Pradhan Mantri Awas Yojna Apply Online: PMAY-U 2.0 योजनेसाठी ऑनलाईन अर्ज सुरु

pradhan mantri awas yojna apply online: केंद्र सरकारने सुरु केलेल्या पंतप्रधान आवास योजने अंतर्गत देशातील बेघर आणि कच्चे घर असणाऱ्या लोकांना घरकुल देण्यात येत आहेत. देशाच्या पंतप्रधानांच्या हस्ते ‘सबके लिये आवास’ या घोषणे नुसार देशातील सर्व शहरी भागात राहणाऱ्या बेघरांना पक्के आणि मजबूत घरे निर्माण करून देण्याचे देय्य आहे. या योजने मधून वाढत्या शहरी करणात झोपड पट्टी आणि कच्या घरात राहणाऱ्या लोकांना पक्के घरे उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पंतप्रधान आवास योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा कार्याचा या बद्दल माहिती आपण पाहणार आहोत.Pradhan Mantri Awas Yojna Apply Online

Pradhan Mantri Awas Yojna 2.0

वाढते शहरीकरण आणि शहरात कच्चे घर आणि झोपडपट्टीत राहणारी लोकसंख्या लक्षात घेता केंद्र शासनाने शहरी भागासाठी Pradhan Mantri Awas Yojna 2.0 ही योजना नव्याने सुरु केली आहे. शहरातील कमजोर आणि मध्यम वर्गाला आपल्या स्वप्नातील घर उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने सदरील योजना सुरु केली आहे. Pradhan Mantri Awas Yojna 2.0 हि खालील 4 महत्वाच्या घटकानुसार राबविली जाते.

Beneficiary Led Construction (BLC)/ लाभार्थी नेतृत्व बांधकाम

EWS श्रेणीतील वयक्तिक पत्र कुटुंबांना त्यांच्या स्वतः च्या जमिनीवर घर बांधण्यासाठी केंद्र सरकार सदरील योजनेतून अर्थ साह्य करते. लाभार्थ्यांना किमान 30 चौ. मीटर ते 45  चौ. मीटर चे पक्के घर बांधता येते. या पात्रतेत बसणाऱ्या लाभार्थ्यांनी Pradhan Mantri Awas Yojna 2.0 पोर्टल वर जावून ऑनलाईन अर्ज सदर करणे आवश्यक आहे.

Affordable Housing in Partnership (AHP)/ भागीदारीत परवडणारी घरे

AHP अंतर्गत पक्के घर मिळविण्यासाठी केंद्र सरकार आर्थिक मदत करते, EWS लाभार्थ्यांना या अंतर्गत 40-45 चौ. मीटर छाती शेत्राफळ असलेली परवडणारी घरे सार्वजनिक किंवा खासगी बांधून पात्र लाभार्थ्यांना उपलब्ध करून दिली जातील.

Affordable Rental Housing (ARH)/ परवडणारी भाड्याची घरे

ARH अंतर्गत शहरी भागातील स्थलांतरित/ बेघर/निराधार/आद्योगिक कामगार/महिला कांगार/बांधकाम कामगार/शहरी गरीब/ रस्त्यावरील विक्रेते/रिक्षा चालक इत्यादी EWS पात्र लाभार्थ्याला सदरील बाबी मध्ये लाभ दिला जातो.

शहरी भागातील रहिवाशींना परवडणारी घरे ज्या मध्ये सर्व आरोग्य आणि इतर सोयी सुविधा उपलब्ध असतील अशा स्वरुपाची घरे शासन सुनिश्चित करेल आणि पात्र लाभार्थ्याला अल्प मुदतीसाठी भाडे तत्वावर उपलब्ध करून देयील.

Interest Subsidy Scheme (ISS)/ व्याज अनुदान योजना

PMAY-U2.0 स्कीम अंतर्गत EWS, LIG आणि MIG श्रेणीतील पत्र कुटुंबे या योजनेचा लाभ घेवू शकतात.  या योजने अंतर्गत अनुक्रमे रु. 3 लाख, 6 लाख आणि 9 लाख रुपये वार्षिक उत्पन्न असणाऱ्या लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळतो.

Pradhan Mantri Awas Yojna Apply Online: पंतप्रधान आवास 2.0 योजनेसाठी ऑनलाईन अर्ज सुरु

पंतप्रधान आवास योजना 2.0 या योजनेसाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम केंद्र शासनाच्या पुढील वेबसाईटवर उजवे लागेल  pmay-urban.gov.in  ( https://pmaymis.gov.in/PMAYMIS2_2024/PmayDefault.aspx) या वेबसाईटवर जाऊन अर्ज करता येतो.

  • pmay च्या वेबसाईटवर आल्या नंतर समोरील पेज वर मेन्यू बार मध्ये दिसणाऱ्या Apply for PMAY-U 2.0 या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
  • त्या नंतर ओपन होणाऱ्या पेज वरील सूचना वाचून त्या खाली दिसणाऱ्या Click to Proceed वरती क्लिक करायचे आहे.
  • नवीन पेजवर तुम्हला या योजनेसाठी आवश्यक असणारे कागदपत्रे कोणती आहेत हे दाखवण्यात आलेले आहे, त्या खाली तुम्हला Proceed या बटनावर क्लिक करायचे आहे.
  • नवीन पेज वर तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात का हे चेक करायचे आहे, त्यासाठी तुम्हाला या पेजवर तुमचे राज्य, तुमचे वार्षिक उत्पन्न आणि कुठल्या योजनेसाठी तुम्ही अर्ज करू इच्छिता हे निवडायचे आहे.
  • या अगोदर तुम्ही कुठल्या योजनेचा लाभ घेतला आहे का यासाठी होय किंवा नाही वर टिक करायचे आहे.
  • Eligibility Check या बटनावर क्लिक करायचे आहे.
  • पुढील पेज वर तुम्हाला तुमचा आधार नंबर आणि आधार प्रमाणे आपले नाव टाकायचे आहे, आणि खालील चेक बॉक्स वरती टिक करून Generate OTP या बटनावर क्लिक करायचे आहे.
  • Generate OTP या बटनावर क्लिक करताच तुमच्या आधार लिंक मोबाईल नंबर वर एक otp येयील to तुम्हाला पुढील पेज वर भरून  तुमचा तुमचा अर्ज पूर्ण करायचा आहे.

PMAY-U 2.0 Track Application/PMAY-U 2.0 केलेल्या अर्जाची स्थिती तपासा 

PMAY-U 2.0 साठी अर्ज केला असेल तर आपल्या अर्जाची स्थिती काय आहे हे तुम्ही शासनाच्या वेबसाईट वर जावून चेक करू शकता. त्यासाठी तुम्हाला PMAY-U 2.0 च्या अधिकृत वेबसाईट वर जावे लागेल. आणि मेन्यू बर मध्ये दिसणाऱ्या Track Application या पर्यायावर क्लिक करायचे आहे. Track Application वर क्लिक करताच तुमच्या समोर नवीन पेज वर तीन पर्याय दिसतील.

  • Beneficiary Code/ Application No
  • Name as per Aadhaar and Aadhaar No
  • Mobile No. and Name as per Aadhaar

या तीन पर्याय मधून एक पर्याय निवडायचा आहे. पहिल्या पर्याय मध्ये तुम्हाला तुमच्या कडील अप्लिकेशन नंबर किंवा बेनेसरी कोड टाकायचा आहे. आणि समोरील कॅप्चा कोड भरून SHOW बटनावर क्लिक करायचे आहे. तुमच्या समोर तुमच्या अर्जाची स्थिती ओपन होईल.

दुसऱ्या पर्यायामध्ये तुम्हाला तुम्हाला तुमचा आधार नंबर आणि आधार प्रमाणे नाव टाकून त्या खालील कॅप्चा कोड टाकायचा आहे, आणि SHOW बटनावर क्लिक करायचे आहे. तुमच्या अर्जाची स्थिती दिसेल.

तिसर्या पर्यायामध्ये तुमचा मोबाईल नंबर तुमचे नाव आणि जन्म तारीख इत्यादी टाकून खालील कॅप्चा कोड टाकून SHOW बटनावर क्लिक करायचे आहे.

अशा पद्धतीने तुम्ही केलेल्या अर्जाची स्थिती तपासू शकता, आणि आपल्या अर्जाची माहिती घेवू शकता.

सारांश

Pradhan Mantri Awas Yojna Apply Online: पंतप्रधान आवास 2.0 योजनेसाठी ऑनलाईन अर्ज सुरु या लेखात आपण  पंतप्रधान आवास 2.0 Urban या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा या बद्दल सविस्तर माहिती पहिली. शासनाच्या वेब पोर्टल वर जावून Pradhan Mantri Awas Yojna साठी ऑनलाईन अर्ज करू शकता. तसेच केलेल्या अर्जाची स्थिती ( Track Application ) कशी तपासायची या बद्दल माहिती पहिली. माहिती आवडली असल्यास आपल्या मित्रांना शेअर करा.

हे ही वाचा :-

अशाच नवीन माहितीसाठी आमच्या सोशल मिडिया ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक ला टच करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top