Construction Workers Educational Welfare Scheme Mbocww Scholarship नमस्कार मित्रांनो आपले pathanik.com हया blog मध्ये स्वागत आहे. ह्या लेखा मद्य आपण बांधकाम कामगार शिष्यवृत्ती योजना काय आहे, ही योजना कोना साठी आहे हे पाहणार आहोत. आज च्या काळात वेगवेगळ्या शिष्यवृत्ती योजना शासना कडून विध्यार्थांच्या उज्वल भविष्यासाठी दिल्या जातात. आपल्या देशात खूप मोठा अकुशल कामगार वर्ग आहे, जो असंघटित स्वरूपात प्रत्यक क्षेत्रात विखुरलेला आपल्याला दिसतो. महाराष्ट्र शासनाने 1996 च्या कायद्याच्या तरतुदी नुसार वेगवेगळ्या योजना हया असंघटित कामगार वर्गा साठी रबविण्यास सुरुवात केलेली आहे. त्या मधूनच एक म्हणजे कामगारांच्या मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे म्हणून कामगार कल्याण मंडळा मार्फत शिष्यवृत्ती योजना राबविली जाते. कामगारासाठी, त्यांच्या मुलांसाठी शासन शिक्षणाच्या वेगवेगळ्या इयत्तेसाठी शिष्यवृत्ती उपलब्ध करून देते.
ह्या योजनेचा लाभ कोन-कोन घेवू शकतो. त्या साठी लागणारी कागदपत्रे कोणती आहेत, या योजनेची पात्रता काय आहे, शिक्षण घेतांना कोणत्या वर्गा पासून आपण ह्या योजनेचा लाभ घेऊ शकतो. कोणत्या वर्गाला किती शिष्यवृत्ती विध्यार्थ्यांना मिळू शकते. हे सविस्तर जाणून घेणार आहोत.
मी आपल्याला ह्या लेखा मधून घेण्या साठी कोणत्या site वर जायचं Construction Workers Educational Welfare Scheme-बांधकाम कामगार शिष्यवृत्ती योजना अर्ज कसा करायचा हया विषयी step by step माहिती घेणार आहोत.
Mbocww Scholarship: बांधकाम कामगार शिष्यवृत्ती योजना
महाराष्ट्र शासनाने इमारत बांधकाम कामगार यांच्या सामाजिक, आर्थिक व आरोग्य विषयीचे जीवनमान उंचावण्यासाठी इमारत व इतर बांधकाम कामगार मंडळाची स्थापना केली. बांधकाम व इतर कामगार हे असंघटित कामगार वर्गात येतात. कामगारांच्या रोजगार व सेवशर्तीचे नियमन करण्याच्या उद्देशाने तसेच शिक्षण, आरोग्य व कल्यानासाठीच्या उपाय योजना करण्याच्या उद्देशाने भारत सरकारने इमारत व इतर बांधकाम कामगार कायदा 1996 तरतूद केली आहे. ह्याच कायद्या अंतर्गत राज्य शासनाने महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाची स्थापना केली आहे.बांधकाम कामगार शिष्यवृत्ती योजना हि योजना कामगारांच्या पत्नी आणि मुलांसाठी कामगार विभागाकडून राबविली जाते. शिक्षण गेणाऱ्या पत्नी आणि दोन मुलासाठी मंडळ शिष्यवृत्ती देते. शिक्षणाच्या प्रत्यक वर्गाला आणि व्यावसायिक शिक्षणाच्या प्रत्येक शाखेला/डिग्रीला वेगवेगळी रक्कम शिष्यवृत्ती दिली जाते.
बांधकाम कामगार म्हणून बोर्डा कडे नोंदणी
बांधकाम कामगार शिष्यवृत्ती योजने चा लाभ घेण्यासाठी. महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ च्या online Official site mahabocw. in वर जावून तुम्ही कामगार म्हणून onlin नोंदणी करू शकता. नोंदणी केल्या नंतर तुम्हाला मंडळा कडून 14 अंकी नोंदणी क्रमांक मिळतो. एकदा नोंदणी क्रमांक मिळाला की, तुम्ही कल्याणकारी मंडळाच्या सामाजिक सुरक्षा, आरोग्य विषयीच्या व शेषणीक योजनांचा लाभ घेवू शकता. नोंदणी साठी खालील पात्रता व कागद पत्रांची आवश्यकता असते.
बांधकाम कामगार म्हणून नोंदणीची पात्रता
Mbocww Scholarship: बांधकाम कामगार शिष्यवृत्ती योजनाचा लाभ घेण्यासाठी खालील पात्रता आवश्यक आहे.
- 1 ) लाभार्थी इमारत बांधकाम कामगार म्हणून कार्यरत असावा.
- 2 ) लाभयार्थ्याची इमारत बांधकाम कामगार म्हणून नोंद ग्रामपंचायत,नगरपालिका किंवा महानगरपालिका येथे केलेली असावी.
- 3 ) ज्या विकसकाकडे कामगार म्हणून त्याच्या कडे ही नोंद असावी.
कागदपत्रे
1 ) आधारकार्ड
2 ) बँक पासबूक
3 ) दोन पासपोर्ट साईज फोटो
4 ) राशन कार्ड
5 ) बांधकाम कामगार म्हणून काम केल्याचे संबंदीत अधिकार्याचे 90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र
बांधकाम कामगार शिष्यवृत्ती योजना नवीन नोंदणी तुम्ही online पद्धतीने महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या खालील official site वर जावून करू शकता.
Mbocww Scholarship: बांधकाम कामगार शिष्यवृत्ती योजना
Mbocww Scholarship: बांधकाम कामगार शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेण्यासाठी.महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या official site वर जाऊन आपण आपल्या दोन पाल्यासाठी व पत्नी साठी हया योजनेचा लाभ घेवू शकता. शिक्षणाच्या वेगवेगळ्या इयत्तेत आणि शाखेत वेगवेगळी शिष्यवृत्ती मिळते. 2500 पासून ते 1,0,0000 लक्ष पर्यन्त शिष्यवृत्ती या योजनेतून घेता येते.
ऑनलाइन अर्ज कसा करायचा
शासनाच्या महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या Official site वर जाऊन बांधकाम कामगार दाव्यासाठी अर्ज करा हया बाटणाला क्लिक केल्यानंतर New Claim या opstion वर गेल्यानंतर तुमचा Registrestion No. टाकायचा व proceed to form क्लिक करायचे. https://iwbms.mahabocw.in/claim-management/claim-main-form
- proceed to form ला क्लिक केल्या नंतर तुमच्या Registred मोबाइल no. वर Otp येईल ती तुम्हाला portal च्या रकण्यात प्रविष्ट करायची आहे.
- त्या नंतर तुमच्या समोर WELFARE SCHEMES / कल्याणकारी योजना योजनेचा फॉर्म open होईल त्या फॉर्म वर तुमचा नोंदणी क्रमांक व इतर भरलेली माहिती असेल.
- फॉर्म open झाल्या नंतर Select Scheme Category / योजना श्रेणी निवडा वर जावून Educastinal Welfare Scheme/शैक्षणिक कल्याण योजना निवडायची आहे.
Mbocww scholarship / शैक्षणिक कल्याण योजना
E01 – नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या पहिल्या २ पाल्यांना १ ली ते ७ वी साठी प्रतिवर्षी रु.२५०० व ८ वी ते १० वी साठी प्रतिवर्षी रु.५००० दिले जातात. |
E02 – नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या पहिल्या २ पाल्यांना इयत्ता १० वी १२ वी मध्ये ५०% किंवा अधिक गुण मिळाल्यास रु.१०,००० दिले जातात. |
E03 – नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या पहिल्या २ पाल्यांना इयत्ता १० वी व १२ वी मध्य शिक्षनासाठी प्रतिवर्षी रु. १०,००० दिले जातात. |
E04 – नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या पहिल्या २ पाल्य व पत्नीस पदवीच्या प्रथम,द्वितीय,व त्रितीय वर्षाच्या शैक्षणिक खर्चासाठी प्रतिवर्षी रु.२०,००० दिले जातात. |
E05 – नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या पहिल्या २ पाल्य व पत्नीस वेद्येकीय पदवी अभ्यासक्रमा करिता प्रतिवर्षी रु. १,०,०००० लक्ष रुपये व अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमा करिता रु.६०,००० दिले जातात. |
E06 – नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या पहिल्या २ पाल्यांना शासनमान्य पद्विकेकरिता प्रतिवर्षी रु. २०,००० व पदयुतर पद्विकेकरिता रु. २५,००० प्रतिवर्षी दिले जातात. |
E07 – नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या पहिल्या २ पाल्यांना संगणकाचे शिक्षन MS-CIT करिता शुल्क प्रतिपूर्ती दिली जाते. |
Mbocww Scholarship Offline Process
बांधकाम कामगार शिष्यवृत्ती योजनेच्या Offline Prosess साठी खालील लिंक वरून आपल्या शिक्षनाच्या इयत्ते नुसार वरील फोर्मेट प्रमाणे फॉर्म Download करावा, आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी समन्धित कार्यलायला जमा करावा. फॉर्म Download करण्यासाठी official site वर क्लिक करा. https://mahabocw.in/download/
Mbocww Scholarship: बांधकाम कामगार शिष्यवृत्ती योजना पात्रता व कागदपत्रे
बांधकाम कामगार शिष्यवृत्ती योजने साठी आवश्यक असलेली पात्रता व कागदपत्रे खालील प्रमाणे आहेत.
1 ) लाभार्थी हा नोंदणीकृत बांधकाम कामगार याचा पाल्य, पत्नी किंवा स्वतः असावा.
2 ) लाभार्थी आधार कार्ड.
3 ) लाभार्थ्याचे विध्यालायाचे/महाविध्यालायाचे ओळखपत्र.
4 ) लाभार्थ्याचे विध्यालायाचे/महाविध्यालायाचे बोनाफाईट .
5 ) लाभार्थ्याचे विध्यालायाचे/महाविध्यालायाचे e mail व संपर्क क्रमांक असावा.
6 ) लाभार्थी पाल्य असेल तर नोंदणीकृत पालकाचे स्वंय घोषणापत्र, स्वतः असेल तर स्वतः चे स्वंय घोषणापत्र.
7) कुटुंबाचे राशन कार्ड.
8 ) लाभार्थ्याची शालेय इयत्तेची गुणपत्रिका ( marcmemo ).
Note -Mbocww Scholarship-बांधकाम कामगार शिष्यवृत्ती योजने साठी सर्व कागदपत्रे Online aplod करताना मूळ कागदपत्रे असावीत, आणि शक्य तोवर फॉर्म Online Prosess नेच भरावा.
Conclusion
Mbocww Scholarship: बांधकाम कामगार शिष्यवृत्ती योजना सदरील लेखा मध्ये बांधकाम कामगार शिष्यवृत्ती योजने विषयी सविस्तर माहिती आपण पहिली. आपल्या mobile द्वारे किंवा PC च्या साह्याने अर्ज करून सदरील योजनेचा लाभ घेवू शकता. बांधकाम कामगारासाठी अत्यंत उपयोगी असलेली योजना आहे. माहिती आवडली असल्यास आपल्या मित्रान पर्यंत अवश्य पाठवा. subscribe करायला विसरू नका.