household item kit distribution महाराष्ट्र सरकारच्या ‘महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळ’ यांच्याकडून महाराष्ट्रातील बांधकाम कामगारांना गृहपयोगी वस्तुसंच वितरीत करण्यात येत आहेत. हि योजना सुरु झाल्यापासून ऑफलाईन स्वरूपात अर्ज करण्यात येत होता. पण आता मात्र मंडळाकडून या संचासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात अली आहे.
Household Item Kit Distribution
बांधकाम कामगार कल्याण विभागाकडून बांधकाम कामगारांना गृहपयोगी वस्तुसंच वाटप केला जातो. मध्यंतरी ही योजना बंद करण्यात आली होती, पण आता ही योजना नव्याने सुरु करण्यात आलेली आहे. नव्याने सुरु करण्यात आलेल्या योजने मध्ये कठल्याही कॅम्पच्या ठिकाणी नंबर लावण्याची गरज नाही. कामगार विभागाच्या दिलेल्या वेबसाईटवर जावून वास्तुसंचासाठी online पद्धतीने अर्ज दाखल करता येतो.
Household Item Kit Distribution/ बांधकाम कामगार गृहपयोगी वस्तुसंच मिळविण्यासाठी ऑनलाइन अर्ज कसा करायचा
बांधकाम कामगार गृहपयोगी वस्तुसंच मिळविण्यासाठी खालील प्रमाणे online अर्ज करावा लागतो.
- सर्वप्रथम कामगार विभागाने उपलब्ध करून दिलेल्या https://hikit.mahabocw.in/appointment वेबसाईटवर जावून ‘गृहपयोगी वस्तुसंच मागणी अर्ज’ या पेजवर अगोदर अर्ज केला असेल तर ‘येथे क्लिक करा’ यावर क्लिक करून पावती काढता येते, तर नवीन मागणी अर्जासाठी खाली दिसणाऱ्या रिकाम्या ”जागेत तुमचा बांधकाम कामगार नोंदणी नंबर टाकायचा आहे. बांधकाम कामगार नोंदणी नंबर टाकल्या नंतर ‘SEND OTP’ यावर क्लिक करायचे आहे.
- ‘SEND OTP’ वर क्लिक केल्या नंतर आलेला otp भरून, ओपन होणाऱ्या नवीन पेजवर कामगार विभागाला केलेल्या नोंदणी संपूर्ण माहिती तुम्हाला दिसेल.
- खाली आल्या नंतर खालील रकान्यात कॅम्प चे जवळचे ठिकाण आणि तारीख निवडायचे आहे.
- कॅम्प ठिकाण आणि तारीख निवडल्यानंतर खाली येवून पावती प्रिंट करून घ्यायची आहे, अशा पद्धतीने (household item kit distribution) गृहपयोगी वस्तुसंच मिळविण्यासाठी online अर्ज करू शकता.
नोंदणी क्रमांक कसा मिळवायचा
गृहपयोगी वस्तुसंच (household item kit distribution) मिलाविण्यास्ठी online अर्ज करतांना बांधकाम कामगार विभागाचा नोंदणी क्रमांक असणे आवश्यक आहे. नोंदणी क्रमांक कसा पाहायचा ते आपण पाहू.
- सर्वप्रथम तुम्हाला बांधकाम कामगार च्या https://mahabocw.in वेबसाईटवर जावे लागेल त्या नंतर Construction Worker:Profile Login या पर्यायावर जायचे आहे, या पर्यायावर आल्यानंतर दिसणाऱ्या पहिल्या रकान्यात लाभार्थ्याचा आधार नंबर टाकायचा आहे तर दुसऱ्यान रकान्यात नोंदणी करतांना दिलेला नंबर टाकायचा आहे.
- आधार नंबर आणि मोबाईल नंबर टाकल्या नंतर आलेला OTP टाकून सबमिट करायचे आहे.
- ओपन होणाऱ्या नवीन पेजवर तुमची पूर्ण माहिती असेल त्यामधून डाव्या कोपऱ्यातील नोंदणी क्रमांक कॉपी करून किंवा लिहून घ्यायचा आहे.
अशा प्रकारे लाभार्थ्याचा नोंदणी क्रमांक मिळविता येतो.
निष्कर्ष
household item kit distribution: बांधकाम कामगार गृहपयोगी वस्तुसंच ऑनलाइन अर्ज सरू या लेखात आपण बांधकाम कामगार कल्याण विभागाकडून वाटप करण्यात येणाऱ्या गृहपयोगी वस्तुसंच (household item kit distribution) यासाठी online अर्ज कसा करायचा या बद्दल सविस्तर माहिती पहिली. माहिती आवडली असल्यास इतरांना शेअर करा.
आमच्या सोशल मोदिया ग्रुपमध्ये सामील होण्यासाठी खालील ग्रुप आयकॉनवर जा.
हे ही वाचा:-
- Kamgar Kalyan Scholarship Scheme 2025:- बांधकाम कामगार कल्याण स्कॉलरशिप अर्ज Online
- www mahabocw in renewal online: 2025 बांधकाम कामगार ऑनलाईन रिनीवल
- Www Mahabocw In Renewal Status: बांधकाम कामगार रिन्यूअल स्थिती तपासा
- Bandhkam Kamgar Mobile Number Change: बांधकाम कामगार नोंदणी करण्यासाठी दिलेला मोबाईल नंबर कसा बदलायचा
- BOCW Status Check: Mahabocw बांधकाम कामगार योजनांची स्थिती तपासा
- बांधकाम कामगार योजना फायदे: Construction Worker Scheme Benefits
- बांधकाम कामगार योजना ऑनलाइन फॉर्म: अशी करा कामगार नोंदणी
- बांधकाम कामगार स्मार्ट कार्ड/Construction Worker Smart Card
- Kamgar Kalyan Scholarship- कामगार कल्याण शिष्यवृत्ती दाव्यासाठी कागदपत्रे पडताळणीची तारीख बदला
- Mahabocw Scholarship Status Check: कामगार विभागाच्या शिष्यवृत्तीची स्थिती तपासा