MAHADBT ट्रॅक्टर योजना: ट्रॅक्टर योजनेसाठी असा करा ONLINE अर्ज

(mahadbt farmer tractor scheme) MAHADBT पोर्टल हे शेतकऱ्यांसाठी बनविलेले बहुउद्देशीय पोर्टल आहे. या पोर्टल अंतर्गत अनेक योजनांचा लाभ शेतकऱ्यांना दिला जातो. महाराष्ट्रातील कोरडवाहू,अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ घडवून आणण्यासाठी आणि शेतीला आधुनिक तंत्राद्यानाची जोड मिळवून देण्यासाठी शासनाचे MAHADBT पोर्टल प्रयत्नशील आहे. पारंपारिक पद्धतीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान आणि यंत्रसामुग्री शासनाच्या MAHADBT पोर्टल च्या कृषी यांत्रिकीकरण मार्फत उपलब्ध करून दिली जाते. कृषी यांत्रिकीकरण मार्फत शेतकऱ्यांना भरघोस अनुदानावर ट्रक्टर खरेदीसाठी अर्थसाह्य दिले जाते. mahadbt farmer tractor

MAHADBT ट्रॅक्टर योजना/ (mahadbt farmer tractor scheme)

शासनाच्या MAHADBT पोर्टल अंतर्गत शेतकऱ्यांना अनुदानावर (mahadbt farmer tractor scheme) ट्रक्टर खरेदीसाठी अर्थसाह्य दिले जाते. पोर्टल वरती जाऊन ONLINE अर्ज केल्या नंतर तुम्हाला पूर्वसंमती दिली जाते त्या नंतर तुम्ही tractor खरेदी करू शकता. tractor चे अनुदान सरळ शेतकऱ्याच्या खात्या मध्ये जमा केले जाते. ट्रक्टरसाठी सुरुवातीला एक लाख अनुदान दिले जात होते, मात्र आता वाढवून ते 50% करण्याचे शासनाच्या विचारधीन आहे.

MAHADBT पोर्टल वरून शेतकऱ्यांना एकदाच हव्या असलेल्या बाबीसाठी अर्ज करता येतो, एका अर्जात तुम्हाला एकापेक्षा अधिक बाबी निवडता येतात. एकदा अर्ज केला कि त्या बाबीचा लाभ मिळे पर्यंत परत परत अर्ज करण्याची आवश्यकता नाही.

ट्रॅक्टर योजनेसाठी असा करा ONLINE अर्ज

MAHADBT पोर्टल वरून ट्रक्टर (mahadbt farmer tractor scheme) याज्नेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला MAHADBTपोर्टल वरती नोंदणी करणे आवश्यक आहे. शेतकरी म्हणून नोंदणी केल्या नंतर तुम्ही तुम्हाला हव्या असलेल्या योजनेसाठी अर्ज करू शकता.

  • सर्वप्रथम तुम्हाला mahadbt पोर्टल वरती लॉगीन करावे लागेल, लॉगीन केल्या नंतर कृषी यांत्रिकीकरण या बाबी वर जावे लागेल.
  • मुख्य घटक या मध्ये कृषी यंत्र औजारांच्या खरेदीसाठी अर्थसाह्य या पर्यायाला निवडावे लागेल.
  • तपशील मध्ये ट्रक्टर ही बाब निवडावी लागेल.
  • व्हील ड्राइव्ह प्रकारामध्ये 2 WD/4 WD निवडावे लागेल.
  • त्या नंतर HP श्रेणी निवडावी लागेल. तुम्हाला हवी असलेली HPश्रेणी तुम्ही निवडू शकता.
  • त्या नंतर खालील चेक बॉक्स ला क्लिक करून जतन करा या पर्यायाला क्लिक करा करा.
  • तुम्हाला पुन्हा काही घटक जोडायचे असल्यास तुम्ही जोडू शकता.
  • मुख्य मेनूवर आल्या नंतर तुम्हाला अर्ज सबमिट करा या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
  • त्या नंतर तुमची फीस भरून तुम्ही पावती कडून घेवू शकता.
  • पुढील प्रोसेस नुसार लॉट्री पद्धतीत तुमची निवड होईल.
  • निवड झाल्या नंतर पूर्वसंमती मिळताच तुम्ही ट्रॅक्टर खरेदी करू शकता.

पॉवर टिलर आणि इतर औजारे

MAHADBT पोर्टल वरून ट्रॅक्टर (mahadbt farmer tractor scheme) बरोबरच तुम्ही पॉवर टिलर, ट्रॅक्टर औजारे, मनुष्य चाळीत औजारे यांच्यासाठी पण अर्ज करू शकतात. त्यासाठी वरील प्रमाणे प्रोसेस तुम्हाला करावी लागेल. पोर टिलरनी ट्रॅक्टर औजारे यांच्यावर शासन MAHADBT अंतर्गत 50% अनुदान उपलब्ध करून देते. ट्रॅक्टर औजारे खरेदीसाठी तुमच्याकडे ट्रॅक्टर असणे आवश्यक आहे.

सारांश

MAHADBT ट्रॅक्टर योजना: ट्रॅक्टर योजनेसाठी असा करा ONLINE अर्ज या लेखात आपण MAHADBT ट्रॅक्टर (mahadbt farmer tractor scheme) योजने अंतर्गत अर्ज ऑनलाइन कसा करायचा या बद्दल माहिती पहिली. महाराष्ट्र शासनाच्या MAHADBT पोर्टल अंतर्गत अनेक योजना शेतकऱ्यांसाठी राबविल्या जातात. या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन शासनाकडून करण्यात येते. माहिती आवडली असल्यास आपल्या मित्रांना शेअर करा.

हे हि वाचा :-

अशाच नवीन माहितीसाठी आमच्या सोशल मीडिया ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक ला टच करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top