जमिनीचा नकाशा आता मोबाईल वर पहा

जमिनीचा नकाशा आता मोबाईल वर पहा, नमस्कार मित्रानो आज आपण आपल्या शेत/जमिनी विषयी नियमित आवश्यक असणाऱ्या नकाशा ह्या या महत्वाच्या गोष्टीविषयी जाणून घेणार आहोत. नेहमीच जमिनीच्या बंधाविषयी वाद शेतकऱ्या मध्ये होताना आपण पाहत असतो. जमिनीची सीमा कुठून आहे, किंवा नंबर बांध कुठून आहे , बांधा वरील झाडे कोणाची आहेत या गोष्टी शेतकऱ्या मध्ये नेहमीच कळीची ठरतात. अगदी भाऊ-भाऊ जरी असले तरी असे वाद उत्पन्न होतात. गट नंबर च्या बांधा वरून खटके उडणे हे तर नेहमीचीच बाब आहे, मग अशा वेळेस जमिनीचा नकाशा काढायचा म्हणले तर तालुक्याच्या ठिकाणी जाऊन तहसील मधून भूमी अभिलेख कार्यालयातून नकाशा काढून आणावा लागतो. ज्या मध्ये वेळ तर जातोच पण त्या सोबतच पैसे ही खर्च होतात.जमिनीचा नकाशा आता मोबाईल वर पहा

आज आपण या blog मधून शेत : जमिनीचा नकाशा आता मोबाईल वर कसा पाहायचा हे पाहणार आहोत. online पद्धतीने तुम्ही नकाशा आपल्या mobile द्वारे घरच्या घरी पाहू शकता, तसेच त्याची प्रिंट ही काढू शकता.

जमिनीचा नकाशा आता मोबाईल वर पहा

शेत/जमिनिसाठी लागणारा रस्ता जर काढायचा म्हणले तर त्यासाठी सर्वात अगोदर आवश्यक असते तो म्हणजे त्या शिवाराचा किंवा त्या जमिनीचा नकाशा. नंबर बांधाचे वाद नेहमीच पाहायला मिळतात. या सगळ्या गोष्टींना सोडवायचं म्हटले तर सगळ्यात अगोदर शिवाराचा किंवा गटाचा नकाशा पहिला जातो. नकाशा काढायचा म्हणलं तर तहसीलमधील भूमी अभिलेख कार्यालयातूनच तो मिळायचा पण आता तुम्ही तो तुमच्या मोबाईल वर पाहू शकता त्याची प्रिंट सुधा काढू शकता. भिमी अभिलेख कार्यालयातील नकाशे हे कागदी असल्यामुळे ती फाटायची किंवा त्याची निगा राखणे कठीण वायचं मात्र आता भूमी अभिलेख कार्यालया काढून सर्व नकाशे Online केली जात आहेत. डिजिटल ७/12 व ८अ बरोबरच आता नकाशे ही डिजिटल पाहता येणार आहेत.

डिजिटल नकाशा कसा पाहायचा

शासनाकडून आता डिजिटल ७/12 आणि ८अ बरोबरच डिजिटल नकाशा ही उपलब्ध करून देण्यात आला आहे. डिजिटल नकाशा पाहण्यासाठी एक site उपलब्द करून देण्यात आली आहे.

डिजिटल नकाशा पाहण्यासाठी खालील लिंक वर जा

https://mahabhunakasha.mahabhumi.gov.in/27/index.jsp

डिजिटल नकाशा पाहण्यासाठी महाभूमिच्या महाभुनकाशा या वरील site वर गेल्या नंतर तुमच्या समोर Site चा मुख्य प्रुष्ठ open होईल त्यावर पुढील पर्याय निवडा.

शेत : जमिनीचा नकाशा आता मोबाईल वर पहा

site च्या मुख्ये पृष्ठावर गेल्यावर State:- राज्य निवडा, Category:- ग्रामीण भागासाठी Rural तर शहरी भागासाठी Urban हा पर्याय निवडा, District:- जिल्हा निवडा, Taluka:- तालुका निवडा , Village:- तुमचे गाव निवडा, आणि शेवटच्या रकान्यात तुमचा गट नंबर टाका.

जमिनीचा नकाशा पाहण्यासाठी पुढील गोष्टी फोलो करा

वरील सगळ्या step फोलो केल्या नंतर शेवटच्या रकाना Select By Plot No. च्या खालील रकान्यां मध्ये तुम्हाला तुमचा गट नंबर टाकायचा आहे, त्या मध्ये गट नंबर टाकताच तुमच्या समोर तुमच्या शेताचा नकाशा Open होईल.

शेत : जमिनीचा नकाशा आता मोबाईल वर पहा

गट नंबर टाकल्यानंतर शेतकऱ्याच्या शेताचा नकाशा तुमच्या स्क्रीन वर Open होईल. नकाशा मध्ये तुम्ही तुमची शेत जमीन पाहू शकता त्याच बरोबर आपल्या जमिनीचे बांध धुरे ही पाहू शकता.

👉मराठा बेरोजगार तरूणांनसाठी कर्ज योजना/अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ

नकाशाची प्रिंट कशी घ्यायची

नकाशाची प्रिंट घेण्यासाठी तुम्हाला तुम्ही Map Report वर क्लिक करावे लागेल Map Report वर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर Show Report चे पर्याय Open होईल त्यानंतर प्रिंट वर क्लिक करून तुम्ही नकाशाची प्रिंट घेवू शकता.

शेत : जमिनीचा नकाशा आता मोबाईल वर पहा

वरील प्रमाणे तुम्ही नकाशाची प्रिंट घेवू शकतात.

सारांश

वरील प्रमाणे जमिनीचा नकाशा आता मोबाईल वर पाहू शकता . नकाशा पाहण्यासाठी सदरील site ची परिपूर्ण माहिती आम्ही आपल्याला दिलेली आहे.अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या WhatsApp Group मध्ये सामील व्हा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
Scroll to Top