Kamgar Kalyan Scholarship:- बांधकाम कामगार कल्याण विभागामार्फत बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांसाठी त्यांच्या आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक उन्नतीच्या अनेक योजना राबविल्या जातात. असंघसटीत असलेल्या बांधकाम कामगारांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याच्या उद्देशाने शासन प्रयत्नशील आहे. बांधकाम कामगारांच्या मुलांना योग्य व दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी शासन kamgar kalyan scholarship योजना राबवित आहे. या योजनेतून बांधकाम कामगारांच्या पाल्यांना शिक्षणाच्या वेगवेगळ्या टप्प्यावर शिष्यवृत्ती उपलब्ध करून दिली जाते. उच्च शिक्षण घेणाऱ्या बांधकाम कामगारांच्या पाल्यांना रु. एक लाख प्रतिवर्षी प्रमाणे शिष्यवृत्ती दिली जाते.
Kamgar Kalyan Scholarship
कामगार कल्याण विभागाच्या शेक्षणिक योजने अंतर्गत बांधकाम कामगाराच्या पहिल्या दोन पाल्यांना तसेच पत्नीस शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती उपलब्ध करून दिली जाते. इयत्ता पहिली ते पुढील उच्च शिक्षण पूर्ण करण्यासाठी शिक्षणाच्या वेगवेगळ्या टप्प्यावर सदरील शिष्यवृत्ती दिली जाते.
E01 :- पहिली ते सातवी प्रतिवर्षी रु. 2500, 8 वी 10 वी प्रतिवर्षी रु. 5000 |
E02;- 10 वी व 12 वी 50% किंवा अधिक गुण असल्यास रु. 10,000 |
E03:- 10 वी, 12 वी शिक्षणासाठी रु. 10,000 |
E04:- पदवीच्या प्रथम,द्वितीय,तृतीय वर्षी शिक्षणासाठी रु. 20,000 |
E05:- वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाकरिता आणि अभियांत्रिकी अभ्यासक्रमाकरिता रु. एक लक्ष रुपये ( 1,00,000 ). |
E06:- पद्विकारिता प्रतिवर्षी रु. 20,000 आणि पदुत्तर रु.25,000 |
E07:- संगणकाचे शिक्षण MS-CIT शुल्क प्रतिपूर्ती |
वरील प्रमाणे शिष्यवृत्ती बांधकाम कामगाराच्या मुलांना कामगार कल्याण विभागाच्या शेषणिक योजने अंतर्गत दिली जाते.
Kamgar Kalyan Scholarship- कामगार कल्याण शिष्यवृत्ती दाव्यासाठी कागदपत्रे पडताळणीची तारीख बदला
महाराष्ट्र शासनाच्या बांधकाम कामगार विभागाच्या पोर्टल अंतर्गत ऑनलाईन पद्धतीने kamgar kalyan scholarship योजनांचे फॉर्म भरून घेतले जातात. भरलेल्या फॉर्म भरल्या नंतर पुढील प्रक्रियेसाठी लाभार्थ्याला SMS द्वारे कळविले जाते. शासनाच्या बांधकाम कामगार कल्याण विभागाच्या नवीन अपडेट नुसार Kamgar Kalyan च्या पोर्टल मध्ये काही बद्दल करण्यात आलेले आहे, त्या नुसार लाभाच्या ऑनलाईन फॉर्म भरण्याच्या प्रक्रीये मध्ये काही बद्दल करण्यात आलेले आहेत.
पहिले शिष्यवृत्ती फॉर्म भरल्या नंतर कागदपत्रे पडताळणीसाठी जिल्ह्याच्या कामगार कार्यालयाला कागदपत्रे पडताळणीसाठी जावे लागत असे, पण आता जवळच्या तालुक्याच्या ठिकाणी असणाऱ्या कामगार कल्याण कार्यालयावर जावून तुम्ही कागदपत्रे पडताळणी करू शकता. तुम्ही भरलेल्या फॉर्म ची कागदपत्रे पडताळणी तारीख कशी बदलायची ते आपण पुढे पाहणार आहोत.
शिष्यवृत्ती फॉर्म ची कागदपत्रे पडताळणी तारीख कशी बदलायची/ Change Appointment Date for Claim
शासनाच्या kamgar kalyan scholarship या योजनेसाठी अर्ज केलेल्या लाभार्थ्यांना कामगार कल्याण पोर्टल च्या अपडेट नंतर नव्याने कागदपत्रांच्या पडताळणीसाठी नव्याने तारीख घ्यावी लागणार आहे. kamgar kalyan scholarship मिळण्यासाठी केलेल्या ऑनलाईन अर्ज, आणि अगोदर मिळालेली पडताळणीसाठी मिळालेली तारीख ही कशी बदलायची या बद्दल सविस्तर माहिती आपण सदरील लेखात पाहणार आहोत.
- सर्वप्रथम महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांच्या अधिकृत वेबसाईट mahabocw.in वर जावे लागेल. या नंतर पोर्टल वर समोर दिसणाऱ्या Change Appointment Date for Claim या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
Change Appointment Date for Claim या पर्यायावर क्लिक केल्या नंतर तुमच्या समोर ओपन होणार्या बॉक्स मध्ये कामगार विभागाकडून मिळालेला रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे.
रजिस्ट्रेशन नंबर टाकल्या नंतर तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबर वर OTP येयील ती भरून तुम्हाला सबमिट करायची आहे.
ओपन होणाऱ्या नवीन पेज वर लाभार्थ्याचा नोंदणी क्रमांक, आधार क्रमांक मोबाईल नंबर इत्यादी असेल.
- खालील रकान्यात लाभार्थ्याला त्याचा पावती नंबर भरायचा आहे, पावती नंबर हा अगोदर तुमच्याकडे असणाऱ्या पावतीच्या डाव्या कोपऱ्यात असेल. पावती नसेल तर लाभार्त्याची प्रोफाईल लॉगीन करून पावती नंबर मिळविता येतो.
- पावती नंबर टाकून खालील निळ्या बटनावर क्लिक करायचे आहे, या बटनावर क्लिक करताच खाली तुमची योजना आणि व्हिजिटिंग तारीख दिसेल.
- खाली रकान्यात तुमच्या जवळचे केंद्र म्हणजे तालुक्याच्या ठिकाणचे कामगार कल्याण कार्यालय निवडायचे आहे.
खाली निळ्या बटनावर क्लिक करून लाभार्त्याला नवीन तारीख निवडायची आहे, उपलब्ध असलेल्या तारखे मधून एक तारीख निवडून, त्या तारखेला तुमचे कागदपत्रे पडताळणी करून घेवू शकता.
वरील प्रमाणे कागदपत्रे पडताळणीसाठी मिळालेली पहिली तारीख बदलून नवीन तारीख ऑनलाईन पद्धतीने मोबाईल किंवा PC द्वारे घेता येते. आणि kamgar kalyan scholarship योजनेचा लाभ मिळविता येतो.
सारांश
Kamgar Kalyan Scholarship- कामगार कल्याण शिष्यवृत्ती दाव्यासाठी कागदपत्रे पडताळणीची तारीख बदला या लेखात आपण कामगार कल्याण शिष्यवृत्ती योजनेसाठी केलेल्या अर्जाची कागदपत्रे पडताळणीची जुनी तारीख बदलून नवीन तारीख कशी मिळवू शकतो, या बद्दल सविस्तर माहिती पहिली. Kamgar Kalyan Scholarship योजनेसाठी ऑनलाईन अर्ज आणि इतर माहितीसाठी पुढील लेख वाचा Construction Workers Educational Welfare Scheme माहिती आवडली असल्यास आपल्या मित्रांना शेअर करा.
आमच्या सोशल मिडिया ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर टच करा.