Mahadbt Farmer Scheme List: Mahadbt शेतकरी योजना यादी

Mahadbt Farmer Scheme List: महाराष्ट्र शासनाच्या Mahadbt पोर्टल अंतर्गत फायद्याच्या अनेक योजना राबविल्या जातात. कोरडवाहू शेतकरी, अल्पभूधारक शेतकरी, अत्यल्प भूधारक शेतकरी यांच्यासाठी शासन सिंचनाच्या, तसेच आधुनिक यंत्र सामुग्री पुरविण्याच्या योजना राबविते. कोरडवाहू शेतकऱ्यांना सिंचनाचे सधन उपलब्ध व्हावे, तसेच अत्यल्पभूधारक, अल्पभूधारक शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे यासाठी शासन Mahadbt अंतर्गत विविध योजना अमलात आणत असते. शेतकऱ्यांसाठी एक पोर्टलवर सर्व योजना उपलब्श आहेत. तुम्ही योजनेसाठी एकदा अर्ज केला कि परत त्या योजनेसाठी तुम्हाला दिसरा अर्ज करण्याची गरज पडत नाही. Mahadbt मार्फत शेतकऱ्यांसाठी कोणकोणत्या योजना राबविल्या जातात याविषयी माहिती आपण पाहणार आहोत. Mahadbt वरील सर्व योजनांची यादीच आपण पाहणार आहोत. पोर्टलवर हि यादी किवा योजना कशी पहायची ते हि जाणून घेणार आहोत.Mahadbt Farmer Scheme List

Mahadbt Farmer Scheme/Mahadbt शेतकरी योजना

महाराष्ट्र शासनाने राज्यातील शेतकऱ्यांसाठी Mahadbt हे अतिशय उपुक्त असे पोर्टल चालू केले आहे. या पोर्टल अंतर्गत शेतकऱ्याला हव्या असलेल्या योजनांसाठी एकच अर्ज करता येणार आहे. एक अर्जात शेतकऱ्यांना ज्या-ज्या योजनांची आवश्यकता आहे, त्या योजनांसाठी एकदाच आर्ज करावा लागणार आहे, म्हणजेच अर्ज एक योजना अनेक अशा स्वरुपाची व्यवस्था शासनाने या पोर्टल द्वारे शेतकऱ्यांना निर्माण करून दिली आहे.

✅👉🏻 पावर टिलर सब्सिडी: पावर टिलर खरेदी करा 50% सब्सिडीवर

Mahadbt Farmer Scheme List: Mahadbt शेतकरी योजना यादी

  • अटल भुजल योजना
  •  भाऊसाहेब फंडकर फलबाग लगवड योजना
  • बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना (आदिवासी उपयोजनेबाहेर)
  • बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना (आदिवासी उपयोजना)
  • मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना
  • मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना – वैयक्तिक शेत तलाव
  • मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना 2020-2021
  • डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना
  • फलोत्पादनाच्या एकात्मिक विकासासाठी मिशन
  • NAFCC योजना
  • NFSM-तेलबिया आणि तेलपाम योजना
  • NFSM-डाळी
  • NFSM- तांदूळ
  • प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना – प्रति थेंब अधिक पीक (सूक्ष्म सिंचन घटक)
  • पर्जन्य क्षेत्र विकास कार्यक्रम
  • राष्ट्रीय कृषी विकास योजना RAFTAAR
  •  कृषी यांत्रिकीकरण योजना
  •  कांदा साठवण रचना ( RKVY )
  • शेत तलावाला प्लॅस्टिक अस्तर ( RKVY )
  •  संरक्षित लागवड ( RKVY )
  • संरक्षित लागवड 2018-19 ( RKVY )
  •  पुण्यश्लोकी अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजना 2020-21 ( RKVY )
  • हळद यांत्रिकीकरण आणि प्रक्रिया-2017-18 ( RKVY )
  •  भाजीपाला रोपवाटिका ( RKVY )
  • अनुसूचित जातींसाठी नवीन सिंचन विहिरीचे बांधकाम ( RKVY )
  • आरकेव्हीवाय एसटीसाठी नवीन सिंचन विहिरीचे बांधकाम
  • महाराष्ट्र बाजरी अभियान ( RKVY )
  • ऊस तोडणी यंत्र अनुदान ( RKVY )
  • बीज गाव योजना
  • कापूस उत्पादकता सुधारणा आणि मूल्य साखळी विकासासाठी विशेष कृती योजना
  • राज्य कृषी यांत्रिकीकरण योजना
  • कृषी यांत्रिकीकरण उप-अभियान
  • डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन वन विकास योजनेंतर्गत अनुदानित सौर कुंपण
  • भाताच्या पडीत क्षेत्रांना लक्ष्य करणे (तेलबिया)
  • तांदूळ पडीत क्षेत्रांना लक्ष्य करणे (डाळी)

वरील योजना Mahadbt पोर्टल अंतर्गत राबविल्या जातात. शेतकऱ्यांसाठी अनेक योजना पोर्टल मार्फत राबविल्या जातात.

✅👉🏻 MahaDBT Post Matric Scholarship: मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजना

Mahadbt Farmer Scheme List

How to Check Mahadbt Farmer Scheme List/Mahadbt शेतकरी योजना यादी कशी चेक करायची 

शासनाच्या mahadbt पोर्टल वरील योजनेंची माहिती पाहण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला Mahadbt पोर्टलवर लॉगीन करावे लागेल. पोर्टलवर तुमची नोंदणी पूर्ण केल्याच्या नंतर अर्ज करा वर क्लिक करताच तुमच्या समोर Mahadbt च्या सर्व योजना Open होतील. पोर्टल वरील मुख्य घटक अंतर्गत असलेल्या योजना तुन्हाला त्या मुख्ये घटकाला क्लिक करताच, फॉर्म भारतानाच्या पुढील प्रोसेस मध्ये दिसतील ज्या तुम्हाला निवडाव्या लागतील.

शेतकरी योजना मुख्य घटक

  • कृषी यांत्रिकीकरण
  • सिंचन साधने व सुविधा
  • बियाणे, औषधे व खाते
  • फलोत्पादन
  • छत्रपती शिवाजी महाराज कृषी योजना ( मागेल त्याला अंतर्गत घटक )
  • सौरकू़ंपन

वरील मुख्य घटक अंतर्गत असणाऱ्या योजना तुमी घटका समोरील तपशिला पाहू शकतात तसेच बाबी निवडा या बटनाला क्लिक करताच मुख्य घटक आणि उपघटक अशा योजना फॉर्म भरताना पाहू शकतात.

✅👉🏻 अल्पभूधारक शेतकरी योजना-Smallholder Farmers Best Scheme

How to Check Mahadbt Farmer List/Mahadbt शेतकरी यादी कशी तपासायची

Mahadbt पोर्टलवर Online अर्ज केल्या नंतर Lottery पद्धतीने तुमची निवड केली जाते. अर्ज केलेल्या लाभार्थ्यांच्या घटक योजनेनुसार Lottery पद्धत घेतली जाते. तुम्ही जर एक पेक्षा जास्त अर्ज केली असतील तर एक-एक घटक Lottery मध्ये मंजूर होऊ शकतो. तुमची योजना Lottery मध्ये मंजूर होताच तुम्हाला तुमच्या Online केलेल्या मोबाईल नंबरवर SMS द्वारे कळविले जाते. त्याच बरोबर Mahadbt च्या झालेल्या Lottery यादी मध्ये तुम्ही तुमचे नाव चेक करू शकता.

How to Check Mahadbt Lottery List /Mahadbt सोडत यादी कशी तपासायची

Mahadbt च्या Lottery मध्ये नंबर लागला असेल तर आणि एखाद्या वेळेस तुम्हाला SMS आला नसेल तर अशा वेळेस तुम्ही Mahadbt च्या पोर्टल वर जावून तुमचे नाव Lottery यादी मध्ये आहे,किंवा नाही हे चेक करू शकता. त्यासाठी तुम्हाला https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/Login या Mahadbt च्या पोर्टल वर जावे लागेल या पोर्टल वर गेल्या नंतर डाव्या बाजूने असणाऱ्या ( Lottery List) लॉटरी यादी या पर्यायाला क्लिक करावे लागेल. या पर्यायाला क्लिक करताच तुमच्या समोर Lottery Report Details या नावाचे पेज Open होईल.

Lottery Report Details हे पेज Open झाल्यावर तुम्हाला समोर दिसणाऱ्या बॉक्स मध्ये विचारलेली माहिती भरावी लागेल. सर्वप्रथम Financial Year- वर्ष, Scheme- योजना, Tile- मुख्य घटक, Manth- महिना, Disrict- जिल्हा, Taluka- तालुका, हि माहिती भरल्या नंतर तुम्हाला Search या बटनावर क्लिक करायचे आहे. Search या बटनावर क्लिक करताच तुमच्या समोर तुमच्या तालुक्याची यादी Open होईल, त्या मध्ये तुम्ही तुमचे नाव शोधू शकता.

✅👉🏻 MahaDBT Special Farmer scheme-शेतकऱ्यानसाठी वरदान

Conclusion

Mahadbt Farmer Scheme List: Mahadbt शेतकरी योजना यादी या लेखा मध्ये आपण Mahadbt पोर्टल वरील शेतकरी योजना यादी Online कशी पहायची तसेच Mahadbt सोडत यादी कशी तपासायची हे पण जाणून घेतले. Mahadbt पोर्टल हे शेतकऱ्यांसाठी वरदान असल्यासारखे पोर्टल आहे. या पोर्टल अंतर्गत बऱ्याच योजना शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी राबविल्या जातात. माहिती आवडली असल्यास शेअर करा.

🟢🔵🟣 आमच्या सोशल मिडिया ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी क्लिक करा.

Scroll to Top