मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना e-KYC : मोबाईल वरून e-KYC, संपूर्ण प्रोसेस

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनामहाराष्ट्र शासनाने राज्यातील लाडक्या बहिणीसाठी सुरु केलेली ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ राज्यातील महिलांमध्ये अत्यंत लोकप्रिय आहे. घरातील खर्चाला हातभार लावण्यासाठी मदतीचा हात महिलांना मिळत आहे. शासनाने आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या पोर्टलवर e-KYC करण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना

महाराष्ट्र शासनाने राज्यातील महिलांना आपल्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी ‘उख्यामंत्री माझी लाडकी बहीण योजना’ सुरु केली आहे. या योजनेतून राज्यातील बहिणींना दरमहा रु. 1500 एवढा हप्ता त्यांच्या बचत खात्यात MAHADBT द्वारे जमा केला जातो.

योजनेतून मिळणारे फायदे

  • राज्यातील ‘उख्यामंत्री माझी लाडकी बहीण योजना’ पोर्टलवरील नोंदणीकृत लाडक्या बहिणींना दरमहिन्याला शासनामार्फत रु.1500 रुपये दिले जातात.
  • राज्यातील लाडक्या बहिणींना महाराष्ट्र शासन बिनव्याजी रु. 1 लक्ष एवढी  रक्कम स्वतःचा व्यवसाय उभा करण्यासाठी उपलब्ध करून देणार आहे, नुकतीच तशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे.
  • खात्यावर दरमहा जमा होणाऱ्या हप्त्यामुळे महिलांना आपले दैनंदिन खर्च भागवणे सहज सोपे झाले आहे, घरखर्च आणि इतर खर्च भागविण्यासाठी त्यांना या पैशातून मदत होत आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना e-KYC संपूर्ण प्रोसेस

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत मोबाईल वरून e-KYC करता येणार आहे, कशी करायची याच संपूर्ण माहिती आपण खाली पाहणार अहोत.

  • सर्वप्रथम राज्य शासनाच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना https://ladakibahin.maharashtra.gov.in या पोर्टलवर जायचे आहे.
  • या पोर्टल वरती आल्या नंतर समोर दिसणाऱ्या होमपेजवर वरील बॉक्समध्ये ‘मुख्यमंत्री लाडकी बाहीन e-KYC ‘ म्हणून नवीन पर्याय दिसेल या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
  • नवीन पर्यायावर क्लिक करताच समोर नवीन पेज ओपन होईल, या पेजवर पहिल्या रकान्यात लाभार्थी महिलाचा आधार नंबर टाकायचा आहे. आणि खालील रकान्यात दिलेला कॅप्चा भरायचा आहे.मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना e-KYC
  • कॅप्चा भरल्या नंतर लाभार्थी महिलांना आधार वापराविषयी सहमती विचारलेली आहे, त्याखाली ‘मी सहमत आहे’ या बटनावर क्लिक करायचे आहे.
  • या बटनावर क्लिक करताच लाभार्थी महिलेच्या आधार कार्डशी लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर OTP येयील, ती पुढील पेजवर भरून सबमिट करा या बटनावर क्लिक करायचे आहे.
  • त्या नंतर पेजवर वार्निंग दिसेल की, ‘e-KYC प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी  माहिती द्या’ त्यानंतर पुढील पेजवर वडिलांचे किंवा पतीचे आधार नंबर टाकायचे आहे.
  • वडिलांचे किंवा पतीचे आधार नंबर टाकून OTP घ्यायचा आहे, आलेला OTP भरून सबमिट करा या बटनावर क्लिक करायचे आहे.
  • सबमिट बटनावर क्लिक करताच पुन्हा वार्निंग दिसेल की, ‘e-KYC प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी  माहिती द्या’ आणि पेजवर दिसणाऱ्या तुमच्या पतीचे किंवा वडिलांचे नाव बरोबर आहे का हे चेक करायचे आहे.
  • त्यानंतर पहिल्या पर्यायामध्ये कुटुंबातील सदस्य शासकीय सेवेत कार्यरत आहे किंवा नाही, हे विचारले जाईल तो पर्याय व्यवस्थित वाचून निवडायचा आहे.
  • त्या नंतर लाभार्थ्याचा जात प्रवर्ग निवडायचा आहे, लाभार्थी ज्या CAST प्रवर्गात येते to योग्य पर्याय निवडा.
  • त्यानंतर दुसऱ्या पर्यायामध्ये कुटुंबातील एक विवाहित आणि दुसरी अविवाहित अशा दोनच महिला या योजनेचा लाभ घेत आहेत म्हणून हो किंवा नाही मधला एक पर्याय हो निवडायचा आहे.
  • त्या नंतर समोरील टिक मार्कवर टिक करून आपली माहिती खरी आहे अशी सहमती देवून सबमिट करा या बटनावर क्लिक करायचे आहे.
  • सबमिट बटनावर क्लिक करताच तुमची KYC पूर्ण झाल्याचा म्यासेज तुम्हाला दिसेल.

अशा पद्धतीने आपल्या मोबाईल फोनच्या साह्याने तुम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची e-KYC अगदी सोप्या पद्धतीने करू शकता.

E-KYC साठी आवश्यक कागदपत्रे

  1. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी महिलांचे आधार कार्ड.
  2. लाभार्थी महिलाच आधार कार्डशी लिंक असलेला मोबाईल नंबर.
  3. लाभार्थी महिलाच्या पतीचे किंवा वडिलांचे आधार कार्ड.
  4. लाभार्थी महिलाच्या पती किंवा वाडीलाच आधार कार्डशी लिंक असलेला मोबाईल.

माझी लाडकी बहीण योजना e-KYC का महत्वाची आहे?

  • लाडकी बहीण योजनेतून येणारे हप्ते बंद पडलेल्या महिलांना आवश्यक.
  • DBT द्वारे थेट खात्यात पैसे जमा होण्यासाठी आवश्यक.
  • चुकीची माहिती टाळण्यासाठी e-KYC करणे आवश्यक.
  • शासनाकडून आर्थिक मदत वेळेवर मिळवण्यासाठी e-KYC पूर्ण करणे गरजेचे आहे.

सारांश 

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना e-KYC : मोबाईल वरून e-KYC, संपूर्ण प्रोसेस या लेखात आपण महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मधील लाभार्थी महिलांना पोर्टलवर उपलब्ध करून दिलेल्या e-KYC बद्दल माहिती पहिली, e-KYC मोबाईल वरून कशी करायची याची सविस्तर माहिती जाणून घेतली.

माहिती आवडली असल्यास आपल्या मित्रांना व नातेवाईकांना शेअर करा व गावातील whatsup ग्रुप वर अवश्य टाका.

हे ही वाचा:-

आमच्या सोशल मिडिया ग्रुपमध्ये सामील होण्यासाठी खालील ग्रुप आयकॉन ला क्लिक करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top