Bandhkam Kamgar Pension Yojana: नवीन GR नुसार बांधकाम कामगारांना मिळणार निवृत्ती वेतन

 

 

 

Bandhkam Kamgar Pension Yojana: महाराष्ट्रातील बांधकाम कामगारांसाठी महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कल्याणकारी मंडळ अनेक योजना राबवीत असते. आपली उपजीविका पूर्णतः मजुरीवर अवलंबून असणारा बांधकाम कामगार अनेक अडचणीने ग्रस्त असतो, अशा परिस्थितीत कामगार कल्याणकारी मंडळ बांधकाम कामगारांना सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक पातळीवर सक्षम कण्यासाठी मदतीचा हात पुढे करते. आपल्या आयुष्यातील बरीच वर्ष बांधकाम कामगार म्हणून काम केल्यानंतर उतार वयात सन्मानाने आपले आयुष्य जगता यावे यासाठी बांधकाम कल्याणकारी मंडळाकडून बांधकाम कामगारांना निवृत्ती वेतन सुरु करण्यात आलेले आहे. त्या संबधीची अर्ज प्रक्रिया आणि पात्रता आपण लेखात पाहणार आहोत.

 

Bandhkam Kamgar Pension Yojana

Bandhkam Kamgar Pension Yojana/बांधकाम कामगारांना मिळणार निवृत्ती वेतन

महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कल्याणकारी मंडळ यांच्या कडून नवीन शासन निर्णयानुसार बांधकाम कामगार म्हणून काम केलेल्या आणि वयाची 60 वर्ष पूर्ण करणाऱ्या बांधकाम कामगारांसाठी Bandhkam Kamgar Pension Yojana सुरु केली आहे. या योजनेतून बांधकाम कामगार म्हणून काम केलेल्या कामगारांना दरमहा 1,000 हजार रुपये पेन्शन देण्यात येणार आहे. नवीन शासन निर्णयानुसार हा लाभ बांधकाम कामगारांना घेता येणार आहे.

Bandhkam Kamgar Pension Yojana अंतर्गत लाभ घेण्यासाठी आवश्यक पात्रता, कागदपत्रे आणि अर्ज प्रक्रिया या बद्दल सविस्तर माहिती आपण पुढे पाहणार आहोत.

बांधकाम कामगार निवृत्ती वेतन योजना पात्रता/निकष

नवीन शासन निर्णयानुसार Bandhkam Kamgar Pension Yojana अंतर्गत लाभ मिळविण्यासाठी बांधकाम कामगारांना काही निकष पूर्ण करावी लागतात, ते निकष कोणते आहेत ते आपण पाहू.

  • बांधकाम कल्याणकारी मंडळाकडे नोंदणीकृत असलेले आणि आपल्या वयाचे 60 वर्ष पूर्ण करणारे बांधकाम कामगार या योजनेस पात्र असतील.
  • बांधकाम कामगार म्हणून नोंदणी असलेले पती आणि पत्नी दोघे ही स्वतंत्र पणे या योजनेस पात्र असतील.
  • पती किंवा पत्नीच्या मृत्यू नंतर निवृत्ती वेतनाचा लाभ मृत्यू पावलेल्या जोडीदारास मिळत राहील, पण जर मृत्यू पावलेल्या जोडीदारास अगोदर पासून निवृत्ती वेतन मिळत असेल तर डबल निवृत्ती वेतनाचा लाभ मिळणार नाही.
  • बांधकाम कामगार म्हणून काम केलेले पण आता शासकीय नोकरीत असणाऱ्या लाभार्थ्यांना सदरील योजनेचा लाभ मिळणार नाही.
  • बांधकाम कामगार म्हणून नोंदणी असावी आणि मागील 10 वर्षात किमान 90 दिवस बांधकाम कामगार म्हणून काम केलेले असावे.
  • बांधकाम कामगार म्हणून नोंदणी ही दरवर्षी नुतनीकरण केलेली असावी.

Bandhkam Kamgar Pension Yojana:

बांधकाम कामगार निवृत्ती वेतन योजना अर्ज प्रक्रिया

 

बांधकाम कामगारांना निवृत्ती वेतन योजनेस अर्ज करण्याची प्रक्रिया पुढील प्रमाणे आहे.

  1. नोंदणीकृत बांधकाम कामगाराने कामगार कल्याण मंडळाच्या वेबसाईट https://mahabocw.in या वेबसाईटवर जावून अर्ज डाऊनलोड करून ग्यायाचा आहे.
  2. परिपूर्ण भरलेला अर्ज मूळ कागदपत्रासह बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या कार्यालयाला जम करायचा आहे.
  3. मंडळाच्या मान्येते नंतर निवृत्ती वेतन क्रमांक अभार्थ्याला दिला जाईल.
  4. पेन्शन धारक लाभार्थ्याला दरवर्षी आपल्या हयातीचा पुरावा मंडळाकडे जमा करावा लागेल.
  5. मिळणारे पेन्शन हे लाभार्थ्याच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाईल.
  6. लाभार्थ्याला बँक खाते बदलायचे असल्यास तसा अर्ज मंडळाकडे करावा लागेल.

NOT:

आम्ही आपल्याला दिली माहिती ही शासनाच्या नवीन GR नुसार आहे, GR पानाण्यासाठी https://mahabocw.in या वेबसाईट जावून शासन निर्णय हा पर्याय निवडा. Bandhkam Kamgar Pension Yojana च्या अधिक माहितीसाठी आपल्या जवळच्या बांधकाम कल्याणकारी मंडळाला भेट द्या.

निष्कर्ष

Bandhkam Kamgar Pension Yojana: नवीन GR नुसार बांधकाम कामगारांना मिळणार निवृत्ती वेतन या लेखात आपण शासनाच्या नवीन निर्णयानुसार बांधकाम कामगारांना दिल्या जाणाऱ्या निवृत्ती वेतन या विषयी संपूर्ण माहिती पहिली माहिती पहिली. आवडली असल्यास आपल्या मित्रांना शेअर करा.

आमच्या सोशल मिडिया ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खाली सोशल मिडिया आयकॉन वर क्लिक करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top