Agro Machinery Subsidy: Power Tiller सबसीडी महाराष्ट्र

Agro Machinery SubsidyAgro Machinery Subsidy:Power Tiller  शेती उत्पन्न वाढीसाठी शेती मध्ये आधुनिकता असणे अत्यंत आवश्यक, नवनवीन आधुनिक तंत्रज्ञान वापरून शेतीचे उत्पन्न वाढविता येवू शकते. आधुनिक यंत्रसामुग्रीचा वापर करून कमी खर्चिक आणि कमी मेहनती मध्ये उत्पन्न काढता येते. लहान शेतकऱ्याच्या आवाक्यात असलेल्या Power Tiller च्या साह्याने आधुनिक शेती करता येते. महाराष्ट्रात MahaDBT या महाराष्ट्र शासनाच्या पोर्टल वरून Power Tiller खरेदीसाठी  “Subsidy” दिली जाते.

Power Tiller ने करता येणारी कामे 

Power Tiller म्हणजे एक मिनी ट्रक्टर म्हणून ओळखले जाते. कमी खर्चात शेतीचे विवध कामे करणारं हे यंत्र आहे.

  • शेती मशागती मध्ये पाळी मारणे.
  • छोटे पेरणी यंत्र जोडून पेरणी करणे.
  • पिकाची फवारणी करणे.
  • पिकांच्या अंतर्गत मशागत जसे की कोळपणी, कापसातील पाळी इत्यादी मशागत करता येते.
  • छोटी ट्रोली जोडता येते.

Agro Machinery Subsidy Power Tiller /महत्वाच्या बाबी 

घटकमाहिती
योजनेचे नाव MahaDBT Power Tiller Subsidy योजना.
पोर्टलMahaDBT Farmer पोर्टल.
उद्दिष्टशेतकऱ्यांना यंत्रसामग्री खरेदीसाठी अनुदान उपलब्ध करून देणे.
यंत्रPower Tiller (8 HP पेक्षा कमी / जास्त).
सबसीडी टक्केवारी50% ते 75% (SC/ST, महिला, सीमांत शेतकरी, अल्प भूधारक शेतकरी यांना प्राधान्य ).
कमाल अनुदान₹50,000 ते ₹75,000 (अट व HP प्रमाणे).
आवश्यक कागदपत्रेआधार कार्ड, 7/12 उतारा, बँक पासबुक, जात प्रमाणपत्र (आवश्यक असल्यास ).
अर्ज पद्धतऑनलाइन – MahaDBT पोर्टलवरून.

MahaDBT Farmer पोर्टल

महाराष्ट्र शासनाने राज्यातील शेतकऱ्यांनाशेतीविषयीच्या अनेक योजनांचा लाभ देण्यासाठी या पोर्टलची निर्मिती केलेली आहे. या पोर्टल अंतर्गत अल्प भूधारक, अत्य अल्पभूधारक शेतकऱ्यांना शेती उपयोगी अनेक योजनांचा लाभ दिला जातो. या पोर्टल अंतर्गत दिला जाणारा लाभ हा DBT मार्फत सरळ शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टाकला जातो.

Power Tiller Subsidy मिळविण्यासाठी अर्ज कुठे करायचा 

शेतीच्या अनेक कामासाठी उपयोगी पडणाऱ्या Power Tiller या यंत्र खरेदीसाठी शासन सबसिडी उपलब्ध करून देते. यंत्र सामुग्री खरेदीचा आर्थिक भुर्दंड कमी करण्यासाठी शासन agro machinery subsidy उपलब्ध करून देते. “Subsidy” मिळविण्यासाठी MahaDBT वर अर्ज कसा करायचा याची माहिती आपण खाली पाहणार आहोत.

  • सर्वप्रथम महाराष्ट्र शासनाच्या MahaDBT https://mahadbt.maharashtra.gov.in  या पोर्टल वरती जावे लागेल, यांपोर्तल वर आल्या नंतर लॉगीन करण्यासाठी शेतकर्याकडे FARMER ID असणे आवश्यक आहे. शासनाने ते कंपल्सरी केले आहे.
  • FARMER ID टाकून लॉगीन केल्या नंतर कृषी यांत्रिकीकरण हे घटक मध्ये निवडायचे आहे.
  • नंतरच्या पर्यायामध्ये Power Tiller निवडा आणि सबमिट बटनावर क्लिक करा.
  • फॉर्म भरल्या नंतर मुख्यपृष्ठ वर जावून अर्ज करा यावरती क्लिक करून केलेल्या अर्ज समोरील बटन दाबून फीस भरा व पावती प्रिंट करून घ्या.

अशा पद्धतीने Agro Machinery Subsidy Power Tiller साठी ऑनलाईन अर्ज करता येतो.

सारांश

Agro Machinery Subsidy: Power Tiller सबसीडी महाराष्ट्र या लेखात आपण Power Tiller खरेदीसाठी महाराष्ट्र सरकारकडून दिल्या जाणाऱ्या Subsidy विषयी संपूर्ण माहिती पहिली. महाराष्ट्र शासनाच्या MahaDBT या पोर्टल वरून शासनाच्या अशा अनेक योजना शेतकरी हितासाठी राबविल्या जातात.

माहिती आवडली असल्यास आपल्या मित्रांना शेअर करा.

हे ही वाचा:-

अशाच माहितीसाठी आमच्या सोशल मिडिया ग्रुपमध्ये सामील होण्यासाठी खालील आयकॉन ला क्लिक करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top