MahaDBT Special Farmer scheme-शेतकऱ्यानसाठी वरदान

आपले www.pathanik.com मध्ये स्वागत आहे. mahadbt portal हा महाराष्ट्र शासनाचा एक अग्रगण्य उपक्रम असून, सामान्य नागरिकांना योजनांच्या माध्येमातून थेट लाभ मिळवून देण्यासाठी उभारलेले एक अद्वितीय व्यासपीठ आहे. आज आपण महाराष्ट्र शासनाच्या mahadbt portal विषयी व त्यातील शेतकरी योजनान विषयी सविस्तर step by step माहिती जाणून घेणार आहोत. शासन शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नती साठी व शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी वेगवेगळ्या पायाभूत सुविधा राबवत असते,अशाच प्रकारचे शेतकऱ्यांसाठी वरदान असलेले महारष्ट्र शासनाचे mahadbt portal हे एक आहे.ज्या मधून शेतकऱ्यांना एका अर्जा वर अनेक  योजनांचा लाभ घेता येतो.

अर्ज एक व योजना अनेक ‘ अशा प्रकारची व्यवस्था व्यवस्था शासनाने हया portal द्वारे शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिलेली आहे.पण बहुतांश शेतकऱ्यांना हया portal विषयी पूर्ण माहिती नसते किंवा portal च्या online prosess कशी करायची माहित नसते,त्या मुळे बरेच शेतकरी हया योजनान पासून वंचित राहतात. अर्ज कसा करायचा, बाबी कशा निवडायच्या, एक योजना निवडल्या नंतर दुसरी कशी निवडायची इत्यादी. ह्या सर्व prosess विषयी आपण पूर्ण माहिती आज पाहणार आहोत.

MahaDBT Farmer scheme-शेतकऱ्यानसाठी वरदान

 

आपण MAHADBT maharashtra gov.Farmer scheme-शेतकऱ्यानसाठी वरदान असलेले Portal वरील योजनांचा लाभ घरबसल्या आपल्या mobile phone, computer ,laptop किवा e सेवा केंद्रावरून घेवू शकतो. आणि आपल्या शेती मध्ये यांत्रिकीकरणाने उत्पन्नात भरघोस वाढ घडवून क्रांती करू शाकतोत.

शेतकरी योजना MAHADBT maharashtra gov.Farmer scheme
शेतकरी अल्पभूधारक, अत्यल्पभूधारक शेतकरी.
राज्य महाराष्ट्र
वेबसाईट https://mahadbt.maharashtra.gov.in/farmer/login/login

MahaDBT Special Farmer scheme-शेतकऱ्यानसाठी वरदान

मध्ये शासनाच्या शेतकऱ्यान साठी भरपूर योजना आहेत त्या step by step आपण इथे पाहणार आहोत. MAHADBT PORTAL वरील online proses समजून घेणार आहोत. MahaDBT Farmer scheme च्या कोणकोणत्या योजना आहेत, त्यांचा लाभ आपण कसा घेवू शकतो. एका अर्जाद्वारे किती बाबी निवडू शकतो, हे पाहणार आहोत. चला तर मग एक एक योजना समजून घेऊ.

अर्ज एक योजना अनेक

शेतकरी कोणत्याही वेळी कुठूनही MAHADBT maharashtra gov.Farmer scheme च्या portal वरून नोंदणी करून राज्य आणि केंद्र पुरस्कृत कृषी योजनेसाठी अर्ज करू शकतात. त्यासाठी आपल्या mobile phone, computer ,laptop किवा e सेवा केंद्रावरून अर्ज करता येतो. केवळ एकाच अर्जाद्वारे कृशि विभागाच्या विविध योजना मधील सर्व बाबींना अर्ज करण्याची सुविधा शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.शेतकरी बांधवानी portal वरून उपलब्ध बाबी पेकी आपल्या पसंतीच्या बाबी प्रथमतः निवडाव्यात व त्यांचा अर्जात समावेश करावा.आपल्या पसंतीच्या सर्व बाबी निवडून झाल्या नंतर अर्ज सादर करा ह्या बटनावर क्लिक करावे.

अशा प्रकारे आपण निवडलेल्या सर्व बाबीसाठी एकच अर्ज तयार होईल, व बाबीसाठी ज्या ज्या योजनेतून अर्ज केला आहे त्या योजनेतून लाभ घेता येयील.अर्ज केल्या नंतर लॉटरी प्रकीर्या होण्या पूर्वी आपण आपल्या अर्जात नवीन घटकांचा समावेश करू शकता अथवा अर्ज केलेल्या घटका पेकी एखादा घटक रद्द देखील करू शकता. अर्जाच्या online prosess साठी इथे क्लिक करा- https://mahadbt.maharashtra.gov.in/farmer/login/login

MahaDBT Special Farmer scheme-कृषी यांत्रिकीकरण योजना

महाराष्ट्र शासन MahaDBT Special Farmer scheme मार्फत शेतकऱ्यांना शेती उपयोगी असलेले विविध यंत्रसामग्री पुरवते. ह्या पोर्टल मार्फत शासन शेतकऱ्यांना ट्रॅक्टर ट्रॅक्टरला लागणारी सर्व अवजारे ह्या एका पोर्टल मार्फत उपलब्ध करून देते, तसेच स्वयंचलित यंत्र मानव चलित यंत्र व बैलावर चालणारी यंत्र MAHADBT maharashtra gov.Farmer scheme मार्फत शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिले जातात. ह्या पोर्टल द्वारे आपण वेगवेगळ्या HP पावर चे ट्रॅक्टर किंवा यांत्रिक अवजारे खरेदी करू शकतो. वेगवेगळ्या यंत्र सामग्री वर वेगवेगळे अनुदान दिले जाते. शासनाने दिलेल्या अनुदाना व्यतिरिक्त वरील लागणारा खर्च हा शेतकऱ्याला करावयाचा असतो. MahaDBT Farmer scheme-शेतकऱ्यानसाठी वरदान

कृषी यंत्र

1 ) ट्रॅक्टर :- ट्रॅक्टर ही बाब निवड करत असताना तुम्हाला वेगवेगळ्या HP चे ट्रॅक्टर निवड करता येते.

2 ) पावर टिलर.

3 ) ट्रॅक्टर/पावर टिलर चलित अवजारे.

4 ) बैलचलित यंत्र.

5 ) मनुष्य चलित यंत्र.

6 ) प्रक्रिया संच.

7 ) काढणी पश्चात तंत्रज्ञान.

8 ) फलोत्पादन यंत्र/अवजारे.

9 ) वैशिष्ट्यपूर्ण यंत्र अवजारे.

10 ) स्वयंचलित यंत्र.

भाडेतत्त्वावरील सुविधा केंद्र

1 ) कृषी अवजारे बँकेची स्थापना.

2 ) उच्च तंत्रज्ञान, उत्पादन सेवा सुविधा केंद्राची स्थापना.

वरील दोन्ही घटकांच्या खरेदी नुसार होणाऱ्या किंमतीच्या अनुषंगाने अनुदान दिले जाते.

पात्रता

1 ) आधार कार्ड.

2) 7/12 उतारा व 8 अ उतारा.

3) खरेदी करावयाच्या अवजाराचे कोटेशन व केंद्र शासनाच्या मान्यता प्राप्त तपासणी संस्थेने दिलेला तपासणी अहवाल.

4) S.C. व S.T. साठी जातीचा दाखला.

5) स्वयं घोषणा प्रमाणपत्र.

6) पूर्व संमती पत्र.

इत्यादी कागदपत्रांची पूर्तता वरील योजनेसाठी करावयाची आहे.

अन्न सुरक्षा अभियान :-अन्नधान्य, तेलबिया, ऊस व कापूस.

MahaDBT Special Farmer scheme सन 2007-2008 पासून राज्यात केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान राबविण्यात येत आहे. अकराव्या पंचवार्षिक योजनेतील अभियानाचा आढावा घेऊन बाराव्या पंचवार्षिक योजनेमध्ये सदर अभियानांतर्गत भात, गहू, करड धान्य व भरड धान्य पिकांचा समावेश करण्यात आला आहे सन 2014 ते 15 पासून 12 व्या पंचवार्षिक योजनेसाठी मार्गदर्शक सूचना नुसार या कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यात येत आहे                                                                                       

अनुदान योजना

या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना खालील बाबीवर अनुदान दिले जाते.

1) बियाणे वितरण.

2) एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन (सूक्ष्म मूलद्रव्य).

3) एकात्मिक व्यवस्थापन ( पिक संरक्षण औषधे व जैविक घटक तन नाशके ).

4) वैयक्तिक शेततळे.

5) पंप संच व पाईप.

6) विविध कृषी अवजारे.

इत्यादी बाबींना योजने अंतर्गत अनुदान दिले जाते.

MahaDBT Special Farmer scheme-केंद्र शासनाने पिक निहाय निवडलेले जिल्हे

रा.अ.सू.अ. भात:- नाशिक,पुणे,सातारा,नागपूर,भंडारा,गोंदिया,चंद्रपूर व गडचिरोली गडचिरोली इत्यादी आठ जिल्हे.

रा.अ.सू.अ.गहू :- सोलापूर,बीड,नागपूर हे तीन जिल्हे.

रा.अ.सू.अ. कडधान्य :-सर्व जिल्हे.

रा.अ.सू.अ.भरड धान्य :-सांगली,अहमदनगर,औरंगाबाद,जालना,नाशिक,धुळे व जळगाव हे सात जिल्हे.

रा.अ.सू.अ. पौष्टिक तृणधान्य:- ज्वारी,बाजरी,रागी असे या योजनेसाठी एकूण 36 जिल्हे आहेत.

अ) ज्वारी :-नाशिक,धुळे,औरंगाबाद,नंदुरबार,जळगाव,अहमदनगर,पुणे,सोलापूर,सातारा,सांगली,कोल्हापूर,बीड,जालना,लातूर,उस्मानाबाद, नांदेड,परभणी,हिंगोली,अकोला,वाशिम,अमरावती व यवतमाळ असे एकूण 23 जिल्हे आहेत.

ब) बाजरी :- नाशिक,धुळे,जळगाव,अहमदनगर,पुणे,सातारा,सांगली,औरंगाबाद,बीड,जालना व उस्मानाबाद असे एकूण 11 जिल्हे आहेत.

क) रागी :- नाशिक,पुणे,सातारा,कोल्हापूर,ठाणे,पालघर,रायगड व रत्नागिरी असे एकूण सात जिल्हे.

ड) कापूस :- (अमरावती विभाग )-बुलढाणा,अकोला,अमरावती,वाशिम,यवतमाळ ( नागपूर)- वर्धा,नागपूर,चंद्रपूर.

ई) ऊस ;- औरंगाबाद,जालना,बीड,लातूर,उस्मानाबाद,नांदेड,परभणी,हिंगोली.

जर शेतकरी तांदूळ गहू डाळी कापूस ऊस यांच्या अंतर्गत येत असलेल्या कोणत्याही घटकासाठी अर्ज करीत असेल तर वरील दिलेले जिल्हे त्या घटकासाठी अनिवार्य राहतील.

कागदपत्रे

1) सातबारा प्रमाणपत्र.

2) आठ अ उतारा.

3) उपकरणाचे कोटेशन.

4) केंद्र शासनाच्या मान्यताप्राप्त एजन्सीचे चाचणी प्रमाणपत्र पंप घटकासाठी.

5) S.C. व S.T. साठी जातप्रमाणपत्र आवश्यक आहे.

6) हमीपत्र.

7) पूर्वसंमती पत्र.

इत्यादी कागदपत्र आपल्याला वरील योजनेसाठी लागणार आहेत.

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान

MahaDBT Special Farmer scheme सन 2005-06 सन फलोत्पादन क्षेत्राच्या सर्व कश विकासासाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय फलोत्पादन या महत्वकांक्षी अभियानाची सुरुवात केली. ह्या काळामध्ये देशातील फलोत्पादन क्षेत्राचे उत्पादन दुप्पट करणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. यासाठी गुणवत्तापूर्ण लागवड साहित्य निर्माण करणे, नवीन फळबागांची लागवड करणे, जुन्या फळबागांचे पुनर्जीवन करणे, सामूहिक शेततळ्याच्या माध्यमातून सिंचन क्षमता वाढविणे, हरितगृह शेडनेट हाऊस मध्ये नियंत्रित करणे. एकात्मिक अन्नद्रव्य व एकात्मिक कीड व्यवस्थापन, सेंद्रिय शेती, मनुष्यबळ विकास, काढणीनंतर व्यवस्थापन या बाबीसाठी अर्थसाह्य या योजनेअंतर्गत देण्यात येते.

अभियानाचे उद्दिष्टे

1) वैशिष्ट्यपूर्ण कृषी हवामान विभागानुसार प्रादेशिक अनुकूलता व गरजा लक्षात घेऊन, त्या त्या प्रदेशातील फलोत्पादन क्षेत्राचा संशोधन तंत्रज्ञान प्रसार करणे, पश्चात तंत्रज्ञान सुविधा यांच्या माध्यमातून समूह पद्धतीने सर्वांगीण विकास करणे.

2) शेतकऱ्यांना एकत्र करून शेतकऱ्यांचे गट निर्माण करणे व शेतकऱ्यांचे आर्थिक राहणीमान उंचावणे.

3) अस्तित्वात फलोत्पादन विषयक विविध योजनांमध्ये समन्वय साधून एकरूपता आणणे.

4) पारंपारिक उत्पादन पद्धतीची नवीन तंत्रज्ञानाशी सांगड घालून तंत्रज्ञानाचा विकास व प्रसार करणे.

5) कुशल व कुशल विशेषतः बेरोजगार तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देणे हा या मागचा उद्देश आहे.

खालील घटकांचा लाभ या योजनेअंतर्गत शेतकरी घेऊ शकतात

1) उच्च तंत्रज्ञान रोपवाटिका ची स्थापना करणे.

2) उतीसंवर्धन प्रयोगशाळा बळकटीकरण व पुनर्जीवन करणे.

3) नवीन उक्ती संवर्धन प्रयोगशाळा स्थापन करणे.

4) भाजीपाला विकास कार्यक्रम.

5) गुणवत्ता पूर्ण लागवड साहित्य आयात करणे.

6) भाजीपाला, बियाणे प्रक्रिया, पॅकिंग, साठवण इत्यादी पायाभूत सुविधा निर्माण करणे.

7) नवीन बागांची स्थापना करणे.

8) फलोत्पादन यांत्रिकीकरण.

9) आळिंबी उत्पादन, पुष्प उत्पादन.

10) मसाला पिके लागवड.

11) जुन्या फळबागांचे पुनर्जीवन करून उत्पादनात वाढ करणे.

12) नियंत्रित शेती घटक:- हरितगृह, शेडनेट हाऊस, पक्षी रोधक जाळी, प्लास्टिक अच्छादन, प्लास्टिक टनेल इत्यादी घटक.

13) सेंद्रिय शेती.

15) परंपरागीकरणासाठी मधुमक्षिका पालन.

16) एकात्मिक काढणी पश्चात व्यवस्थापन:- प्याक हाऊस, पूर्व शीतकरण गृह, शीतगृह, शीत वाहन, फिरते प्रक्रिया केंद्र, कांदा चाळ इत्यादि.

17) फलोत्पादन पिकासाठी पण सुविधा स्थापन करणे.

18) सामूहिक शेततळे, वैयक्तिक शेततळे, शेततळे अस्तरीकरण इत्यादी अनुदान या योजनेअंतर्गत दिले जातात.

पात्रता

1) आधार कार्ड.

2) 7/12 उतारा व 8 अ उतारा.

3) S.C. व S.T. साठी जात प्रमाण पत्र आवश्यक.

4) शेतकरी/शेतकरी समूहाकडे फलोत्पादन पिके असणे आवश्यक आहे.

5) लाभार्थ्याने शेततळे अस्तरीकरण साठी अधिकृत 500 मायक्रोनची प्लास्टिक फिल्म वापरणे बंधनकारक राहील.

6) सामूहिक शेततळे घटकाचा लाभ हा शेतकरी समूहा साठी आहे, समूहात दोन किंवा अधिक शेतकरी असावेत, शेतकरी संयुक्त कुटुंबातील नसावेत, शेतकऱ्याचे सातबारा उतारे स्वतंत्र असावेत.

7) शेततळ्यातील पाणी वापरण्यासाठी सूक्ष्म सिंचन पद्धतीचा वापर करणे आवश्यक आहे.

8) सामूहिक शेततळ्यासाठी नानाजी देशमुख प्रकल्पातील सर्व जिल्हे पात्र राहतील.

9) सामूहिक शेततळ्यासाठी एसी व एसटी संवर्गातील अर्जदार सर्व जिल्ह्यात पात्र राहतील.

कागदपत्रे

1) 7/12 उतारा व 8 अ उतारा.

2) S.C. व S.T. साठी जात प्रमाणपत्र आवश्यक आहे.

3) खरेदी करण्याचे साधन/उपकरण यांचे कोतेशन किंवा बिल असणे आवश्यक.

सिंचन साधने व सुविधा

ठिबक सिंचन

MahaDBT Special Farmer scheme-शेतकऱ्यानसाठी वरदान portal मध्ये प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना अंतर्गत ठिबक सिंचन योजना राबविली जाते. प्रती थेंब अधिक पीक या उक्ती प्रमाणे पिकांच्या झाडाच्या मुळाशी लहानशा नळी द्वारे थेंब थेंब पानी आधुनिक पद्धत म्हणजे ठिबक सिंचन. या पद्धतीत जमिनीत पानी जिरवण्याचा जो वेग असतो ,त्यापेक्षा कमी वेगाने पिकस पानी दिले जाते. मुख्यत्वे करून पानी थेंबा थेंबा ने दिले जाते. ठिबक सिंचनात महाराष्ट्र अग्रेसर असून संपूर्ण भारताच्या 60% ठिबक सिंचन एकट्या महाराष्ट्रात केले जाते.

तुषार सिंचन

हे एक असे साधन आहे जे शेती पिके,लॉन्स आणि इतर भागात वापरले जाते. शेती मध्ये विशेषतः कमी पाण्यात पिकांच्या वाढीसाठी , व पावसाच्या पडलेल्या खंडात पिकाला जीवदान देण्यासाठी तुषार चा वापर केला जातो. कमी पाण्यात उत्पादन घेणाऱ्यासाठी तुषार सिंचन वरदान साबीत होत आहे.

अनुदान

केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनानुसार सदर योजने अंतर्गत देय असलेले अनुदान खालील प्रमाणे आहे.

1) अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी -55%

2) इतर शेतकरी 45%

MahaDBT Special Farmer scheme ह्या portal वरुण वरील प्रमाणे अनुदानाची रक्कम शेतकाऱ्याच्या खात्यात जमा होते.

पात्रता

1) 7/12 उतारा व 8 अ उतारा.

2) वीज बिल.

3) खरेदी केलेल्या संचाचे बिल.

4) पूर्व संमती.

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना.

MahaDBT Special Farmer scheme Portal वर महाराष्ट्र शासनाने सन 2018-19 पासून राज्यात भाऊसाहेब फुनडकर फळबाग लागवड योजना नव्याने सुरू केली आहे. या योजने अंतर्गत केंद्र शासनाच्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत जे लाभार्थी फळबाग लागवड बाबीचा लाभ गहेवू शकत नाही,त्या शेतकाऱ्याना लाभ देण्यात येणार आहे. सदर योजना शासनाच्या कृषि विभागा मार्फत MahaDBT Special Farmer scheme Portal द्वारे राबविली जात आहे.

MahaDBT Special Farmer scheme -शेतकऱ्यानसाठी वरदान Portal योजनेत भाग घेणाऱ्या शेतकाऱ्याना मंजूर अनुदान पहिल्या वर्षी 50% ,दुसऱ्या वर्षी 30%, आणि तिसऱ्या वर्षी 20% आशा तीन वर्षात देण्यात येणार असून ,लाभार्थी शेतकाऱ्याने दुसऱ्या व तिसऱ्या वर्षीच्या अनुदानाचा लाभ घेण्यासाठी लागवड झाडांचे जीविताचे प्रमाण बागायती झाडासाठी 90% तर कोरडवाहू झाडसाठी 80% ठेवणे आवश्यक आहे. हे प्रमाण कमी झाल्यास शेतकाऱ्याने स्व: खर्चाने झाडे आणून पुनः जीवंत झाडाचे प्रमाण विहित केल्या प्रमाणे राखणे आवश्यक आहे.

MahaDBT Farmer scheme-शेतकऱ्यानसाठी वरदान Portal योजनेत भाग घेण्यासाठी शेतकरी कोकण विभागात कमीत कमी 10 घुंठे तर जास्तीत जास्त 10 हे. आणि इतर भागात कमीत कमी 20 घुंठे व जास्तीत जास्त 6 हे. क्षेत्र मर्यादेत लाभ घेवू शकतात.अल्प,अत्यल्प भूधारक,महिला आणि दिव्यांग शेतकाऱ्याना या योजनेत प्राधान्य आहे.

अनुदान

MahaDBT Farmer scheme-शेतकऱ्यानसाठी वरदान Portal च्या योजने अंतर्गत लाभयार्थ्याला ठिबकसिंचन संचाच्या उभारणी करीता 100% अनुदान दिले जाते. तसेच सर्व प्रवर्गा अंतर्गत ज्या शेतकऱ्यांची उपजीविका केवळ शेती वर अवलंबून आहे,आशा शेतकाऱ्याना प्रथम प्राधान्य दिले जाते.

पात्रता

1)लाभयार्थ्याना फळबाग लागवडीसाठी ठिबकसिंचन बसवणे आवश्यक आहे.

2) व्यक्तीक शेतकाऱ्याना लाभ दिला जातो,संस्थात्मक लाभरतींना लाभ दिल जात नाही.

3) शेतकाऱ्याच्या नवे 7/12 असणे आवश्यक आहे, संयुक्त मालकी असल्यास बाकी खाते दाराची संमती असणे आवश्यक आहे.

4) परंपरागत वन निवासी ( वन अधिकार मान्यता ) अधिनियम 2006 नुसार वनपट्टे धारक शेतकरी लाभ घेण्यास पात्र आहे.

5) इतर शासकीय योनेतून फळबाग लागवड केली असल्यास ते क्षेत्र वगळून वरील विभागानुसारच्या क्षेत्र मर्यादेत शेतकाऱ्यास लाभ घेता येईल.

कागदपत्रे

  1. 7/12 व 8 अ प्रमाणपत्र .

2. संयुक्त खातेदार असल्यास सर्व खातेदाराचे संमती पत्र आवश्यक.

3. S.C. व S.T. साठी जात प्रमाणपत्र आवश्यक आहे.

NOTE

MahaDBT Farmer scheme-शेतकऱ्यानसाठी वरदान Portal वरील  सर्व योजनान साठी आधार कार्ड, बँकेचे पासबूक, सातबारा व 8 अ प्रमाणपत्र अवश्यक आहे. कागदपत्र आपलोड करताना मूळ कागदपत्र आपलोड करावीत झेरॉक्स करू नयेत.

conclusion

 ह्या लेखामध्ये MahaDBT PORTAL वरील सर्व शेतकरी योजनांची माहिती अगदी सविस्तर दिलेली आहे. आपण वरील माहिती नुसार step prosess folo करून घरी बसल्या वरील योजनांचा लाभ आपण घेवू शकता, आपल्या mobile phone, computer ,laptop वरुण किंवा e सेवा केंद्रा वरुण नोंदणी करू शकता.

FAQ

1) Mahadbt farmer list

= mahadbt चे फोल्डर open केल्या नंतर मुख्य पृष्ठ वर बाबी मंजूर झालेल्या शेतकऱ्यांची यादी जाहीर करण्यात येते.

2) Mahadbt scholarship

= MAHADBT.maharashtra.gov. च्या पोर्टल वर शेतकरी योजना बरोबरच विध्यार्थी यांच्या साठी महाराष्ट्र शासनाकडून scholership दिली जाते. त्या साठी ऑनलाइन पद्धतीने लाभ घेता येतो.

3) mahadbt फरमेर scheme 2023

= वरील blog मध्ये शेतकरी योजनान साठी चालू वर्ष 2023 च्या पूर्ण योजनांचा तपशील दिला आहे.

4) mahadbt portal

= वरील लेखा मध्ये mahadbt portal ची लिंक दिलेली आहे. तेथून तुम्ही नोंदणी करू शकता.

5) mahadbt farmer tractor

👉MahaDBT Special Farmer scheme-शेतकऱ्यानसाठी वरदान असलेले Portal आहे ह्या पोर्टल वरुण कृषि यांत्रिकीकरण योजने अंतर्गत आपण tractor चा लाभ घेवू शकता. वरील लेखात त्या विषयी परिपूर्ण माहिती दिलेली आहे.

👉राष्ट्रीय कृषि विकास योजनेअंतर्गत परंपरागत कृषि विकास योजना सन 2023-24 (RKVY)

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
Scroll to Top