Application For Separate Ration Card/विभक्त रेशन कार्डसाठी अर्ज व कागदपत्रे आज प्रत्येक गोष्टीला रेशन कार्ड आवश्यक झाले आहे. शासकीय योजना असोत किंवा इतर काही बाबी असोत रेशन कार्ड हवे असतेच. शासनाच्या योजनांना हि रेशन कार्ड अत्यावश्यक झाले आहे. त्यात शासन काही योजना रेशन कार्ड गृहीत धरून देते, त्यामुळे कुटुंबात कतीही सदस्य योजनेला पात्र असली तरी, एका रेशन कार्डवर एकच लाभ दिला जातो या मुळे बऱ्याच जनांची कोंडी होते. आणि वेळेवर रेशन कार्ड वेगळे नसल्यामुळे लाभा पासून वंचित राहावे लागते. त्यामुळे वाढत्या कुटुंबाला रेशन कार्ड वेगळे असणे हि आज गरज बनली आहे. रेशन कार्ड विभक्त करणे हि अत्यंत सोपी process असून तुमचा रेशन दुकानदार ते तहसील कार्यालयातील अन्नपुरवठा विभाग इतपर्यंतच मर्यादित असते.
विभक्त रेशन कार्डसाठी लागणारी कागदपत्रे कोणकोणती असतात ते आपण खाली पाहणार आहोत त्या सोबतच विभक्त रेशन कार्ड करण्यासाठी लागणारा अर्ज तुम्हाला Application For Separate Ration Cardविभक्त रेशन कार्डसाठी अर्ज व कागदपत्रे इथेच Download करता येणार आहे.
Application For Separate Ration Card/विभक्त रेशन कार्डसाठी अर्ज व कागदपत्रे
विभक्त रेशन कार्ड म्हणजेच एका एकत्र कुटुंबातील वाढलेले सदस्य, त्यातील वेगळे कुटुंब यांची नावे जुन्या रेशन कार्ड मधून काढून, त्यांचे स्वतंत्र रेशन कार्ड करणे. एकत्र रेशन कार्ड मुळे शासकीय योजना घेण्यासाठी नेहमी अडथळे येतात. त्यामुळे प्रत्यक कुटुंबाचे वेगळे रेशन कार्ड असणे गरजेचे आहे. Application For Separate Ration Card/विभक्त रेशन कार्डसाठी अर्ज व कागदपत्रे या लेखात आपण विभक्त रेशन कार्डसाठी लागणारा फॉर्म आणि कागदपत्रे या विषयी माहिती आपण घेणार आहोत.
विभक्त रेशन कार्डसाठी लागणारी कागदपत्रे
बिभक्त रेशन कार्ड काढण्यासाठी पुढील कागदपत्रे लागतात.
- अर्जदाराचे छायाचित्र.
- ओळखीचा पुरावा :- मतदान कार्ड/पारपत्र/वाहनचालक परवाना/निमशासकीय ओळखपत्र/पॅन कार्ड/मरारोहयो जॉब कार्ड/आधार कार्ड.
- पत्त्याचा पुरावा:- घरपट्टी,पाणीपट्टी पावती/ 7-12 उतारा व 8 अ उतारा/भाडेपावती/दूरध्वनी बिल/वीज बिल/मालमत्ता कर पावती/घर नमुना न.8/मूळ शिधापत्रिका.
- वयाचा पुरावा:- शाळेचा प्रवेश निर्गम उतारा/शाळा सोडल्याचा दाखला/बोनाफाईड / आधार कार्ड.
- उत्पन्नाचा पुरावा:- अर्जदाराकडे जमीन असल्यास 7-12 उतारा व 8 अ उतारा/वेतन मिळत असल्यास फॉर्म न. 16/ सर्कल ऑफिस चा पडताळणी अहवाल/निवृत्ती वेतन धरकासाठी बँकेचे प्रमाणपत्र/आयकर विवरण प्रमाणपत्र.
- जुनी शिदापात्रिका.
- कुटुंबातील सर्व सदस्याचे आधार कार्ड छायांकित प्रत.
- विभक्त रेशन कार्ड करण्याचा फॉर्म.
- रेशन दुकानदाराचे कुटुंब विभक्त प्रमाणपत्र.
वरील प्रमाणे कागदपत्रे विभक्त रेशन कार्ड करण्यासाठी लागतात.
विभक्त रेशन कार्डसाठी अर्ज
विभक्त रेशन कार्ड करण्यासाठी वरील कागदपत्रे लागतात. त्या सोबतच अन्नपुरवठा विभागाचा एक फॉर्म लागतो तो खालील प्रमाणे.
अर्जदाराचा तपशील
- आधार क्रमांक :- स्वतः चा आधार नंबर.
- संपूर्ण नाव.
- पतीचे पित्याचे नाव.
- लिंग.
- जन्मतारीख.
- अर्जदाराचा व्यवसाय.
- निवासाचा पत्ता.
- संपर्क क्रमांक.
सध्याच्या (जुन्या)शिधापत्रिकेचा(रेशन कार्डचा)तपशील
- शिधापत्रिका क्रमांक:- जुन्या शिधापत्रिकेचा क्रमांक.
- रेशन दुकान क्रमांक:- रेशन दुकानाचा क्रमांक.
- संदर्भ क्रमान:- रेशन दुकानदाराकडील संदर्भ क्रमांक.
- एककांची संख्या:-सदस्य संख्या.
सध्याच्या (जुन्या) शिधापात्रीकेतून (रेशन कार्ड) वगळायच्या एककांचा (सदस्यांचा) तपशील
- जुन्या रेशन कार्ड मध्ये असलेल्या सदस्यांचा तपशील भार्याचा आहे.
स्वयंघोषणा प्रमाणपत्र
रेशन दुकानदार यांचे कुटुंब विभक्त प्रमाणपत्र.
वरील पद्धतीने फॉर्म भरावयाचा आहे. रेशन कार्ड विभक्त करण्यासाठी फॉर्म नमुना.
Conclusion
Application For Separate Ration Card/विभक्त रेशन कार्डसाठी अर्ज व कागदपत्रे या blog मध्ये आपण विभक्त रेशन कार्ड कसे करायचे या विषयी सविस्तर माहिती पहिली आहे. त्या सोबतच रेशन कार्ड विभक्त करण्यासाठी फॉर्म pdf दिला आहे. Application For Separate Ration Cardविभक्त रेशन कार्डसाठी अर्ज व कागदपत्रे या लेखाद्वारे तुम्हाला निशितच विभक्त रेशन कार्ड करण्यासाठी मदत होईल. माहिती आवडली असल्यास आपल्या मित्रांना शेअर करा. एखाद्या गरजवंताला नक्कीच मदत होईल. आमच्या ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी telegram ग्रुप जॉईन करा,
Pingback: आयुष्मान कार्ड डाउनलोड-Ayushman Card Download Online – www.pathanik.com