महाडीबीटी पोर्टल शेतकरी योजना अर्ज

शेतकऱ्यानसाठी शेती योजनांचे भंडार असलेले, महाराष्ट्र शासनाचे महाडीबीटी पोर्टल हे शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. आपण या लेखात महाडीबीटी पोर्टल शेतकरी योजना अर्ज कसा करायचा हे पाहणार आहोत. महाडीबीटी पोर्टल अंतर्गत शासन आधुनिक शेतीसाठी अनेक योजना शेतकऱ्यांना पुरविते. सिंचनाचे साधने योजना, आधुनिक कृषी यांत्रिकीकरणाच्या योजना, काढणीपश्चात तंत्रज्ञान योजना, पेरणी पश्चात तंत्रज्ञान योजना, शुक्ष्मसिंचन साधने योजना इत्यादी अनेक योजना महाराष्ट्र शासनाकडून महाडीबीटी पोर्टलद्वारे राबविल्या जातात. कोरडवाहू शेतकऱ्याला बागायतदार आणि बागायतदार शेतकऱ्याला सधन शेतकरी करण्याचा आणि शेतीमधील उत्पादनात वाढ करून शेतकऱ्यांचे वार्षिक उत्पन्न वाढविण्याचा उद्देश शासनाचा आहे. महाडीबीटी पोर्टल अंतर्गत अनेक योजना ह्या 50% ते 80% सबसिडीवर अनुदानावर दिल्या जातात आणि मागासवर्गीयांना 100% सबसिडी अनुदान योजना दिल्या जातात. आपण महाडीबीटी पोर्टल शेतकरी योजना अर्ज कसा करायचा हे Step By Step पाहू.महाडीबीटी पोर्टल शेतकरी योजना अर्ज

Table of Contents

महाडीबीटी पोर्टल शेतकरी योजना अर्ज

महाराष्ट्र शासनाचे महाडीबीटी पोर्टल शेतकऱ्यांना अनेक शेती उपयोगी योजना पुरवते, पारंपारिक शेतीला अधुनेक्तेची जोड मिळावी आणि शेतकऱ्याचे वार्षिक उत्पन्न वाढावे, पर्यायी शेतकरी आर्थिक बाजूने सक्षम व्हावा व त्याचा उदरनिर्वाह शेतीद्वारे भागवा या ददृष्टीने शासन निनिराळ्या योजना शेतकऱ्यांसाठी राबवीत असते. पण बऱ्याच अंशी या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहचत नाही. तालुक्याच्या ठिकाणी जावून अर्ज करणे, आणि त्या योजनेचा फोलोअप घेणे शेतकऱ्यांना शक्य होत नसे, या वर उपाय म्हणून शासनाने सर्वच योजना एक छताखाली शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिल्या आहेत.

Mahadbt Farmer Portel विषयी

Mahadbt Farmer Portel हे महाराष्ट्र शासनाने अल्पभूधारक, अत्यल्पभूधारक, कोरडवाहू आणि बागायतदार अश्या सर्व शेतकऱ्यानंसाठी शेती विषयी विकासात्मक प्लॅटफॉर्म तयार करून दिलेला आहे. या पोर्टलद्वारे प्रत्यक शेतकऱ्याला त्याचे वार्षिक उत्पादन व आर्थिक परिस्थिती सुदारण्याची संधी शासनाने निर्माण करून दिलेली आहे. या एका पोर्टलद्वारे तुम्ही शेती विषयीच्या सर्व योजनांचा लाभ घेऊ शकता. पोर्टल एक योजना अनेक अशा स्वरूपाच धोरण शासनाचे आहे. या पोर्टल वर योजनेसाठी फॉर्म तुम्ही स्वतः मोबाईल द्वारे किंवा गावातील CSC/ आपले सरकार केंद्रावर जावून भरू शकता. भरलेल्या फॉर्म ची माहिती विचारायला तुम्हाला कुठल्या हि ऑफिस जायचे काम नाही तुम्ही दिलेल्या तुमच्या मोबाईल वर SMS द्वारे अर्जाच्या सद्य स्थितीची माहिती पोर्टल द्वारे दिली जाते.

महाडीबीटी पोर्टल शेतकरी योजना उद्दिष्टे 

  • अल्पभूधारक, अत्यल्पभूधारक व कोरडवाहू शेतकऱ्यांना योजनेद्वारे आर्थिक पाठबळ देवून त्यांचे वार्षिक उत्पादन वाढविणे आणि त्यांना सधन बनविणे.
  • सतत पडणाऱ्या दुष्काळ सदृश्य परिस्थितीवर मात करण्यासाठी शेतकऱ्यांना आधुनिक शुक्ष्मसिंचन साधने पुरवणे आणि कमी पाण्यात जास्त उत्पादन काढण्यास मदत करणे.
  • कोरडवाहू शेतकऱ्याला सिंचन साधने जसे कि विहीर /बोअरवेल देवून सिचन क्षेत्र निर्माण करणे.
  • मागासवर्गीय घटकातील कोरडवाहू शेतकर्यांना 100% सबसिडीवर सिंचन विहीर/बोअरवेल साठी अनुदान देणे.
  • अत्यल्पभूधारक व अल्पभूदारक शेतकऱ्यांना शेती मशागतीसाठी आधुनिक यंत्र सामुग्री पुरवणे.
  • शेतकऱ्यांना शेती मशागतीसाठी सबसिडीवर ट्रक्टर व ऑजारे पुरविणे.
  • ज्या शेतकर्यांकडे सिंचन साधने उपलब्ध आहेत अशा शेतकऱ्यांना पाईप लाईन , मोटार इत्यादी साहित्य पुरविणे.
  • पेरणीपूर्वी आणि पेरणी नंतर चे आधुनिक तंत्रज्ञान शेकार्याला उपलब्ध करून देणे.
  • पिक काढणी पश्चात तंत्रज्ञान शेतकार्याला निर्माण करून देणे.
  • पिक काढणी पश्चात मालावरील प्रक्रिया घटक निर्माण करून देणे.
  • पिक काढणी पश्चात माल साठवणी गृह निर्माण करणे.
  • शेती मद्ये सोलारपंप बसविणे.
  • आधुनिक आणि भरमसाठ उत्पादन देणारे बियाणे निर्माण करून देणे.
  • शेतकऱ्याच्या मालाला बाजारपेठ उपलब्ध करून देणे.

Mahadbt Farmer Scheme अंतर्गत लाभ योजना

महाडीबीटी पोर्टल शेतकरी योजना अर्ज करताना पोर्टल वर कोणकोणत्या योजना आहेत त्या आपण पाहणार आहोत शेतकरी हिताच्या अनेक योजना या पोर्टलद्वारे राबविल्या जातात.

कृषी यांत्रिकीकरण योजना

  • शेतकऱ्यांना शेतीला आधुनिकतेची जोड देण्यसाठी शासन शेती मशागतीसाठी इतर यंत्रान बरोबरच ट्रक्टर हि शेतकऱ्यांना अनुदानावर देत आहे.
  • अत्यल्पभूधारक आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना शेती मशागतीसाठी पावर टिलर सारखे आधुनिक यंत्र जे कि कमी जागेत आणि कमी खर्चात शेतीची मशागत करते ते शासन शेतकऱ्यांना अनुदानावर देते.
  • ट्रक्टर व पावर टिलर चाळीत यंत्रे.
  • बैलचलीत यंत्र.
  • मनुष्य चलित यंत्र.
  • वेगवेगळ्या मालावर प्रक्रिया करण्यासाठी प्रक्रिया संच.
  • काढणी पश्चात तंत्रज्ञान.
  • फाल्बागामध्ये वापरले जाणारे यंत्र.
  • वैशिष्ट्य पूर्ण यंत्र ऑजरे.
  • स्वयंचलित यंत्र.महाडीबीटी पोर्टल शेतकरी योजना अर्ज

भाडेतत्वावरील सुविधा केंद्र

  • कृषी ऑजरे बँकेची स्थापना.
  • उच्च तंत्रज्ञानसुविधा केंद्राची स्थापना.

अन्न सुरक्षा अभियान 

  • आधुनिक व उच्च प्रतीचे बियाणे वितरण.
  • एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन.
  • वैयक्तिक शेत तळे.
  • पंप संच व पाईप.
  • कृषी ऑजरे.

एकात्मिक फळ उत्पादन विकास अभियान अभियान

  • रोपवाटिका स्थापन करणे.
  • नवीन उक्ती संवर्धन प्रयोग शाळा स्थापन करणे,
  • भाजी  पाला विकास कर्यक्रम.
  • गुणवत्ता पूर्ण लागवड साहित्य निर्माण करणे.
  • भाजी पाला, बियाणेप्रक्रिया, पॅकिंग , साठवण इत्यादी पायाभूत सुविधा निर्माण करणे.
  • नवीन फळबागांची निर्मिती करणे.
  • फळ उत्पादन बागेत आधुनिक यांत्रिकीकरण करणे.
  • मसाला पिके लागवड.
  • जुन्या फळबागांचे पुनर्जीवन करणे. 
  • सेंद्रिय शेती प्रोत्साहन

एकात्मिक काढणी पश्चात व्यवस्थापन

  • प्याक हाउस.
  • पूर्व शीतकरण ग्रह.
  • आधुनिक शीतकरण ग्रह.
  • माल वाहतूक शीत वाहन.
  • फिरते प्रक्रिया केंद्र.
  • कांदा चाळ.

सिंचन साधने

  • तुषार सिंचन.
  • ठिबक सिंचन.

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजने अंतर्गत जे शेतकरी MREGS मधून फळबाग लागवड योजनेचा लाभ घेऊ शकत नाही त्या शेतकऱ्यांना भाऊसाहेब फुंडकर योजनेतून लाभ देण्यात येतो. सदरील योजना शेतकऱ्यांना 100% अनुदानावर दिली जाते.

हे हि वाचा 👉🏻 श्रावणबाळ निवृत्ती वेतन अनुदान योजना 2023-2024

मागासवर्गीय विहीर योजना 

महाडीबीटी पोर्टल शेतकरी योजना मध्ये इतर इतर योजनान बरोबरच मागासवर्गीय शेतकऱ्यांसाठी हि सिंचन विहीर योजना राबविली जाते, ज्या अंतर्गत सिंचन विहिरीसाठी 2,50,000 (अडीच लाख) रुपये अनुदान शासनाकडून दिले जाते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना

Mahadbt Farmer Portel अंतर्गत SC ( अनुसूचित जाती ) प्रवर्गासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना राबविली जाते या योजने अंतर्गत SC समाजातील अल्पभूधारक कोरडवाहू शेतकऱ्यांना सिंचन साधन उपलब्ध करून देण्यासाठी तब्बल सिंचन विहिरीसाठी 2,50,000 (अडीच लाख) रुपये अनुदान शासनाकडून दिले जाते. विहर खोदकामाच्या दोन टप्प्यात सदरील अनुदान दिले जाते.

बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना

Mahadbt Farmer Scheme Portel मधून ST ( अनुसूचित जमाती ) प्रवर्गातील लाभार्थी शेतकऱ्यांसाठी हि योजना राबविली जाते. बिरसा मुंडा कृषी क्रांती योजने अंतर्गत ST अल्पभूधारक कोरडवाहू शेतकऱ्यांना विहीर खोदण्यासाठी 2,50,000 (अडीच लाख) रुपये अनुदान शासनाकडून दिले जाते. विहिरीच्या खोद्कामानुसार दोन टप्प्यात अनुदान दिले जाते.

महाडीबीटी पोर्टल शेतकरी योजना फायदे 

  • मागासवर्गीय सिंचन विहिरीसाठी 2,50,000 (अडीच लाख) रुपये अनुदान.
  • सिंचन साधने ठिबक सिंचन, तुषार सिंचनसाठी 75% ते 80% अनुदान.
  • भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड 100% अनुदान.
  • कृषी यांत्रिकीकरण अंतर्गत ट्रक्टर खरेदीसाठी 1,25,000 ( एक लाख पंचवीस हजार ) अनुदान.
  • पावर टिलर आणि आधुनिक ऑजरे खरेदी करण्यासाठी 50% अनुदान.
  • वैयक्तिक शेत तळेसाठी भरघोस अनुदान.
  • रोपवाटिकासाठी 50% अनुदान.
  • एकात्मिक काढणी पश्चात व्यवस्थापन अंतर्गत भरघोस अनुदान.

हे हि वाचा 👉🏻 महात्मा गांधी नरेगा अंतर्गत सिंचन विहीर/बागायत लागवड अर्ज करा मोबाईल app वरून

महाडीबीटी पोर्टल शेतकरी योजना पात्रता 

महाडीबीटी पोर्टल शेतकरी योजना अर्ज करतांना खालील पात्रता तुमच्याकडे असणे आवश्यक आहे.

  1. महाडीबीटी पोर्टल शेतकरी योजनेत अर्ज करण्यासाठी तुमच्याकडे 5 एकर ( दोन हेक्टर ) जमिनीच्या वर जमीन नसावी.
  2. शेती वेयक्तिक मालकीची असावी, सामायिक क्षेत्र नसावे.
  3. वहीर किंवा बोअरवेलचा लाभ घेतांना तुमच्या शेतात अगोदरची विहीर अथवा बोअरवेल नसावा.
  4. पंप संच आणि पाईप लाईनसाठी अर्ज करण्यासाठी तुमच्या 7/12 वर विहीर अथवा बोअरवेल ची नोंद असावी.
  5. सोलर पंपसाठी र्ज करण्यासाठी तुमच्या 7/12 वर विहीर अथवा बोअरवेल ची नोंद असावी.
  6. महाडीबीटी पोर्टल शेतकरी योजना अर्ज करण्यासाठी तुम्ही महाराष्ट्राचे कायम रहिवाशी असावेत.

महाडीबीटी पोर्टल शेतकरी योजनेसाठी कागदपत्रे 

महाडीबीटी पोर्टल शेतकरी योजनेसाठी अर्ज Online करतांना तुम्हाला खालील कागदपत्रांची आवश्यकता असते.

  1. अर्जदाराचे आधार कार्ड.
  2. अर्जदाराचे बँक पासबुक.
  3. अर्जदाराची 7/12 आणि होल्डिंग.
  4. आधार लिंक असलेला ( किंवा नसला तरी ) मोबाईल नंबर.

इत्यादी कागदपत्रे अर्ज Online करतांना लागतात.

Mahadbt.maharashtra.gov.in

योजना Mahadbt FarmerScheme
राज्य महाराष्ट्र
लाभार्थी महाराष्ट्र राज्यातील शेतकरी
अधिकृत वेबसाईट https://mahadbt.maharashtra.gov.in/farmer/login/login

महाडीबीटी पोर्टल शेतकरी योजनेसाठी अर्ज कसा करायचा

Maha Dbt portel Open केल्या नंतर उजव्या बाजूच्या कोपऱ्यात नवीन अर्जदार नोंदणी म्हणून पर्याय दिसेल, त्या पर्यायावर क्लिक करायचे आहे, या पर्यायावर क्लिक केल्या नंतर तुमच्या समोर नवीन नोंदणी म्हणून पृष्ठ Open होईल. या नवीन पृष्ठावर्ती Applicant Name च्या रकान्यात तुम्हाला तुमचे पूर्ण नाव टाकायचे आहे. त्या नंतर Username आणि Password तयार करायचा आहे. आणि पुढील रकान्यात Confirm Password मध्ये परत Password टाकायचा आहे. Email id आणि Mobile Number टाकून दिलेला कॅपचा पुढील रकान्यात प्रविष्ठ करायचा आहे. आणि शेवटी नोंदणी करा या बटनावर क्लिक करायचे आहे.

त्या नंतर तुमच्या मोबाईल वर एक OTP येयील तो भरून तुम्हाला तुमच्या योजना निवडायच्या आहेत. विचारलेली माहिती पूर्ण भरून नंतर फॉर्म सबमिट करायचा आहे. आणि सगळ्यात शेवटी पोहोच पावती फीस भरून PDF सेव्ह अथवा तुम्ही पावतीची प्रिंट काढू शकता. अतिशय माफक फीस भरावी लागते ती तुम्ही तुमच्या मोबाईल फोनपे अथवा तत्सम अॅप ने भरू शकता.

Mahadbt Farmer Registration Login

महाडीबीटी पोर्टल शेतकरी योजना अर्ज

Mahadbt Farmer portel वर आल्या नंतर वरील पृष्ठावरील माहिती भरून otp घेवून पुढे शेतकरी योजना पर्याय निवडून तुम्हाला तुमच्या योजना निवडायच्या आहेत. शासनाच्या नवीन धोरणा नुसार तुम्ही एकाच फॉर्म वर तुम्हाला हव्या असलेल्या सर्व योजना निवडू शकतात. एकदाच निवडलेल्या योजना तुम्हाला टप्प्या टप्प्याने Mahadbt च्या लॉटरी पद्धती नुसार एक एक मिळत राहतील, एका योजनेच्या लाभा नंतर दुसऱ्या योजनेसाठी तुम्हाला परत परत अर्ज करण्याची गरज नाही. एकाच अर्जावर तुम्ही सर्व योजनांचा लाभ घेवू शकतात.

Conclusion

महाडीबीटी पोर्टल शेतकरी योजना अर्ज या blog मध्ये आपण महाडीबीटी पोर्टल वर शेतकरी अर्ज कसा करायचा त्यासाठी लागणारी पात्रता, कागदपत्रे आणि पोर्टल वर Online अर्ज कसा करायचा या विषयी सविस्तर माहिती पहिली आहे. वरील लेखाच्या आधारे तुम्ही स्वतः आपल्या मोबाईल वर किंवा गावातील आपले सरकार केंद्रावर जावून अर्ज करू शकतात, आणि महाडीबीटी पोर्टल शेतकरी योजनांचा लाभ घेवू शकता. माहिती आवडली असल्यास आपल्या मित्रांना शेअर करा. आम्ही नेहमीच शेतकरी हिताच्या योजना आपल्या पर्यंत पोहचवीत असतोत, अशाच नवीन योजना माहितीसाठी आम्हाला फॉलो करा. आमचे ग्रुप जॉईन करा.

Telegram group

WhatsApp group

Scroll to Top