HSRP नंबर प्लेट महाराष्ट्र: ऑनलाइन बुकिंग, फी, आणि संपूर्ण माहिती

hsrp maharashtra:- महाराष्ट्र शासनाच्या नवीन नियमानुसार 2019 अगोदर च्या सर्व वाहनांना उच्च सुरक्षा क्रमांक प्लेट (High security number plate-HSRP) बसवून घेण्याचे निर्देश दिले आहेत. यानुसार महाराष्ट्रातील 2019 पूर्वीचे वाहन असणाऱ्या सर्व वाहनधारकांना नवीन hsrp maharashtra नंबर प्लेट बसविणे आवश्यक आहे. शासनाकडून यासाठी एक अंतिम तारीख फिक्स करण्यात आलेली आहे. या तारखे अगोदर वाहनाला HSRP नंबर प्लेट बसविणे अनिवार्य आहे. HSRP नंबर प्लेट कशी बुक करायची आणि यासाठी किती खर्च येतो, या बद्दल माहिती आपण या लेखात पाहणार आहोत.hsrp maharashtra

HSRP नंबर प्लेट काय आहे

HSRP – High security number plate (उच्च सुरक्षा क्रमांक प्लेट hsrp maharashtra ) शासनानाच्या नवीन नियमानुसार आता सर्व वाहनांना HSRP नंबर लावणे अनिवार्य झाले आहे. 2019 पूर्वी च्या वाहनांना पेंट केलेल्या नंबर प्लेट होत्या, नवीन वाहनांना येणाऱ्या HSRP नंबर प्लेट आहेत, पण आता शासनाच्या नवीन निर्णयानुसार सर्वच वाहनांना HSRP नंबर प्लेट लावणे अनिवार्य करण्यात आलेले आहे.

hsrp maharashtra ही एक उच्च सुरक्षा असलेली नंबर प्लेट आहे. या नंबर प्लेट वर लेसर कोड, क्रोमेटीक स्टीकर आणि इतर सुरक्षे विषयीचे वैशिष्ट्य या नंबर प्लेट वर देण्यात आलेले आहे. ही नंबर प्लेट वाहनाच्या चोरी आणि बनावटी सारख्या गोष्टीवर नियंत्रण आणते.

HSRP नंबर प्लेट ऑनलाईन बुकिंग प्रोसेस

महाराष्ट्र शासनाने  1 एप्रिल 2019 पूर्वीच्या सर्व जुन्या वाहनांना HSRP( hsrp maharashtra) नंबर प्लेट लावणे बंधन कारक केले आहे. 30 मार्च 2025 ही शेवटची तारीख आहे, या तारखे अगोदर hsrp (maharashtra) नंबर प्लेट लावणे आवश्यक आहे. ही नंबर प्लेट मिळविण्यासाठी शासनाने अधिकृत वेबसाईट वर बुकिंग सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. 30 मार्च शेवटची तारीख असल्याने वाहनधारक नंबर प्लेट मिळविण्यासाठी धावपळ करतांना दिसत आहेत. याचा फायदा सायबर क्रिमिनल घेवून बनावट वेबसाईट तयार करून लोकांना फसविण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा बनावट वेबसाईट पासून लोकांना सावधान राहण्याची गरज आहे.

HSRP Maharashtra Official Website

HSRP Mharashtra नंबर प्लेट मिळविण्यासाठी वाहन धारकाला शासनाच्या अधिकृत वेबसाईट वर जावून ऑनलाईन बुकिंग अर्ज करायचा आहे. शासनाने ठरवून दिलेल्या तारखेच्या आत नंबर प्लेट बसविणे अनिवार्य असल्याने आणि कालावधी असल्याने सायबर क्रिमिनल अनेक बनावट वेबसाईट तयार करून लोकांना फसविण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा वेळेस चुकीच्या वेबसाईट वर आपली माहिती भरू नका. यामधून आर्थिक भुर्दंड बसू शकतो.

महाराष्ट्र शासनाच्या ट्रान्सपोर्ट विभागाच्या वेबसाईट वर जाऊन HSRP Mharashtra नंबर प्लेट मिळविण्यासाठी बुकिंग करायची आहे.

HSRP Maharashtra Official Website :- transport.maharashtra.gov.in 

HSRP नंबर प्लेट मिळविण्यासाठी कसा करायचा ऑनलाईन अर्ज

  • सर्वप्रथम शासनाच्या अधिकृत वेबसाईट transport.maharashtra.gov.in या वेबसाईट वर जायचे आहे.
  • ट्रान्सपोर्ट विभागाच्या वेबसाईट आल्या नंतर समोर ओपन होणाऱ्या पेज वर तुमचे RTO कार्यालय निवडायचे आहे, आणि सबमिट बटनावर क्लिक करायचे आहे.
  • सबमिट बटनावर क्लिक करताच समोर एक नवीन पेज ओपन होईल या पेज वर ORDER NOW, RESHEDULE APPOINTMENT, TRACK HSRP STATUS, RE-PRINT INVOICE, CUSTOMER GRIEVANCE इत्यादी पर्याय दिसतील या मधून नंबर प्लेट बुकिंगसाठी पहिला पर्याय ORDER NOW वर क्लिक कार्याचे आहे.
  • ORDER NOW वर क्लिक केल्या नंतर ओपन होणाऱ्या पेज वर पहिल्या रकान्यात राज्य निवडायचे आहे.
  • दुसऱ्या रकान्यात HSRP नंबर प्लेट प्रकार निवडायचा आहे, ज्या मध्ये नवीन नंबर प्लेट पूर्ण कित निवडायचे आहे.
  • खालील रकान्यात वाहन इंजिन नंबर टाकायचा आहे.
  • नंतर नंबर प्लेट बसवून स्थान निवडायचे आहे, ज्या मध्ये डीलर कडे जावून बसवू शकता किंवा घरी बोलावून नंबर प्लेट बसवू शकता. घरी डीलर बोलवून नंबर प्लेट फीत करण्यासाठी अतिरिक्त चार्ज द्यावा लागतो.
  • खाली रकान्यात वाहनाचा चासिस नंबर टाकायचा आहे ( चासिस नंबर आणि इंजिन नंबर हे वाहनाच्या आरसी कार्ड वर असतात).
  • शेवटच्या रकान्यात वाहन मालकाचा मोबाईल नंबर टाकायचा आहे.
  • माहिती भरून झाल्यावर सबमिट बटनावर क्लिक करायचे आहे, आणि शेवटी समोर दिसणाऱ्या QR कोड स्क्यान करून पेमेंट करायचे आहे.

अशा पद्धतीने नवीन hsrp maharashtra नंबर प्लेट बुक करता येते.

HSRP Maharashtra आवश्यक कागदपत्रे

  • वाहनाचे RC  बुक .
  • वाहन मालकाचे आधार कार्ड.
  • वाहन मालकाचा मोबाईल नंबर.

HSRP नंबर प्लेटसाठी लागणारी फी किती

  1. टू व्हीलर आणि थ्री व्हीलर :- 1230 ते 1640 रु.
  2. कार :- 1975 ते 2050 रु.
  3. जड वाहने :- 1345 ते 1975 रु.

HSRP नंबर प्लेटसाठी ऑनलाईन घेतलेली तारीख कसी बदलायची

HSRP Mharashtra मध्ये बुकिंग केलेली HSRP नंबर प्लेट ची तारीख ऑनलाईन बदल येते. बुक केलेल्या तारखेला जर दिलेल्या केंद्रावर जाने होत नसेल तर ती तारीख बदलता येते.

  • यासाठी transport.maharashtra.gov.in या वेबसाईट वर जाऊन RESHEDULE APPOINTMENT या पर्यायाला क्लिक करायचे आहे.
  • नंबर प्लेट बुक करतांना मिळालेला ईनव्हाईस नंबर टाकून OTP घ्यायचा आहे, आणि पुढील फॉर्म भरून घेतलेली तारीख बदलता येते.

TRACK HSRP STATUS / तुमच्या अर्जाची स्थिती तपासा

उच्च सुरक्षा क्रमांक प्लेट मिळविण्यासाठी केलेल्या अर्जाची स्थिती अर्जकर्त्याला तपासता येते, त्यासाठी अर्जकर्त्याला वेबसाईट वर जावून TRACK HSRP STATUS या पर्यायावर क्लिक करून तुमच्याकडे असणारा ईनव्हाईस नंबर टाकून अर्जाची स्थिती जाणून घेवू शकता.

त्याच बरोबर ईनव्हाईस नंबर टाकून प्रिंट परत काढणे आणि कस्टमर सर्विस इत्यादी सेवा सदरील वेबसाईट वर शासनाने उपलब्ध करून दिल्या आहेत.

निष्कर्ष

HSRP नंबर प्लेट महाराष्ट्र: ऑनलाइन बुकिंग, फी, आणि संपूर्ण माहिती या लेखात आपण पहिली आहे. hsrp maharashtra शासनाने अनिवार्य केलेल्या HSRP नंबर प्लेटसाठी बुकिंग कशी करायची, बुकिंगसाठी शासनाची अधिकृत वेबसाईट कोणती आहे आणि वेबसाईट वर उपलब्ध करून दिलेल्या इतर सेवा या बद्दल सविस्तर माहिती आपण पहिली. माहिती आवडली असल्यास आपल्या मित्रांना शेअर करा.

अशाच माहितीसाठी आमच्या सोशल मिडिया ग्रुप मध्ये सामील व्हा.

हे ही वाचा :-

आमच्या सोशल मिडिया ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक ला टच करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top