PM Kisan New Update: प्रधान मंत्री किसान सन्मान निधीचे बंद पडलेले हप्ते आता सुरु करता येणार

pradhan mantri kisan samman nidhi news देशातील शेतकऱ्यांसाठी चालविल्या जाणाऱ्या ‘प्रधान मंत्री किसान सन्मान निधी’ या योजनेचा लाभ घेत असलेल्या लाभार्थ्यांचे बंद पडलेले हप्ते आता सुरु करता येणार आहे. भारत सरकारच्या PM Kisan पोर्टलवर नवीन पर्याय शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.

नवीन पर्यायानुसार बँक पासबुक त्रुटी, मोबाईल नंबर त्रुटी किंवा इतर कारणाने बंद पडलेले हप्ते नवीन अपडेट नुसार पुन्हा चालू करता येणार आहे. कशे चालू करायचे या बद्दल माहिती आपण खाली पाहणार आहोत.

Pradhan Mantri Kisan Samman Nidhi News Update/ प्रधान मंत्री किसान सम्मान निधी नवीन अपडेट

भारत सरकारने सुरु केलेल्या pradhan mantri kisan samman nidhi अंतर्गत देशातील शेतकऱ्यांना रु. 2000 सम्मान निधी सुरु केलेला आहे. पात्र शेतकऱ्याला वर्षाला रु. 6,000 एवढा निधी टप्या – टप्याने मिळतो. देशातील शेतकरी या योजनेचा लाभ उचलत आहे. या योजने अंतर्गत सरळ निधी लाभार्थी शेतकऱ्याच्या खात्या मध्ये वर्ग केला जातो.

सम्मान निधीचे चालू असलेले हप्ते त्रुटी किंवा काही कारणास्तव बंद पडल्यास शेतकऱ्यांना या योजनेपासून मिळणाऱ्या लाभापासून वंचित राहावे लागत होते. पण आता शानाकडून PM Kisan पोर्टलवर नवीन पर्याय सुरु करून देण्यात आला आहे. Update of Missing Beneficiary Information या पर्यायावर जाऊन ज्यांचे हप्ते बंद पडले आहेत, अशे शेतकरी आपली नोंदणी नव्याने अपडेट करू शकतात.

PM Kisan चे बंद पडलेले हप्ते पुन्हा सुरु करण्याची संधी

pradhan mantri kisan samman nidhi योजनेचा लाभ घेत असलेल्या शेतकऱ्यांचे हप्ते बँक लिंकिंग, e-KYC किंवा आधार त्रुटीमुळे बंद पडले असेल तर आता ते हप्ते सुरु करण्यात येणार आहे. भारत सरकारच्या कृषी मंत्रालयाने PM Kisan पोर्टलवर नवीन अपडेट उपलब्ध करून दिले आहे. या पोर्टलवर जाऊन ज्या शेतकऱ्यांचे हप्ते बंद पडले आहेत ते पुन्हा सुरु करता येतात.

या संबंधी काय प्रोसेस आहे ती आपण खाली पाहणार आहोत.

PM Kisan samman nidhi बंद पडलेले हप्ते सुरु करण्याची प्रोसेस

सर्वप्रथम शासनाच्या PM Kisan https://pmkisan.gov.in पोर्टलवर जायचे आहे. या पोर्टल वरती आल्यानंतर खाली फार्मर कॉर्नर वरती यायचे आहे. खाली आल्या नंतर दिसणाऱ्या इतर पर्याया मध्ये उजव्या कोपऱ्यात दिसणाऱ्या Update of Missing Beneficiary Information या पर्ययला कल्क करायचे आहे.

  • Update of Missing Beneficiary Information या पर्ययला क्लिक करून लाभार्थ्याने आपला आधार नंबर टाकायचा आहे.
  • त्यानंतर दिलेला कॅप्चा टाकून सर्च या बटनावर क्लिक करायचे आहे.
  • Search बटनावर क्लिक केल्या नंतर लाभार्थ्यांचा पूर्ण डाटा ओपन होईल, या मध्ये लाभार्थ्यांचे आधार, बँक पासबुक आणि इतर माहिती दिसेल ती चेक करून चुकलेली माहिती किंवा पासबुक बदल करून दुरुस्ती करता येते.
  • नवीन दुरुस्ती करून लाभार्थ्याने e-KYC करून घ्यायची आहे.

वरील सगळी प्रोसेस पूर्ण करून लाभार्थी आपला बंद पडलेला हप्ता नव्याने चालू करू शकतात.

PM Kisan Update Mobile Number

शासनाच्या PM Kisan पोर्टलवर बंद पडलेल्या हप्ते पुन्हा चालू करण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या पर्याय बरोबरच (Update of Missing Beneficiary Information) मोबाईल नंबर बदलण्यासाठी एक नवीन पर्याय दिला आहे.

Update Mobile Number वर जाऊन Registration Number आणि कॅप्चा कोड टाकून लाभार्थी आपला पहिला मोबाईल नंबर चेक करून बदलू शकता. आधार नंबर टाकून Registration Number मिळवता येतो.

सारांश

PM Kisan New Update: प्रधान मंत्री किसान सन्मान निधीचे बंद पडलेले हप्ते आता सुरु करता येणार या लेखात आपण pradhan mantri kisan samman nidhi योजने अंतर्गत लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांचे हप्ते बंद पडल्यास ते PM Kisan New Update नुसार कसे अपडेट करायचे या बद्दल संपूर्ण माहिती पहिली.

Pradhan Mantri Kisan Samman Nidhi News या blog माहिती नुसार PM Kisan या पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आलेल्या Update of Missing Beneficiary Information या पर्यायावर जाऊन  त्रुटीमुळे किंवा इतर कारणाने बंद पडलेलं हप्ते नव्याने सुरु करता येतात.

हे हि वाचा;-

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top