Fancy Parivahan Number: वाहनासाठी फॅन्सी किंवा व्हीआयपी नंबर कसा मिळवायचा ?

Fancy Parivahan Number: वाहनासाठी फॅन्सी किंवा व्हीआयपी नंबर कसा मिळवायचा ?  कुठलेही वाहन खरेदी केल्यावर मग ते दोन असो कि चार चाकी किंवा लोडिंग वाहन असेल, आपल्या वाहनाला फॅन्सी किंवा व्हीआयपी नंबर मिळावा असे प्रत्येकाला वाटते. आपल्या गाडीला व्हीआयपी नंबर असावा हि आज मोठेपणाची गोस्थ समजली जाते. त्यामुळे बरेचजण फॅन्सी किंवा व्हीआयपी नंबर मिळविण्यासाठी प्रयत्न करत असतात. फॅन्सी किंवा व्हीआयपी नंबर मिळविण्यासाठी RTO कार्यालयाला जावून प्रयत्न करणारे आपण पाहतो. RTO कडे गाडीची पासिंग करत असतांना काही नंबर असतात जे फॅन्सी किंवा व्हीआयपी समजले जातात. आपण या लेखात हा फॅन्सी किंवा व्हीआयपी नंबर मिळवायचा कसा, शासनाच्या परिवहन विभागाकडे या फॅन्सी किंवा व्हीआयपी नंबरची नोंदणी केली जाते. मग या Parivahan Fancy Number साठी काय करावे लागते आपण पाहणार आहोत.Parivahan Fancy Number: वाहनासाठी फॅन्सी किंवा व्हीआयपी नंबर कसा मिळवायचा ?

वाहनासाठी फॅन्सी किंवा व्हीआयपी नंबर

RTO कार्यालयाकडे अनेक फॅन्सी किंवा व्हीआयपी नंबर असतात, नवीन सिरीज चालू झाली कि त्यातील व्हीआयपी नंबर RTO कार्यालयाकडे उपलब्ध असतात. मात्र सर्वांनाच हे नंबर मिळत नाहीत, कारण यासाठी वेगळी किंमत मोजावी लागते. विशेष करून राजकीय लोक या नंबरसाठी विशेष प्रयत्नशील असतात. मग त्यासाठी ते किंमत मोजायला देखील तयार असतात. Fancy Number नंबर मधून स्वतःच्या व्यवसायाविषयीचा कोड किंवा राजकीय पार्टीचा विशेष नंबर अश्या गोष्टी प्रामुख्याने दर्शविल्या जातात. या Fancy Number मधून स्वतःची आगळी वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी VIP नंबर निवडले जातात.

शासनाच्या MINISTRY OF ROAD TRANSPORT & HIGHWAYS या परिवहन सेवा पोर्टलवर जावून तुम्ही तुम्हाला हवा असणारा व्हीआयपी नंबर किंवा फॅन्सी नंबर निवडू शकता, आणि त्या नंबरसाठी Online बुकिंग देखील करू शकता.

✅👉🏻 Parivahan Sewa Application Status: लाइसेंससाठी केलेल्या अर्जाची स्थिती अशी तपासा

Fancy Parivahan Number: वाहनासाठी फॅन्सी किंवा व्हीआयपी नंबर कसा मिळवायचा ?

आपल्या नवीन वाहनासाठी व्हीआयपी किंवा फॅन्सी असावा असे प्रत्येकाला वाटते, गाडीला असला तर त्याची शानच काही वेगळी असते. गाडी त्या विशिष्ठ नंबर ने ओळखली जाते, विशेष करून राजकारणी लोकांमध्ये अशा नंबर ओढ जास्त असते. चला तर मग व्हीआयपी किंवा Fancy Parivahan Number कसा मिळवायचा ते आपण जाणून घेणार आहोत.

Fancy Parivahan Number
Fancy Parivahan Number

Welcome to Fancy Numbers Booking System

आपल्या वाहनासाठी व्हीआयपी किंवा फॅन्सी नंबर मिळविण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला Parivahan Sewa या शासनाच्या MINISTRY OF ROAD TRANSPORT & HIGHWAYS च्या वेबसाईट वर जावे लागेल. या वेबसाईट वर आल्या नंतर तुम्हाला, Online Services या मेनू बर मधील पर्यायावर जावे लागेल. या पर्यायावर आल्या नंतर त्या मधील Fancy Number Booking या पर्यायावर क्लिक करावे लागेल. त्या नंतर ओपेन होणाऱ्या बॉक्स च्या शेवटी तुम्हाला Public User म्हणून दिसेल त्यावर तुम्हाला क्लिक करायचे आहे. Open होणाऱ्या USER SIGN UP या नवीन पेज वर तुम्हाला तुमचे Acount बनवायचे आहे. त्यावर पहिल्यांदामोबाई तुमचे राज्य, तुमचे नाव, तुमचा e-mail, तुमचा मोबाईल नंबर आणि शेवटी कॅप्चा कोड टाकून Sign Up करायचे आहे.

वरील प्रोसेस पूर्ण केली कि तुमचे Acount पूर्ण होईल तुमच्या e-mail किंवा मोबाईल नंबरवर तुमची parivahan Id आणि password येवून जाईल.त्या नंतर तुम्ही पुढील प्रोसेस करू शकाल. या नंतर तुम्हाला Parivahan Home वर परत यायचे आहे, आणि Online Services मधील Fancy Number Booking या पर्यायावर लिक करायचे आहे. त्या नंतर तुमचा तयार झालेला User Id आणि password टाकायचा आहे, आणि Login बटनावर क्लिक करायचे आहे.

Login करतांना आलेला पहिला Password बदलून तुम्हाला नवीन Password बनवायचा आहे. नवीन Password आणि तुमचा Id जो e-mail तुम्ही टाकला होता तो, टाकून लोगिन करायचे आहे. केल्या नंतर नवीन पेज वर तुम्हाला Welcome to Fancy Numbers Booking System या वर तुम्हाला Fancy Number बुक करायचे सर्व नियम आणि वेळ कळवला जाईल, त्याच वेळेत तुम्हाला तुमचा Choice number निवडायचा आहे.

मेनू बर मध्ये असलेल्या select number या पर्यायाला निवडून तुम्हाला तुमचे RTO निवडावे लागेल, तर दुसर्या बॉक्स मध्ये तुम्हाला तुमची गाडी दोन चाकी आहे कि, चार चाकी हे निवडावे लागेल आणि खालील बटनावर क्लिक काफ्रावे लागेल. बुकिंग पूर्ण होताच तुम्हाला SMS द्वारे कळविले जाईल.

अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या गाडीसाठी व्हीआयपी किंवा  Fancy Number नंबर बुक करू शकता.

✅👉🏻 सारथी शिष्यवृत्ती: मराठा विध्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना

VIP OR Fancy Number Choice कसा करायचा

Parivahan पोर्टलवर आपला Choice Number पाहण्यासाठी तुम्हाला Home पेज वर असतांना, खली दिसणाऱ्या Fancy Number Allocation या पर्यायाला क्लिक करायचे आहे. त्या मध्ये खाली इतर पर्यायाबरोबर तुम्हाला Choice Number हा पर्याय दिसेल. या पर्यायाला क्लिक करायचे आहे.

Choice Number या पर्यायाला क्लिक केल्या नंतर  AVAILABLE FANCY/CHOICE NUMBER REPORT उपलब्ध असलेले नंबर तुम्हाला दिसतील त्यासाठी तुम्हाला पहिल्या रकान्यात राज्य, दुसऱ्या रकान्यात RTO जिल्हा निवडायचा आहे. त्या नंतर दिसणाऱ्या यादी मधून आवडीचा नंबर यादी खालील रकान्यात टाकून Check Avalibility या बटनावर क्लिक करायचे आहे.

अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या आवडीचा नंबर CHOICE करू शकता.

Fancy Number निवड प्रक्रिया

  1. सर्वप्रथम परिवहन विभागाच्या अधिकृत वेबसाइट वर जा.
  2. तिथे तुम्हाला फॅन्सी नंबरसाठी एक सेक्शन मिळेल.
  3. उपलब्ध फॅन्सी किंवा व्हीआयपी नंबरची यादी तपासा.
  4. तुम्हाला हवा असलेला नंबर निवडा.
  5. फॅन्सी नंबरसाठी बोली प्रक्रिया (ऑक्शन) असते.
  6. तुमच्या निवडलेल्या नंबरसाठी बोली लावा.
  7. जर तुमची बोली सर्वात जास्त असेल, तर तुम्हाला तो नंबर दिला जाईल.
  8. बोली जिंकताना पेमेंट करा.
  9. पेमेंट केल्यानंतर तुम्हाला फॅन्सी नंबर मिळेल.
  10. सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर संबंधित आरटीओ कार्यालयात जाऊन नंबरसाठी आवश्यक कागदपत्रे द्या आणि नंबर आपल्या नावावर रजिस्टर करून घ्या.

आवश्यक कागदपत्रे

तुमच्याकडे आवश्यक कागदपत्रे असावी, जसे की वाहनाचा रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र (RC), ओळखपत्र (ID Proof) आणि इतर आवश्यक दस्तऐवज.

Conclusion

Fancy Parivahan Number: वाहनासाठी फॅन्सी किंवा व्हीआयपी नंबर कसा मिळवायचा ? या लेखात आपण फॅन्सी किंवा व्हीआयपी नंबर कसा मिळवायचा, त्यासाठी काय करावे लागते या बद्दल माहिती पहिली, त्याच बरोबर VIP OR Fancy Number Choice कसा करायचा हे देखील पहिले आहे. माहिती आवडली असल्यास आपल्या मित्र व सहकाऱ्यांना शेअर करा.

🟢🔵🟣आमच्या ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी क्लिक करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

1 thought on “Fancy Parivahan Number: वाहनासाठी फॅन्सी किंवा व्हीआयपी नंबर कसा मिळवायचा ?”

  1. Pingback: Www Mahabocw In Renewal Status: कामगार रिन्यूअल स्थिती चेक करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top