Mahabocw Scholarship Status Check: कामगार विभागाच्या शिष्यवृत्तीची स्थिती तपासा

Mahabocw Scholarship Status Check, mahabocw- Maharashtra Bulding And Other Constraction Workers Welfare Bord या महाराष्ट्र शासनाच्या  महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांच्या कडून बांधकाम कामगार यांच्या पाल्यांना/ पत्नीला शिक्षणासाठी वार्षिक शिष्यवृत्ती दिली जाते. कामगाराच्या मुलांना उच्च शिक्षण घेता यावे, यासाठी कामगार मंडळाकडून प्रत्येक इयत्तेत शिष्यवृत्ती दिली जाते. कामगार मंडळाच्या नोंदणीकृत कामगाराच्या पाल्यांना/ पत्नीला या शिष्यवृत्तीचा लाभ दिला जातो. प्राथमिक शिक्षणापासून ते प्रत्येक डिग्री मिळे पर्यंत प्रतिवर्षी शिष्यवृत्ती दीली जाते. रु. 5000 पासून ते रु. 1,000,00 लक्ष रुपयापर्यंत वार्षिक शिष्यवृत्ती सरळ कामगाराच्या बँक खात्यांमध्ये टाकली जाते. कामगाराच्या दोन पाल्यासाठी शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेता येतो, याच बरोबर कामगाराच्या पत्नीला हि या योजनेचा लाभ घेता येतो. Mahabocw Scholarship Status Check

Mahabocw Scholarship Scheme/ कामगार शिष्यवृत्ती योजना

शासनाच्या  महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांच्या कडून कामगारासाठी विविध कल्याणकारी योजना राबविल्या जातात. कामगारासाठी सामाजिक सुरक्षा योजना, आरोग्य विषयक योजना, आर्थिक योजना आणि शेक्षणिक योजना इत्यादी योजना कामगाराच्या कल्याणासाठी राबविल्या जातात. प्रत्येक योजनेतून कामगाराची आर्थिक सामाजिक आणि शेक्षणिक उन्नती साधली जावी, हा उद्देश शासनाचा आहे.

इतर सामाजिक घटका बरोबरच कामगाराच्या मुलांना हि चांगले आणि उच्च दर्जाचे शिक्षण मिळावे म्हणून कामगार महामंडळ कामगाराच्या पत्नी व पाल्यांनसाठी शिष्यवृत्ती योजना राबविते. कामगाराच्या मुलाच्या शिक्षणाच्या प्रत्येक टप्प्यावर वेगवेगळी शिष्यवृत्ती दिली जाते. कामगाराच्या मुलांना शैक्षणिक कल्याण योजना च्या माध्येमातून रु. 2500 ते रु. 1,000,00 एक लक्ष रुपया पर्यंत शिष्यवृत्ती दिली जाते. प्राथमिक शिक्षणापासून ते post graduate पर्यंत आणि प्रत्येक डिग्री डिग्रीच्या अभ्यासक्रमा करिता शिष्यवृत्ती दिली जाते.

✅👉🏻 बांधकाम कामगार योजना फायदे

Mahabocw Scholarship/ बांधकाम कामगार शिष्यवृत्ती

  • इयत्ता 1 ली ते 7 वी प्रतीशेक्षणिक वर्षी रु. 2500
  • इयत्ता 8 ली ते 10 वी प्रतीशेक्षणिक वर्षी रु. 5000 ( किमान उपस्थिती 75% किंवा अधिक )
  • इयत्ता 10 ली ते 12 वी प्रतीशेक्षणिक वर्षी रु10,000 ( किमान 50% किंवा अधिक गुण प्राप्त )
  • इयत्ता 11 ली ते 12 वी प्रतीशेक्षणिक वर्षी रु 10,000
  • पदवी अभ्यासक्रमा करिता प्रतिवर्षी रु. 20,000 पत्नीसह लागू.
  • वैद्यकीय पदवी करिता प्रतिवर्षी रु. 1,000,00 लक्ष रुपये.
  • अभियांत्रिकी पदवी करिता प्रतिवर्षी रु. 60,000.
  • शासनमान्य पदविकेसाठी प्रतिवर्षी रु. 20,000.
  • शासनमान्य पदवीत्तर पदविकेसाठी प्रतिवर्षी रु.25,000.
  • नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या दोन पाल्यांना MS-CIT शिक्षणाच्या शुल्काची प्रतिपूर्ती.

✅👉🏻 बांधकाम कामगार योजना ऑनलाइन फॉर्म

Mahabocw Scholarship Online Process/ बांधकाम कामगार शिष्यवृत्ती ऑनलाइन प्रक्रिया 

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ च्या पोर्टलवर कामगार नोंदणी केल्याच्या नंतर तुम्हाला शिष्यवृत्ती फॉर्म भरता येतो. त्यासाठी तुमच्याकडे मंडळाने दिलेला Online Registration No. 14 अंकी नंबर पाहिजे. कामगार विभागाच्या पोर्टलवर जावून Construction Worker: Aplly Online For Claim हा पर्याय निवडून Select Action मध्ये New Claim ला क्लिक करावे लागेल त्या नंतर तुम्हालार Registration No. टाकावा लागेल त्या नंतर Proceed to Form वर क्लिक करावे लागेल.

Proceed to Form वर क्लिक केल्या नंतर तुमच्या Register मोबाईल नंबर वर OTP येयील ती OTP तुम्हाला पुढील रकान्यात भरायची आहे.आणि सबमिट करायचे आहे. एवढे केल्यावर तुमच्या समोर कामगाराचा भरलेला फॉर्म open होईल. फॉर्म च्या शेवटी दोन पर्याय दिसतील योजना श्रेणी निवडा आणि योजना निवडा हे पर्याय असतील. योजना श्रेणी निवडा या मध्ये तुम्हाला शैक्षणिक कल्याण योजना हा पर्याय निवडायचा आहे. आणि योजना श्रेणी या मध्ये तुम्ही तुमच्या शिक्षणा प्रमाणे पर्याय निवडू शकता.

पर्याय निवडल्या नंतर आणि तुमचे शैक्षणिक कागदपत्रे अपलोड केल्या नंतर तुम्हाला फॉर्म सबमिट करायचा आहे.

✅👉🏻 बांधकाम कामगार स्मार्ट कार्ड/Construction Worker Smart Card

Mahabocw Scholarship Status Check: कामगार विभागाच्या शिष्यवृत्तीची स्थिती तपासा

नोंदणीकृत कामगाराचे पाल्य आणि पत्नीसाठी कामगार विभागाच्या शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेता येतो. नोंदणीकृत कामगाराच्या पाल्यासाठी कामगाराच्या Profile वर जावूनच online अर्ज करावा लागतो. कामगाराच्या मुलाच्या किंवा पत्नीच्या शिष्यवृत्तीसाठी केलेल्या अर्जाची सद्य स्थिती Mahabocw Scholarship Status Check करण्यासाठी कामगाराचे Profile Login करून Claim या पर्यायावर टच करून तुम्ही तुमच्या शिष्यवृत्ती अर्जाची सद्य स्थिती तपासू शकता.

शिष्यवृत्तीसाठी अर्ज केल्यानंतर नोंदणीकृत कामगाराच्या Register मोबाईल नंबर वर अर्जाचे अपडेट तुम्हाला पाठवले जातात. अर्ज केल्यानंतर अर्जा मध्ये काही त्रुटी असल्यास तुम्हाला मोबाईल SMS द्वारे कळवले जाते. त्रुटी असल्यास तुम्हाला ती त्रुटी 7 दिवसाच्या आत पूर्ण करून फॉर्म अपडेट करावा लागतो.

Mahabocw Scholarship Form भरण्यासाठी आणि Mahabocw Scholarship Status Check करण्यासाठी कामगार विभागाच्या Mahabocw.in या वेबसाईट ला भेट दया.

Conclusion

Mahabocw Scholarship Status Check: कामगार विभागाच्या शिष्यवृत्तीची स्थिती तपासा या लेखामध्ये आपण बांधकाम कामगार विभागाची शिष्यवृत्ती कशी Online करायची आणि Online केलेली शिष्यवृत्तीची स्थिती कशी तपासायची या बद्दल सविस्तर माहिती पहिली आहे. कामगार विभागाकडून कामगाराच्या हिताच्या अनेक कल्याणकारी योजना राबविल्या जातात. यामध्ये शैक्षणिक योजना हि कामगाराच्या मुलांच्या शिक्षणासाठी अत्यंत उपयुक्त अशी योजना आहे, जी विध्यार्थ्याच्या शिक्षणाच्या प्रत्येक टप्प्यावर प्रतिवर्षी शिष्यवृत्ती उपलब्ध करून देते. या योजनेतून रु. 2500 ते रु. 1,000,00 लक्ष पर्यंत शिष्यवृत्ती दिली जाते.

माहिती आवडली असल्यास Mahabocw Scholarship Status Check हा लेख आपल्या मित्रांना व गरजवंत विध्यार्थ्यांना शेअर करा . अशाच नवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करा. आमच्या सोशल मिडिया ग्रुप मध्ये सामील व्हा.

🔵🟣🟢 आमच्या सोशल मिडिया ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

1 thought on “Mahabocw Scholarship Status Check: कामगार विभागाच्या शिष्यवृत्तीची स्थिती तपासा”

  1. Pingback: Www Mahabocw In Renewal Online: बांधकाम कामगार ऑनलाईन रिनीवल

Comments are closed.

Scroll to Top