Pmjay kyc: आयुष्यमान भारत कार्ड Online KYC मोबाईल वरून

pmjay kyc: भारत सरकारच्या आयुष्यमान भारत योजने अंतर्गत देस्गातील नागरिकांना 5,000.000 रु. पर्यंत आर्थिकसाह्य हे दुर्धर आजारात मिळते. म्हणजे दवाखान्यासाठी लागणाऱ्या खर्चातून पाच लाख रुपया पर्यंतचा इलाज हा मोफत करता येतो. या योजनेतून भारत सरकारने आर्थिक दुर्बल घटकांना या योजनेचे ओळखपत्र उपलब्ध करून दिलेले आहेत. या ओळखपत्राच्या आधारे कोणत्याही दवाखान्यात 5 लाख पर्यंत मोफत इलाज मिळविणे शक्य झाले आहे. ज्या लाभार्थ्ग्यांनी या योजनेमधून pmjay card ( आयुष्यमान कार्ड) बनविले आहेत, त्यांना आपली kyc करावी लागणार आहे. ही kyc आपल्या मोबाईल वरून कशी करायची ते आपण पहाणार आहोत.Pmjay kyc

PMJAY -प्रधानमंत्री जनआरोग्य योजना (PMJAY)

भारत सरकाने प्रधानमंत्री जनआरोग्य योजना (PMJAY) ही योजना देशातील आर्थिक दुर्बल घटकांना आपल्या आजारावर मोफत उपचार करता यावे यासाठी सुरून केलेली आहे. ही एक आरोग्य विमा योजना आहे. या योजनेतून दरवर्षी 5 लाख पर्यंत मोफत उपचार लाभार्थ्यांना मिळणार आहेत. शासकीय तसेच शासनाने ठरवून दिलेल्या काही रुग्णालयात या योजने अंतर्गत मोफत उपचार घेता येतो.

आयुष्यमान भारत कार्ड KYC करणे का गरजेचे आहे.

भारत सरकारने सुरु केलेल्या आयुष्यमान भारत कार्ड अंतर्गत अनेक लोकांना सदरील योजनेचा लाभ मिळत आहे. आयुष्यमान भारत कार्ड अंतर्गत शासनाकडे लाभार्थ्याचा data (माहिती) सुरक्षित ठेवली जाते. आयुष्यमान भारत कार्डच्या लाभार्थ्ग्यांना आपली माहिती अध्यायावत ठेवण्यासाठी आपल्या आयुष्यमान भारत कारची kyc करणे गरजेचे आहे. या pmjay kyc मुळे आपली अद्यावत माहिती शासनाकडे जाते, तसेच शासकीय किंवा खाजगी रुग्णालयात उपचार घेण्यासाठी online सेवेमध्ये सोयीचे होते.

मोबाईलवरून आयुष्यमान भारत कार्ड KYC कशी करायची

आयुष्यमान भारत कार्ड kyc मोबाईल वरून अगदी सोप्या पद्धतीने करता येते. त्यसाठी कुय्ह्ल्याही CSC केंद्रावर जाण्याची आवश्यकता नाही. मोबाईलवरून pmjay kyc कशी करायची ते आपण खाली पाहू.

  • सर्वप्रथम भारत सरकारच्या PMJAY https://beneficiary.nha.gov.in या वेबसाईटवर जावे लागेल, या वेबसाईटवर आल्या नंतर उजव्या बाजूला दिसणाऱ्या बॉक्समध्ये Beneficiary आणि Operator या दोन पर्यायांमधून Beneficiary या पर्यायाला क्लिक करायचे आहे.
  • दिलेला कॅप्चा टाकून मोबाईल नंबर टाकून OTP घ्यायचा आहे, आलेला OTP टाकून लॉगिन करून घ्यायच आहे.
  • लॉगिन केल्या नंतर ओपन केल्यानंतर नवीन पेजवर दिसणाऱ्या बॉक्स मध्ये तुमचे राज्य, जिल्हा, तालुका, ग्रामिन किंवा शहरी इत्यादी बाबी निवडायच्या आहेत.
  • वरील माहिती भरल्यानंतर लाभार्थ्यांचा आधार नंबर टाकून OTP घ्यायचा आहे, आलेला आधार otp आणि मोबाईल नंबर otp टाकून घ्यायचा आहे.
  • आधार otp आणि मोबाईल नंबर otp टाकल्या नंतर तुमच्या समोर नवीन पेज ओपन होईल या पेजवर तुम्हाला आयुष्यमान कार्ड downolad करता येते, त्याच बरोबर e-kyc करता येते.
  • e-kyc पर्याय निवडून खालील बॉक्स मधील आधार नंबर समोर Verify समोर क्लिक कार्याचे आहे, यावर क्लिक करताच रजिस्टर मोबाईल नंबरवर आधार आणि मोबाईल OTP येयील, आलेल्या दोन्ही otp भरून त्याखालील माहिती भरायची आहे, जसेकी पिनकोड नंबर, तुमचे गाव इत्यादी आणि शेवटी Submit बटनावर क्लिक करायचे आहे.
  • Submit बटनावर क्लिक करताच तुमची KYC पूर्ण झाली म्हणून मॅसेज स्क्रीनवर दिसेल.

अशा पद्धतीने (pmjay kyc) आयुष्यमान भारत कार्ड Online KYC आपल्या मोबाईल वरून करू शकता.

आवश्यक कागदपत्रे

  1. लाभार्थ्याचे आधार कार्ड.
  2. लाभार्थ्याचा मोबाईल नंबर.
  3. आयुष्यमान भारत कार्ड ( पर्यायी).

PMJAY KYC Online चे फायदे

  1. घरी बसून KYC करता येते.
  2. KYC प्रक्रिया पूर्ण केल्यामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल होतांना online प्रक्रिया सोयीची आणि जलद होते.
  3. कार्डमुळे उपचार घेण्यास विलंब होत नाही.
  4. शासनाकडे रेकोर्ड कायम राहते.

निष्कर्ष

Pmjay kyc: आयुष्यमान भारत कार्ड Online KYC मोबाईल वरून ही अतिशय सोपी आणि सहज करता येणारी प्रक्रिया आहे. अगदी काही मिनटात Pmjay kyc (आयुष्यमान भारत कार्ड Online KYC ) पूर्ण करून शासनाच्या 5 लाखांपर्यंतच्या आरोग्य विण्याचा लाभ घेवू शकता. जर आत्ता पर्यंत तुम्ही आयुष्यमान भारत कार्ड KYC केली नसेल तर आपल्या मोबाईलच्या साह्याने करून घ्या. माहिती आवडली असल्यास इतरांना शेअर करा.

हे ही वाचा ;-

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top