बांधकाम कामगार योजना फायदे: Construction Worker Scheme Benefits

बांधकाम कामगारांसाठी गठित करण्यात आलेल्या महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांच्या कडून अनेक योजना बांधकाम कामगारानच्या फायद्यासाठी राबविल्या जातात. देशात सर्वात जास्त आढळून येणाऱ्या असंघटित बांधकाम कामगारांसाठी शासन वेगवेगळ्या स्तरावरून योजना राबवितांना आपल्याला दिसते.

महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांच्या कडून बांधकाम कामगारांसाठी कल्याणकारी योजना राबविल्या जातात. त्या मध्ये सामाजिक सुरक्षा योजना,शैक्षणिक योजना,आरोग्य विषयक योजना, आर्थिक योजना इत्यादी योजना राबविल्या जातात.

 बांधकाम कामगाराच्या सामाजिक, आर्थिक , शैक्षणिक आणि आरोग्यविषयीच्या संरक्षणासाठी या योजना राबविल्या जातात. बांधकाम कामगाराच्या वर्तमानाबरोबरच त्यांचे भविष्य हि सुनिश्चित करण्याचा शासनाचा हेतू आहे. त्यामुळेच कामगाराच्या कल्याणा बरोबरच त्यांच्या पाल्याच्या कल्याणासाठी देखील शासन प्रयत्नशील आहे.

बांधकाम कामगार योजना फायदे-Construction Worker Scheme Benefits

बांधकाम कामगार योजना फायदे-Construction Worker Scheme Benefits या blog मधून आम्ही बांधकाम कामगाराच्या विविध योजना आणि त्या पासून होणारे बांधकाम कामगारांचे फायदे या विषयी परिपूर्ण माहिती तुम्हाला देणार आहोत.

बांधकाम कामगार योजना फायदे-Construction Worker Scheme Benefits

बांधकाम कामगार योजना फायदे-Construction Worker Scheme Benefits बांधकाम कामगाराच्या कल्याणकारी योजना मधून अनेक फायदे नोंदणीकृत बांधकाम कामगारांचे होतात. कारण शासनाच्या महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांच्या कडून अनेक कल्याणकारी योजना बांधकाम कामगारांसाठी निर्माण केल्या जातात.

सामाजिक,आरोग्यविषयक,शैक्षणिक, आर्थिक अशा सर्व स्थरावर या योजना दिल्या जातात.

बांधकाम कामगार योजना 

कामगार कल्याणकारी मंडळाकडून बांधकाम कामगारासाठी अनेक आर्थिक मदतीच्या योजना राबिल्या जातात. सामाजिक, आरोग्याविषयी, शेक्षणिक, आर्थिक अशा सर्वच स्तरावरून कामगार हिताच्या योजना महामंडळ उपलब्ध करून देते.

  • पहिल्या विवाहाच्या खर्चाच्या परिपूर्तीसाठी रुपये 30,000 आर्थिक मदत केली जाते.
  • कामगारांना मध्यान्ह भोजन योजना.
  • पाधान्मंत्री शश्रमयोगी मानधन योजने अंतर्गत रु. 3000 हजार मासिक मानधन योजना.
  • प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजना अंतर्गत कामगाराचा विमा काढला जातो.
  • प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना.
  • पूर्व शिक्षण ओळख प्रशिक्षण योजने अंतर्गत व्यावसायिक प्रशिक्षण.
  • इयत्ता 1 ली ते 7 वी च्या विध्यार्थ्यांसाठी प्रतिवर्षी रु. 2500 शिष्यवृत्ती योजना.
  • इयत्ता 8 वी ते 10 वी च्या विध्यार्थ्यांसाठी प्रतिवर्षी रु. 5000 शिष्यवृत्ती किमान 75% अथवा अधिक उपस्थिती असणार्या विध्यार्थ्यांसाठी.
  • इयत्ता 10 वी ते 12 वी मध्ये किमान 50% किंवा अधिक गुण प्राप्त झाल्यास रु. 10,000  शिष्यवृत्ती.
  • इयत्ता 11 वी ते 12 वी च्या विध्यार्थ्यांसाठी प्रतिवर्षी रु. 10,000 शिष्यवृत्ती.
  • पदवी अभ्यासक्रमाकरिता प्रतिवर्षी रु. 20,000 शिष्यवृत्ती नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या पत्नीसह लागू.
  • 1 )वेद्यकीय पद्विकारिता प्रतिवर्षी रु. 1,00,000 शिष्यवृत्ती योजना. 2 ) अभियांत्रिकी पद्विकारिता प्रतिवर्षी रु. 60,000 शिष्यवृत्ती नोंदीत कामगाराच्या पत्नीसह लागू.
  • 1 ) शासनमान्य पदविकेसाठी प्रती शेक्षणिक वर्षी रु. 20,000 शिष्यवृत्ती 2 ) शासनमान्य पद्व्युतर पदविकेसाठी प्रती शेक्षणिक वर्षी रु. 25,000 शिष्यवृत्ती दिली जाते.
  • नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या दोन पाल्यांना MS-CIT शिक्षणाच्या शुल्काची प्रतिपूर्ती.
  • 1 ) नेसर्गिक प्रसूतीसाठी रु. 15,000 आर्थिक मदत. 2 ) शस्त्रक्रियेद्वारे प्रसूतीसाठी रु. 20,000 दोन जीवित अपत्यासाठी लागू.
  • गंभीर आजाराच्या उपचारार्थ रु. 1,00,000 कामगार आणि कामगाराच्या कुटुंब सदस्यासाठी लागू.
  • एक मुलीच्या जन्मा नंतर लुतुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्यास त्या मुलीच्या नावे 18 वर्षा पर्यंत रु. 1,00,000 मुदत ठेव योजना.
  • कामगाराला कामावर असतांना 75% किंवा कायमचे अपंगत्व आल्यास रु. 2,00,000 अर्थिल मदत.
  • महात्मा जोतीबा फुले जन आरोग्य योजना.
  • कामगाराची मोफत तपासणी योजना.
  • कामगाराचा कामावर असताना मृत्यू झाल्यास रु. 5,00,000 आर्थिक मदत त्याच्या कायदेशीर वारसास दिली जाते.
  • कामगाराचा नेसर्गिक मृत्यू झाल्यास रु. 2,00,000 त्याच्या कायदेशीर वारसास दिले जातात.
  • अटल बांधकाम कामगार आवास योजना :- कामगाराला घर बांधण्यासाठी रु. 2,00,000  मदत महामंडळाकडून केली जाते.

Scholarship Loan: जे.एन.टाटा एन्डॉवमेंट शिष्यवृत्ती कर्ज, परदेशी शिक्षणासाठी कर्ज योजना

बांधकाम कामगार सामाजिक सुरक्षा योजना 

बांधकाम कामगारांसाठी कामगार कल्याणकारी मंडळ त्यांच्या सामाजिक सुरक्षेच्या दृष्टीने कामगाराला कामाच्या ठिकाणी कुठली दुखापत झाली आणि त्यामध्ये जर त्याला कायमचे अपंगत्व आले किंवा त्याच्या जीवाला धोका झाला तर त्याच्या आणि त्याच्या कुटुंबाच्या भविष्यासाठी शासन इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून पुढील उदरनिर्वाहा करिता, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेमधून रु. २ लाखा पर्यंत भरीव निधी उपलब्ध करून देते.

तसेच बांधकाम कामगाराच्या वृद्धपकाळातील जीवन सुसह्य व्हावे यासाठी प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजनेमधून मासिक ३००० रु. मानधन स्वरूपात दिले जातात. सामाजिक सुरक्षा योजनेतून कोणकोणत्या योजना दिल्या जातात, त्या आपण पुढे पाहू.

Parivahan Fancy Number: वाहनासाठी फॅन्सी किंवा व्हीआयपी नंबर कसा मिळवायचा ?

प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना 

असंघटित बांधकाम कामगाराच्या वृद्धत्व संरक्षणआणि सामाजिक सुरक्षेसाठी शासनाकडून महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून राबविली जाते. कामगारांचे वय झाल्या नंतर तो मजुरी करू शकणार नाही, मग अशा वेळेस त्याच्या जीवनावश्यक गरजा भागविण्यासाठी शासन प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजनेद्वारे बांधकाम कामगाराची आर्थिक मदत करते.प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना

फायदे 

  • बांधकाम कामगारला एक निश्चित मानधन महिना ३००० ( तीन हजार ) रु. प्रत्यक महिन्याला कामगाराच्या खात्यावर सदरील रक्कम जमा होणार.
  • बांधकाम कामगारांसाठी हि ऐच्छिक आणि अंशदायी योजना आहे, तुम्ही वयाच्या चाळीशी पर्यन्त केंव्हा ही चालू किंवा बंद करू शकता. आणि आपला जमा झालेला निधी काढून घेऊ शकता.
  • असंघटित बांधकाम कामगारांसाठी हि योजना महाराष्ट्र शासन आणि भारत सरकार यांच्या संयुक्त रित्या चालवली जाते.
  • बांधकाम कामगाराच्या वयाच्या ६० वर्षा नंतर मासिक ३००० रु. मिळणे सुरु होतात.

पात्रता 

  1. नोंदणीकृत बांधकाम कामगार असावा.
  2. योजनेत सहभाग घेणाऱ्या कामगारांचे वय १८ ते ४० च्या दरम्यान असावे.
  3. कामगारांचे स्वतः चे वार्षिक उत्पन्न रु.१,५०,००० या पेक्षा जास्त नसावे.
  4. या योजनेसाठी रु. १०० मासिक हप्ता वयाच्या ४० व्य वर्षा पर्यंत भरावा.

सारथी शिष्यवृत्ती: मराठा विध्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना

प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना 

बांधकाम कामगाराच्या सामाजिक सुरक्षेसाठी अपघाती विमा कामगार मंडळाकडून अतिशय कमी प्रीमियम मध्ये बांधकाम कामगाराला उपलब्ध करून दिला जातो. जर यदाकदाचित कामगारा सोबत एखादा अपघात झाला आणि तो कायम स्वरूपी अपंग झाला तर प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेतून रु १ लक्ष रुपये तर अपघाती मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला २ लक्ष रु. विम्या पोटी दिले जातात.

कामगार स्त्री असल्यास तिच्या पतीला दिले जातात. वार्षिक २०रु प्रीमियम वर हि योजना दिली जाते.प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना

पात्रता.

  1. बांधकाम कामगारांचे वयोगट हे १८ ते ६० वर्ष असावे.
  2. बांधकाम कामगाराच्या खात्यामधुन वार्षिक रु.२० प्रीमियम पोटी मे महिन्याच्या ३१ तारखेला कातले जातील.
  3. विमा संरक्षण हे मे महिन्याच्या ३१ प्रीमियम भरल्या नंतर १  जून पासुंलागू होईल.

Construction Workers Educational Welfare Scheme Mbocww Scholarship: बांधकाम कामगार शिष्यवृत्ती योजना

प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना 

प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेमधु बांधकाम कामगाराचा कोणत्याही कारणाने मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला २ लक्ष रु. विम्यापोटी दिले जातात. बांधकाम कामगार म्हणून स्त्री असल्यास त्याच्या पतीला सदरील रक्कम विमा म्हणून दिली जाते.

 पात्रता 

  1. कामगारांचे वय १८ ते ५० वर्ष असावे.
  2. वार्षिक प्रीमियम ४३६ रु.दरवर्षी ३१ मे ला खात्यातून डेबिट केली जातील आणि विमा पहिल्या प्रीमियम नंतर १ जून पासून लागू होईल.

इतर फायदे 

  1. बांधकाम कामगाराच्या पहिल्या विवाहाच्या प्रतिपूर्तिसाठी 30,000 रु. बांधकाम कामगाराला मदत म्हणून दिले जातात.
  2. मध्यान्ह भोजन योजना;- बांधकाम कामगाराला कामाच्या ठिकाणी मध्यान्ह भोजनसाठी आर्थिक मोबदला किंवा जेथे सोय होईल तेथे जेवण दिले जाते.
  3. पूर्व शिक्षण ओळख प्रशिक्षण योजना. 

बांधकाम कामगाराच्या सामाजिक सुरक्षेसाठी वरील सर्व बांधकाम कामगार योजना फायदे आहेत जे बांधकाम कामगार मंडळाकडे नोंदणी केल्यावर मिळतात.

बांधकाम कामगार शैक्षणिक योजना 

नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या पत्नी किंवा पहिल्या दोन पाल्यांनसाठी कामगार कल्याण मंडळाकडून सदरील योजना बांधकाम कामगाराच्या शैक्षणिक सुरक्षिततेसाठी राबविली जाते. या योजने मधून शिक्षणाच्या वेगवेगळ्या इयत्तेत आणि शाखेत वेगवेगळी शिष्यवृत्ती बांधकाम कामगाराच्या पाल्यांना दिली जाते. शिष्यवृत्ती कशी दिली जाते, ते आपण खाली पाहू.बांधकाम कामगार शैक्षणिक योजना

शैक्षणिक फायदे 

  • कामगाराच्या पाल्यांना इयत्ता १ ली ते ७ वि अशा प्रत्यक्ष वर्षी २५,०० रु. शिष्यवृत्ती दिली जाते.
  • इयत्ता ८वि ते १० वि मध्ये शिकणाऱ्या मुलांना प्रत्यक वर्षी ५,००० रु. शिष्यवृत्ती दिली जाते.
  • इयत्ता १० वि ते १२ वि मद्ये किमान ५०% किंवा त्या पेक्षा जास्त गुण मिळवलेल्या विध्यार्थ्याला रु.१०,००० प्रति वर्षी शिष्यवृत्ती म्हणून दिले जातात.
  • इयत्ता ११ वि ते १२ वि मध्ये शिकणाऱ्या विध्यार्थ्याला रु.१०,००० प्रति वर्षी शिष्यवृत्ती म्हणून दिले जातात.
  • पदवी अभ्यासक्रमा करिता प्रति वर्षी रु. २०,००० बांधकाम कामगाराच्या पत्नी आणि पाल्यांना दिले जातात.
  • वैद्यकीय पदवी करिता प्रति वर्षी रु. १,०,०००० ( एक लक्ष ) शिष्यवृत्ती दिली जाते, पत्नी सह लागू.
  • अभियांत्रिकी पदवीच्या अभ्यासक्रमा करीता रु. ६०,००० प्रति वर्षी पाल्य व पत्नी सह शिष्यवृत्ती दिली जाते.
  • शासनमान्य पदविकेकरिता २०,०००रु. वार्षिक प्रति वर्षी शिष्यवृत्ती दिली जाते.
  • शासनमान्य पदव्यूत्तर पदविकेसाठी रु. २५,००० शिष्यवृत्ती दिली जाते.
  • नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या दोन पाल्यांना MS-CIT शिक्षणाच्या शुल्काची प्रतिपूर्ती केली जाते.

बांधकाम कामगाराच्या शैक्षणिक सुरक्षिततेसाठी बांधकाम कामगार योजना फायदे आहेत, प्रत्येक इयत्तेच्या आणि शाखेच्या वर्षात शिष्यवृत्तीची रक्कम खात्यावर जमा केली जाते.

 MahaDBT Post Matric Scholarship: मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजना

बांधकाम कामगार आरोग्य विषयक योजना

बांधकाम कामगाराच्या आरोग्यासाठी आणि कुटुंबाच्या आरोग्यासाठी अनेक योजना कामगार मंडळाच्या धर्तीवर राबविल्या जातात. आरोग्य विषयक योजनेतून दुर्धर आजारावरील उपचारासाठी मदत म्हणून ठराविक रक्कम कामगाराच्या खात्यावर टाकली जाते.बांधकाम कामगार योजना फायदे-Construction Worker Scheme Benefits

आरोग्य विषयक फायदे 

  • बांधकाम कामगाराच्या पत्नीच्या नेयसर्गिक प्रसूतीसाठी १५,००० हजार रुपये दिले जातात.
  • शस्त्रक्रियेद्वारे प्रसूतीसाठी रु. २०,००० हजार दिले जातात.
  • गंभीर आजारासाठी बांधकाम कामगाराच्या आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांच्या दुर्दर आजाराच्या उपचारासाठी रु. १ लक्ष मदत दिली जाते.
  • बांधकाम कामगाराने आपल्या एका मुलीच्या जन्मा नंतर कुटुंबनियोजनाची शस्त्र क्रिया केल्यास त्या मुलीच्या नावे वयाच्या १८ वर्ष पर्यंत रु. १ लक्ष मुदत ठेव म्हणून ठेवले जातात.
  • कामगारांचे काम करताना अपघात झाल्यास आणि ७५% अपंगत्व आल्यास रु. २ लक्ष निधी मजुरास दल जातो.
  • कामगाराच्या आरोग्य तपासणीसाठी मंडळाकडून निधी दिला जातो.
  • महात्मा ज्योतिबा फुले जण आरोग्य योजना:– या योजनेतून ५ लाख रुपयाचे कवच कामगारांसाठी आणि त्याच्या कुटुंब सदस्यासाठी दिले जाते.

वरील प्रमाणे बांधकाम कामगाराच्या आरोग्य विषयक सुरक्षिततेची हमी कामगार मंडळाकडून दिली जाते हे बांधकाम कामगार योजना फायदे-Construction Worker Scheme Benefits चे आणखीन फायदे आहेत.

बांधकाम कामगार योजना नवीन शासनाचे निर्णय 

बांधकाम कामगार योजना अंतर्गत शासन कामगारासाठी विविध आरोग्य विषयक योजना राबवीत असते, बांधकाम कामगाराला महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत दुर्धर आजारासाठी त्याला किंवा त्याच्या कुटुंबातील सदस्याला 5 लाखां पर्यंत मदत केली जाते.

जर या योजनेतून लाभ मिळाला नाही तर किंवा आजारावरील होणारा खर्च 5 लाख पेक्षा जास्त असेल तर शासनाच्या नवीन निर्णया नुसार महामंडळाकडून कामगाराला दुर्धर आजारावरील खर्चासाठी आर्थिक मदत केली जाणार आहे, त्या संबंधीचा निर्णय चालू वर्षाच्या सुरुवातीला घेण्यात आला आहे.

बांधकाम कामगार आर्थिक योजना 

बांधकाम कामगारांसाठी अनेक आर्थिक फायद्याच्या योजना महामंडळ राबविते. कामगाराच्या आर्थिक प्रगतीसाठी आणि सर्वांगीण विकासासाठी या बहु उपयोगी योजना राबविल्या जातात. राबविल्या जाणाऱ्या आर्थिक स्वरूपाच्या योजना खालील प्रमाणे आहेत.

आर्थिक फायदे

  • बांधकाम कामगाराचा कामावर असतांना मृत्यू झाल्यास त्याच्या पत्नीला ५ लक्ष रु. मदत केली जाते.
  • बांधकाम कामगाराचा नेसर्गिक मृत्यू झाल्यास त्याच्या वारसास २ लक्ष रु. मदत केली जाते.
  • अटल बांधकाम कामगार आवास घरकुल योजना :- शहरी भागास २ लक्ष रु. अर्थसाह्य केले जातात.
  • अटल बांधकाम कामगार आवास घरकुल योजना :- ग्रामीण भागास २ लक्ष रु. अर्थसाह्य दिले जाते.
  • कामगाराचा मृत्यू झाल्यास अंत्यविधीसाठी १०,००० रु. अर्थसाह्य केले जाते, मयताचे वय ५० ते ६० च्या दरम्यान असल्यास सदरील मदत केली जाते.
  • कामगाराचा मृत्यू झाल्यास त्याच्या विधवा पत्नीस अथवा स्त्री कामगार असल्यास त्याच्या विधुर पतीस रु. २४,००० रक्कम ५ वर्षा करीत दिली जाते.
  • गृह कर्जावरील रु. ६ लक्ष पर्यंतच्या व्याजाची रक्कम किंवा रु. २ लक्ष निधी असे दोन्हीतून एक कामगाराला मदत म्हणून दिली जाते.

बांधकाम कामगार घरकुल योजना

बांधकाम कामगाराला महामंडळाकडून अटल बांधकाम कामगार आवास घरकुल योजना घर बांधकामासाठी राबविली जाते सदरील योजनेतून बांधकाम कामगाराला 2 लाख रुपये अनुदान घराचे बांधकाम करण्यासाठी दिले जातात. सदरील योजनेसाठी तुमचे नाव पंतप्रधान घरकुल यादीत असावे. तुमच्या कडे स्वतःची जागा असावी, तुमचे राहते घर कच्चे असावे. तुम्ही या पूर्वी घरकुल योजनेचा लाभ घेतलेला नसावा.

बांधकाम कामगार स्मार्ट कार्ड

बांधकाम  कामगाराने महारष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांच्या कडे कामगार म्हणून नोंदणी केल्या नंतर महामंडळाकडून कामगाराला 14 अंकी नोंदणी क्रमांक असलेले स्मार्ट कार्ड दिले जाते. हे कार्ड नोंदणी झाल्या नंतर जिल्हा कार्यालयावर बोलवून दिले जाते.

कार्ड आल्या नंतर तुमची नोंदणी पावती आणि आधार कार्ड घेवून तुम्हाला कार्यालयाला जावे लागते. कार्ड तुमच्या कडे आल्यावर कामगार कल्याणकारी मंडळाच्या विविध योजना तुम्हाला त्याद्वारे घेता येतात.

बांधकाम नोंदणी फॉर्म PDF

बांधकाम कामगाराच्या विविध योजनांसाठी आणि Online फॉर्म करण्यासाठी तसेच योजनांच्या PDF फॉर्मसाठी महारष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांच्या अधिकृत वेबसाईट ( MAHABOCW.IN ) या साईट ला भेट दया. बांधकाम कामगाराच्या Online नोंदणीसाठी आणि फॉर्म Download करण्यासाठी इथे क्लिक करा.

Conlcusion 

बांधकाम कामगार योजना फायदे-Construction Worker Scheme Benefits या लेख मध्ये बांधकाम कामगार योजना आणि फायदे या विषयी सविस्तर माहिती आपल्याला दिली आहे. बांधकाम कामगाराच्या हितासाठी अनेक योजना शासनाकडून महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून राबविल्या जातात.

नोंदणीकृत बांधकाम कामगार हे या सर्व योजनांचा फायदा घेऊ शकतात. सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक आणि आर्थिक अशा विविध स्वरूपाच्या योजना बांधकाम कामगाराच्या फायदयासाठी अमलात आणल्या जातात.

आम्ही आमच्या blog च्या मध्येमातून शासनाच्या विविध योजना आपल्या पर्यंत पोहचवीत असतो, अशाच नवनवीन योजनांच्या माहितीसाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा, माहिती आवडल्यास आपल्या मित्रांना शेअर करा. आम्हाला फॉलो करा. बेल बटनावर क्लिक करा.

WhatsApp

Telegram

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

1 thought on “बांधकाम कामगार योजना फायदे: Construction Worker Scheme Benefits”

  1. Pingback: Mahabocw Scholarship Status Check: कामगार विभागाच्या शिष्यवृत्तीची स्थिती तपासा

Comments are closed.

Scroll to Top