Aadhaar Verification: आधार पडताळणी कशी करावी ? ऑनलाइन बँक सीडिंग स्थिती

आधार कार्ड हे भारतीय नागरिकांसाठी एक अत्यंत महत्त्वाचे दस्तावेज आहे. आज प्रत्येक ठिकाणी आधार कार्डची आवश्यकता भासते, मग शासकिय काम असो किंवा खासगी आधार कार्ड लागतेच. बँकेविषयीचे जवळ जवळ सगळेच व्यवहार आणि कामे आधार च्या माध्यमातून केले जातात. बँकेचा व्यवहार पारदर्शक आणि सुरक्षित व्हावे यासाठी बँके कडून तुम्हाला आधार कार्ड मागितले जाते. पासबुक नसताना फक्त आधार च्या माध्यमातून खात्यातून पैसे काढता येत आहेत. या सर्व गोष्टीसाठी बँक तुम्हाला Aadhaar Verification करायला लावते. आपण आधार पडताळणी काय आहे, आणि ते कसे करावे लागते या बद्दल सविस्तर माहिती या लेखात पाहणार आहोत.Aadhaar Verification

Aadhaar Verification: आधार पडताळणी कशी करावी ?

आजच्या काळात खूप मोठ्या प्रमाणात सायबर गुन्हे घडत आहेत. ऑनलाइन फसवणुकीचे प्रमाण खूप वाढलेले आहे. अशा वेळेस तुमच्या कडून होणार ऑनलाइन व्यवहार हा किती सुरक्षित आहे हे पाहणे महत्वाचे आहे. बँके मार्फत या गोष्टीवर बारकाईने लक्ष दिले जाते. त्यामुळे बँक आपल्याकडून आधार सत्यापन करून घेते.

Aadhaar Verification म्हणजे तुमच्या आधार कार्ड ची सत्यता पडताळणे. आपल्याकडे असणारे आधार कार्ड हे आपल्याला यूआयडीएआय (UIDAI) म्हणजेच भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण उपलब्ध करून देते. आधार कार्ड वर  असणारा १ २ अंकी नंबर हा आपला ओळख क्रमांक असतो. Aadhaar Verification मुळे आधार नंबर धारकाची खरी माहिती पडताळून पाहता येते, या मुले ऑनलाइन होणार्‍या फसवणुकीतून आपण वाचू शकतो.

✅👉🏻 E-Shram Registration: मोबाईलवरून नोंदणी करून मिळवा ई-श्रम कार्ड

Aadhaar Verification: आधार पडताळणी करणे का गरजेचे आहे

Aadhaar Verification करणे गरजेचे आहे. कारण आज जेथे कुठे आर्थिक व्यवहाराचा संबंध येतो तेथे आधार पडताळणी मागणी केली जाते. आधार पडताळणी आवश्यकता का आहे हे आपल्याला खालील कारणावरून लक्षात येईल.

  • Aadhaar Verification मुळे ऑनलाइन फसवणुकीला आळा बसतो.
  • नागरिकांचा  योग्य ओळख पुरावा तसेच पत्त्याचा पुरावा प्राप्त होतो.
  • आधार सत्यपणामुळे बनावट आधार कार्डला आळा बसतो.
  • Aadhaar Verification मुळे अनेक आर्थिक आणि सामाजिक व्यवहार सुरक्षित होतात.
  • ऑनलाइन सायबर गुन्हे टाळता येतात.

✅👉🏻 Dairy Farming: दुग्ध व्यवसायातून कमवा एक लाख रुपये महिना

Aadhaar Verification: ऑनलाइन बँक सीडिंग स्थिती

आर्थिक व्यवहारात महत्वाचे असणारे  Aadhaar Verification हे तुम्ही ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने करू शकता.

A) Offline Aadhaar Verification: ऑफलाइन बँक सीडिंग

  • ऑफलाइन साठी तुम्हाला ई-केवायसी (e-KYC) द्वारे आधार पडताळणी बँकेच्या ठिकाणी जाऊन करता येते. त्यासाठी तुम्हाला तुमचे आधार कार्ड, बँक पासबुक, पॅन कार्ड सोबत न्यावे लागते. तुमचे बोट scan करून ऑफलाइन Aadhaar Verification केले जाते.

B) Online Aadhaar Verification: ऑनलाइन बँक सीडिंग

प्रत्येक ठिकाणी आवश्यक असणारे  आधार पडताळणी तुम्ही ऑनलाइन करू शकता. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती भरण्यासाठी देखील आधार नंबर बँक अकाउंटला NPCI Mapper मध्ये Update केल्याची पावती माघितली जाते. ती कशी काढायची हे आपण खाली पाहणार आहोत.

Online Aadhaar Verification करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला यूआयडीएआय (UIDAI)  My Aadhar वेब साईटवर जावे लागेल.

  • यूआयडीएआय च्या My Aadhar या पोर्टलवर हे पोर्टल ओपन करा.
  • My Aadhar या पोर्टल वरती आल्यावर तुम्हाला Aadhaar Services वर जायचे आहे.
  • Aadhaar Services मध्ये तुम्हाला Verify Aadhaar या वरती क्लिक करायचे आहे.
  • Verify Aadhaar वर क्लिक करताच तुमच्या समोर नवीन पेज ओपन होईल.
  • ओपन झालेल्या नवीन पेज वर समोर दिसणाऱ्या पर्यायांपैकी Bank Seeding Status या पर्यायावर जायचे आहे.
  • Bank Seeding Status मध्ये गेल्या नंतर समोर दिसणाऱ्या बॉक्स मध्ये तुम्हाला तुमचा आधार नंबर आणि त्या खालील कॅप्चा टाकायचा आहे, आणि Login With OTP वर क्लिक करायचे आहे.
  • आधार नंबर कॅप्चा टाकून Login With OTP वर क्लिक करताच तुमच्या आधार लिंक मोबाईल नंबरवर OTP येईल ती तुम्हाला भरून Login वर क्लिक करायचे आहे.
  • Login वर क्लिक करताच तुम्ही यूआयडीएआय (UIDAI) च्या My Aadhar या पोर्टलवर Login झालेले असाल.
  • Login झाल्या नंतर यूआयडीएआय (UIDAI) च्या सर्व Services तुमच्या समोर ओपन होतील.
  • Services मध्ये Document Update, Download Aadhaar, Order Aadhaar PVC Card, Address Update, Bank Seeding Status, Generate Virtual ID, LOK/Unlock Biometrics, Authentication History, Payment History, My Head of Fsmily ( HOF),Requests, Aadhaar Update History इत्यादी Services आहेत.
  • या मधून तुम्हाला Bank Seeding Status वरती जायचे आहे. Bank Seeding Status क्लिक करताच तुमचे Aadhaar-Bank Mapping पूर्ण झालेले असेल.
  • Aadhaar-Bank Mapping मध्ये तुमचे आधार नंबर आणि त्याला लिंक असलेल्या बँकेचे नाव आणि Bank Seeding Status तुम्हाला दिसेल.

अशा प्रकारे तुमचे Aadhaar Verification ऑनलाइन बँक सीडिंग पूर्ण होते. सदरील Bank Seeding Status चे स्क्रीन शॉट मारून तुम्ही तुमच्या लागणाऱ्या शासकीय कमला प्रिंट मारून देऊ शकता.

✅👉🏻 Driving Licence Download Pdf: Online Maharashtra काढा ड्रायविंग लायसेन्स प्रिंट

Download Aadhaar Card/आधार कार्ड डाउनलोड करा

आधार कार्ड हे महत्वाचे कागदपत्र आहे, एखाद्या वेळेस आधार कार्ड हरवले किंवा अनवधानाने घरी विसरून राहिले तरी तुम्ही आपल्या मोबाइल च्या साह्याने आधार कार्ड Download करू शकता. आणि त्याची प्रिंट मारू शकता. आधार कार्ड Download कसे करायचे या बद्दल आपण पाहणार आहोत.

  • यूआयडीएआय (UIDAI) My Aadhar या पोर्टलवर Login झाल्या नंतर दिसणाऱ्या एकूण Aadhaar Services मधून तुम्हाला Download Aadhaar या पर्यायावरती जायचे आहे.
  • Download Aadhaar ला क्लिक करताच तुमच्या समोर आधार डीटीएल ओपन होईल, त्या खाली असणाऱ्या Download बटनावर क्लिक करून तुम्ही तुमचे आधार कार्ड Download करून त्याची प्रिंट मारू शकता.

यूआयडीएआय (UIDAI) My Aadhar या पोर्टल वरून तुम्ही आधार विषयीच्या सर्व सुविधा घर बसल्या मिळवू शकता. Document Update, Download Aadhaar, Order Aadhaar PVC Card, Address Update, Bank Seeding Status, Generate Virtual ID, LOK/Unlock Biometrics, Authentication History, Payment History, My Head of Fsmily ( HOF),Requests, Aadhaar Update History इत्यादी Aadhaar Services तुम्हाला My Aadhar (UIDAI) वरून मिळतात.

✅👉🏻 Check Aadhaar Update Status: आधारकार्ड अपडेट स्थिती तपासा

Conclusion

Aadhaar Verification: आधार पडताळणी कशी करावी ? ऑनलाइन बँक सीडिंग स्थिती या लेखात आपण Aadhaar Verification आणि Download Aadhaar Card या बद्दल सविस्तर माहिती पहिली. Aadhaar Verification आणि Bank Seeding Status कसे करायचे आणि त्याची पावती कशी मिळवायची या विषयीची आणि आधार Download कसे करायचे ही संपूर्ण माहिती आपण स्टेप बाय स्टेप पहिली. My Aadhar पोर्टल वरून या सगळ्या सुविधा तुम्हाला मिळतात. माहिती आवडली असल्यास आपल्या मित्रांना आणि नातेवाईकांना अवश्य शेअर करा. अशाच नवीन माहितीसाठी आमच्या सोशल मीडिया ग्रुप मध्ये सामील व्हा.

आमच्या सोशल मीडिया ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
Scroll to Top