pmmvy nic in रजिस्ट्रेशन: प्रधानमंत्री मातृवंदना योजना ( PMMVY- pmmvy nic in ) ही भारत सरकारची एक महत्त्वपूर्ण योजना आहे. या योजने अंतर्गत गर्भवती व स्तनपान करणाऱ्या महिलांना आर्थिक सहाय्य दिले जाते. शासनाकडून ही योजना डिजिटल पद्धतीने राबविण्यासाठी PMMVYsoft MIS Portal सुरु करण्यात आला आहे. या पोर्टलवरून नागरिकांना स्वतः लॉगिन करून नोंदणी करता येते, स्वतः लॉगीन करून नोंदणी शकतात, अर्जाची स्थिती पाहू शकतात आणि इतर माहिती मिळवू शकतात.
प्रधानमंत्री मातृवंदना योजना (PMMVY) काय आहे
प्रधानमंत्री मातृवंदना योजना (PMMVY) ही गर्भवती व स्तनपान करणाऱ्या महिलांसाठी भारत सरकारची कल्याणकारी योजना आहे. या योजनेत महिलांना रु. 5000 पर्यंत आर्थिक सहाय्य दिले जाते. अर्ज आणि लाभ तपासण्यासाठी सरकारने PMMVYsoft Citizen Login Portal सुरू करून दिले आहे. गर्भवती महिला व स्तनपान करणाऱ्या मातांना आर्थिक मदत मिळावी हा उद्देश शासनाचा या योजने माघे आहे. महिलांना चांगले पोषण मिळून बाळ आणि आई दोघांचे आरोग्य सुधारावे, यासाठी शासनाकडून ही योजना सुरू करण्यात आली आहे.
PMMVYsoft Citizen Login Portal
भारत सरकारने गर्भवती व स्तनदा माता यांच्यासाठी सदरील पोर्टल सुरु केलेले आहे. या पोर्टल अंतर्गत देशातील गर्भवती आणि स्तनदा मातांना त्याचे व बाळाचे आरोग्य निरोगी राहावे यासाठी प्रधानमंत्री मातृवंदना योजने अंतर्गत रु. 5000 हजारापर्यंत आर्थिक मदत करण्याचे योजिले आहे. PMMVYsoft Citizen Login Portal वर जाऊन नागरिक स्वतः आपली नोंदणी करू शकतात. तसेच आपल्या अर्जाची स्थिती जाणून घेवू शकतात. यासाठी लाभार्थ्याला शासनाच्या अधिकृत पोर्टल वेबसाईट https://pmmvy.wcd.gov.in वरती जावे लागेल. या पोर्टल वरती आल्या नंतर उजव्या कोपऱ्यात दिसणाऱ्या LOGIN या बटनावर क्लिक करावे लागेल. Citizen Login वरती क्लिक करताच खालील उपलब्ध असलेल्या सुविधा मधून एका निवडून पुढील प्रक्रिया पूर्ण करू शकतात.
Beneficiary Registration (लाभार्थी नोंदणी)
Track Application Status (अर्जाची स्थिती तपासणे)
Pmmvy nic in रजिस्ट्रेशन कसे करावे
सर्वप्रथम भारत सरकारच्या https://pmmvy.wcd.gov.in ( PMMVY ) या पोर्टल वरती जावे लागेल. या पोर्टल वर आल्या नंतर उजव्या बाजूला दिसणाऱ्या LOGIN वरती क्लिक करायचे आहे.
- LOGIN वरती क्लिक केल्या नंतर Citizen Login हा पर्याय निवडा. आणि खालील रकान्यात आपला दहा अंकी मोबाईल नंबर टाका आणि Verify बटनावर क्लिक करा. त्यानंतर Create account वरती जा आणि तुम्ही स्वतः जर लाभार्थी असाल तर स्वतः किंवा नातेवाईक किंवा पती असेल तर तास पर्याय निवडा.
- त्यानंतर तुमच्या मोबाईलवर आलेला otp खालच्या रकान्यात टेकवून त्या खालील कॅप्चा कोड टाकून VALIDATE या बटनावर क्लिक करा.
- आता तुमच्या खाते तयार झाले आहे, ते तुम्हाला परत लॉगिन करून तुम्हाला तुमचा फॉर्म भरावा लागेल.
- खाते तयार झाल्यानंतर तुमचा मोबाईल नंबर पुन्हा टाकून Verify बटनावर क्लिक करा.
- आता तुमच्या समोर PMMVY चे अधिकृत पोर्टल ओपन होईल, यामध्ये तुम्हाला Beneficiary Registration या पर्यायावर क्लिक करून पुढील माहितीचा फॉर्म भरायचा आहे. या मध्ये तुम्हाला नाव , आधार नंबर, पत्ता, तुमचे राज्य आणि NCP कार्डची माहिती भरावी लागेल. त्याबरोबरच बँक डीटीएल भरून फॉर्म सबमिट करायचा आहे.
- अशा पद्धतीने PMMVYsoft Portal वरती लाभार्थ्यांची ऑनलाईन नोंदणी पूर्ण होईल.
अर्जाची स्थिती तपासा
Citizen Login मध्ये प्रवेश करून Track Application Status वर क्लिक करून. लाभार्थ्याने आपला अर्ज क्रमांक टाकून आपल्या अर्जाची स्थिती तपासता येते. यामध्ये तुमचा अर्ज प्रलंबित आहे की मंजूर, हे कळायला मदत होते.
निष्कर्ष
प्रधानमंत्री मातृवंदना योजना pmmvy nic in रजिस्ट्रेशन, लाभ आणि अर्जाची स्थिती तपासा या लेखात आपण pmmvy nic in रजिस्ट्रेशन: पोर्टलवरून प्रधानमंत्री मातृवंदना योजना ऑनलाइन अर्ज करा, लाभार्थी नोंदणी व अर्जाची स्थिती ऑनलाइन कशी तपासायची संपूर्ण या विषयीची संपूर्ण माहिती पहिली. PMMVYsoft Portal वरती जाऊन Beneficiary Registration करता येते. काही सोप्या स्टेप पूर्ण करून तुम्ही सदरील नोंदणी करू शकता.
अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या सोशल मीडिया ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालिल ग्रुप आयकॉन वर क्लिक करा.
हे हि वाचा ;-
- Pradhan Mantri Awas Yojna Apply Online: PMAY-U 2.0 योजनेसाठी ऑनलाईन अर्ज सुरु
- पंतप्रधान रोजगार निर्मिती अंतर्गत येणाऱ्या उद्योगांची यादी: PMEGP उद्योग लिस्ट
- विश्वकर्मा श्रम सम्मान योजना/PM Vishvkarma Scheme
- PM Tractor Yojana: ट्रॅक्टर खरेदी करा अर्ध्या किमतीत,शासन देतंय भरघोस सब्सिडीवर
- Pradhan Mantri Gramin Awas Yojana : टप्पा 2 अंतर्गत स्वतःचा सर्वे स्वतःच करा
- Aadhar Link Bank of India: Process to link Aadhaar card to Bank of India account online