Business Ideas In Marathi: ग्रामीण व शहरी भागात करता येणारे लघु उद्योग

Business Ideas In Marathi : ग्रामीण व शहरी भागात करता येणारे लघु उद्योग
Business Ideas In Marathi

Business Ideas In Marathi : ग्रामीण व शहरी भागात करता येणारे लघु उद्योग, महाराष्ट्रात ग्रामीण भागात अनेक छोटे-छोटे उद्योग कमी खर्चात उभे करता येतात. आजच्या परिस्थिती ची पाहणी केल्यास वाढती बेरोजगारी हि एक मोठी समस्या आहे. तरुणांना शिक्षण पूर्ण झाल्यावर नोकऱ्या मिळत नाहीत. आणि त्यामुळे तरुणान समोर बेरोजगारीचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. या परीस्ठीवर मत करण्यासाठी ग्रामीण भागात काही लघु उद्योग उभारून तुम्ही त्याद्वारे रोजगार उभा करू शकता. ग्रामीण भागात मिळणाऱ्या कच्च्या मालावर प्रक्रिया करून तो माल तुम्ही शहराच्या ठिकाणी नेवून विकू शकता, त्यामधून तुम्हाला चांगली मार्जिन कमावता येवू शकते. आपण पुढे काही लागू उद्योगाची माहिती पाहणार आहोत, जी तुम्हाला कमी खर्चात व कमी जागेत उभी करता येणारी आहेत. ग्रामीण भागात देखील सदरील उद्योगातून चांगली आर्थिक कमाई तुम्ही करू शकता.

Business Ideas In Marathi ग्रामीण व शहरी भाग

बेरोजगार तरुणांना रोजगार मिळवून देणारे अनेक लघु उद्योग आहेत, ज्याद्वारे बेरोजगार तरुण उद्योजक होऊ शकतात.आपण काही उद्योगाची माहिती पाहणार आहोत, जे ग्रामीण आणि शहरी भागात कमी खर्चात करता येवू शकतात.

Business Ideas In Marathi/ लघु उद्योग लिस्ट मराठी

  1. शेळी पालन व्यवसाय
  2. दुग्ध व्यवसाय
  3. कुक्कुट पालन व्यवसाय
  4. कापड दुकान
  5. पिठाची गिरणी
  6. किराणा दुकान
  7. ऑनलाईन सेवा CSC सेंटर
  8. जनरल स्टोर
  9. पम्चर काढणे दुकान
  10. फिल्टर पाणी प्लांट
  11. मोटार पंप दुरुस्ती
  12. चहा नाश्ता स्टोल
  13. प्रवासी वाहन
  14. भाजी पाला विक्री स्टोल
  15. वेल्डिंग वर्क शॉप
  16. बूट चप्पल दुकान
  17. ट्रक्टर व्यवसाय

    Business Ideas In Marathi : ग्रामीण व शहरी भागात करता येणारे लघु उद्योग
    Business Ideas In Marathi

वरील प्रमाणे लघु उद्योगाची लिस्ट आहे जे तुम्हाला ग्रामीण आणि शहरी भागात करता येतात. यातील बर्याच उद्योगांना शासन आर्थिक अनुदान देते. अनुदानावर देखील तुम्ही यातील काही उद्योग करू शकतात. शासकीय अनुदान कोणकोणत्या लघु उद्योगांना मिळू शकते ते आपण पुढे पाहू.

✅👉🏻 Scholarship Loan: जे.एन.टाटा एन्डॉवमेंट शिष्यवृत्ती कर्ज, परदेशी शिक्षणासाठी कर्ज योजना

शेळी पालन अनुदान योजना

महाराष्ट्र शासना कडून बेरोजगार तरुणांना व्यवसाय निर्माण करून देण्यासाठी अनेक योजना राबविल्या जातात. महाराष्ट्र शासनाकडून शेळी पालन व्यवसायासाठी पशुसंवर्धन विभागा मार्फत 90% अनुदानावर शेळी गट उपलब्ध करून दिला जातो. तुम्हाला या योजनेचा लाभ घेण्यासाठी शासनाच्या पशु संवर्धन विभागाच्या वेबसाईट वर जाऊन online अर्ज करावा लागतो.

✅👉🏻 Vidyalakshmi Education Loan: Vidyalakshmi Portal,प्रधानमंत्री विद्यालक्ष्मी कार्यक्रम

दुग्ध व्यवसाय अनुदान योजना

शासनाकडून दुग्ध व्यवसायासाठी अनेक योजनातून अनुदान दिले जाते. दुग्ध व्यवसाय करू इच्छिणाऱ्या लाभार्थ्याला शासन पशुसंवर्धन विभागाकडून गाई आणि म्हशी खरेदी करण्यासाठी भरघोस अनुदान देते. या साठी पशुसंवर्धन विभागाच्या वेबसाईट वर Online अर्ज करावा लागतो.

कुक्कुट पालन व्यवसाय अनुदान योजना

कुक्कुट पालन व्यवसायासाठी शासंकडून वेगवेगळ्या योजना राबविल्या जातात. 80%-90% अनुदांवर योजनांमधून लाभ दिला जातो.

प्रवासी वाहन कर्ज योजना

शासन प्रवासी वाहन खरेदी साठी वेगवेगळ्या महामंडळाकडून अल्प दारात कर्ज उपलब्ध करून देते जसे कि अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ या मांडला कडून वाहन खरेदीसाठी कर्ज दिले जाते.

ट्रक्टर खरेदीसाठी अल्प दरात कर्ज योजना

ट्रक्टर खरेदीसाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ या मंडळाकडून ट्रक्टर खरेदीसाठी अल्प दरात कर्ज दिले जाते.

✅👉🏻 Parivahan Fancy Number: वाहनासाठी फॅन्सी किंवा व्हीआयपी नंबर कसा मिळवायचा ?

उद्योगासाठी जागेची निवड

लघु उद्योग निवडतांना तो आपल्या भागात कितपत यशयस्वी होऊ शकतो याचा विचार करणे अत्यंत महत्वाचे आहे. तुम्ही जो व्यवसाय निवडता तो आपल्या भागात चालू शकतो का ? आपल्या भागात त्या व्यवसायाला ग्राहक आहेत का ? याचा परिपूर्ण अभ्यास करून व्यवसाय निवडावा, किंवा आपण निर्माण करत असलेल्या वस्तू किंवा शेवा यांना मार्केट कुठे मिळू शकते हे हि पाहावे लागेल.लघु उद्योग लिस्ट मराठी या लेखाची मदत तुम्हाला व्यवसाय निवड करण्यासाठी नक्की होईल.

ग्रामीण व शहरी भागात अनेक असे व्यवसाय आहेत जे तुम्ही अतिशय कमी भांडवलात उभे करू शकता. महाराष्ट्र शासनाच्या अनेक योजना आहेत ज्या लघुउद्योगांना अल्प व्याजदरात कर्ज उपलब्ध करून देतात. या योजनांचा लाभ घेऊन तुम्ही तुमच्या व्यवसायाला सुरुवात करू शकता. शेतमालावर प्रक्रिया करणारे छोटे छोटे उद्योग उभारून त्याद्वारे आपल्या उत्पन्नाचे साधन तुम्ही निर्माण करू शकता.

वरील प्रमाणे व्यवसायाची निवड करून तुम्ही व्यावसायिक बनू शकता. शासनाच्या योजनांन द्वारे तुम्ही आर्थिक पाठबळ मिळवू शकता.

✅👉🏻Parivahan Insurance Check: परिवहन सेवा पोर्टलवर तुमच्या वाहन विम्याची स्थिती ऑनलाईन तपासा

Conclusion

Business Ideas In Marathi: Information on Rural and Urban Small-Scale Industries : ग्रामीण व शहरी भागात करता येणारे लघु उद्योग सदरील लेखामध्ये आम्ही तुम्हाला ग्रामीण व शहरी भागात करता येणाऱ्या उद्योगाची माहिती तसेच या उद्योगासाठी मिळणारे शासनाचे अनुदान या बद्दल परिपूर्ण माहिती या blog दिलेली आहे. तुम्ही याद्वारे आपला व्यावाय निवडू शकता, माहिती आवडली असल्यास आपल्या मित्रांना शेअर करा.

आमचे ग्रुप जॉईन करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

1 thought on “Business Ideas In Marathi: ग्रामीण व शहरी भागात करता येणारे लघु उद्योग”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top