरवयीन व्यक्तीकडे Fitness Certificate असणे आवश्यक.
  • मुलांचे कामाचे तास 4-5 तासांपर्यंत मर्यादित आहेत, रात्री काम करण्यास मनाई आहे.

आरोग्य विषयक तरतुदी

कारखान्यात कामगाराच्या आरोग्याच्या दृष्टीने Maharashtra Factory Act नुसार  कायद्यात काही तरतुदी करण्यात आलेल्या आहेत त्या खालील प्रमाणे.

  • कारखाना स्वच्छ व सुव्यवस्थित ठेवणे बंधनकारक आहे.
  • यंत्र सामुग्री पासून निघणारा कचरा तसेच धूळ, घाण नियमित साफ करणे.
  • कारखान्याचा परिसर तसेच  मजले, भिंती, छप्पर स्वच्छ व रंगलेले/पांढरे केलेले असावे.
  • सांडपाण्याचा तसेच वापरातील पाण्याचा योग्य निचरा होत असावा.

कामगाराची सुरक्षितता

  1. यंत्रांचे कुंपण (Section 21) :- कारखान्यात असलेल्या धोकादायक यंत्रभागांभोवती कुंपण/कव्हर असणे बंधनकारक.
  2. हलणारी यंत्रणा (Section 22):- चालू असलेल्या यंत्राजवळ कामगारांना थेट काम करु देऊ नये, जोपर्यंत सुरक्षित पद्धतींचे पूर्ण पालन होत नाही.
  3. यंत्रांचे स्वच्छता व तेलपाणी (Section 23-24):-  यंत्र चालू असतांना स्वच्छ करण्याचे काम बंद करावे किंवा सुरक्षित साधने वापरूनच करावे. 18 वर्षांखालील व्यक्तीला धोकादायक यंत्राजवळ काम देऊ नये.
  4. कापणी यंत्र (Section 25):- धोकादायक कापणी यंत्रांना अतिरिक्त सुरक्षा व्यवस्था केलेली असावी.
  5. कापसाची प्रक्रिया (Section 27):- कापसाचे लोकर (cotton fluff) उडत असल्यास ते बाहेर काढण्यासाठी योग्य यंत्रणा बसविलेली असावी.
  6. आगीपासून संरक्षण (Section 38):- कारखान्यात योग्य फायर-फायटिंग साधने उपलब्ध असावीत. कामगारांना आग लागल्यास बाहेर पडण्यासाठी सुरक्षित मार्ग दिशा निर्दर्शीत केलेला असावा.
  7. धोकादायक कामे (Section 41A – 41H)धोकादायक रसायने/प्रक्रियांसाठी विशेष नियम लागू आहेत जी पाळणे बंधन कारक आहेत.धोकादायक रसायने निर्माण होणाऱ्या ठिकाणी कामगारांना संरक्षणात्मक साधने (हेल्मेट, मास्क, ग्लोव्हज) देणे बंधनकारक.कामगारांची नियमित आरोग्य तपासणी झाली पाहिजे.अपघात टाळण्यासाठी आपत्कालीन योजना तयार असणे आवश्यक आहे.

कामगारांच्या कल्याणासाठी सोयी-सुविधा

  1. स्वच्छता गृह (Section 42):- पुरुष व महिलांसाठी पुरेशा संख्येत शौचालये व मूत्रालये असणे बंधनकारक, वेगळ्या सुविधा उपलब्ध असाव्यात.
  2. धुण्यासाठी जागा (Section 42):- कामगारांना स्वच्छतेसाठी कपडे आणि इतर वस्तू धुण्यासाठी जागा उपलब्ध असावी.
  3. साठवणूक (Lockers) (Section 43):- कामगारांना कपडे बदलण्यासाठी व वैयक्तिक वस्तू ठेवण्यासाठी लॉकर्सची उपब्धता असावी.
  4. बसण्याची व्यवस्था (Section 44):- यांत्रापाशी किंवा इतर ठिकाणी उभे राहून काम करणाऱ्या कामगारांसाठी बसण्याची व्यवस्था असावी.
  5. बालसंगोपन केंद्र (Section 48):- महिलांची संख्या 30 पेक्षा जास्त असल्यास कारखान्यात मुलांसाठी बालसंगोपन केंद्र असावे.
  6. प्राथमिक उपचार पेटी (First Aid) (Section 45):- प्रत्येक कारखान्यात प्राथमिक उपचार पेट्या असणे बंधनकारक आहे. 150 पेक्षा जास्त कामगार संख्या असल्यास स्वतंत्र First Aid Room असावा.
  7. विश्रांतीगृहे व कपडे बदलण्याची सोय (Section 47):- कारखान्यात 150 पेक्षा जास्त कामगार संख्या असल्यास विश्रामगृह व कपडे बदलण्यासाठी स्वतंत्र जागा असावी.
  8. उपहार गृह ( Section 48 ):- कारखान्यात कामगार संख्या 250 पेक्षा जास्त असल्यास उपहार गृह असावे.

प्रोढ कामगारांसाठी कामाचे तास

  • प्रोढ कामगार असेल तर दिवसाला फक्त 9 तास काम असावे.
  • आठवड्यात कामाचे एकूण तास 48 पेक्षा जास्त नसावे.
  • आठवड्यात एक दिवस सुट्टी.
  • ओव्हरटाईमला दुहेरी वेतन दिले जावे.

तरुण कामगार

  • 14 वर्षा आतील मुलांना नोकरीस ठेवण्यास बंदी.
  • 15-18 वयातील किशोर वयीन तरुणांना वैद्यकीय प्रमाणपत्र आवश्यक.
  • किशोर वयीन तरुणांचे कामाचे तास मर्यादित.

वेतनासह वार्षिक रजा

  • वर्षभर काम लेल्यास वेतनासह सुट्टीचा अधिकार.
  • प्रौढ कामगाराला 20 दिवस सलग काम केल्यास एक दिवस वेतनासह सुट्टीचा अधिकार.
  • 18 वर्षा आतील मुलांना सलग 15 दिवस काम केल्यास 1 दिवस वेतनासह सुट्टी.

दंड प्रक्रिया

  • Maharashtra Factory Act नुसार कायद्याचे उलंघन झाल्यास ठराविक दंड किंवा कैद.
  • कायद्याचे उलंघन झाल्यास व्यवस्थापक व कारखानदार जबाबदार.

पूरक व्यवस्था

  • कारखानदाराला सर्व नोंदी रजिस्टर ठेवणे आवश्यक.
  • सूचना बोर्ड लावणे बंधनकारक.
  • Maharashtra Factory Act नुसार नियमांची योग्य अंमलबजावणी करून घेण्याचा आदिकर शासनाला आहे.
  • धोकादायक प्रक्रिया नियोजन.
  • अपघात किंवा धोकादायक घटनांची सूचना नोंदवून ठेवणे.
  • कारखाना कमगारांना विषबाधा किंवा रोगाची सूचना देणे.
  • कायद्याविषयी एखाद्या कलमासाठी अपीलची कार्यपद्धती बोर्डवर लावणे.
  • कारखान्यातील प्रत्येक घडामोडी विषयी सूचना प्रदर्शित करणे.
  • निरीक्षकाने मागितलेली माहिती उपलब्ध करून देणे.
  • हजेरी नोंदवही अद्यावत ठेवणे.
  • अपघात व धोकादायक घटनांची नोंद ठेवणे.

वरील सर्व तरतुदीची नोंद कारखान्दाराकडे असणे आवश्यक आहे. कारखान्यातील अपेक्षित व अनपेक्षित घटनांची माहिती कामगारांना देणे बंधनकारक आहे.

निष्कर्ष

Maharashtra Factory Act: महाराष्ट्र कारखाना कायदा 1948 – संपूर्ण आढावा या blog मध्ये आपण कारखादार आणि कामगार यांच्यासाठी भारत सरकारने तयार केलेल्या Factory Act-1948 या ठळक माहिती पहिली. Maharashtra Factory Act 1948 हा कामगारांच्या सुरक्षा, आरोग्य आणि कल्याणासाठी अत्यंत महत्त्वाचा कायदा आहे. या लेखात आपण कायद्याचा इतिहास, तरतुदी, सुरक्षा उपाय, महिला व बालकामगारांचे संरक्षण आणि उपयुक्तता या विषयी संपूर्ण आढावा जाणून घेतला. माहिती आवडली असल्यास शेअर करा.

हे ही वाचा :-

अशाच नाव-नवीन माहितीसाठी आमच्या सोशल मिडिया ग्रुपमध्ये खालील सोशल मिडिया आयकॉनवर क्लिक करून सामील व्हा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top