phonepe bike insurance आजच्या काळात बाईक च्या किमती खूप वाढलेल्या आहेत. अशावेळेस तुमची बाईक गेली किंवा बाईक चा एक्सिडेंट झाला तर त्याचा बराच आर्थिक फटका आपल्याला बसू शकतो. त्यामुळे बाईकचा विमा आपल्याकडे असणे केंव्हाही फायद्याचे ठरते. बाईकचा विमा काढायचा म्हणजे एखाद्या एजंट ला भेटणे किंवा विमा कंपनीचे कार्यालय शोधणे आणि नंतर विमा काढणे या मध्ये बराच वेळ जातो. त्यामुळे कधीकधी बाईकचा विमा काढणे राहून जाते. पण आता तुम्ही घरच्या घरी तुमच्या बाईकचा विमा काढू शकता ते ही तुमच्या मोबाईल मधील फोनपे च्या मदतीने. कसे आपण पाहू.
Bike Insurance/ बाईक विमा
आपण कुठले हि नवीन किंवा जुने वाहन घेतले कि त्याचा विमा काढावाच लागतो त्याशिवाय ते वाहन आपल्या नावावर करता येत नाही किंवा RTO नियमात बसत नाही. बाजारात अनेक विमा कंपन्या आहेत, ज्यांच्याकडून आपण वाहनाचा विमा काढू शकतो. प्रत्येक कंपनीचे रेट आणि सुविधा वेगवेगळ्या असतात. वाहनासोबत चालकाचा पण विमा काढता येतो.
Bike Insurance हे तुमच्या Bike चे संरक्षण कवच असते. जर एखाद्या वेळेस तुमचे Bike चोरी गेली किंवा एखाद्या दुर्घटनेत शतीग्रस्त झाली तर त्याची नुकसान भरपाई म्हणून विमा कंपनी तुम्हाला रोख रक्कम देते.
Bike Insurance Online Check/ बाईकचा विमा ऑनलाईन कसा चेक करायचा
बाईकचा विमा काढत असतांना तो कोणत्या कंपनीचा काढावा किंवा कोणत्या कंपनीचा विमा स्वस्त आहे हे अगोदर पाहावे लागते. अनेक कंपन्या आहेत ज्या Bike Insurance उपलब्ध करून देतात. ऑनलाईन चेक केलेतर बऱ्याच वेबसाईट वर तुम्ही विमा कंपनीची माहिती काढू शकता. एक-एक कंपनी चेक करायची मानले तर बराच वेळ वाया जातो. पण आपल्या मोबाईल मध्ये असणाऱ्या phonepe च्या साह्याने आपण आपण बाईकचा विमा ही काढू शकतो शिवाय बऱ्याच कंपन्या आणि त्यांचा विमा प्लान ही चेक करू शकतो.
Phonepe Bike Insurance
बाईकचा विमा तुम्हाला phonepe वरती काढता येतो, त्या सोबतच तुम्हाला Insurance कंपन्या निवडण्याचे पर्याय देखील मिळतो. phonepe वरील या सुविधे मुळे आता तुमाला कुठे ही बाहेर विमा कंपनी शोधण्याची गरज राहिलेली नाही. phonepe bike insurance कसा काढायचा ते आपण पाहू.
- सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या फोन मधी phonepe हे अॅप ओपन करावे लागेल. आणि अॅप मधील Insurance पर्याय मधील दिसणाऱ्या Bike या सिम्बॉल वरती क्लिक करावे लागणार आहे.
- Bike Insurance मध्ये तुम्हाला तुमच्या बाईक चा RTO पासिंग नंबर टाकायचा आहे आणि सबमिट या बटनावर क्लिक करायचे आहे.
- सबमिट बटनावर क्लिक करताच तुम्हाल प्लान आणि वर्ष निवडण्याचे पर्याय दिसेल त्या मध्ये तुम्ही तुमचा प्लान निवडू शकता त्याच बरोबर किती वर्षासाठी विमा काढायचा आहे ते हि निवडू शकता.
- या नंतर वयक्तिक दुर्घटना संरक्षण घ्यायचे किंवा नाही ते ठरवू शकता.
- वरील गोष्टी निवडल्या नन्तर तुम्हाला खाली विमा कंपन्याची लिष्ट दिसेल त्या मधून तुम्हाला हवी असलेली कंपनी निवडून BUY PLAN या बटनावर क्लिक करून विमा काढू शकता.
- BUY PLAN या बटनावर क्लिक करताच तुमच्या खात्यावरील रक्कम कपात होऊन तुमचा विमा प्लान चालू होईल.
- phonepe अॅप मधून तुम्ही विमा पावती काढू शकता.
अशा पद्धतीने तुम्हाला तुमच्या phonepe च्या साह्याने तुमच्या बाईक चा विमा ( phonepe bike insurance ) घर बसल्या काढता येतो.
सारांश
Phonepe Bike Insurance-अगदी काहीवेळात फोनपेवर काढा तुमच्या बाईकचा विमा या Blog मध्ये आपण phonepe अॅप च्या साह्याने बाईकचा विमा (phonepe bike insurance) कसा काढायचा तसेच Bike Insurance Online Check कसे करायचे या बद्दल सविस्तर माहिती पहिली. Bike Insurance बरोबरच तुम्ही Car Insurance देखील phonepe च्या मधेमातून कडू शकता. माहिती आवडली असल्यास आपल्या मित्रांना व नातेवाईकांना अवश्य शेअर करा.
हे ही वाचा :-
- पॅन कार्ड दुरुस्ती- ऑनलाइन दुरुस्त करा तुमचा पत्ता, मोबाईल नंबर आणि इतर बाबी
- Driving Licence Download Pdf: ऑनलाइन ड्रायव्हिंग लायसन्स PDF डाउनलोड प्रक्रिया
- Dispute Redressal Mechanism: मोबाईलद्वारे व्यवहार करताना चुकून दुसर्याच्या खात्यावर पैसे ट्रान्सफर झाले तर ते परत कसे मिळवायचे?
- TAFCOP मोबाइल नंबर चेक: तुमच्या नावावर किती सिमकार्ड चालू आहेत चेक करा
- Work From Home Jobs: घरी बसून काम करा आणि कमवा लाखा पर्यंत
- UIDAI NPCI Link Status: बँक सीडिंग स्थिती तपासा
- माझी नोकरी शोधण्यासाठी सर्वोत्तम मार्ग आणि टिप्स/ The Best Tips For Job
अशाच नवीन माहितीसाठी आमच्या सोशल मिडिया ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक टच करा.