pradhan mantri ujjwala yojana 2.0 प्रधानमंत्री उज्ज्वला योजने अंतर्गत देशातील आर्थिक दुर्बल घटकातील कुटुंबांना सबसिडीवर गॅस सिलिंडर वाटप करण्यात आले होते. बऱ्याच कुटुंबांनी या योजनेचा लाभ घेतला होता. पण काही कुटुंब या योजनेपासून वंचित राहिली होती, विशेषतः नवीन विभक्त कुटुंब.
पण आता नवीन pradhan mantri ujjwala yojana 2.0 नुसार वंचित राहिलेल्या सर्व कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. या योजनेची पात्रता, कागदपत्रे आणि अर्ज कसा करायचा या बद्दल आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत.
Pradhanmantri Ujjwala Yojna 2.0
भारत सरकारने धूर मुक्त सवयंपाक घर या अंतर्गत देशातील आर्थिक दुर्बल कुटुंबांना pradhan mantri ujjwala yojana अंतर्गत मोफत गॅस सिलेंडर वाटप करण्याचा संकल्प केला होता. महिलांच्या आरोग्याचे संरक्षण आणि ग्रामीण भागात स्वच्छ इंधनाचा वापर वाढावा या उद्देशाने pradhan mantri ujjwala yojana 2.0 (PMUY) मध्ये सुरु केली होती.
आता याच योजनेचा दुसरा टप्पा सुरु केला आहे. pradhan mantri ujjwala yojana 2.0 योजने अंतर्गत वंचित कुटुंबांना या योजनेतून पुन्हा लाभ देण्यात येणार आहे.
प्रधानमंत्री उज्ज्वला योजना 2.0 अंतर्गत मिळणारा लाभ
- लाभार्थ्याला नवीन गॅस कनेक्शन.
- गॅस सिलिंडर व शेगडी मोफत.
- सबसिडीची रक्कम थेट बँक खात्यात.
- ग्रामीण महिलांना स्वयंपाकासाठी सुरक्षित पर्याय.
पात्रता
pradhan mantri ujjwala yojana 2.0 या योजने अंतर्गत लाभ घेण्यासाठी खालील पात्रता आवश्यक आहे.
- लाभार्थी महिला हि भारतीय नागरिक असावी.
- अर्जदार लाभार्थी हि दारिद्रय रेषेखालील (BPL ) यादी मधील असावा.
- पहिले कोणाच्या नावावर गॅस कनेक्शन नसावे.
- अर्जदाराकडे बँक पासबुक असावे.
कागदपत्रे
- लाभार्थ्यांचे आधार कार्ड.
- रेशन कार्ड.
- बँक पासबुक.
- पासपोर्ट साईज फोटो.
- पत्त्याचा पुरावा (Voter ID, Ration Card इ.).
pradhan mantri ujjwala yojana 2.0 ऑनलाईन अर्ज कसा करायचा
पंप्रधान उज्ज्वला योजना 2.0 अंतर्गत अर्ज करण्यासाठी शासनाने पोर्टल मिर्माण करून दिले आहे https://www.pmuy.gov.in या पोर्टलवर जावून ऑनलाईन अर्ज कसा करायचा हे आपण पाहणार आहोत.
- प्रथमतः ‘पेट्रोलियम आणि प्राकृतिक गॅस मंत्रालय’ विभागाच्या https://www.pmuy.gov.in वेबसाईटवर जावे लागेल.
- वेबसाईटवर आल्या नंतर Apply for New Ujjwala PMUY Connection या पर्यायावर क्लिक करायची आहे.
- ओपेन होणाऱ्या नवीन पेजवर Click Here to apply for New PMUY Connection वरती क्लिक करायचे आहे.
- त्या नंतर समोर बॉक्स मध्ये दिसणाऱ्या कंपनी मधून तुम्हाला ज्या कंपनीचे गॅस कनेक्शन घ्यायचे आहे ती कंपनी निवाडाची आहे.
- कंपनी निवडल्या नंतर नवीन पेजवर Ujjwala Beneficiary Connection गॅस या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
- खालील टिक मार्क वर क्लिक करून जवळचा Distributor निवडायचा आहे. त्यानंतर NEXT या बटनावर क्लिक करून पुढे ओपन होणार फॉर्म पूर्ण भरून वर सांगितलेले कागदपत्रे अपलोड करायची आहेत.
सगळी कागदपत्र अपलोड करून फॉर्म सबमिट करायचा आहे, फॉर्म सबमिट झाल्या नंतर Distributor तुम्हाला कॉल करतील किंवा तुम्हाला त्यांच्याशी संपर्क करावा लागेल.
सारांश
pradhan mantri ujjwala yojana 2.0: प्रधानमंत्री उज्ज्वला योजने अंतर्गत नवीन कनेक्शन सुरु या लेखात आपण भारत सरकारच्या नव्याने सुरु केलेल्या पंप्रधान उज्ज्वला योजना 2.0 या योजने बद्दल माहिती पहिली. या योजनेतून वंचित असलेल्या कुटुंबांना नवीन योजनेतून गॅस कनेक्शन वाटप करण्यात करण्यात येणार आहे.
pradhan mantri ujjwala yojana 2.0 अंतर्गत महिलांना मोफत गॅस कनेक्शन, एक सिलिंडर व शेगडी मोफत दिल्या जात आहे. अर्ज प्रक्रिया, पात्रता, आवश्यक कागदपत्रे व ऑनलाइन रजिस्ट्रेशनची संपूर्ण माहिती येथे जाणून घेण्यासाठी BLOG पूर्ण वाचा.
माहिती आवडली असल्यास आपल्या मित्रांना व नातेवाईकांना शेअर करा.
हे हि वाचा:-
- Gas KYC Online: गॅस सबसिडी मिळविण्यासाठी e KYC करा मोबाईल फोन वरून
- PHH Ration Card: PHH रेशन कार्ड म्हणजे काय? संपूर्ण माहिती आणि फायदे
- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना e-KYC : मोबाईल वरून e-KYC, संपूर्ण प्रोसेस
- Pmjay kyc: आयुष्यमान भारत कार्ड Online KYC मोबाईल वरून
- Ration Card e-KYC Online: मोबाईलवरून काही मिनिटांत पूर्ण करा रेशन कार्डची ई-केवायसी
- कापूस सोयाबीन अनुदान E Kyc: कापूस सोयाबीन अनुदान E Kyc करा मोबाइल वरून
अशाच नवीन माहितीसाठी आमच्या सोशल मीडिया ग्रुपमध्ये सामील होण्यासाठी खालील सोशल मीडिया आयकॉन वर क्लिक करा.