Ration Card e-KYC Online: मोबाईलवरून काही मिनिटांत पूर्ण करा रेशन कार्डची ई-केवायसी

E-kyc For Ration Card Online : रेशन कार्ड धारकाला e-kyc करणे शासनाने बंधनकारक केले आहे. प्रत्येक रेशन कार्ड धारकाने आपल्या रेशन कारची e-kyc करणे आवश्यक आहे अन्यथा रेशन कार्ड बंद करण्यात येणार आहे. रेशन दुकानदाराकडे जावून e-kyc करता येते किंवा मोबाईल app च्या साह्याने घरबसल्या e-kyc करता येते असे दोन पर्याय शासनाने उपलब्ध करून दिले आहेत.E-kyc For Ration Card Online

E-kyc For Ration Card Online म्हणजे काय ?

शासनाने नवीन निर्णयानुसार रेशन कार्डधारकांना e-KYC बंधनकारक केली आहे. महाराष्ट्रातील बोगस लाभार्थी कमी व्हावेत आणि खऱ्या लाभार्थ्यांना रेशन योजनेचा लाभ मिळत राहण्यासाठी e-KYC  करणे आवश्यक करण्यात आलेले आहे. e-KYC  म्हणजे तुमचे रेशन कार्ड तुमच्या आधार नंबरला जोडून घेणे.  रेशन कार्ड मधील प्रत्येक सदस्याचे आधार कार्ड त्याच्या रेशन कार्डशी जोडण्याला आधार e-KYC  म्हणतात. हे दोन प्रकारे करता येते एक तुमच्या रेशन दुकानदाराकडे आणि दुसर म्हणजे मोबाईल अप्लिकेशनद्वारे. आधार e-KYC मोबाईलवरून कशी करायची ते आपण खालील लेखात पाहणार आहोत.

मोबाईलवरून रेशन कार्डची ई-केवायसी कशी करायची 

मोबाईलवरून E-kyc For Ration Card Online  करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला मोबाईल मध्ये दोन app downolad करावे लागतील. पहिले app तुम्हाला ‘मेरा KYC’ आणि दुसरे म्हणजे  ‘AadhaarFaceRD’ या app च्या साह्याने तुम्हाला रेशन  कार्ड E-kyc For Ration Card Online  करता येते ती कशी करायची ते आपण खाली पाहू.

  • प्रथमतः तुम्हाला तुमच्या मोबाईल मध्ये ‘मेरा KYC’ app प्ल्ये स्टोर मधून downolad करून घ्यायचे आहे. त्या नंतर ‘AadhaarFaceRD’ हे app downolad करून घ्यायचे आहे.
  • ‘मेरा KYC’ app downolad करून घेतल्या नंतर app ओपन करायचे आहे, समोरील रकान्यात तुमचे राज्य निवडायचे आहे. राज्य निवडल्यानंतर लाभार्थ्याचा आधार नंबर टाकून OTP द्वारे लॉगीन करून घ्यायचे आहे.
  • लाभार्थ्याचे आधार टाकून OTP आणि कॅप्चा टाकल्यानंतर FACE KYC चा पर्याय निवडून मोबाईल मध्ये FACE वेरीफाय करायचे आहे.
  • FACE व्हेरीफाय होताच तुमची आधार E-kyc For Ration Card Online पूर्ण होईल.

‘AadhaarFaceRD’ हे app downolad केल्या नंतर या app मध्ये लॉगीन करण्याची आवश्यकता नाही. फक्त downolad करावे लागते.

Ration Card e-KYC झाली का नाही हे कसे चेक करायचे 

रेशन कार्ड विषयीच्या सर्व माहितीसाठी लाभार्थ्यांच्या मोबाईलमध्ये ‘Mera Ration’ हे app असणे आवश्यक आहे. ‘Mera Ration’ या app च्या साह्याने घर बसल्या तुम्ही तुमच्या रेशन विषयीची संपूर्ण माहिती मिळवू शकता. जसे की मिळणाऱ्या रेशनची मात्रा, रेशनचा भाव, कुटुंबातील सदस्यांची नवे आणि इतर माहिती यासर्व गीष्टीची माहिती आपल्याला मिळविता येते.

‘Mera Ration’ हे app प्ल्ये स्टोर वरून downolad करून घ्यायचे आहे. downolad केल्या नंतर तुमचा आधार नंबर आणि कॅप्चा टाकून लॉगीन करायचे आहे. लॉगीन करताच तुमच्या रेशन कार्ड मधील सदस्यांची माहिती तुम्हाला समोर दिसेल, तिथेच जर e-KYC झालेली असेल तर नावापुढे  Y दिसेल आणि जर झालेली नसेल तर N दिसेल. अशा प्रकारे तुम्हाल आधार E-kyc For Ration Card Online  झालेली आहे किंवा नाही हे चेक करता येते.

Ration Card e-KYC चेक करण्याबरोबरच रेशन कार्ड विषयीची आणखीन माहिती शेवा तुम्हाला सदरील app च्या साह्याने मिळविता येतात.

  1. Manage Family Details
  2. Ration Entitlement
  3. Surrender RC 
  4. Track My Ration 
  5. My Grievance

वरील शेवा ‘Mera Ration’ app च्या साह्याने घेता येतात. रेशन कार्डच्या सर्व शेवा घर बसल्या ऑनलाईन मिळविण्यासाठी वरील तिन्ही app तुमच्या मोबाईल मध्ये असणे आवश्यक आहेत. वरील app च्या मदतीने घरबसल्या रेशन कार्ड मधील तुम्ही करू शकता, त्यासाठी कुठल्याही कार्यालयाला खेटे मारण्याची आवश्यकता नाही.

वारी तिन्ही app downolad करण्यासाठी खालील लिंकवर जा

  1.     ‘AadhaarFaceRD’  –   https://play.google.com/store/apps/details?id=in.gov.uidai.facerd&pcampaignid=web_share
  2. ‘मेरा KYC’ app – https://play.google.com/store/apps/details?id=com.nic.facialauth&pcampaignid=web_share
  3. ‘Mera Ration’ app – https://play.google.com/store/apps/details?id=com.nic.onenationonecard&pcampaignid=web_share

सारांश 

Ration Card e-KYC Online: मोबाईलवरून काही मिनिटांत पूर्ण करा रेशन कार्डची ई-केवायसी या लेखात आपण मोबाईलद्वारे E-kyc For Ration Card Online  कशी करायची या बद्दल सविस्तर माहिती पहिली. शासनाच्या ऑनलाईन app च्या साह्याने आपण घरबसल्या रेशन कार्ड विषयीच्या अनेक शेवांचा लाभ मिळवू शकतो. Ration Card e-KYC आपण घरबसल्या मोबाईलच्या साह्याने करू शकतो, त्यासाठी कोणत्याही कार्यालयाला खेटे मारण्याची आवश्यकता नाही. माहिती आवडली असल्यास आपल्या मित्रांना आणि नातेवाईकांना शेअर करा.

हे ही वाचा:-

 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top