Kamgar Kalyan Scholarship Scheme 2025:- बांधकाम कामगार कल्याण स्कॉलरशिप अर्ज Online

Kamgar Kalyan Scholarship शासनाच्या महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांच्या कडून महाराष्ट्रातील बांधकाम कामगारांसाठी अनेक योजना राबविल्या जातात. महाराष्ट्रात असंघटीत स्वरुपात आढळणारा बांधकाम कामगार हा फार मोठ्या प्रमाणात आहे. बांधकाम कामगारांना आपली उपजीविका भागविण्यासाठी सतत कामाचे ठिकाण बदलत राहावे लागते, अशा परिस्थितीत बांधकाम कामगारांच्या मुलांना शिक्षण घेत असतांना अडचणी निर्माण होऊ नाही यासाठी शासन कामगार कल्याण मंडळाकडून बांधकाम कामगारांच्या मुलांना वेगवेगळ्या इयत्तेत शिष्यवृत्ती उपलब्ध करून देते.Kamgar Kalyan Scholarship

Kamgar Kalyan Scholarship Scheme/बांधकाम कामगार कल्याण स्कॉलरशिप योजना 2025

शासनाच्या महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांच्या कडून बांधकाम कामगारांच्या दोन पाल्य आणि पत्नी यांच्यासाठी शैक्षणिक शिष्यवृत्ती योजना (Kamgar Kalyan Scholarship)  चालविली जाते. या योजनेतून कामगाराच्या पाल्यांना इयत्ता पहिली ते डिग्री पूर्ण करेपर्यंत प्रर्तीवर्षी प्रमाणे शिष्यवृत्ती उपलब्ध करून दिली जाते.

Kamgar Kalyan Scholarship पात्रता आणि मिळणारी शिष्यवृत्ती 

E01 इयत्ता पहिली ते 7 वी प्रतिवर्षी रु. 2500, 8 वी ते 10 वी प्रतिवर्षी रु. 10,000. 
E0210 वी 12 वी 50% किंवा अधिक गुण असल्यास रु. 10,000.
E0310 वी 12 वी शैक्षणिक खर्च रु. 10,000. 
E04पदवीच्या प्रथम, द्वितीय, त्रितीय वर्ष रु. 20,000. 
E05वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाकरिता प्रतिवर्षी एक लक्ष रुपये ( 1,00,000 ), अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाकरिता प्रतिवर्षी रु. 60,000.
E06पदवी करिता प्रतिवर्षी रु. 20,000 व पदव्युत्तर शिक्षणासाठी रु. 25,000.
E07कामगारांच्या पाल्यांना MS-CIT शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती.

Kamgar Kalyan Yojana Scholarship आवश्यक कागदपत्रे 

E01इयत्ता 1 ली ते 7 वी आणि 8 वी ते 10 वी. 
  1. शाळेचे 75% उपस्थिती प्रमाणपत्र/मागील वर्षाचा प्रगती अहवाल.
  2. चालू  शैक्षणिक वर्षाचे बोनाफाईड प्रमाणपत्र.
  3. लाभार्थ्याचे आधार कार्ड.
  4. हमीपत्र.
  5. रेशन कार्ड.
E0210 वी-12 वी मध्ये 50% किंवा त्यापेक्षा जास्त गुण असणे.
  1. 10 वी, 12 वी गुणपत्रिका.
  2. शाळेचे/महाविध्यालायाचे ओळखपत्र.
  3. चालू शैक्षणिक वर्षाचे बोनाफाईड प्रमाणपत्र.
  4. लाभार्थ्याचे आधार कार्ड.
  5. हमीपत्र.
  6. रेशन कार्ड.
E0310 वी-12 वी शैक्षणिक खर्च 
  1. मागील शैक्षणिक वर्षात उतीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र/ गुणपत्रिका.
  2. चालू शैक्षणिक वर्षाची प्रवेशाची पावती.
  3. चालू शैक्षणिक वर्षाचे बोनाफाईड प्रमाणपत्र.
  4. महाविध्यालायाचे ओळखपत्र ( पर्यायी).
  5. लाभार्थ्याचे आधार कार्ड.
  6. हमीपत्र.
  7. रेशन कार्ड.
E04पदवीच्या प्रथम, द्वितीय, त्रितीय वर्ष
  1. मागील शैक्षणिक वर्षात उतीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र/गुणपत्रिका.
  2. चालू शैक्षणिक वर्षाच्या प्रवेशाची पावती.
  3. चालू शैक्षणिक वर्षाचे बोनाफाईड प्रमाणपत्र.
  4. पुस्तके आणि लेखाची पावती.
  5. लाभार्थ्याचे आधार कार्ड.
  6. हमीपत्र.
  7. रेशन कार्ड.
E05वैद्यकीय पदवी अभ्यासक्रम, अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रम.
  1. मागील वर्षाचे उतीर्ण गुणपत्रिका.
  2. चालू शैक्षणिक वर्षाचे बोनाफाईड प्रमाणपत्र.
  3. ID CARD/ ओळखपत्र.
  4. चालू शैक्षणिक वर्षाची प्रवेशाची पावती.
  5. लाभार्थ्याचे आधार कार्ड.
  6. रेशन कार्ड.
E06पदवी-पदव्युत्तर शिक्षणासाठी खर्च 
  1. मागील शैक्षणिक वर्षात उतीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र/गुणपत्रिका.
  2. चालू शैक्षणिक वर्षाच्या प्रवेशाची पावती.
  3. चालू शैक्षणिक वर्षाचे बोनाफाईड प्रमाणपत्र.
  4. ID CARD/ ओळखपत्र.
  5. हमीपत्र.
  6. रेशन कार्ड.
  7. लाभार्थ्याचे आधार कार्ड.
E07MSC-IT
  1. MSC-IT उतीर्ण प्रमाणपत्र.
  2. फी पावती.
  3. लाभार्थ्याचे आधार कार्ड.
  4. हमीपत्र.
  5. रेशन कार्ड.

Kamgar Kalyan Scholarship मिळविण्यासाठी वरील कागदपत्रांची आवश्यकता असते.

Kamgar Kalyan Scholarship Online Prosess/कामगार कल्याण शिष्यवृत्ती ऑनलाईन अर्ज 

Kamgar Kalyan Scholarship अर्ज करण्यापूर्वी कामगार म्हणून पालकाची नोदणी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांच्याकडे असणे आवश्यक आहे. कामगार नोदणी कशी करायची हे जाणून घेण्यासाठी पुढील blog वाचा बांधकाम कामगार ऑनलाईन नोंदणी. बांधकाम कामगार नोंदणी असलेल्या लाभार्थ्यांना Kamgar Kalyan Scholarship चा लाभ घेता येतो. कामगार कल्याण शिष्यवृत्ती मिळविण्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा ते आपण पाहू.

  • सर्वप्रथम महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांच्या अधिकृत वेबसाईट mahabocw.in वर जावे लागेल.
  • वेबसाईट वर आल्या नंतर समोर दिसणाऱ्या पर्याया मधून Construction Worker: Apply Online for Claim या पर्यायावर क्लिक करा.
  • Select Action म्हणून पेज ओपेन होईल त्या रकान्यात New Claim वर क्लिक करा.
  • New Claim वर क्लिक करून लाभार्थ्याला बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून मिळालेला Registrestion No. टाकायचा आहे, आणि proceed to form वर क्लिक करायचे आहे.
  • proceed to form वर क्लिक करताच तुमच्या रजिस्टर मोबाईल वर एक OTP येयील तो तुम्हाला खाली भरायचा आहे.
  • OTP भरल्या लाभार्थ्याचा नोंदणी केलेला फॉर्म ओपेन होईल, फॉर्म च्या खाली आल्या नंतर तुम्हाला रकान्यात Select Scheme Category / योजना श्रेणी वर क्लिक करून Educastinal Welfare Scheme/शैक्षणिक कल्याण योजना निवडायची आहे.
  • Educastinal Welfare Scheme/शैक्षणिक कल्याण योजना मध्ये लाभार्थी ज्या योजनेस पात्र असेल ती योजना निवडून खाली आवश्यक असलेले कागदपत्रे अपलोड करायचे आहे.
  • खाली दिसणाऱ्या निळ्या बटनावर क्लिक करून आपण अपलोड केलेल्या कागदपत्रे पडताळणीसाठी लाभार्थ्याला एक तारीख निवाड्याची आहे, निवडलेल्या तारखेला जवळच्या तालुका बांधकाम कामगार कल्याण कार्यालयाला हजार होऊन मूळ कागदपत्रांची पडताळणी करून घ्यायची आहे.
  • कागदपत्रे अपलोड करून शेवटी सबमिट केल्या नंतर लाभार्थ्याला एक पावती क्रमांक मिळेल, या पावती क्रमांकाच्या आधारे लाभार्थी आपल्या शिष्यवृत्ती चे स्टेटस चेक करू शकतो.

सारांश 

Kamgar Kalyan Scholarship Scheme 2025:- बांधकाम कामगार कल्याण स्कॉलरशिप अर्ज Online या लेखात आपण कामगार कल्याण कामगार कल्याण स्कॉलरशिप विषयी सविस्तर माहिती पहिली, कामगार कल्याण स्कॉलरशिपसाठी अर्ज कसा करायचा आणि कोणती कागदपत्रे लागतात या विषयी सविस्तर जाणून घेतले. माहिती आवडली असल्यास आपल्या मित्र व नातेवाईकांना अवश्य शेअर करा.

अशीच नवीन माहिती मिळविण्यासाठी आमच्या सोशल मिडिया ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर टच करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top