PMFME Loan Scheme: भारतातील ग्रामीण व शहरी भागातील सूक्ष्म अन्न उद्योग निर्मितीसाठी भारत सरकारने PMFME योजना (Pradhan Mantri Formalisation of Micro Food Processing Enterprises) सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत लघु व सूक्ष्म उद्योग उभारणीसाठी भारत सरकार कर्जावर भरघोस सबसिडी देत आहे. सदरील योजनेतून शेतकरी उत्पादक गट (FPO), सहकारी संस्था, स्वयं-सहायता गट (SHG) तसेच वैयक्तिक उद्योजक यांना लाभ देण्यात येणार आहे.
PMFME Loan Scheme
शहरी व ग्रामीण भागातील सूक्ष्म अन्न उद्योगांना आधुनिक बनविण्यासाठी भारत सरकारने PMFME Loan योजना सुरु केलेली आहे. One District One Product Loan या योजनेतून अन्नप्रक्रिया उद्योगात रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करणे हा शासनाचा मुख्य उद्देश आहे. लघुउद्योगांना आर्थिक मदत व तांत्रिक प्रशिक्षण देवून नवीन संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने भारत सरकार या योजनेवर काम करीत आहे.
PMFME Loan Scheme अंतर्गत मिळणारी सबसिडी
भारत सरकारकडून PMFME Loan योजनेतून देशातील सूक्ष्म अन्न उद्योगांना भरघोस सबसिडी दिली जाते.
- वैयक्तिक उद्योजकांसाठी कर्ज सबसिडी: भारत सरकार कडून PMFME Loan योजनेतून सूक्ष्म अन्न उद्योग उभारणीसाठी एकूण प्रकल्प खर्चाच्या 35% पर्यंत अनुदान दिले जाते.
- कमाल मर्यादा: प्रति उद्योजक मिळणारी सबसिडी ही प्रकल्प खर्चाच्या एकूण खर्चापैकी जास्तीत जास्त ₹10 लाखांपर्यंत सबसिडी PMFME Loan योजनेतून दिली जाते.
स्वयं-सहायता गट (SHG)/ शेतकरी उत्पादक गट SHG/FPO/Cooperative Society साठी: गटआणि संस्था यांना प्रकल्पाच्या एकूण खर्चावर 35% सबसिडी या योजनेतून भारत सरकारकडून दिली जाते.
PMFME Loan योजनेचे फायदे
- अत्यल्प व्याजदरावर कर्ज उपलब्ध.
- कर्जदाराला 35% पर्यंत सबसिडी.
- प्रशिक्षण आणि मार्गदर्शन सुविधा उपलब्ध.
- देशातील अन्नप्रक्रिया उद्योगाला चालना.
- ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना.
पात्रता व अटी (Eligibility)
PMFME Loan योजनेतून अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांना खालील पात्रता निकषात बसने आवश्यक आहे.
- अर्जदार भारतीय नागरिक असावा.
- अर्जदाराचे वय किमान 18 वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे.
- अन्नप्रक्रिया क्षेत्राशी संबंधित व्यवसाय संलग्न असणे आवश्यक आहे.
- शेतकरी गट, स्वयं-सहायता गट, सहकारी संस्था, वैयक्तिक उद्योजक या योजनेसाठी अर्ज करू शकतात.
ऑनलाईन अर्ज प्रक्रिया (Application Process)
PMFME Loan योजनेतून अर्ज करण्यासाठी भारत सरकारच्या अधिकृत https://pmfme.mofpi.gov.in पोर्टल वरती जावून ऑनलाईन अर्ज करावा लागतो.
- पोर्टल वरील फॉर्म विचारलेल्या माहितीसह पूर्ण भरून घ्यायचा आहे.
- आवश्यक असलेली कागदपत्रे अपलोड करायची आहेत (आधार कार्ड, बँक पासबुक, प्रकल्प अहवाल, व्यवसाय नोंदणी).
- अर्ज केल्या नंतर बँके मार्फत कर्ज वितरण व सबसिडी मंजुरी प्रक्रिया पूर्ण केली जाते.
PMFME योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
- लाभार्थ्याचे आधार कार्ड.
- लाभार्थ्याचे पॅन कार्ड.
- बँक पासबुक.
- प्रकल्प अहवाल (Project Report).
- व्यवसाय नोंदणी प्रमाणपत्र (असल्यास).
- पत्ता पुरावा.
निष्कर्ष
PMFME Loan Scheme: सूक्ष्म अन्न उद्योग उभेकरण्यासाठी केंद्र शासनाची आर्थिक मदत यालेखात आपण भारत सरकारच्या सूक्ष्म अन्नउद्योग सबसिडी ( PMFME योजना ) या योजने बद्दल संपूर्ण माहिती पहिली. अन्नप्रक्रिया कर्ज योजना देशातील अन्नप्रक्रियेवर आधारित उद्योगांना नवीन संधी उपलब्ध करून देण्यासाठी भरघोस सबसिडी देत आहे.
माहिती आवडली असल्यास आपल्या मित्रांना व नातेवाईकांना अवश्य शेअर करा.
हे ही वाचा:-
- pmmvy nic in रजिस्ट्रेशन: प्रधानमंत्री मातृवंदना योजना नोंदणी, लाभ व अर्ज स्थिती तपासा
- Cmegp Scheme in Marathi: मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना
- पंतप्रधान रोजगार निर्मिती अंतर्गत येणाऱ्या उद्योगांची यादी: PMEGP उद्योग लिस्ट
- व्यवसाय कर्ज योजना:वीणा तारण वीणा जामीन मिळवा कर्ज
- पंतप्रधान रोजगार निर्मिती अंतर्गत येणाऱ्या उद्योगांची यादी: PMEGP उद्योग लिस्ट
- उद्योगिनी योजना: महिलांना व्यवसाय सुरु करण्यासाठी 30% अनुदानावर बिनव्याजी कर्ज
- महिला कर्ज योजना: शासनाच्या या योजना महिलांना कर्ज उपलब्ध करून देतात
अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या सोशल मिडिया ग्रुपमध्ये सामील होण्यासाठी खालील सोशल मिडिया आयकॉन वर क्लिक करा.