आता मेरा राशन मोबाईल ॲपच्या साह्याने करता येणार रेशन कार्ड नवीन नाव नोंदणी

Mera Ration App 2.0: रेशन कार्ड हे आपल्याला प्रत्येक शासकीय पुराव्यासाठी आवश्यक असलेले महत्वाचे दस्तावेज आहे. शासकीय कामात आणि योजना मध्ये रेशन कार्ड हे तुमच्या वास्तव्याचा पुरावा गृहीत धरला जातो, तसेच कुटुंब सदस्याच्या पुराव्यासाठी पण रेशन कार्ड पुरावा म्हणून गणला जातो. भारतातील प्रत्येक नागरिकाकडे रेशन कार्ड असणे अनिवार्य आहे. डिजिटल युगात अनेक सेवा बरोबरच शासनाने रेशन कार्ड धारकासाठी  Mera Ration App 2.0 हे ॲप उपलब्ध करून दिले आहे.Mera Ration App 2.0

रेशन कार्ड नवीन नाव नोंदणी

आज प्रत्येक कुटुंबाकडे रेशन कार्ड आढळते, रेशन कार्ड मध्ये कुटुंबातील प्रत्येक सदस्याच्या नावाची नोंदणी असते. कुटुंबात एखाद्या नवीन सदस्याचे आगमन जसे की, लग्न होऊन येणारी सून असेल किंवा नवीन बाळ जन्माला आल्यास त्यासदस्याचे नवीन नाव रेशन कार्ड मध्ये ॲड करावे लागते. सदस्याचे नवीन नाव रेशन कार्ड मध्ये नोंदणी करण्यासाठी तहसील कार्यालयाला कागदपत्रांची पूर्तता करून अर्ज करावा लागतो. पण आता सदस्याचे नवीन नाव नोंदणी करण्यासाठी तहसील कार्यालयाला चकरा मारण्याची आवश्यकता नाही, तुम्ही तुमच्या मोबाईलच्या साह्याने कुटुंबातील नवीन सदस्याचे नाव रेशन कार्ड मध्ये नोंदणी करू शकता.

शासनाने रेशन कार्ड धारकासाठी नवीन मोबाईल ॲप Mera Ration App 2.0 उपलब्ध करून दिले आहे. या ॲपच्या साह्याने आता नागरिकांना घर बसल्या सर्व सुविधांचा लाभ घेता येणार आहे. सदरील मोबाईल ॲप डाउनलोड करून रेशन कार्ड नवीन नाव नोंदणी, मिळणारे रेशन किती, रेशन किंमत इत्यादी आणि यासारख्या अनेक सेवांचा लाभ घर बसल्या घेता येतो.

Mera Ration App 2.0 हे ॲप डाउनलोड केल्यानंतर लॉगीन करून घ्या, लॉगीन झाल्यानंतर तुम्हाला नवीन नाव ॲड करणे, कुटुंबाची माहिती मिळविणे, आपल्याला मिळणाऱ्या रेशनची किंमत आणि मात्रा तसेच रेशन कार्ड ट्रान्स्फर करणे यासारख्या बऱ्याच सुविधा Mera Ration App 2.0 या ॲप मधून मिळतात.

Mera Ration App 2.0 /मेरा राशन मोबाईल ॲप

मेरा राशन मोबाईल ॲप Mera Ration App 2.0 हे रेशन धारकांना डिजिटल सुविधा घरबसल्या पुरविण्यासाठी निर्माण करण्यात आलेले आहे. या मोबाईल ॲपच्या साह्याने अनेक राशन विषयीच्या अनेक सेवा घरबसल्या मिळविता येतात. त्यासाठी तहसील कार्यालयाला चकरा मारण्याची गरज पडणार नाही.Mera Ration App 2.0

Mera Ration हे ॲप तुम्ही मोबाईल मधील प्ल्ये स्टोर वरून डाउनलोड करू शकता. डाउनलोड करून आपल्या आधार नंबरच्या साह्याने लॉगीन करून तुम्हाला हवी असलेली राशन कार्ड राशन कार्ड विषयीच्या सुविधा मिळवू शकता. वरील लोगो असलेले मोबाईल ॲपच डाउनलोड करा, अन्यथा इतर ॲप आपली फसवणूक करू शकतात.

Mera Ration App 2.0 हे ॲप डाउनलोड करण्यासाठी पुढील लिंकवर जा – https://play.google.com/store/apps/details?id=com.nic.onenationonecard

निष्कर्ष

आता मेरा राशन मोबाईल ॲपच्या साह्याने करता येणार रेशन कार्ड नवीन नाव नोंदणी या लेखात आपण Mera Ration App 2.0 ॲपच्या साह्याने रेशन विषयीच्या सुविधांचा लाभ घर बसल्या मिळवू शकतात. रेशन कार्ड नवीन नाव नोंदणी, रेशन विषयीची माहिती, कुटुंब सदस्यांची माहिती, रेशनकार्ड ट्रान्स्फर इत्यादी सेवा या ॲपच्या साह्याने मिळविता येतात. माहिती आवडली असल्यास आपल्या मित्रांना आणि नातेवाईकांना अवश्य शेअर करा.

अशाच नवीन माहितीसाठी आमच्या सोशल मिडिया ग्रुपमध्ये सामील होण्यासाठी खालील लिंकवर टच करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top