- beneficiary satyapan app: संजय गांधी निराधार योजना अंतर्गत लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांसाठी शासनाने नवीन app लाॅच केले आहे. या app च्या साह्याने लाभार्थ्यांना आता online हयात प्रमाणपत्र काढता येणार आहे. वर्षातून एकदा किंवा दोनदा द्यावे लागणारे हयात प्रमाणपत्र आता app साह्याने काढून तिथेच ते आधारशी सलग्न होणार आहे. म्हणजे कार्यालयाला खेटे मारायचे काम आता पडणार नाही. हे app कोणते आहे, आणि त्यावर कसे आधार फेस व्हेरिफिकेशन करायचे हे आपण पुढील लेखात पाहणार आहोत.
Beneficiary Satyapan म्हणजे काय ?
शासनाकडून पेन्शनचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांना ठरवून दिलेल्या कालावधीत आपण हयात असल्याचा पुरावा सबंधित कार्यालयाला द्यावा लागतो. याने लाभार्थ्याची ओळख पटते, यालाच Beneficiary Satyapan म्हणतात. राज्यातील पेन्शनधारक लोकांसाठी तसेच संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यासाठी शासनाने एक Beneficiary Satyapan app ची निर्मिती केली आहे या app च्या साह्याने पेन्शनधारक व्यक्ती स्वतः आपल्या आधार कार्डच्या साह्याने ई-केवायसी (eKYC) करू शकतात आणि आपला हयात फॉर्म अॉनलाईन भरून देवू शकतात. शासनाने हे app उपलब्ध करून दिल्यामुळे दरवर्षी किंवा सहा महिन्याला द्यावे लागणारे हयात प्रमाणपत्र आता कार्यालयाला नेवून देण्याची गरज पडणार नाही. या app मदतीने घरबसल्या तुम्ही ते करू शकता.
Beneficiary Satyapan app चे फायदे
- Beneficiary Satyapan app डाउनलोड केल्या नंतर कुठल्याही कार्यालयाला खेटे न मारता आपल्या मोबाईलच्या साह्याने शासनाच्या मिळणाऱ्या पेन्शनसाठी घरीच ई-केवायसी (eKYC) करू शकता.
- कार्यालयाला जाण्याचा वेळ आणि खर्च वाचतो, शिवाय कागदपत्र लागतात.
- प्रक्रिया पूर्णतः पारदर्शक असल्याने जलद गतीने होते.
- मिळत असलेल्या पेन्शन योजनेचे अपडेट सतत मिळत राहतात.
Beneficiary Satyapan कसे करावे
Beneficiary Satyapan करण्यासाठी तुमच्या मोबाईलमध्ये Beneficiary Satyapan app आणि आधार AadhaarFaceRD हे दोन app असणे आवश्यक आहे. मोबाईल मधील प्ले स्टोर मध्ये जावून वरील दोन्ही app डाउनलोड करायचे आहे. डाउनलोड केल्यानंतर लॉगीन करून घ्यावे लागेल.
- Beneficiary Satyapan app डाउनलोड केल्या नंतर लॉगीन करण्यासाठी त्यामध्ये आधार नंबर टाकायचा हे आहे. आधार टाकल्यानंतर मोबाईल नंबर टाकायचा आहे. मोबाईल नंबर टाकल्यानंतर आलेला OTP टाकून घ्यायचा आहे. त्या नंतर स्क्यान या बटनाला क्लिक केल्या नंतर तुमचा चेहरा स्क्यान करून घ्यायचा आहे. आता तुमचे app लॉगीन कम्प्लीट झाले आहे.
- लॉगीन झाल्यानंतर आता तुम्हाला स्वतः चे किंवा इतर लाभार्थ्याचे आधार सत्यापन करू शकता.
- app मध्ये सर्च बारच्या खाली दिसणाऱ्या सिम्बॉल वर क्लिककरा खाली येणाऱ्या NSAP पर्यायावर क्लिककरा आणि खाली येणाऱ्या दोन पर्यायामधून पहिल्या पर्यायावर कल्क करा.
- Beneficiary Satyapan या पर्यायावर क्लिक करताच Beneficiary Authentication नावाचे पेज ओपन होईल, या पेजवर लाभार्थ्याचे आधार नंबर आणि मोबाईल नंबर टाकायचा आणि खालील चेक बॉक्सला टिक करायचे आहे. चेक बॉक्सला टिक करताच खालील Submit बटनावर क्लिक करायचे आहे.
- Submit बटनावर क्लिक केल्या नंतर लाभार्थ्याचा चेहरा स्क्यान कराचा आहे, चेहरा स्क्यान झाल्या नंतर लाभार्थ्याचे ई–केवायसी पूर्ण होईल आणि लाभार्थ्याचे हयात प्रमाणपत्र तयार होईल. तयार झालेले हयात प्रमाणपत्र कोणत्याही कार्यालयाला देण्याची गरज नाही. गरज वाटली तर प्रिंट मारून जवळ ठेवू शकता.
अशा पद्धतीने पेन्शनधारक तसेच संजय गांधी निराधार योजना अंतर्गत लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांना Beneficiary Satyapan app च्या मदतीने आपली ई–केवायसी करू शकता आणि आपले हयात प्रमाणपत्र ऑनलाईन पद्धतीने भरू शकता. यासाठी कोणत्याही कार्यालयाला खेटे मारण्याची गरज नाही. वरील दोन्ही app डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकला टच करा.
Beneficiary Satyapan app – https://play.google.com/store/apps/details?id=com.adhaar.bsa&pcampaignid=web_share
AadhaarFaceRD – https://play.google.com/store/apps/details?id=in.gov.uidai.facerd&pcampaignid=web_share
सारांश
Beneficiary Satyapan app: संजय गांधी निराधार व पेन्शनधारक लाभार्थ्यांना app वरून करता येणार आधार सत्यापन या लेखात आपण संजय गांधी निराधार योजनेच्या आणि इतर पेन्शन योजनेच्या लाभार्थ्यांना ई-केवयासी आणि ऑनलाईन हयात प्रमाणपत्र app च्या साह्याने कसे बनवायचे या बद्दल सविस्तर माहिती पहिली. पेन्शनधारक लाभार्थ्यांना आता हयात प्रमाणपत्र कार्यालयाला नेवून देण्याची गरज नाही. या app वर ई-केवयासी करून योजनेचा लाभ दरवर्षी घेवू शकता. माहिती आवडली असेल्यास गरजवंता पर्यंत अवश्य पोहचावा.
हे ही वाचा :-
- संजय गांधी निराधार योजना कागदपत्रे
- श्रावणबाळ निवृत्ती वेतन अनुदान योजना- कागदपत्रे आणि प्रोसेस
- 60 वर्षावरील पेन्शन योजना: जेष्ठ नागिरीकांना पेन्शन योजना
- मुख्यमंत्री वयोश्री योजना : ज्येष्ठ नागरिकांना साह्य साधने व उपकरणे खरेदीसाठी अर्थसाह्य
- मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना: पालकाचे छत्र हरवलेल्या मुलांना मिळणार 4000 रुपये प्रतिमहिना
- बाल संगोपन योजना: दरमहा ११०० रुपये आर्थिक मदत
अशाच नव-नवीन माहितीसाठी आमच्या सोशल मिडिया ग्रुपमध्ये सामील होण्यासाठी खालील सोशल मिडिया ग्रुप आयकॉन ला टच करा.