भारत सरकारने आयुष्मान कार्ड सोबतच देशातील जेष्ठ नागरिकांसाठी आयुष्मान वय वंदना कार्ड सुरु केले आहे. देशातील जेष्ठ नागरिकांना त्यांचे उतार वय निश्चिंत होवून आनंदाने जगता यावे यासाठी सदरील आयुष्मान वय वंदना कार्ड सुरु केलेले आहे. या कार्ड च्या माध्यमातून जेष्ठ नागरिकांना त्यांच्या आरोग्य विषयीच्या समस्यावर मोफत उपचार मिळविण्याचे सुरक्षा कवच मिळणार आहे. अनेक दुर्धर आजारावर या योजने अंतर्गत मोफत उपचार करणे सहज शक्य होणार आहे.
आयुष्मान वय वंदना कार्ड काय आहे
केंद्र सरकारच्या आयुष्यमान भारत योजने अंतर्गत देशातील जेष्ठ नागरिकांसाठी एक विशेष योजना सुरु करण्यात आलेली आहे ती म्हणजे आयुष्मान वय वंदना कार्ड होय. या कार्ड अंतर्गत वयाचे 70 वर्ष पूर्ण करणाऱ्या नागरिकांसाठी 5 लाखाचे आरोग्य सुरक्षा कवच मिळणार आहे. जेष्ठ नागरिकांना त्यांच्या उतार वयात उद्भवणाऱ्या आरोग्य विषयक समस्यांवर 5 लाख रुपया पर्यंत मोफत उपचार या योजनेच्या माध्येमातून मिळणार आहेत. आयुष्यमान भारत योजनेच्या पोर्टल वरती तुम्हाला आयुष्मान वय वंदना कार्ड काढता येणार आहे.
आयुष्मान वय वंदना कार्ड अंतर्गत मिळणारा लाभ
आयुष्मान भारत योजने अंतर्गत सुरु करण्यात आलेल्या आयुष्मान वय वंदना कार्ड हे जेष्ठ नागरिकांना आरोग्य सुरक्षा कवच निर्माण करून देते. या योजने अंतर्गत देशातील जेष्ठ नागरिकांना रु. 5 लाखां पर्यंत मोफत उपचार मिळणार आहेत. वयोमानानुसार उद्भवणाऱ्या गंभीर आजारावर उपचारासाठी सदरील कार्ड वापरता येणार आहे. देशातील शासकीय तसेच खाजगी रुग्णालयात सदरील कार्डच्या माध्येमातून 5 लाख उपचार खर्चापर्यंतच्या दुर्धर आजारावर मोफत उपचार घेता येणार आहेत.
आयुष्मान वय वंदना कार्ड द्वारे कर्करोग, हृदयरोग आणि मूत्रपिंड यासारख्या दुर्धर आजारावर मोफत उपचार घेता येणार आहे. देशातील शाशकीय तसेच खासगी रुग्णालयात या योजनेतून उपचार घेता येणार आहेत.
आयुष्मान वय वंदना कार्ड कसे काढायचे
केंद्र सरकारच्या आयुष्मान भारत योजने अंतर्गत सुरु करण्यात आलेल्या आयुष्मान वय वंदना कार्ड योजने अंतर्गत देशातील 70 वय वर्ष असणाऱ्या जेष्ठ नागरिकांना त्यांच्या गंभीर आजारावर उपचारासाठी रु. 5 लाख पर्यंतचा खर्च मोफत करण्यात आलेला आहे. या योजनेसाठी ऑनलाईन नोंदणी करून तुमचे कार्ड मिळवावे लागते. ऑनलाईन नोंदणी कशी करायची ते आपण पाहणार आहोत.
PMJAY Beneficiary Portal
- सर्वप्रथम तुम्हाला आयुष्मान भारत योजनेच्या ऑनलाईन पोर्टल beneficiary.nha.gov.in वरती जावे लागेल.
- पोर्टल आवरती आल्या नंतर उजव्या बाजूला दिसणाऱ्या Beneficiary आणि OPRETAR या मधु स्वतः लाभार्थी असल्यास Beneficiary हा पर्याय निवडावा लागेल. आणि खालील बॉक्स मध्ये तुम्हाला पहिल्या रकान्यात दिलेला कॅप्चा कोड टाकायचा आहे.
- दुसऱ्या रकान्यात तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकून वेरीफाय करायचा आहे.
- मोबाईल नंबर वेरीफाय करताच तुमच्या मोबाईल नंबर वरती एक OTP येयील to खालील रकान्यात टाकायचा आहे, त्या नंतर त्याखाली दिसणाऱ्या रकान्यात परत तोच OTP टाकायचा आहे.
- त्या नंतर खालील रकान्यात समोर दिसणारा कॅप्चा कोड भरायचा आहे .
- सगळ्यात शेवटी दिसणाऱ्या सबमिट बटनावर क्लिक करायचे आहे.
- शेवटच्या बटनावर क्लिक करताच तुमच्या समोर नवीन पेज ओपन होईल, या पेजवर पहिल्या रकान्यात स्कीम PMJAY निवडायचे आहे.
- दुसर्या रकान्यात तुमचे राज्य निवडायचे आहे.
- सब स्कीम मध्ये तुम्हाला PMJAY-MJPJAY हा पर्याय निवडायचा आहे.
- त्या नंतर चं रकान्यात तुमचा जिल्हा निवडायचा आहे, आणि शेवटच्या रकान्यात तुमच्या असणारी आयडी प्रूप निवडायचे आहे.
- शेवटच्या रकान्यात सहसा आपण आधार कार्ड निवडणार आहोत, आधार निवडल्यास पुढील पेज वर तुम्हाल पहिल्या रकान्यात तुमचे आधार आणि दुसर्या रकान्यात दिलेला कॅप्चा कोड भरायचा आहे आणि सर्च बटनावर क्लिक करायचे आहे.
- पुढील पेज वर वय वर्ष 70 असणाऱ्या लाभार्थ्यासाठी एक सेप्रेट लिंक दिसेल त्यावरती क्लिक करायचे आहे.
- तुमच्या कुटुंबात जर कोन्ही व्यक्ती 70 वय वर्ष असणारी असेल तर त्या व्यक्तीचे माहिती समोर येयील.
- नवीन पेज वर रकान्यात आधार नंबर टाकून त्या समोरील वेरीफाय बटनावर क्लिक करायचे आहे.
- त्या नंतर दिसणारे कॉन्सेट वाचून टिक मार्क करायचे आहे आणि खालील ALLOW बटनावर क्लिक करायचे आहे.
- नवीन पेज वर तुमच्या मोबाईल वर आलेली आधार OTP आणि मोबाईल OTP अश्या दोन्ही OTP रकान्यात भरायच्या आहे.
- पुढील पेज वर तुम्ही शाशकीय इतर कुठल्या आरोग्य विषयक सेवांचा लाभ घेत असल्यास ते टिक करायचे आहे, नसल्यास तसे टिक कार्याचे आहे.
- शेवटी प्रोसिड या बटनावर क्लिक करायचे आहे.
- प्रोसिड बटनावर क्लिक करताच तुमची आधार नुसार संपूर्ण माहिती ओपेन होईल, त्या नंतर तुम्हाला वेबसाईट वर तुमचा लाइव्ह फोटो काढायचा आहे.
- फोटो दिल्या नंतर प्रोसिड बटनावर क्लिक करायचे आहे, आणि नंतर लाभार्थ्याचा मोबाईल टाकून वेरीफाय वर क्लिक करून OTP भरायचा आहे, आणि तुमची CAST, पिनकोड इत्यादी माहिती भरायची आहे. तसेच त्या खालील भागात कुटुंब सदस्याची माहिती भरायची आहे.
- सगळ्यात शेवटी फॉर्म भरून झाल्यावर सबमिट बटनावर क्लिक करायचे आहे.
- सबमिट केल्यावर तुमचा फॉर्म सक्सेस झाल्याचा म्यसेज येयील, त्यस नंतर 15-20 मिनिटाने तुम्ही आयुष्मान वय वंदना कार्ड डाउनलोड करू शकता.
अशा प्रकारे आयुष्मान वय वंदना कार्ड PMJAY Beneficiary Portal वरती जाऊन नवीन डाउनलोड करता येते.
कागदपत्रे
- लाभार्थ्यांचे आधार कार्ड
- बँक पासबुक
PMJAY Beneficiary Login/अॅपद्वारे आयुष्मान वय वंदना कार्ड नोंदणी
आयुष्मान भारत योजनेच्या शासकीय अॅपद्वारे तुम्ही आयुष्मान वय वंदना कार्ड काढू शकता. सर्वप्रथम प्ले स्टोर वरून आयुष्मान भारत हे अॅप डाउनलोड करावे लागेल. त्यानंतर तुम्हला वरती दिलेल्या माहिती प्रमाणे पुढील प्रोसेस करावी लागेल.
आयुष्मान भारत योजनेचे अॅप डाउनलोड करण्यासाठी पुढील लिंक वर जा :-https://play.google.com/store/apps/details?id=com.beneficiaryapp
सारांश
आयुष्मान वय वंदना कार्ड: 70 वर्षावरील जेष्ठ नागरिकांसाठी 5 लाख रुपयांचे आरोग्य सुरक्षा कवच या लेखात आपण केंद्रसरकारने आयुष्मान भारत अंतर्गत 70 वय वर्ष असणाऱ्या जेष्ठ नागरिकांसाठी सुरु केलेल्या आयुष्मान वय वंदना कार्ड विषयी माहिती पहिली. या योजने अंतर्गत देशातील जेष्ठ नागरिकांना त्यांच्या दुर्धर आजारावर उपचार करण्यासाठी रु. 5 लाख पर्यंतचा उपचार खर्च मोफत करण्यात आलेला आहे. माहिती आवडली असल्यास आपल्या नातेवाईकांना शेअर करा.
हे ही वाचा :-
- Ayushman Card Download Online-आयुष्यमान कार्ड डाउनलोड
- पॅन कार्ड दुरुस्ती- ऑनलाइन दुरुस्त करा तुमचा पत्ता, मोबाईल नंबर आणि इतर बाबी
- UIDAI NPCI Link Status: बँक सीडिंग स्थिती तपासा
- Aadhaar Verification: आधार पडताळणी कशी करावी ? ऑनलाइन बँक सीडिंग स्थिती
- E-Shram Registration: मोबाईलवरून नोंदणी करून मिळवा ई-श्रम कार्ड
अशीच नवीन माहिती मिळविण्यासाठी आमच्या सोशल मीडिया ग्रुप मध्ये सामील व्हा, ग्रुप जॉईंट करण्यासाठी खालील लिंक टाच करा.