मित्रांनो सध्याच्या काळात देश पातळीवर गाजत असलेला मुद्दा म्हणजे Electoral Bonds. SBI बँके संबंधित असलेला हा विषय आहे, SBI मार्फत इतर पैशाच्या बचतीचे BONDS विषयी आपल्याला माहिती आहे, पण Electoral Bonds हा विषय सर्व-सामन्यासाठी नवीन आहे. विशेष म्हणजे न्यायालयाच्या Electoral Bonds विषयीच्या निकालानंतर हा मुद्दा आणखी प्रखर झाला. निरनिराळ्या राजकीय पक्षांची यादी निवडणूक विभागाच्या अधिकृत संकेत स्थळावर प्रकाशित करण्यात आली. या यादी मध्ये अगदी कोटीच्या घरात Electoral Bonds राजकीय पक्षांना मिळालेली आहेत. मग हे Electoral Bonds काय आहेत, ते कोणाला खरेदी करता येतात. आणि कोणाला देता येतात, या Electoral Bonds चा बँकेत रकमेत रूपांतर करण्याचा कालावधी किती या सर्व बाबी विषयी आपण सविस्तर जाणून घेणार आहोत.
निवडणूक रोखे म्हणजे काय
भारतातील नोंदणीकृत राजकीय पक्ष, ज्यांनी मागील सार्वत्रिक निवडणुकीत किमान १% किंवा त्यापेक्षा अधिक मतदान घेतले आहे, असे राजकीय पक्ष Electoral Bonds प्राप्त करू शकतात. राजकीय पक्षांना देणगी देऊ इच्छिणारा एखादा व्यक्ती किंवा संस्था स्टेट बँक ऑफ इंडिया शाखे मार्फत राजकीय पक्षांना निवडणूक रोखे ( Electoral Bonds ) च्या माद्यमातून देणगी देऊ शकते.
भारतातील कोणतीही व्यक्ती किंवा कंपनी जी भारतात स्थापन करण्यात आलेली आहे, ती व्यक्ती किंवा कंपनी निवडणूक रोखे खरेदी करू शकते. या निवडणूक रोखे मध्ये देणगीदार किंवा प्राप्तकर्ता यांचा कुठलाही तपशील नसतो. ते पूर्णपणे निनावी असतात. हे निवडणूक रोखे हे रु. १०००, रु. १०,०००, रु. १,००,००० ते १ कोटी च्या मर्यादेत असतात. हे बॉण्ड इच्छुक खरेदीदार यांना त्यांच्या SBI बँक शाखेच्या खात्याद्वारे खरेदी करता येतात. SBI बँक या निवडणूक रोख्यांवर कोणतेही व्याज, कमिशन किंवा इतर शुल्क आकारत नाही.
Electoral Bonds/निवडणूक रोखे किती दिवस वैध असतात
देणगीदाराने आपल्या SBI बँक शाखेच्या माद्यमातून खरेदी केलेले Electoral Bonds हे कोणत्याही राजकीय पक्षाला दिल्या नंतर त्या राजकीय पक्षाला हे निवडणूक रोखे जास्तीत जास्त १५ दिवसाच्या आत त्यांच्या पक्षाच्या खात्यामध्ये वठवून घ्यावी लागतात, अन्यथा हे निवडणूक रोखे SBI बँकेला परत जातात. आणि परत आलेले निवडणूक रोखे SBI द्वारे पंतप्रधान मदत निधी मद्ये जमा केली जातात. नियमानुसार निवडणूक रोखे ( Electoral Bonds ) जानेवारी, एप्रिल, जुलै आणि अकटोबर या महिन्यात १० दिवसासाठी SBI बँके कडून खरेदीसाठी उपलब्ध करून दिले जातात.
✅👉🏻 Parivahan Fancy Number: वाहनासाठी फॅन्सी किंवा व्हीआयपी नंबर कसा मिळवायचा ?
Electoral Bonds: निवडणूक रोखे
भारत सरकारने २०१७ मध्ये सदरील Electoral Bonds योजना जाहीर केली होती. आणि २९ जानेवारी २०१८ रोजी कायदेशीर रित्या लागू केली होती. भारतात राहणाऱ्या कोणत्याही नागरिकाला किंवा भारतात अस्तित्वात असलेल्या कोणत्याही कंपनीला भारतातील नोंदणीकृत राजकीय पक्षाला, ज्यांनी मागील निवडणुकीत किमान १% मते मिळविली आहे अशा पक्षांना Electoral Bonds च्या माध्येमातून रु. १,०००, रु. १०,०००, रु. १,००,००० ते १ कोटी पर्यंत निधी देता येत होता. आणि विशेष म्हणजे देणगीदाराची माहिती तसेच देणगी स्विकारणाऱ्या राजकीय पक्षाची माहिती गुपित राहत होती. सरकारच्या निवडणूक रोखे योजने नुसार देणगी दार आणि देणगी प्राप्त कर्ता यांची माहिती, ही माहिती अधिकारात देता येत नव्हती.
भारतातील राजकीय पक्षाचे २०१७ पासून निधीचे साधन असलेले Electoral Bonds हे माननीय सर्वोच्च न्यायालयाने १५ फेब्रुवारी २०२४ रोजी ‘Electoral Bonds द्वारे माहिती अधिकाराचे उल्लंघन आहे, आणि स्वातंत्र्याचे उल्लंघन आहे’ असे कारण देत, Electoral Bonds Scheme ( निवडणूक रोखे योजना ) अवैध ठरवली.
✅👉🏻 महाराष्ट्र मतदार यादी कशी चेक करायची: Maharashtra Voter List PDF
Electoral Bonds/निवडणूक रोखे द्वारे कोणत्या राजकीय पक्षाला किती निधी मिळाला
Electoral Bonds ( निवडणूक रोखे ) यांच्या माध्यमातून भारतातील राजकीय पक्षांना किती निधी मिळाला हि यादी चेक करण्यासाठी तुम्हाला Election Commission Of India यांच्या ऑफिशियल वेब साईटवर जावे लागेल. या साईटवर आल्या नंतर ADVANCE SEARCH मध्ये Electoral Bond नावाचे पर्याय निवडून तुम्ही राजकीय पक्षांना मिळालेला निधी चेक करू शकता.
राजकीय पक्षांना मिळाला निधी चेक करा 👉🏻 https://www.eci.gov.in/advance-search
Conclusion
Electoral Bonds: निवडणूक रोखे म्हणजे काय, आणि ते कशे काम करतात या लेखा मध्ये आपण Electoral Bonds काय आहेत आणि ते कशे काम करतात या बद्दल सविस्तर माहिती पहिली, आम्ही दिलेली माहिती आवडली असल्यास आपल्या मित्रांना शेअर करा. आम्ही आपल्याला नेहमीच नवनवीन आणि उपयुक्त माहिती देत असतो, अशीच माहिती मिळविण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.
🟢🔵🟣आमच्या सोशल मीडिया ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी क्लिक करा.