Maratha Aarakshan: शासन हैदराबाद गॅझेट लागू करणार

१ ९ ८ ० पासून महाराष्ट्रभर गाजत असलेला मुद्दा म्हणजे Maratha Aarakshan. सर्वप्रथम या लढ्याला सुरुवात हि माथाडी कामगार नेते स्व. आण्णासाहेब पाटील यांनी केली. तेंव्हा पासून ते आज पर्यंत मराठा आरक्षणाची मागणी सतत महाराष्ट्रात केली जात आहे. अनेक सामाजिक संघटना आणि नेत्यांनी ही मागणी लावून धरलेली आहे. मराठवाड्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी अनेक मोर्चे शांतीपूर्ण मार्गाने काढण्यात आले आहेत. मात्र मागील एक वर्षांपासून हा मुद्दा मराठा आरक्षण लढ्याचे नेते जरांगे पाटील यांच्या द्वारे अधिक प्रखरतेने उचलण्यात आला. आता मात्र या लढ्याला यश येताना दिसत आहे, कारण महाराष्ट्र शासन मराठा आरक्षणाविषयी लवकरच मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. खालील BLOG मध्ये आपण सविस्तर माहिती पाहू.Maratha Aarakshan

Maratha Aarakshan/ मराठा आरक्षण

स्व. अण्णासाहेब पाटील यांनी सर्वप्रथम १ ९ ८ ०  मध्ये मराठा आरक्षणाची मागणी केली होती. मध्येंतरीच्या काळात अनेक सरकारे आली आणि गेली पण हा मुद्दा कायम राहिला. मराठा आरक्षण विषयी मुद्दा सोडविण्यासाठी १ ) सराफ आयोग २ ० ० ९  २ ) राणे समिती २ ० १ ४ समित्याही स्थापन करण्यात आल्या होत्या पण या समित्यांच्या माध्यमातून ही मराठा आरक्षणाचा तिढा सुटला नाही.

१ ) सराफ आयोग २००९

२ ० ० ९  मध्ये तत्कालीन सरकारने मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर अभ्यास करण्यासाठी सराफ अयोग्य स्थापन करण्यात आला, या आयोगाला मराठा समाजाच्या शैक्षणिक, आर्थिक आणि सामाजिक स्थितीचा अभ्यास करून मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आवश्यक असलेल्या बाबींची माहिती गोळा करून त्याचा अहवाल शासनाला सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते.

पुढे सराफ आयोगाचा अभ्यास करून मराठा समाजाला आरक्षणाची गरज असल्याचे स्पष्ट झाले.

२ ) राणे समिती २०१४

आघाडी सरकार असतांना मराठा आरक्षणाच्या मुद्दयांवर तोडगा काढण्यासाठी नारायण राणे यांच्या अध्यक्षतेखाली राणे समिती स्थापन करण्यात अली होती. मराठा समाजाच्या सामाजिक आणि आर्थिक स्थितीचा अभ्यास करून अहवाल शासनाला सादर करण्याची जिम्मेदारी सदरील समितीवर होती.

समितीने मराठा समाजाच्या मागासलेपणाबाबत अभ्यास केला आणि विविध क्षेत्रामध्ये मराठा समाजाची स्थिती कमजोर असल्याचे नमूद केले. मराठा समाज शैक्षणिक आणि आर्थिक दृष्ट्या मागासलेला आहे आणि मराठा समाजाला आरक्षणाची गरज असल्याची शिफारस अहवालात करण्यात आली. पुढे या अहवालाच्या आधारे मराठा समाजाला १ ६ % आणि मुस्लिम समाजाला ४ % आरक्षण देण्यात आले होते, मात्र न्यायालयात ते टिकले नाही.

✅👉🏻 पंतप्रधान रोजगार निर्मिती अंतर्गत येणाऱ्या उद्योगांची यादी: PMEGP उद्योग लिस्ट

मराठा आरक्षण नेते जरांगे पाटील यांचे आंदोलन

जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी या छोट्याशा गावातून मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांनी आपल्या उपोषणाद्वारे २ ९ /० ८ /२ ० २ ३ पासून मोठे आंदोलन सुरु केले. मराठा समाजाला OBC प्रवर्गातून आरक्षण मिळावे या प्रमुख मागणीद्वारे त्यांनी आपल्या आंदोलनातून संपूर्ण मराठवाडा पिंजून काढला. जरांगे पाटील यांच्या माघे प्रथमच आरक्षणाच्या मागणीसाठी  संपूर्ण मराठा समाज पूर्ण ताकदीने उभा राहिला.Maratha Aarakshan

सुरुवातीला काना डोळा करणाऱ्या सरकारला नंतर मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला गांभीर्याने घ्यावे लागले. मराठा आरक्षण नेते जरांगे पाटील यांची हैदराबाद गॅझेट, सातारा गॅझेट आणि सगे-सोयरे लागू करा अशा प्रमुख मागणीसह मराठा समाजाला सरसकट OBC प्रवर्गातून आरक्षण मिळावे अशी भूमिका आहे.

Maratha Aarakshan: शासन हैदराबाद गॅझेट लागू करणार

मराठा आरक्षण नेते जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात झालेल्या Maratha Aarakshan आंदोलनाची दखल घेत शासन मराठा आरक्षण विषयी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. आंदोलन कर्त्यांच्या मागणी नुसार शासन हैदराबाद गॅझेट लागू करण्याच्या तयारीत आहे. येत्या २ ५  ते ३ ०  सप्टेंबर दरम्यान विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवून हैदराबाद गॅझेट लागू करण्या संबंधी मान्यता घेणार असल्याचे संकेत आहेत.

हैदराबाद गॅझेट मधील असलेल्या मराठा समाजाच्या कुणबी नोंदी च्या आधारे, मराठा समाजाला OBC प्रवर्गात समाविष्ट करण्याचे मार्ग मोकळे होतात. या अगोदर ही ज्यांच्या ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या त्यांना OBC प्रवर्गाचा लाभ मिळत आहे.

✅👉🏻 अण्णासाहेब पाटील कर्ज योजना: Annasaheb Patil Loan Apply Online

हैदराबाद गॅझेट

निजाम कालीन दस्तावेज असलेल्या हैदराबाद गॅझेट मध्ये मराठा समाजाच्या कुणबी म्हणून नोंदी आहेत. निजाम काळात शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना कुणबी म्हणून संबोधल्या जायचे. ज्यांच्याकडे शेती होती, त्यांच्या ७ /१ २  उताऱ्यावर त्यांच्या नावापुढे कुणबी असा उल्लेख असायचा. महाराष्ट्रात कुणबी असणाऱ्या मराठा समाजाला अगोदर पासूनच  OBC प्रवर्गाचा लाभ मिळत आहे.

Conclusion

Maratha Aarakshan: शासन हैदराबाद गॅझेट लागू करणार मराठा आरक्षणसाठी झालेल्या प्रदीर्घ आंदोलना नंतर शासन मराठा आरक्षण विषयी ठोस निर्णय घेऊन हैदराबाद गॅझेट लागू करण्याच्या तयारीत आहे. हैदराबाद गॅझेट मध्ये असलेल्या कुणबी नोंदीच्या आधारे मराठा समाजाला OBC  प्रवर्गाचा लाभ मिळणार आहे.

आमच्या सोशल मीडिया ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा.

Scroll to Top