MAHADBT Farmer Scheme: महाराष्ट्र शासनाच्या MAHADBT पोर्टल वरून शेतकऱ्याच्या हिताच्या अनेक योजना राबविल्या जातात. शेतकऱ्याला आधुनिकतेची जोड मिळावी आणि शेतकऱ्याचे उत्पन्न वदावे या उद्देशाने शासन सदरील योजना राबवित असते. शासनाच्या MAHADBT पोर्टल वरून अनेक Farmer Scheme ( शेतकरी योजना ) शेतकरी हिताच्या आहेत, ज्या मध्ये कृषी यांत्रिकीकरण, सिंचन साधने व सुविधा, बियाणे, बियाणे औषध व खते, फलोत्पादन, सौरकुंपण इत्यादी योजना मधून शेतकऱ्यांना अनुदानावर अनेक सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. MAHADBT मार्फत बियाणे औषध व खते या योजनेच्या मार्फत शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी बियाणे उपलब्ध करून दिले जात आहे. यासाठी अर्ज कसा करायचा या बद्दल आपण माहिती पाहणार आहोत.
MAHADBT Farmer Scheme
महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांच्या हितासाठी तयार केलेल्या पोर्टल वर अनेक योजना शेतकऱ्यांसाठी राबविल्या जातात. शेतकऱ्यांना अत्याधुनिक औजारे तसेच संशोधन केलेले बियाणे आणि खते देखील पुरविली जातात. कृषी यांत्रिकीकरण योजनेतून ट्रॅक्टर आणि ट्रॅक्टर वरील औजारांवर भरीव सबसिडी दिली जाते. सिंचन साधने शेतकऱ्यांसाठी अनुदानावर उपलब्ध करून दिली जातात.
✅👉🏻 E-Shram Registration: मोबाईलवरून नोंदणी करून मिळवा ई-श्रम कार्ड
रब्बी बियाणे अनुदानासाठी असा करा अर्ज
MAHADBT पोर्टल अंतर्गत शेतकऱ्यांना संशोषण केलेली बियाणे आणि खते पुरविली जातात. सध्या महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांना रब्बीसाठी बियाणे उपलब्ध करून दिली जाणार आहेत. ज्या मध्ये हरबरा, गहू, जवस इत्यादी बियाणे आहेत. हे बियाणे शेतकऱ्यांना अनुदानावर दिली जातात. कृषी विभागाकडून अनुदानावर दिल्या जाणाऱ्या बियाणांसाठी तुम्हाला MAHADBT पोर्टल वर जाऊन अर्ज करावा लागणार आहे. अर्ज कसा करायचा ते आपण पाहू.
- सर्व प्रथम तुम्हाला MAHADBT पोर्टल वर तुमची नोंदणी करून घ्यावी लागेल.
- तुमची नोंदणी असेल तर तुम्हाला पोर्टल वर LOGIN केल्या नंतर तुम्हाला अर्ज करा याच्या वरती क्लिक करायचे आहे.
- अर्ज करा वरती क्लिक केल्या नंतर बियाणे औषध व खते या बाबी वर जायचे आहे.
- बियाणे औषध व खते या बाबी वर गेल्या नंतर ओपन होणाऱ्या पेजवर तुम्हाला बियाणांचे वाण आणि कोणते बियाणे पाहिजे हे निवडून फॉर्म सबमिट करायचा आहे.
MAHADBT नोंदणी अर्ज प्रक्रिया
MAHADBT पोर्टल वरती नोंदणी करण्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या CSC केंद्रावर किंवा आपले सरकार केंद्रावर जाऊन नोंदणी कार्याची आहे. तुमच्या कदर PC किंवा लपटॉप असल्यास तुम्ही हि नोंदणी तुमच्या घरी पण करू शकता. नवीन नोंदणी करणाऱ्या लाभार्थ्याला अर्ज कोणत्याही योजनेचा अर्ज सबमिट केल्या नंतर पोर्टल वरती शासकीय फीस भरावी लागते. ती भरल्यावर तुमचे रजिस्ट्रेशन आणि योजनेचा लाभ निश्चित होतो. एकदा फीस भरल्यावर दुसरी बाब निवडतांना फीस भरण्याची आवश्यकता नसते. आणि एका बाबी साठी अर्ज केल्यावर पुढील पाच वर्ष लाभ भेट पर्यंत नवीन अर्ज भरण्याची आवश्यकता नसते.
कागदपत्रे
- शेतकऱ्याचे ७ /१ २ आणि नमुना ८ चा उतारा.
- आधार कार्ड.
- बँक पासबुक.
- मोबाईल नंबर.
इत्यादी कागदपत्रांची आवश्यकता MAHADBT Farmer Scheme साठी नोंदणी करतांना आवश्यक असतात.
संपर्क
गावाला उपलब्ध असलेले कृषी सहायक किंवा आपल्या विभागातील तालुका कृषी अधिकारी कार्यालय येथे तुम्ही योजने संबंधीच्या माहितीसाठी अँपर्क करू शकता.
✅👉🏻 कापूस सोयाबीन अनुदान E Kyc: कापूस सोयाबीन अनुदान E Kyc करा मोबाइल वरून
Conclusion
MAHADBT Farmer Scheme: रब्बी बियाणे अनुदानासाठी असा करा अर्ज शासनाच्या MAHADBT पोर्टल अंतर्गत चालू असलेल्या रब्बी बियाणे अनुदाना योजने विषयी आपण माहिती पहिली यासाठी तुम्हाला MAHADBT पोर्टल वरती शेतकरी नोंदणी करून बियाणे मिळविण्यासाठी ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. माहिती आवडली असल्यास इतर शेतकर्यां पर्यंत अवश्य पोहचावा.
🟢🔵🟣 आमच्या सोशल मीडिया ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा.